Friday, 2 September 2022

प्रदर्शन

 फोर स्टोरीज’ कला प्रदर्शनास उपमुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही. कलाकारांच्या चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते. साहित्य, कला यातून साकारलेले समृद्ध विचार आपण कधीच खोडू शकत नाही. ते कायमस्वरूपी मनात राहतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मुंबईत जहांगीर कला दालनात भरविण्यात आलेल्या ‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी माजी आमदार राज पुरोहित, माजी खासदार विजय दर्डा, सौ. अमृता फडणवीस, कलाकार जयश्री भल्ला, रचना दर्डा, बीना ठकरार, लोकमत वृत्तपत्र मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, अनेक कलाकार उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कला, संस्कृती, चालीरिती यावरून त्या त्या राज्याची ओळख असते. चित्रप्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते की, किती समृद्ध विचाराने ह्या चित्रकथा रेखाटलेल्या आहेत. कलाकार आपल्या कलेतून कला, संस्कृती जपत असतो. त्याची किंमत करता येत नाही. याठिकाणी चार कलाकारांनी एकत्रित या प्रदर्शनात विविध चित्रकथा रेखाटलेल्या आहेत.

            माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह वास्तुविशारद जयश्री भल्ला, छायाचित्रकार रचना दर्डा आणि बीना ठकरार यांनी रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

            माजी खासदार श्री.दर्डा म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दि. ५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

Thursday, 1 September 2022

हासासासासा

 *मालवणी टॅलेंट* मास्तर : मुलांनो मला सांगा राम वनवासाला कधी निघाले 😚                      

बंडया : मास्तर राम वनवासाक 9:15 वाजता निघाले 😙

मास्तर : 9:15 वाजता ते कसे...😗

बंड्या : *वनवास* यो शब्द उलटो वाचा.....😎

मास्तर शाळा सोडून वनवासाच्या तयारीत लागलेत

😉😀😆😜😆😜🤣🤣😅😅

N joy नो ग्राफी


पुरस्कार

 दिलखुलास’ कार्यक्रमात ‘बाल साहित्य पुरस्कार’ विजेत्या

डॉ. संगीता बर्वे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 01 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘बाल साहित्य पुरस्कार’ विजेत्या डॉ. संगीता बर्वे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 2 सप्टेंबर, शनिवार दि. 3 सप्टेंबर आणि सोमवार दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            प्रसिद्ध लेखिका, कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमीचा ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांचा आजवरचा लेखन प्रवास त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेतला आहे. बाल साहित्याचा प्रवाह विस्तारण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. कविता, गीतलेखन, अनुवाद, बालसाहित्य आदी विषयांची सविस्तर माहिती, लेखिका डॉ. संगीता बर्वे यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

000000

सुखकर्ता दुःखहर्ता पोलिस

 


द्यावा आशीर्वाद बाप्पा


 

इंडो अमेरिेका संबंध

 अमेरिकेच्या जॉर्जीया स्टेटचे सिनेटर जॉन ऑसोफ यांच्या

नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट


उभय देशांतील औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध वृद्धींगत करण्यासंदर्भात चर्चा

            मुंबई, दि. 1 : युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेच्या जॉर्जीया स्टेटचे (सिनेटर) वरिष्ठ प्रतिनिधीगृहाचे सदस्य जॉन ऑसोफ (Mr. Jon Osoff), वाणिज्य दूत माईक हॅन्की (Mr. Mike Hankey) यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उभय देशांतील औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध वृद्धींगत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी युएसएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी झालेल्या चर्चेत राज्याशी संबधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात वैद्यकीय शिक्षणासाठी जॉर्जीया येथे भारतातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या गणेश उत्सवानिमित्ताने राज्यात असलेल्या उत्साहाच्या वातावरणात होत असलेल्या स्वागताने आपण भारावून गेल्याचेही यु. एस. ए. च्या प्रतिनिधींनी सांगितले. राज्यातील औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थिती या सर्व बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.

             उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख केला. ते म्हणाले, मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. देशाच्या आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणूनही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र हे उत्पादन, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रात अग्रगण्य आहे. भारतात येत असलेली अमेरिकन गुंतवणूक ही राज्यात मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्यातील ऊर्जा क्षेत्र, कृषी तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अमेरिकन उद्योजकांना उपमुख्यमंत्र्यांनी आमंत्रित केले.

शैक्षाणिक क्षेत्राविषयी

            नव्या शैक्षणिक धोरणानुसार संशोधन आणि कौशल्य विकास यावर भर देण्यात येत आहे. राज्यात असलेल्या अनेक शैक्षाणिक संस्था आणि त्यातून तयार होत असलेले कुशल मनुष्यबळ यासाठी संधी निर्माण होणे आवश्यक आहे. सॉफ्टवेअर निर्मिती आणि निर्यातीमध्येही राज्य आघाडीवर आहे. तंत्रज्ञान संशोधन या क्षेत्रात काम करण्यासाठी इतर देशांचे सहकार्य घेण्यात येत आहे. नुकताच कॉर्नेल विद्यापीठासोबत यासंदर्भात करार झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

कृषी क्षेत्राविषयी

            राज्यासमोरील आव्हाने आणि संधी या विषयावर चर्चेदरम्यान बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले, वातावरणीय बदल हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. अवेळी येणाऱ्या पावसामुळे कृषी क्षेत्राला संकटाचा सामना करावा लागतो तर देशांतील कुशल मनुष्यबळ हे बलस्थान आहे.

            कृषी आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर कृषी क्षेत्रासाठी केला जाणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योगावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. फलोत्पादन क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणार आहे. अणुऊर्जा निर्मितीबरोबरच सौर ऊर्जेचा वापर वाढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यावेळी उपस्थित होते.

**



Featured post

Lakshvedhi