Monday, 3 October 2022

वैद्यकीय उपकरणांना परवाना

 वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक

            मुंबई दि २:- वैद्यकीय उपकरण संबंधितचा नविन कायदा जानेवारी, २०१८ अस्तित्वात आला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे, ऑक्टोबर २०२२ बंधनकारक करण्यात आले आहे; असे, जी.बी.ब्याळे, सह आयुक्त (औषधे) बृहन्मुंबई विभाग, अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे.

            रुग्णांच्या उपचारासाठी व रोगनिदानासाठी वैद्यकीय उपकरणांचा वापर केला जातो. यापूर्वी ३७ वैद्यकीय उपकरणांचे नियमन केले जात होते. आता नव्या कादयानुसार सुमारे २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित केले जाणार आहे. वैद्रयकीय उपकरणे अधिनियम (Medical Device Rules) २०१७ नुसार १ ऑक्टोबर २०२२ पासून वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना असणे आवश्यक आहे. (परवाना घेणे सक्तीचे करण्यात आले आहे).

नेब्युलायझर, डिजीटल थर्मामिटर, रक्तदाबाचे मॉनिटर, ग्लुकोमिटर या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणा-या वैद्यकीय उपकरणांना औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या अंतर्गत औषधे या वर्गवारीत गणले जाणार आहे.

            यापूर्वी फक्त कार्डियाक स्टेंट, हार्ट व्हॉल्व्ह, ऑर्थोपेडिक्स इम्प्लांट, यासारख्या वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी उत्पादन परवाने दिली जात होते. याव्यतिरिक्त इतर काही वैद्यकीय उपकरणांची (जसे ब्लड प्रेशर मशीन, एमआरआय आणि एक्स-रे मशीन) मोठया प्रमाणात विनापरवाना आणि नियंत्रणाशिवाय उत्पादन विक्री होत होती.

            मात्र २०१७ च्या नव्या नियमानुसार २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित करण्यात येणार आहे. कमी जोखीम आणि जास्त जोखमीच्या उपकरणांना अ आणि ब श्रेणीत ठेवले आहे. यामध्ये १ हजार ६४ प्रकारची उपकरणे आहेत. त्यांना १ ऑक्टोबरपर्यंत परवाने घ्यावे लागतील, असे अन्न व औषध विभागाने कळविले आहे.


000


घर घ्या घर.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'नारेडेकोच्या प्रदर्शनाचा समारोपसर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात

-  मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन

            मुंबई दि. 2 : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध  योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी  खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यातयाकरिता बांधकाम क्षेत्राने पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

       नारेडेको’ म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो 2022   मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज समारोप झालात्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक नारेडेकोचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप रुणवाल,  नारेडेकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानीराजन भालेकर,अभय चांडक आदी  मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला त्याच्या हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. 'सर्वांसाठी घरे: या संकल्पनेतून ही योजना सामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही शहरी आणि ग्रामीण भागात या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केलेही योजना राबविण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. शासनाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध सवलती दिल्या जातात.

बांधकाम क्षेत्र हे कृषी क्षेत्रानंतर रोजगार निर्मिती करणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र ओळखले जाते. हे खूप मोठे क्षेत्र असून यावर लक्ष देण्याची गरज आहे.त्यामुळे या क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करूअशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी  दिली.

            सण उत्सव काळात अहोरात्र पोलीस आपल्या कर्तव्य बजावत असतातविकासकाने घरे बांधत असताना एक सामाजिक बांधीलकी म्हणून पोलिसांना घरे द्यावीत असे सांगून पोलिसांसाठी घरांना प्राधान्य देण्याकरिता योजना तयार करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

       मुंबईत दरवर्षी 50 कि.मी. चे रस्ते बनवले जात होते. हे सरकार आल्यानंतर आता दरवर्षी 500 कि.मी. चे रस्ते तयार केले जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीया कामासाठी 550 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत उर्वरित रस्त्याचे संपूर्ण कॉक्रेंटीकरण होईल. तसेच दोन ते अडीच वर्षात एकही रस्ता डांबराचा आढळून येणार नसून संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यापुढे मुंबईतील रस्त्यावर एकही खड्डा आढळून येणार नाही असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

            शासनामार्फत मुंबई आणि महानगरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्राचा होणारा विकास लक्षात घेऊन त्याभागात गृहनिर्माण प्रकल्प देखील झपाट्याने उभे राहत आहेत. राज्यभरात बांधकाम क्षेत्रात सुसूत्रता यावी आणि शहरांच्या विकासात एकत्रितपणा यावायासाठी नगरविकास विभागाने युनिफाइड डीसीपीआर राज्यभर लागू केला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी मोकळ्या जागेवरील नव्या बांधकांमाऐवजी जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढे आले पाहिजे. मुंबईच्या धर्तीवर समुह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) व झोपडपट्टी पुनर्विकास (SRA) नियमावली मध्ये ठाणे तसेच राज्यातील इतर शहरासाठी लागू केल्यामुळे जुन्या शहराच्या भागाचा पुनर्विकास आता अधिक चांगल्या प्रकारे व नियोजनबध्द पध्दतीने करता येईल. सुधारित नियमांमुळे पुनर्विकासासाठी अधिक एफएसआय उपलब्ध होणार आहे. अनेक किचकट नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे प्रकल्प विकासक आणि रहिवासी या दोघांसाठीही व्यवहार्य ठरतील त्यातून पुनर्विकासाला गती मिळेलअसा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

गृहनिर्माण क्षेत्राबरोबरच पायाभूत आणि दळणवळण प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहे. सद्यस्थिती अनेक माठ्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.

            मुंबईतील वांद्रे कुर्ला काँम्प्लेक्स येथील जिओ कन्वेक्शन सेंटर येथे नारेडेको महाराष्ट्र होमेथॉन एक्पो 2022 आयोजन करण्यात आले होते. रिअल इस्टेट संबंधित असलेल्या या प्रदर्शनामध्ये 125 हून अधिक  स्टॉल्स होते,  मुंबईसह पुणेनाशिक आणि विदर्भातील विकासक या प्रर्दशनात सहभागी झाले होते.

000

 

 


Sunday, 2 October 2022

फुलांची कला



 

लावा खोबरेल तेल आरोग्यासाठी

 *हाता-पायाच्या तळव्यावरखो (कोकोनट) तेल लावा आणि अनेक रोगांपासून मुक्त व्हा*


१. एका सौ.शेट्टी या महिलेने लिहिले की, माझ्या आजोबांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले, त्याना पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही ना दात दुःखी नाही. 

माझे आजोबा सांगायचे,ते मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याचा सल्ला दिला होता. आणि हाच तेंव्हापासून आजोबांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत होता. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.


२. मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की, लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती.  जेव्हापासून तो हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याची ही प्रक्रिया सुरू ठेवली, तेव्हा १ महिन्यानंतर माझ्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे नियमित झाला. 


३.  उडुपी येथील एक व्यापारी गृहस्थ श्री. कामथ सुट्टीसाठी केरळला गेले असता, तिथल्या हॉटेलमध्ये ते झोपू शकले नाही. म्हणून बाहेर चालू लागले.   तेव्हा रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकऱ्याने विचारले, "काय झाले आहे, असे का भटकता?" 

ते म्हणाले "मला झोप येत नाही!"  

तो हसला आणि म्हणाला, "तुमचा कडे नारळ तेल आहे का?"  

मी म्हणालो "हो". 

तो म्हणाला, "मग त्याने आपल्या हाता-पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा, शांत झोप येईल." 

आता श्री कामथ स्वस्थ आणि सामान्य आहेत.


४. रात्री झोपण्यापूर्वी हाता-पायाना नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो .


५. पोटाचा त्रास- हाता-पायाच्या तळांवर नारळाच्या तेलाने मालिश केल्यानंतर पोटाचा त्रास 2 दिवसात बरे होते.


६. लहान मुलांच्या पायाच्या तळव्यांवर नारळ तेलाने मालिश देखील केल्यास, त्यांना खूप आनंदी आणि निरोगी ठेवते.


७. पाय दुखणे/मुंग्या येणे- रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळव्यांची मालिश करण्यास सुरवात करावे.  या प्रक्रियेमुळे पायांच्या दुखण्यापासून व मुंग्या येणे यापासून बराच आराम मिळातो.


८. पाय नेहमी सुजलेले आणि चालत असताना थकवा येत असेल, तर,  रात्री झोपायला जाण्यापूर्वी पायांच्या तळांवर नारळ तेलाने मालिशची ही प्रक्रिया सुरू करावी. फक्त दोन दिवसातच, पायांची सूज अदृश्य होते.


९. पायाला जळजळ होत असल्यास आपल्या  हाता-पायाचा तळव्यांवर नारळाचे तेल लावायला सुरुवात करा. आठव्या दिवसापासून वेदना कमी होतील आणि परत जळजळ कधीच होणार नाही.


१०. थायरॉईड रोगाने पाय सर्व वेळ दुखत असल्यास झोपायच्या आधी पायाच्या तळांवर नारळ तेलाची मालिश करा आणि स्वस्थ व्हा.


११. पायाला फोड असल्यास रात्री झोपायच्या आधी चार दिवस नारळ तेलाने पायातील तळांची मालिश करावे. बराच मोठा फरक दिसेल.


१२. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने झोपेत घोरणे प्रतिबंधित करते.


१३. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने गुडघ्यात वेदना कमी होतात.  


१४. रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेलाची हाता-पायाचा तळव्यावरील मालिश  या पद्धतीने पाठीचा, मणक्याचा त्रास कमी होतो.


दक्षिण भारतीय रहस्य खालीलप्रमाणे आहेः


एकमात्र रहस्य आणि प्रत्येकासाठी खूप सोपे, आहे.

झोपेच्या वेळी पायांच्या तळांवर मालिश करणे सुरू करा आणि त्याच प्रकारे मुलांचा सुद्धा पायावर मालिश करा आयुष्यभर याचा एक नित्य कर्म बनवा नंतर निसर्गाची परिपूर्णता पहा तुम्ही आयुष्यभर अनेक आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.


प्राचीन चिनी औषधानुसार पायाखाली सुमारे 100 एक्युप्रेशर पॉइंट असतात.

ते अवयव दाबून आणि मालिश करून अनेक आजार देखील बरे होतात. याला - *फूट रिफ्लेक्सोलॉजी*

असं म्हणतात.  ही फुट मालिश थेरपी संपूर्ण जगभरात वापरली जाते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.* 

*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक* 

*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*


(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन ९२ ७१ ६६९ ६६९ या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)


*संजीवनी आर्टलाईफ वेलनेस सेंटरला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* 


https://sanjeevani-artlife-wellness.business.site

आरोग्य शिबिर

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्विवि धान भवनात अभिवादन

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचा शुभारंभ

 

 

         मुंबई, दि.2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आलीयाप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राह नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार  गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

            याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवतउप सचिव विलास आठवलेसंचालकवि..पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारीनिलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी  कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

            भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यांचे औचित्य साधून विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या पुढाकाराने विधानमंडळ सचिवालयात आरोग्य तपासणी  मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेविधानसभा अध्यक्ष यांनी दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 पर्यंत चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन केलेमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी  कर्मचारी कल्याण केंद्रामार्फत स्माआरोग्य हेल्थकेअर संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहेयावेळी प्रधान सचिवराजेंन्द्र भागवतकल्याण केंद्राचे सरचिटणीसमनिष पाटीलराजपत्रित अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्षअजय अग्रवालस्माआरोग्याचे संचालक अरुण रामचंद्रडॉ.सुजाता अरुण यावेळी उपस्थित होतेउपसचिव विलास आठवले.वि.यांनी प्रथम तपासणी केलीविधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांनी सर्वांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि "उत्तम कार्यक्षमतेसाठी उत्तम आरोग्याची उपासना करावी," असे आवाहन केले.

 

सायकल रॅली




 

पर्यावरण जागृती सायकल

 गांधी जयंती : मुंबई - देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ

 

            मुंबई दि.2 'प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे' ('प्रगति से प्रकृति तक') या मुंबई ते देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी राजभवन मुंबई येथून झेंडी दाखवून रवाना केले. 

            67- वर्षीय ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि हिमालय पर्यावरण अध्ययन व संवर्धन संस्थेचे संस्थापक डॉ अनिल प्रकाश जोशी या सायकल यात्रेचे नेतृत्व करीत आहे. राज्यपालांच्या हस्ते रॅलीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले, तसेच सहभागी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.  

            सायकल यात्रेच्या आरंभ प्रसंगी अभिनेत्री हिमानी शिवपुरीअभिनेते हेमंत पांडेइंडियन आयडॉल विजेते गायक पवनदीप राजनउद्योजक अनंत सिंघानियाराज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अब्राहम मथाई आदी उपस्थित होते. 

            पर्यावरण तज्ज्ञांच्या मते आज जग ज्वालामुखीवर उभे आहे. भारतीय तत्वज्ञानात निसर्गाच्या पाच तत्वांचा समतोल साधण्यावर भर दिला आहे. प्रत्येक शांतीमंत्रांमध्ये पृथ्वीवनस्पती इत्यादी तत्वांच्या   शांतीचा विचार मांडला आहे. विकास साधताना पर्यावरणाचा समतोल साधला गेल्यास शाश्वत विकास साधता येईल असे राज्यपालांनी सांगितले. पर्यावरण तज्ज्ञ डॉ अनिल जोशी यांची यात्रा समुद्राकडून हिमालयाकडे अशी उन्नत मार्गाने जाणार असून त्यातून जनजागृती होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. 

            'प्रगतीकडून पर्यावरणाकडेया सायकल यात्रेचा आरंभ देशातील सर्वात प्रगतिशील शहर असलेल्या मुंबई येथे होत असून देशाची पर्यावरण राजधानी असलेल्या उत्तराखंड येथे तिचा समारोप होणार आहेअसे डॉ अनिल जोशी यांनी सांगितले. दरवर्षी जगात नवनवी विध्वंसक वादळे निर्माण होत आहेत. मनुष्याला विकास हवा आहेरस्ते देखील हवे आहेत. अश्यावेळी विकास साधताना पर्यावरणाकडे नव्या दृष्टीने पाहावे लागेल असे डॉ अनिल जोशी यांनी सांगितले. 

            कोविड सारख्या जागतिक आपत्तीच्या मुळाशी कोठेतरी निसर्गाप्रती माणसाचे चुकीचे वर्तन कारणीभूत आहे असे त्यांनी सांगितले.  भावी पिढ्यांसाठी आपण घरे  बांधीत आहोतआर्थिक तरतूद करीत आहोतपरंतु मूलभूत गरजा असलेल्या पाणीजमीनहवाजंगल याचा विचार करीत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.  भारतात पृथ्वीजलअग्नी यांची पूजा केली जाते त्यामुळे भारतच जगाला पर्यावरण रक्षणाचा विचार देऊ शकतो असे त्यांनी  सांगितले. सकल घरगुती उत्पन्न  (GDP) या ऐवजी सकल पर्यावरण उत्पन्न (GEP) या माध्यमातून विकास मोजला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

            सायकल यात्रेमध्ये 15 युवक युवती सहभागी झाले असून ही यात्रा ४० दिवसांमध्ये दहा हजार लोकांशी संपर्क साधेल व एक कोटी लोकांना निसर्ग रक्षणाचा संदेश देत २००० किमी अंतर पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.  


Featured post

Lakshvedhi