Friday, 30 December 2022

राज्य राखीव पोलीस बल केंद्राबाबत जानेवारी महिन्यात बैठक

 राज्य राखीव पोलीस बल केंद्राबाबत जानेवारी महिन्यात बैठक


- देवेंद्र फडणवीस


            नागपूर, दि. 30 : राज्य राखीव पोलीस बलाचे केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव किंवा आणि अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे सुरू करण्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासोबत जानेवारी महिन्यात बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.


            विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारत राखीव बटालियनचे दोन केंद्र राज्यासाठी मंजूर झाले होते. त्यातील एक केंद्र कुसडगाव येथे करण्याची मागणी होती. मात्र असे केंद्र नक्षलवाद प्रभावी क्षेत्रासाठी असल्याने ते अकोला येथे करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात जळगाव जिल्ह्यातील वरणगाव (ता. भुसावळ) येथे राज्य राखीव पोलीस बल केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. नंतर हे केंद्र पुन्हा कुसडगाव येथे हलविण्याचा निर्णय झाला. सध्या हे केंद्र वरणगाव येथे करण्याचे प्रस्तावित असले तरी दोन्ही लोकप्रतिनिधी यांची भावना लक्षात घेऊन लवकरच संयुक्त बैठक घेऊन सर्वसमावेशक मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.


            या चर्चेत सदस्य संजय सावकारे यांनी सहभाग घेतला.

शासन पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पाठीशी

 शासन पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पाठीशी

- मंत्री सुधीर मुनगंटीवार


            नागपूर, दि. 30 : पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पाठीशी शासन आहे. मत्स्य व्यवसाय विभाग हा रोजगार क्षमता असणारा विभाग असून या विभाला गती देण्यात येईल, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.


            पर्ससीन मासेमारीवर बंदी असतानाही अनेक मच्छीमार बेकायदेशीररित्या मासेमारी करीत असल्याबाबत प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित केला होता.


            श्री. मुनगंटीवार म्हणाले की, 120 हॉर्सवर स्पीड बोटीला परवानगी दिली आहे. 720 किमी असलेल्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या 7 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांत गस्ती बोटी उपलब्ध आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन २ स्पीड बोटी उपलब्ध करून देण्यात येतील, असेही ते म्हणाले.


            अशा पद्धतीने पारंपरिक मासेमारी करणाच्या आड कोणी येत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. शासन पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या सोबत सकारात्मक दृष्टीने आहे. मत्स्य व्यवसाय विभाग हा रोजगार क्षमता असणारा विभाग आहे या संदर्भात राजाच्या व केंद्राच्या योजनांबाबत दिल्लीत बैठक घेऊन या 7 जिल्ह्यातील प्रतिनिधीना बोलावण्यात येईल. 12 नॉटिकलच्या पुढे मासेमारी करण्यास बंदी आहे. याबाबत समिती गठीत केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत एकच धोरण तयार करण्यात येईल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            यावेळी सदस्य भास्कर जाधव, महेश बालदी यांनी सहभाग घेतला होता.

मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

 मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            नागपूर, दि.30 ; मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आता शक्य होणार आहे. पुनर्विकास नियमातील फेरबदल सूचना काढल्यामुळे आता लाखो लोकांच्या इमारतींशी संबधीत प्रलंबीत विषय यामुळे मार्गी लागला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.


            म्हाडाने पुनर्बांधणी केलेल्या ३८९ इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. धोकादायक किंवा किमान ३० वर्ष जुन्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन मालकी तत्वावर ३०० चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिकेत करण्यात येणार असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.


            म्हाडाने पुनर्बांधणी केलेल्या ३८९ इमारतींच्या पुनर्विकासाच्या नियमावलीत स्वतंत्र तरतुदींना मान्यता देण्यात आली आहे. बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत नविन तरतूद करण्यात आली आहे. या फेरबदलाची अधिसूचना काढण्यात आली आहे.


            मुंबई शहरातील उपकर प्राप्त इमारतींचा म्हाडाने विकास करुन त्यातील गाळे भाडे तत्वावर रहिवासासाठी देण्यात आले होते. या 389 इमारतीत असणारे सुमारे 30 हजार पेक्षा जास्त सदनिका आणि सुमारे दिड लाख रहिवासी 180 ते 225 चौ. फु. किंवा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकेत राहत होते. म्हाडाने या पुनर्रचित केलेल्या असल्याने या इमारती उपकरप्राप्त मध्ये येत नव्हत्या. त्यामुळे या इमारतींचा विकास करण्यासाठी विकासक पुढे येत नव्हते. तसेच इतर तांत्रिक अडचणींमुळे पुनर्वसन शक्य होत नव्हता. आता नव्या नियमांच्या तरतुदीमुळे धोकादायक किंवा किमान 30 वर्ष जुन्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन मालकी तत्वावर 300 चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिकेत करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


००००


MAA तुझे सलाम

 जैसे ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी की माताजी हीराबेन के देहावसान की खबर लगी... लगा कि आज तो उनका पार्थिव शरीर कंही अंतिम दर्शन के लिए रखा जायेगा..... फिर जैसा अन्य राजनेताओं के परिवार जन की मृत्यु में होता है राजसी तरीके से अंतिम संस्कार होगा...... पूरा अंतिम संस्कार का कार्यक्रम सियासी हो जाएगा लेकिन ऐसा सोचते सोचते टेलीविज़न ऑन..... किया तो देखा मोदीजी और उनके भाई सहित परिवार जन तो माँ के पार्थिव शरीर को बिल्कुल सामान्य तरीके से लेकर... श्मशान पंहुच चुके है मतलब इतनी सामान्यता तो मध्यम आम लोगो के परिवारों में नही देखने को नही मिली। चित्र देखकर विश्वास नही होता कि *विश्व के इतने बड़े नेता अपनी माँ को सामान्य.....बाँस और घास की अर्थी को कंधा देकर चल रहे है इतनी सादगी ....* वाकई भूतों न भविष्यति ऐसे अद्भुत व्यक्तित्व को जन्म देने वाली माँ को .....शत शत नमन.... *विनम्र श्रद्धांजलि*

साहिबजादे’ यांना महाराष्ट्राचा मानाचा सलाम.

 साहिबजादे’ यांना महाराष्ट्राचा मानाचा सलाम.

            महाराष्ट्र आणि पंजाब यांचे शतकांचे नाते आहे. हे नातं आत्मतीयेचे आहे. आंतरीक असे हे नाते आहे. संत नामदेव भारत भ्रमण करीत असताना पंजाबच्या घुमानमध्ये पोहोचले आणि तिथलेच झालेत. त्यांच्या वाणीत, कर्तृत्वात ऐवढे बळ होते. त्यांच्या अभंगांचा अंर्तभाव ‘गुरू ग्रंथ साहेब’ मध्ये आहे. दशमेश (दहावे)गुरू गुरू गोविंदसिंग यांना ही महाराष्ट्रात यावेसे वाटले. नांदेडमध्ये त्यांच्या नावे ‘सचखंड श्री हुजूर साहेब’ असे शीख अनुयायांचे महत्वाचे तीर्थस्थळ आहे. हा काही योगायोग नसावा. अस व्हायचं असेल. म्हणूनच ते झालं.


महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये असणारे साधर्म्य हे अनेक विषयात दिसून येते. स्वातंत्र्य पूर्व काळात महाराष्ट्र आणि पंजाब यांनी कित्येक क्रांतिकारांना जन्म दिला. देशाचे नेतृत्व केले. भगतसिंगासोबत हसत हसत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचे. महाराष्ट्र आणि पंजाब चे ऋणानुबंध किती विशेष आहे. दोन्ही राज्यातील बहुसंख्य जनता ही कृषीनिगडीत व्यवस्थेवर आधारीत आहे. पंजाब रेंजीमेंट आणि मराठा रेजीमेंटच्या शौर्य गाथा आपण ऐकतच मोठे झालेलो आहोत. देशाच्या मातीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महाराष्ट्र आणि पंजाब हे शौर्य आणि धाडस, आणि अध्यात्माची परंपरा जोपासणारे राज्य आहेत.


       महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये साहसाचे बाळकडू त्यांना घरूनच पाजले जाते. माता गुजरी आणि गुरू तेगबहादूर यांच्याकडून अदम्य साहसाचे संस्कार गुरू गोविंदसिंग यांना मिळाले आणि पूढे हाच वारसा त्यांच्या ‘साहिबजादे’ बाबा अजीत सिंग, बाबा जुझार सिंग तसेच ‘छोटया साहिबजादे ’ साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांना मिळाला. अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद त्यासाठी शेवटपर्यंत निसंकोचपणे शौर्याने उभे राहणे या साहिबजादयांचे आचरण ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ अशीच आहे. त्यांना 26 डिसेंबर ला हौतात्म आले.


       त्यांच्या या दिवसाला ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचे गुरू गोविंदसिंग यांच्याशी असलेले नातं बघता या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नवी दिल्ली येथे आयोजित उपक्रमास मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये येथे आमंत्रित करण्यात आले. 


       या ऐतिहासिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले संबोधन उपस्थितांच्या ह्दयात भिडले असल्याच्या भावना उपस्थितांच्या चेह-यावर दिसत होत्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या कार्यक्रमातील उपस्थिती आणि संबोधनामुळे पंजाब आणि महाराष्ट्राच्या नात्यात नव्याने दृढता निर्माण होईल.


       अवघ्या 9 वर्ष आणि 6 वर्षांचे वय असणारे छोटे साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांनी अदम्य शौर्याचे परिचय देऊन आपले प्राण अर्पण करून स्वाभिमानाने शहादत दिली. त्यांच्यामध्ये गुरू गोविंदसिंग यांचे रक्त असल्यामुळे या साहबजादे यांनी अदम्य धाडस दाखविले. त्यांच्या या धाडसाला महाराष्ट्राच्या जनतेचा सलाम.


 

भवताल

 


भवताल"चा ताजा अंक प्रसिद्ध


नमस्कार.

"भवताल" मासिकाचा डिसेंबर २०२२ चा अंक प्रसिद्ध झाला.

त्याचे मुखपृष्ठ, पीडीएफ स्वरूपातील अंक आणि नावनोंदणीची लिंक सोबत देत आहोत.

अंक वाचावा. मुखपष्ठ आणि लिंक इतरांसोबत शेअर करावी, ही विनंती.


विशेष आकर्षण:

• रेंगाळणारा पाऊस, हवामानबदल परिषद आणि भवतालातील उपाय

• वन्यप्राण्यांच्या शिकारीबाबत चर्चा...

- शिकार आवश्यक

- म्हणून संरक्षण महत्त्वाचे

• कारवीवर विशेस प्रकाश टाकणारे फॅक्ट्स - फिगर्स

• "भवताल"च्या सडे-पठारे विशेषांकाची झलक

• पर्यावरणविषयक घडामोडींचे इको-अपडेट्स आणि इतर काही...


अंक मिळवण्यासाठी नावनोंदणीची लिंक=

https://bhavatal.com/connectus/masik-nondani-information

हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली.

            नागपूर, दि. ३० :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            “श्रीमती हिराबेन यांच्यासारख्या धर्मानुरागी, सात्विक व्यक्तिमत्त्वाचे निधन ही समाजाची हानी आहे. नियतीचक्रामुळे आज श्रीमती मोदी यांची इहलोकीची यात्रा संपली. ही बाब पुत्र म्हणून प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यासाठी एक आघात आहे. आईचा वियोग ही दुःखाची परिसीमा असते. प्रधानमंत्री श्री. मोदी यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मातृतुल्य श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” अशी शोकभावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

0

मोदीजींना घडवणाऱ्या हिराबेनजीसारख्यामातांमुळे आपला देश महान

हिराबेनजी मोदी यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            नागपूर, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिराबांना श्रद्धांजली वाहिली.


उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोक संदेशात म्हणतात, “हिराबा १०० वर्षे सेवाव्रती आणि संघर्षमय जीवन जगल्या. त्यातूनही त्यांनी मा. मोदीजींवर जे संस्कार केले त्यातून देशाला कणखर, प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्व मिळाले”.


            “वयाच्या १०० व्या वर्षीही कुठलेही काम बुद्धीने आणि मनाच्या शुद्धीने करण्याची शिकवण त्या देतात यावरून त्यांचा कणखरपणा दिसून येतो. श्री. मोदीजी आणि हिराबा यांचे आत्मीय नाते होते. जेव्हा जेव्हा मोदीजी त्यांना भेटायला जायचे तेव्हा तेव्हा दृढ आणि तेवढ्याच प्रेमळ हिराबा आपणा सर्वांना पाहायला मिळायच्या. अशा मातांमुळे आपला देश महान आहे. आई सोबत नसणे हे जगातील सर्वात मोठे दुःख असते, श्री. मोदीजी, त्यांचे कुटुंब व स्नेही यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.     

.

हिराबांच्या स्वर्गवासाने एक महान जीवन हरपले

- सुधीर मुनगंटीवार

            नागपूर, दि. ३० : "विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीच नव्हे तर संपूर्ण देशाचीच ही हानी आहे. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास हिराबांच्या निधनाने आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असते. हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळो. संपूर्ण देश मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. स्वर्गीय हिराबांना ईश्वर सद्गती देवो. या महान मातेला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.", अशा शब्दात वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्री हिराबांचा वाटा मोठा आहे. ‘काम करो बुद्धी से, जीवन जीयो शुद्धीसे’ ही त्यांनी दिलेली शिकवण प्रधानमंत्री मोदी यांनी मोलाने जपली”, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी स्वर्गीय हिराबांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi