Saturday, 6 August 2022

नाच मेरी bulbul


 

 मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत.

केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश.

            मुंबई, दि. 6- अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री,मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे 

            शासनाने दि. 4 ऑगस्ट ,2022 च्या आदेशान्वये मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना दिले आहेत. हे अधिकार केवळ अर्धन्यायीक [ क्वासी जुडीशियल ] प्रकरणे दाखल करून घेण्याचे व त्यावर सुनावणी घेण्याबाबतचे अधिकार आहेत. मा. उच्च न्यायालयात चालू असणाऱ्या एका जनहित याचिकेमुळे हे अधिकार तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेले आहेत.

            अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडे आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे असे म्हणणे दिशाभूल करणारे व पूर्णत: चुकीचे आहे. ज्यावेळेस पूर्ण मंत्रीमंडळ अस्तित्वात असते तेव्हाही आवश्यकतेनुसार काही अर्धन्यायिक सुनावण्यांचे अधिकार सचिवांना किंवा अन्य वरिष्ठ अधिका-यांना दिले जातात. उदा. सहकार, महसूल, ग्रामविकास किंवा सामान्य प्रशासन, इ. त्यामुळे हा निर्णय आताच घेण्यात आला आहे असे म्हणणे चूक आहे.


 


 



 गोंदिया जिल्ह्यात महिलेवरील घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

महिला आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी करणार फास्ट ट्रॅकवर तपास


 


            मुंबई, दि 6 - गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 


            हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

            यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पिडीत महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत



 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्लीत आगमन

मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांचा दिल्ली दौरा.

        नवी दिल्ली,६- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर असून आज त्यांचे येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

         आगमनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या 'आजादी का अमृतमहोत्सव' राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच, उद्या रविवार (दि.७) रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या ७ व्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

         भंडारा व गोंदिया येथील महिला अत्याचार प्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


                                          

 राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतगैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई.

            मुंबई, दि. 6 - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.आयोगाने याविषयी ट्विटही केले आहे.


 

Featured post

Lakshvedhi