Friday, 4 March 2022

 गुरुवारी महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल

महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परतले

            नवी दिल्ली, दि. ३ : गुरुवारी सात विशेष विमानांनी महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे गेल्या पाच दिवसात १२६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.  

                युद्धजन्य युक्रेन देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. देशातील अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांसह या मोहिमेंतर्गत २७ फेब्रुवारी २०२२च्या मध्यरात्रीपासून ते गुरुवार दुपारपर्यंत विशेष विमानांनी महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत.

थोडक्यात तपशील

               एयर इंडियाच्या विशेष विमानाने २७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील ५८ विद्यार्थी दाखल झाले .२८ फेब्रुवारीला दोन विशेष विमानांनी १४ तर १ मार्च रोजी तीन विमानांनी २६ विद्यार्थी दाखल झाले. २ मार्च रोजी ५ विमानांनी ६४ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले. तर ३ मार्च रोजी सर्वाधिक ७ विमानांनी ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले.    

महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परत

             युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीरकुमार बिस्वास यांच्या नेतृत्वाखाली २६ फेब्रुवारी २०२२ रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजिकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी या कक्षाद्वारे विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहेत.

मुंबई येथे सर्वाधिक ७८ विद्यार्थी परतले

             या विद्यार्थ्यांना राज्यातील महत्वाच्या विमानतळांद्वारे स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत सर्वाधिक ७८ विद्यार्थी मुंबईला परतले आहेत. पुणे येथे २३, नागपूर येथे १२ तर औरंगाबाद येथे ७ विद्यार्थी परतले आहेत. तीन विद्यार्थी नांदेडमार्गे मुंबई गेले तर दोन विद्यार्थी हैद्राबाद व एक विद्यार्थी गोव्याहून महाराष्ट्रात स्वगृही सुखरूप पोहचला आहे.

           महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

              दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे विमानतळाहून महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे. महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षामध्ये एकूण २५ अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.

              युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

                                                              0000

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीचा लाभ

उर्वरित 109 विद्यार्थ्यांनाही देण्याबाबत सकारात्मक

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 3 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी २०१९ व २०२० च्या जाहीर केलेल्या ४०० विद्यार्थ्यांच्या निवड यादीव्यतिरिक्त आमरण उपोषण सुरू केलेल्या १०९ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मकता दर्शवली असून त्याबाबत बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना माहिती दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संकेतस्थळावर प्रत्येकी २०० याप्रमाणे एकूण ४०० विद्यार्थ्याची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि उर्वरित १०९ विद्यार्थ्यांनी सरसकट फेलोशिप मिळणेबाबत आमरण उपोषण सुरु केले होते. श्री. मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून १ मार्च २०२२ रोजी केलेल्या टि्वटमध्ये या १०९ विद्यार्थ्यांच्या फेलोशिप बाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून शासन स्तरावरून आदेश प्राप्त झाल्याननंतर फेलोशिप देण्यात येणार असल्याचे सांगितले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१९ व २०२० सर्व विद्यार्थ्यांची सरसकट निवड करण्याबाबत केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने, कोविड-१९ ची परिस्थिती पाहता विशेष बाब म्हणून सहानुभूतीपूर्वक विद्यार्थ्याना फेलोशिप मिळणेबाबत शासन स्तरावरून उचित निर्णय घेण्याची विनंती शासनास बार्टीमार्फत करण्यात आली होती, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी दिली आहे.



 राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर

           

            नवी दिल्लीदि.  : महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी  केंद्रीय  आपत्ती  प्रतिसाद  निधीअंतर्गत राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.

               केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी  1,682.11 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली.

            महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशहिमाचल प्रदेशकर्नाटकतामिळनाडू आणि पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशामध्ये वर्ष 2021 मध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी  या पाच राज्यांना  1,664.25 कोटी  आणि  पुद्दुचेरीला 17.86 कोटी  रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे.

          केंद्राकडून मंजूर अतिरिक्त मदत केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मध्ये राज्यांसाठी जारी केलेल्या निधीपेक्षा अधिकचा निधी आहे.

 *🍁खूप छान विचार*🌺🙏

============

👏👏👏👏👏👏👏👏

*बैलांच्या अंगावर बसून जेंव्हा कावळा गोचीड खातो तेंव्हा बैलाला असे वाटते की कावळा आपल्यावर उपकार करीत आहे तो त्याला आपला सखा मित्र वाटतो आणि संपूर्ण शरीर त्याच्या स्वाधीन करून निवांतपणे पाय पसरवून पडून राहतो.*

              *तोच कावळा जेंव्हा गोचीड सोडून बैलाच्या मांसाचे लचके तोडायला लागतो.तेंव्हा मात्र बैल सावध होऊन आपल्या शिंगांने त्याला धुडकावून लावतो.खरेतर कावळा त्यावर उपकार वगेरे काही करीत नव्हता तो त्याच्या अंगावरचे गोचीड खाऊन आपले पोट भरत होता.जेंव्हा गोचीड संपले तेंव्हा त्याने बैलाचे मांस खायला सुरवात केली.*

              *मित्रांनो,असे कावळे आपल्या जीवनात ही पुष्कळ आहेत.त्यांना आपल्या मांसाचे लचके तोडण्याअगोदरच ओळखा आणि दूर करा.कारण,ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत मित्र बनण्याचे नाटक करीत असतात.त्यांना आपल्या विषयी सहानुभूती वगेरे काहीही नसते.*


      *पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,*

          *मरेपर्यत टिकतात..*

      *कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,*

          *इतिहास घडवतात..*

        

 *घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....*

 *""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....*                                        


*कुणाच्या नशिबाला हसू नये*

               *नशिब कुणी विकत घेत नाही*

       

*वेळेचे नेहमी भान ठेवावे*..

           *वाईट वेळ सांगून येत नाही*.!

 

*बुद्धी कितीही तल्लख असली तरी*

          *नशिबाशिवाय जिंकता येत नाही*, 

  

 *बिरबल बुद्धीवान होता तरीही तो*           

             *राजा होऊ शकला नाही*.!


     *समाधान ही अंत:करणाची* *सर्वात सुंदर संपत्ती आहे.*

*ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.*


*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल*

*हसण्यामगील दुःख*

*रागवण्या मागील प्रेम*

*आणि शांत रहाण्यामागील कारण*.

*कपडे* नाही 

माणसाचे *विचार*

*Branded* पाहिजे...!

*चुकीच्या* बाजूला उभा राहण्यापेक्षा 

*एकटं* उभं रहाणं केव्हाही चांगलं.

   *आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 


*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी लोकांच्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 


🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

Thursday, 3 March 2022

राशी गुणधर्म

 जन्म महिना आणि तुमचा स्वभाव

अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीचा जन्म या महिन्यात झाला आहे त्या महिन्याचा प्रभाव व्यक्तीवर आणि व्यक्तीच्या आयुष्यावर पडत असताना दिसून येतो.

अंकशास्त्रानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे ते महिन्यानुसार ठरवता येते

जानेवारी.

या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात

यांना शिकायला आणि शिकवायला आवडते

इतरांच्या कमतरते कडे जास्त लक्ष देतात

हे लोक खूप कष्टाळू असतात खूप संवेदनशील असतात.

इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते

फेब्रुवारी..

यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात. आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते. हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात. यांचा परिवार मित्रपरिवार फार मोठा असतो यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते लहान छान गोष्टींवर यांना लवकर राग येतो

मार्च..

या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्त्वाची असतात

यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. हे यात अतिशय शांतीप्रिय असतात. ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात. यांच्यातील विश्वासू गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात. घराची सजावट करण्याची आवड असते

एप्रिल महिना..

या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरण शक्ती चांगली असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप खंबीर असतात

 मे महिना..

जनता जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात

यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात हि माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो

जून महिना.. 

ज्या लोकांचा जन्म जून मध्ये झाला, त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात. ही व्यक्ती उत्तम वक्ता असते. सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात. कामासंबंधी जास्त विचार करीत असतात. अत्यंत संवेदनशील असतात सतत बोलत राहणारी असतात

ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग आणि चिडचिड करतात

जुलै महिना..

या महिन्यात जनता जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते खूप मोठी स्वभाव असतो.या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात

ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात सहजपणे कुणालाही माफ करीत नाहीत

ऑगस्ट महिना..

या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असता यांचा स्वभाव मोहुन घेणारा असतो सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात कधी कधी फार अहंकारी होतात

सप्टेंबर महिना..

ज्या लोकांचा जन्म सप्टेंबर मध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढतात ते माहीर असतात. यांचे स्मरण शक्ती चांगली असते. ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात.

ऑक्टोबर महिना..

या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते

त्यासाठी त्यांना नवीन मित्र करायला आवडते. यांना प्रवास करायला आवडतो कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दूनीयेत रमायला यांना खूप आवडते

नोव्हेंबर महिना

या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते

त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते

या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते. या व्यक्ती हार बोलत नाहीत मात्र मनमिळाऊ असतात

डिसेंबर महिना..

डिसेंबर मध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असते

यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते

हे फार महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते या. ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात.

प्रवासी जागे रहा

 


 


Featured post

Lakshvedhi