Sunday, 3 July 2022



 बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाब्यातील पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन.

            मुंबई, दि. ३ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनासाठी विधानभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सकाळी कुलाब्याच्या रिगल चौकातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार सर्वश्री दीपक केसरकर, दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, भरतशेठ गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, प्रसाद लाड, डॉ. संजय कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

विधानसभा

 विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड

            मुंबई, दिनांक ३ - विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर यांची निवड झाल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले. श्री.नार्वेकर यांच्या बाजूने एकूण 164 सदस्यांनी मतदान केले.

राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै 2022 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आज अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर आणि राजन प्रभाकर साळवी या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यानंतर झालेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले.

            यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदस्य अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी ॲड नार्वेकर यांना अध्यक्षांच्या आसनावर नेऊन स्थानापन्न केले.

            तत्पूर्वी आज सकाळी 11 वाजता वंदे मातरम् ने विशेष अधिवेशनाची सुरूवात झाली.


०००००

थोडीशी जरुरत है.

 


 






हसू का नकू

 😄😄 हसावे की रडावे 🤣🤣

माझा एक मित्र हेल्मेट घालून मोटरसायकल चालवत होता ..🏍️.


पोलिसांनी पकडले ..🤦🏻‍♂

गाडी बाजूला घ्या , याने गाडी बाजूला घेतली ...

पोलिसांनी लायसन्स मागितले ... 

याने दाखवले ..👍

पोलिसांनी पीयुसी दाखवायला सांगितले , 

याने दाखवले ...👍

पोलिसांनी गाडीची कागदपत्रे मागितली ,

याने दाखवले ...👍

पोलिसांनी विमा विचारला ,

याने दाखवले ....👍

सगळी कागदपत्रे योग्य होती हेल्मेट सुध्दा होते ...👍👍

.

.

पोलिसांनी तरी सुद्धा रु. ५००/- दंड केला ... 😱😱

.

मित्र म्हणाला का ??

माझी सगळी कागदपत्रे तर योग्य आहेत .. 

हेल्मेट घातलेलं आहे..

मग मी का दंड भरू !...😏😏


पोलिस म्हणाले ,

कागदपत्रे योग्य आहेत ,

पण कुठे ठेवलीत , 🤨

मित्र म्हणाला , प्लॅस्टिकच्या पिशवीत !🛢️


पोलिस म्हणाले , 

प्लॅस्टिकच्या पिशवीला बंदी आहे , 

माहीत नाही का ? 😠😠


*१ जुलै २०२२ पासुन प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी.*


🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

भरपूर हसाल, .... *पण ते पिशवीचं तेवढं लक्षात ठेवा.*

😂😂😂😂😂😂😂😂😂

काय ते गुर्जी... काय त्यो मार..

 *काय ती शाळा... काय ते गुर्जी... काय त्यो मार.... आरारारा खतरनाक...!*

     आमची मराठी शाळा विठ्ठल मंदिरात भरायची. दर शनिवारी शाळा शेणानं सारवायची, मग आमच्यात गट पाडायचं. शेण कुणी आणायचं तर ज्याला जनावरं कुठं आहेत हे माहीत आहे त्यानं, पाणी आणायला जरा तगडी पोरं आणि राहिलेल्यांनी जमीन लोटायची आणि सारवायची!शनिवारीच का तर सोमवार पर्यंत ती वाळायची!

    आमचं गुर्जी लै भारी हूतं. शाळेला उशीर झाला की अशा छड्या बसायच्या की आमी बोंबलायचो, गुर्जी छडी अशी मारायचं की हाताच्या खालनं आणि वरनं, कळ आशी यायची की बापजादे आठवायचे!ह्ये गुर्जी येवढं लवकर मरु देत असं आमी मनातल्या मनात म्हनायचो. तोंडावर बोलायची हिंमत आमच्यात कुठली!

    मराठी शाळा आणि शिक्षा हे ठरलेलं गणित!गुर्जी आदल्या दिवशी सांगायचं उद्या मी उजळणी घेणार आहे, तयारीत या. आमच्या अंगावर काटं उठायचं, कारण गुर्जी प्रश्न विचारायचं एक एक करुन, शेवटी जो उत्तर सांगल त्येनं न उत्तर दिलेल्यांस्नी नाक धरून गालावर मुस्काटात मारायची!गाल लालभडक व्हायचा!आमच्यातली कांही हूशार पोरं डाव काडायची!

     आनी कुनाला उत्तर न्हाय आलं तर दोन्ही हाताची बोटं एकमेकांत अडकवून खुट्टीला टांगायचं, आय आय आयचं डोस्कं आउट व्हायचं!आमी बोंबलायचो पन गुर्जी आसं खवळायचं आनी छडीनं टिरीवर हानायचं!

     ग्रुहपाठ ही आमाला पीडा वाटायची, तो न्हाय केला तर गुर्जी पायाचं आंगठं धरायला लावायचं!लय चुळबूळ केलीच तर पाठीवर छडी ठेवायचं, छडी पडली की पुना त्याच छडीनं टिर शेकायचं!अक्षरशः मला कुटलंबी काम सांगा परं शाळा नको असं वाटायचं!

    परं तवा गुर्जींची तक्रार घरात सांगायची सोय नव्हती, कारण बापच पुना फोकाटीनं फोकलून काडायचा, त्याचा आमच्या पेक्षा गुर्जीवर दांडगा ईस्वास!आम्ही हुतोच तसं गुनी!

   गुर्जी कदी कदी आमच्या मळ्याला सुद्दा यायचं, गुर्जी मळ्याला आलं की आमच्या पोटात गोळा उटायचा!आता आनी ह्यो बापाला काय सांगतुय का काय?म्हनून मी दडून बसायचो, पन आमचा बाप हमखास बोलवायचा, गुर्जीस्नी हारबुर आन, गुळ शेंगदानं दे आनी येवडं कमी का काय म्हनून आईला जेवान करायला सांग!आसं फर्मान सुटायचं. गुर्जी मळ्यातनं जाऊस्तवर माजी धाकधूक काय थांबायची न्हाय!गुर्जी येथेच्छ पाहूणचार घेऊन निघाले की माझा जीव भांड्यात पडायचा!

    एक मात्र नक्की माझ्या गुर्जीनी कदी दुस्कान माज्या बापाला माजी तक्रार सांगिटली न्हाय!

    मित्रांनो, विनोदाचा भाग सोडून द्या, पण आज आपण कोणते शिक्षण आपण घेत आहोत? *छडी लागे छमछम विद्या येई घमघम!* हे आपण विसरून गेलोय. आमची शाळा, आमचे शिक्षक, आमचे संस्कार आणि संस्कृती आपण विसरून जात आहोत. आज शिक्षकांनी मुलांना हात लावला तरी पालक आकाश पाताळ एक करतात हे चित्र बरोबर नाही!कुंभार मडके घडवत असताना बाहेरून लाकडी ठोकणीने ठोकत असतो तेव्हा आतून हाताला कपड्यांची गुंडाळी केलेला हात आधार देत असतो कारण मडके फुटता कामा नये, ही काळजी असते. आई वडील यांचा एक मुलगा/मुलगी शिकत असते परंतु शाळेतील सर्व मुलांचे पालकत्व शिक्षकांनी घेतलेले असते हे आम्ही विसरत आहोत. एखादी चुक मुलांनी केली तर आपण सहजच तुला शाळेत हेच शिकवले का?म्हणतो पण शाळा सहा सात तास असते बाकी तो तुमच्याच ताब्यात असतो हे आपण सोईस्कर पणे विसरतो.

    जसे डॉक्टर पेशंटचा देव असतो, तसाच विश्वास शिक्षक आणि शाळा यांच्यावर असायला हवा!,पटतंय की नाही?👌🏾👌🏾👍🏽👍🏽

हे राम हे राम

 रामायणाची एक कथा आहे. अगदी शेवटाकडची. रामाचं अवतार कार्य संपलेलं असतं म्हणून काळ त्यांना घ्यायला आलेला असतो. पण तो आयोध्येच्या बाहेरच थांबून राहतो. वेळ जात राहतो, पण काळ काही आयोध्येमध्ये प्रवेश करीत नाही. ब्रम्हदेवांना प्रश्न पडतो की काळ असं का करतोय. ते त्याला विचारतात. काळ म्हणतो, "हनुमान राखी राम, जाऊ कसा आत, जीवाचे गा भय, जीवाहून थोर!" ब्रम्हदेव काय समजायचे ते समजतात आणि रामाकडे जातात. ते रामाला सांगतात ''काळाचाही काळ तुझा हनुमान... वाटे लाव त्याला, खूप लोटलासे काळ"

प्रभू श्रीराम विचारांती, हनुमानाला जवळ बोलवतात. नकळतच त्यांचे डोळे भरून येतात. युगायुगाच्या या सोबत्याला सोडून जाणं त्यांच्यासाठी अवघड असणार असतं. हनुमानाला त्याच्या धन्याची ही अवस्था का झाली ते कळू शकत नाही. तो प्रश्न विचारायला तोंड उघडणार एवढ्या रामाच्या हातातली एक अंगठी जमिनीवर पडते आणि हळुहळू घरंगळत जमिनीतील एका फटीमध्ये नाहीशी होते. हनुमानाच्या हे लक्षात येत नाही. राम त्याला सांगतो, तेवढी अंगठी घेऊन ये हनुमंता! हनुमान निरखून बघतो, भेग चांगलीच खोल असते. तो सूक्ष्म रूप धारण करतो आणि त्या भेगेमध्ये प्रवेशतो. तो खोल खोल जात राहतो.

अगदी धरणीच्या अंतापर्यंत आता हा प्रवास होणार, असं वाटत असतानाच, हनुमान नागलोकांत येऊन पोहोचतो. तिथलं गूढ वातावरण अधिकच गूढ वाटू लागतं. भलाथोरला नागराज हनुमानासमोर येतो. तो हनुमानाला म्हणतो, त्या पलिकडच्या खोलीमध्ये पडली आहे अंगठी. दोघेही त्या खोलीकडे चालू लागतात. दाराखालच्या फटीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडू पाहत असतो. हनुमान खोलीचं दार ढकलतो. दाराखालून बाहेर पडणारा पिवळा प्रकाश आता दोघांच्याही अंगावर पडू लागतो. हनुमान समोर बघतो तर एकसारख्या असंख्य अंगठ्यांची एक रास समोर पडलेली असते. नागराज हनुमानाला म्हणतो, शोध तुझी अंगठी!

हनुमान पुढे होऊन एक एक अंगठी उचलू लागतो. प्रत्येक अंगठीमध्ये त्याला त्याचा राम जाणवत असतो! प्रत्येकीला रामाचा स्पर्श झालेला असतो. तो बुचकळ्यात पडतो आणि पाताळाच्या स्वाम्याकडे बघतो. तो हसत असतो. तो हनुमानाला सांगतो, "प्रवेशला काळ, संपला अवतार, रघुरामाचा!" हनुमान पळतच दारकडे जाऊ लागतो. नागराज त्याला थांबवतो "उशिर जाहला, त्याने गाठ्ली गा वेळ! कसा रे फसशी, युगांचा हा खेळ! मारुतीराया युगांयुगे हे असंच चाललं आहे. दरवेळेस आंगठी पडते आणि दरवेळेस तू फसतोस!"

हनुमानाचे डोळे पाणवतात. त्याच्या डोळ्यासमोर असतो तो त्याच्या प्रभूचा चेहरा. त्या चेहर्‍याला नमस्कार करून हनुमान म्हणतो "नाही फसणार पुढच्या वेळी, नाही सोडणार राम"

*श्रीराम, जय राम, जय जय राम* ।

Featured post

Lakshvedhi