Tuesday, 1 November 2022

निवेदन


 

शिकवण


 

ओवाळी भाऊराया


 

सुप्रभात







 

कामगार कल्याण,शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना*

 📚 

महाराष्ट्र शासन-कामगार विभाग

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

*शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना*

‼️

*अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख *३०/११/२०२२* 

नोव्हेंबर अखेर.


🌼 *कोणासाठी आहे*❓

 माहे जुन व डिसेंबरच्या पगारातून ₹१२/- इतका कामगार कल्याण निधी कपात होणा -या कामगारांच्या कुटुंबातील  विद्यार्थ्यांना.


🍁 *नियम अटी*

📗 फक्त कामगारांच्या पाल्यांसाठी (मुले व मुली)यांच्यासाठी ही योजना आहे.

📙 अर्ज करण्यास मागील वर्षिच्या परीक्षेत कमित कमी ६०% आवश्यक आहेत. 

📘 ९ पास अर्थात *१० वी पास पासुन ते पुढील सर्व शिक्षणाकरिता अर्ज करता येईल. * *प्रत्येक वर्षी अर्ज करता येतो.*

📕फक्त शासनामान्य अभ्यासक्रम व शासनमान्य संस्थेच्या प्रवेश घेतलेल्यांनीच अर्ज करावा.

📗 मुक्त विद्यापीठ, बहिस्थ अभ्यासक्रम, दूरस्थ शिक्षण, अप्रेंटिशिप, स्टायपंड घेणारांनी अर्ज करु नये. *अर्ज बाद करण्यात येईल.* ‼️

📘 अर्ज भरताना सर्व *ओरिजनल,*  👈🏼 *मुळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत, झेराॅक्स कागदपत्रे अपलोड केल्यास *अर्ज बाद केला जाईल.* ❌

📙अर्ज भरताना एकुण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी तपशिल टाकायलाच हवा. ज्यांना ग्रेड, ग्रेड पाॅइंट किंवा इतर प्रकारे गुण दिले असतील तर त्यांनी काॅलेजकडुन गुणांची टक्केवारी व गुण आणि स्वताच्या नावाच्या तपशिलासह पत्र प्राप्त करुन ते पत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. *important* 

📘दिव्यांगांना ६०% गुणांची अट असणार नाही. तो विद्यार्थी फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.

📗 सदर शिष्यवृत्ती  मंडळाची तरतुद व मेरिट या निकषावर दिली जाणार आहे.

📙 अपूर्ण माहितीचा आणि चुकीची माहितीचा अर्ज online भरलेस *अर्ज बाद केला जाईल.* याची जबाबदारी कामगार व त्याच्या पाल्याची आहे.

📕online विहित नमुण्यातिल अर्ज भरावा लागेल.


🍁

*शिष्यवृत्ती रक्कम*

🔅१० वी ते १२ वी.- ₹.२०००/-

🔅पदवी - ₹. २५००/-

🔅पदवीत्तोर पदवी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- ₹.३०००/-

🔅 व्यावसायिक पदविका (डिप्लोमा) - ₹ २५००/-

🔅व्यावसायिक पदवी - ₹. ५०००/-

🔅पी. एच. डी. नोंदणी ₹.५०००/-

🔅 mpsc prelim उत्तीर्ण ₹. ५०००/-

🔅UPSC Preliminary उत्तीर्ण - ₹. ८०००/-

🔅 परदेशात शिकत असेल तर ₹. ५० हजार. (परदेश शिष्यवृत्तीचा स्वतंत्र online अर्ज भरावा.)


🍁 *आवश्यक कागदपत्रे व पूर्वतयारी* 

🔸कामगाराचा फोटो

🔸कामगाराची जुन २२ पे स्लिप (त्यात रु. १२ कपात असायलाच हवी.) 

🔸कामगाराचे आधार कार्ड दोन्ही बाजू. पत्यासह. 

🔸कामगाराचा *LIN number* (जो कंपनीत मिळेल.) मागील वर्षिचा वापरून पहावा अन्यथा कंपनीतून किंवा खाली दिलेल्या फोनवर संपर्क करुन मिळवावा.

🔸कामगाराचा मोबाइल नंबर.(तो कंपनीत लेबर फंड भरताना नोंदविला आहे.)

🔸विद्यार्थ्याचा फोटो

🔸विद्यार्थ्याचे आधार कार्ड

🔸विद्यार्थ्याची मागील वर्षाची *मार्कशिट* कलर ओरिजनल काॅपि.

🔸सेमिस्टर पध्दत असेल तर मागील वर्षातील दोन सेमिस्टरचे २ निकालपत्रके. हे दोन्ही कागद *एकाच ठिकाणी स्कॅन* करावे किंवा दोघांची एकच पिडिएफ बनवावी.

🔸 निकालपत्रावर *ग्रेड किंवा ग्रेड पाॅइंट* असतील तर टक्केवारीत रूपांतर केलेले तपशिलासह *काॅलेजचे प्रमाणपत्र.* 👈🏼

🔸 शैक्षणिक खंड असेल तर तहसीलदार प्रमाणपत्र. Gap फक्त १ वर्षाचा असावा. सर्वसाधारण शिष्यवृत्ती साठी.

🔸मुलाचे चालु वर्षी प्रवेश घेतलेले *बोनाफाइड* *(२२-२३ उल्लेख असलेले)*

🔸कामगाराचा सन *२१-२२* चे उत्पन्न अॅसेसमेन्ट ईयर *२२-२३* दाखविणारा *फाॅर्म नंबर १६* किंवा कारखान्याने दिलेले वार्षिक उत्पन्न लिहिलेले सहि शिक्यासह पत्र/ दाखला.

(फाॅर्म १६ ला एकापेक्षा जास्त कागद असतात. ते सर्व कागद एकत्र म्हणजे एकाच फाइलमध्ये पिडिएफ करुन ती पिडिएफ अपलोड करावी लागेल.)

🔸 *बँक पासबुक* ओरिजनल क्लियर काॅपि. त्यावरील अकाउंट नंबर व आय एफ सी कोड *स्पष्ट असावा.*

🔅 अर्जदार विद्यार्थ्याचे स्वयंघोषणापत्र.- याचा फाॅरमॅट मिळविण्यासाठी गुगलवर सर्च करावे. फाॅरमॅटची प्रिंट काढून तो भरुन अपलोड करावा. अर्जदाराचा फोटो आवश्य लावावा.


🔸रेशन कार्ड दोनही साईड अपलोड करावी./ आधार कार्ड कामगार पालक व  अर्जदाराचे

🔸कामगाराने व्हि.आर.एस. घेतली असेल तर त्याबाबतचे सर्टिफिकेट.

🔸अर्जदार मुलगा मुलगी /दिव्यांग असेल तर त्याचे सर्टिफिकेटे ओरिजनल प्रत.

🛑 *(वरील सर्व कागदपत्रे "ओरिजनल कागदाची क्लियर स्कॅन काॅपी  असावीत". अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.)* 


🛑 याव्यतिरिक्त स्वतःच्या मनाने कोणतेही इतर कागद लावु नयेत./ अपलोड करु नयेत. *अर्ज बाद करण्यात येईल.* 

🍁


*Online भरावयाची फी*

▪️Member Rs. १५/- कामगार

▪️Family Rs. २०/- प्रत्येकी

(Online credit / debit card,  ATM card, UPI/  फोन पे गुगल पे वरुन भरता येते.)


👉🏼 घरातील म्हणजे कुटुंबातील सर्व मेंबरची नावे कामगाराने त्याच्या Labour login मध्ये प्रोफाईलवर add update family member मध्ये टाकावीत. व membership फी भरावी म्हणजे भविष्यात अनेक योजनांचा लाभ त्या त्या व्यक्तीस घेता येणार आहे.

ज्यांची नावे मागील वर्षी add केली असतील त्यांनी डायरेक्ट यावर्षिची membership नोंदवावी.

👆🏼👆🏼👆🏼👆🏼

*(सर्व कागदपत्रे ओरिजनलची स्कॅन काॅपि अपलोड करावी. झेराॅक्स अपलोड केल्यास अर्ज नामंजूर होईल.)*


📕 *अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३०/११/२०२२* नोव्हेंबर अखेर.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

अर्ज online वर करावयाचा आहे.

त्या साठी सर्वप्रथम केंद्राची मेंबरशिप घ्यावी

🍁

*ONLINE PROCESS* *कशी करायची?*

🍁‼️

*वेबसाईट*

public.mlwb.in


🔅आपल्या कंपनीतून कामगाराने स्वतःचा LIN number आणि नोंदविलेला mobile number मिळवावा. (लिन नंबर हा युजर आय डी व मोबाइल नंबर हा पासवर्ड आहे. मागील वर्षिचा लिन नंबर सुरुवातीस टाकून पहावा. नसेल तर कंपनीकडून नविन क्रमांक घ्यावा.)

🔅यात

District - पुणे 

Division - पुणे

Circle - पुणे गटकार्यालय

Center - का.क.भवन संभाजीनगर

अशा नोंदी कराव्यात.

🔅पुढिल योजना मिळविण्यास आपले सर्व कुटुंबियांस member (सभासद)  करावे.

🔅माहिती भरून स्वत: कामगार व त्या सर्वांचे online पैसे भरावेत. 

🔅प्रत्येकाचे आधार कार्ड व कामगाराची जुन २२ ची पेस्लिप / अस्थापनाचा दाखला अपलोड करावे. 

🔅membership केल्यानंतर का.क.केंद्र  यांचेकडून त्याचे approval येते.त्यानंतरच अर्ज भरता येतो.


🔅 *Membership* option मध्ये *Application For Schemes* याची निवड करुन "सर्वसाधारण शिष्यवृत्ती /General scholarship योजनेचा" अर्ज भरावा.

🔅त्यातील आवश्यक सर्व माहिती भरावी.

🔅कागदपत्रे पिडिएफ / जेपिजी फाइल्स अपलोड कराव्यात.

🔅अर्ज पुन्हा एकदा, *दोनदा तपासून submit* करावा.

🔅 *विद्यार्थ्यांचा वर्ग लिहिताना सर्वसाधारण अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील फरक समजून घ्यावा. कारण यानुसारच शिष्यवृत्ती रक्कम ठरणार आहे.*

🔅‼️चुकिचा अकाउंट नंबर व आय एफ सी कोड टाकल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल.🔴‼️❌ यासाठी चारवेळा तपासावे. Bank अकाउंट चालु आहे का याची अगोदर खात्री करूनच लिहावा. *(बँकेचे व्यवहार ३-६ महिणे नसतील तर अकाउंट बंद केले जाते.)*

🛑 तयार झालेल्या अर्जाची प्रिंट करुन घ्यावी.

🙏🏼

*महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ*

साथ साथ


 

Shiv shiv


 

Featured post

Lakshvedhi