Wednesday, 3 August 2022

सदस्य संख्या

 मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा

            मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे ती खालील प्रमाणे :-

            ३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या ६५ इतकी तर कमाल संख्या ८५ इतकी असेल. ३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या ८५ इतकी तर कमाल संख्या ११५ इतकी असेल. ६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

            ३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक व २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी असेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या १६१ इतकी तर कमाल संख्या १७५ इतकी असेल.


 



आपत्ती व्यवस्थापान

 मुंबईतील आपत्ती व्यवस्थापनाविषयीसंचालक महेश नार्वेकर यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. महेश नार्वेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक दिपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        गुरुवार, दि. 4 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

           मुंबईसारख्या महानगरात आपत्ती व्यवस्थापन हे आव्हानात्मक काम आहे. महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे कार्य कसे करतो, पावसाळ्यातील नियोजन, मुंबई वातावरण कृती आराखडा, आपत्ती मदत कक्षाचे कामकाज, समुद्र किनारपट्टीलगत पर्यटकांनी घ्यावयाची काळजी, मदत आणि सूचनांसाठी समाजमाध्यमांचा वापर, जुन्या इमारतीतील नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, पावसाळ्यातील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापनात लोकसहभागाचे महत्व आदी विषयांबाबत सविस्तर माहिती संचालक श्री. नार्वेकर यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.

000000



 राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

     मुंबई, दि.३ : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ पथके तैनात आहेत.

           नांदेड- १, गडचिरोली- १ अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) दोन तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती

      राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३१४ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

                      राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.


00000


फिटनेस ?डान्स कर ग dance


 

निर धूर चूल

 महाप्रितकडून सुधारित निर्धूर चूल मोफत

वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 2 : निर्धुर चूलीचे मोफत वाटप महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कडून राज्यात करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांनी मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे.

            पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत. रहिवाशी अनुसूचित जातीचा असावा, गरिबी रेषेखाली असावा आणि एलपीजी गॅस कनेक्शन नसावे. सर्व जिल्ह्यातील इच्छूक रहिवाश्यांनी दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा.

          अधिक माहितीसाठी https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

००००

 





Good morning


 

Featured post

Lakshvedhi