Tuesday, 10 January 2023

अजब तुझे


 

सुप्रभा


 

जिंदगी गुलजार हैं

 








एक तरी वाडी अनुभवावी... - कोकणातील शांत, निवांत वाडीमधील नेचर कॅम्प

 एक तरी वाडी अनुभवावी...

- कोकणातील शांत, निवांत वाडीमधील नेचर कॅम्प 


धकाधकीपासून दूर असलेलं निसर्गरम्य गाव..

तिथं ना कसली धावपळ, ना कोणते टेन्शन..

नैसर्गिक गरम पाण्यात मनसोक्त डुंबायचं..

माशांसाठी गळ टाकून काठावर बसायचं..

तिथल्याच बांबूपासून विविध वस्तू बनवायच्या..

स्थानिकांनी बनवलेलं चविष्ट जेवण चाखायचं..

आणि

संपन्न निसर्ग अनुभवायचा, तो समजून घ्यायचा..!


शुक्रवार - शनिवार - रविवार;

दि. २७ ते २९ जानेवारी २०२३


ठिकाण =

राजवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

(केवळ १६ जागा)


नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/EcoCamp/Konkan


निसर्ग दर्शन:

* विश्वाचा अफाट पसारा दाखवणारे आकाशदर्शन

* संपन्न निसर्ग, जैवविविधता समजून देणारा ट्रेल

* उष्ण पाण्याचे झरे, जुन्या जलव्यवस्था यांचा अनुभव

* कातळशिल्प, प्राचीन मंदिरांच्या वारशाची झलक

* कोकणातल्या शांत वाडीत राहण्याचा सुखद अनुभव


अधिक माहितीसाठी : 

९५४५३५०८६२/ ९९२२०६३६२१

bhavatal@gmail.com


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्यावतीने 11 आणि 12 जानेवारीला शिबीराचे आयोजन.

 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्यावतीने

11 आणि 12 जानेवारीला शिबीराचे आयोजन.

            मुंबई, दि.9: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्यावतीने दि. 11 आणि 12 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे दोन दिवसीय विभागीय खंडपीठाच्या शिबीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीर बैठकीत आयोगाकडे आलेल्या विविध विषयांवरील तक्रारींची सुनावणी होणार आहे. उदघाटन सत्रात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मार्गदर्शन करणार आहेत.


            मानवाधिकारांचे अधिक चांगले संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तक्रारकर्त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण व्हावे, या उद्देशाने अशा शिबीर बैठका आणि खुली सुनावणी आयोगाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. 11 आणि 12 रोजी तक्रारींची सुनावणी होणार असल्याची माहिती गृह विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.   



मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आढावा

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आढावा

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती द्यावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. ९: वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            मंत्रालयात झालेल्या या बैठकीस म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पायाभूत सुविधा प्रकल्प वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.


            यावेळी श्री. डिग्गीकर यांनी प्रकल्पांच्या कामांबाबत सादरीकरण केले. वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग येथे एकूण १५९ बीडीडी चाळी आहेत. वरळी येथील १२१ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात ३४ चाळी आणि २५२० गाळ्यांचा पुनर्विकास होत आहे, तर नायगाव येथील ४२ पैकी पहिल्या टप्प्यात २३ चाळी आणि १८२४ गाळ्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. ना.म. जोशी मार्ग येथील ३२ चाळींपैकी पहिल्या टप्प्यात १६ चाळी आणि १२८० गाळ्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे.


            बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात रहिवाशांना विविध सोयी मिळणार असून त्यामध्ये व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, सिनिअर सिटीजन प्लाझा या सुविधांचा अंतर्भाव असणार आहे.


            यावेळी पात्र निवासी झोपडीधारकांना सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २६९ चौरस फूटाऐवजी ३०० चौरस फूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. चाळ परिसरातील पात्र निवासी झोपडीधारकांना संक्रमण शिबिराऐवजी मागणी केल्यास दरमहा भाडे देण्याच्या पर्यायास यावेळी मंजुरी देण्यात आली.


००००

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत

जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून कंत्राटदारांना नवी कामे द्यावीत

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. ९ : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तत्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची ६३ वी बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात पार पडली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु.पां.कुशारे आदी उपस्थित होते.


            महाराष्ट्र जलसंधारण महामंडळांतर्गत ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या जलसंधारण योजनांची मुख्य कामे, इतर बांधकामांच्या २२५ निविदांना सर्वसाधारण मान्यता देण्याच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रस्तावांचा उच्चस्तरीय समितीने अभ्यास करुन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.


आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामे घ्यावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            जलसंधारणाच्या कामांची राज्यात जिथे आवश्यकता आहे, अशा ठिकाणी जलसंधारण महामंडळाने कामे घेण्यावर भर देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.


महामंडळाकडे प्राप्त झालेल्या ८५ कंत्राटदारांच्या नोंदणीस मान्यता देतानाच यापुढे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्तरावर निकष तपासून कंत्राटदार नोंदणीला मान्यता देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


००००



Featured post

Lakshvedhi