Tuesday, 10 August 2021

 [10/08, 19:33] Baby: मुलांनी चिखलात का खेळायचे?


शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख.


 ज्यांनी ही डिझाईन केली त्यांना मानसशास्त्र, मज्जामानसशास्त्र आणि शरीरशास्त्र या तिघांची उत्तम जाण असणारा आहे कारण लहान मुलांनी चिखलामध्ये मातीमध्ये भरपूर आणि सातत्याने खेळणे अत्यंत आवश्यक आहे. 


मुलं चिखलात लोळली की आई ओरडते, बाबा मारतात.. "ए घाणेरड्या" नावाने संबोधले जाते. यातून *माती घाण असते असा चुकीचा विचार या बालवयात बिंबवला जातो आणि मग पुढे मुलं चिखलात पाय ठेवण्याची हिंमतच ठेवत नाही.*


याचा दुष्परिणाम असा होतो की *मुलांची रोग प्रतिकारक्षमता विकसित होत नाही.* ज्या मुलामुलींना चिखलात खेळण्याचे, मातीत उड्या मारण्याचे स्वातंत्र्य असते त्यांची रोगप्रतिकार क्षमता म्हणजेच इंम्युन सिस्टिम चांगली बनते.


आजकालची मुलं साधं शंभर किलोमीटर वर गाव बदलले की सर्दी होते, पाणी ची चव बदलली की पोट दुखते कारण *शरीरामध्ये कुठलेही बॅक्टेरिया आले की त्याला फाईट करण्याची पेशी या तयार झालेल्या नसतात.* या पेशी तेव्हा तयार होतात जेव्हा मुलं निसर्गतः सर्व गोष्टीला एक्सप्लोर करत असतात. *म्हणून मुलांना माती, चिखलात, पावसात खेळू दिले पाहिजे.*


आजकालच्या प्रतिष्ठित आयांना सांगावेसे वाटते की *मुलांच्या आयुष्यात बॅक्टेरिया (जिवाणू) चे स्वागत करा.* तुम्हाला टीव्ही मधली जाहिरात सांगते की मुलांच्या एका हातावर लाखो जीवाणू असतात ते घालवण्यासाठी आमचा साबण वापरा.. *"राजू तुम्हारा साबून स्लो है क्या?"*, सांगून कंपनीवाले करोडो रुपये कमावतात. आपण साधा विचार करत नाही की, आपल्या लहानपणी किंवा आपल्या आजोबांकडे असले साबण नव्हते. तरी ते कधीही आजारी पडले नाही.. आपल्यापेक्षा जास्त रोग प्रतिकार क्षमता त्यांची होती. *कारण त्यांच्या डोक्यात असले जाहिरातीची खुळ (सजेशन) नव्हते आणि ते निसर्गात वाढत होते.*


मुलांना मातीत खेळल्याने मेंदूच्या पेशींची वाढ अधिक उत्तम होते. पहिल्या आठ वर्षाच्या आत बाल मेंदूची जडणघडण सर्वात अधिक होत असते. 80% मेंदू या वयात घडत असतो. *जितक्या मेंदूच्या पेशींना चेतना मिळेल तेवढे सिन्याप्स निर्मिती होत असते. जितकी सिन्याप्स निर्मिती होईल तेवढा मेंदू अधिक शक्तिशाली व बुद्धिमान बनतो. सिन्याप्स निर्मिती तेव्हा जास्त होते जेव्हा मुल मनसोक्तपणे, तणावरहित आणि पाचही ज्ञानेंद्रियांना सोबत खेळेल. चिखलात खेळतांना पाचही ज्ञानेंद्रियांचा विकास होतो.* चिखलामध्ये मूलं जेव्हा खेळतात तेव्हा त्यांची संवेदन क्षमता अधिक विकसित होते.


सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटीचा पाया हा लहानपणी मनसोक्त हुंदडण्या मध्ये असतो आणि या हुंदडण्या मध्ये महत्त्वाची एक्टिविटी म्हणजे चिखलात उड्या मारणे, पाणी उडवणे, लोळणे,खेळणे असते. 

*मुलं नखशिकांत चिखलात माखलेल्या असताना जेव्हा हातामध्ये मातीचा गोळा घेतात आणि वरती आकाशाकडे पाहत ढगांच्या आकाराचे मातीचे गोळे बनवतात तेव्हा या क्रियेमुळे मुलांची क्रिएटिव्हिटी अधिक विकसित होते.*


सर्वात महत्त्वाचे मूल जेव्हा चिखलात उड्या मारतात तेव्हा त्यांच्या मनात कळत-नकळत साचलेला ताण निघून जातो.. मुलं अधिक रिलॅक्स होतात.. हे करू नको, ते करू नको.. घाणीत जाऊ नको.. चिखल घाण आहे.. *या सर्व वाक्यांचे कुंपण तोडून ते अधिक मुक्त होतात. ते अधिक आनंदी व्यक्तिमत्त्वाकडे वाटचाल करतात.*


अतिचंचल मुलांसाठी चिखलात खेळणे तर गरजेचेच असते.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलं जेव्हा चिखलात खेळतात तेव्हा ते आपल्या *मातीशी कनेक्ट होतात.* मातीचा स्पर्श काय असतो तो त्यांना समजतो. चप्पल बूट न घालता खुल्या पायांनी जेव्हा ते एक तास चिखलात राहतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने या मातीशी या पृथ्वीशी संपर्कात येतात. त्यामुळे मुलांना अधून-मधून शूज न घालता मातीमध्ये जाऊद्या. 


मी हे सर्व सांगतोय हे शास्त्र जागतिक स्तरावर मान्य केलेले असून कितीतरी हेल्थ ऑर्गनायझेशन *"मड थेरपी"* नावाखाली या सर्व ॲक्टीव्हीटी आयोजित करत असतात.


म्हणून आपल्या मुलांना या पावसाळी वातावरणात जवळपास कुठे शेत असेल, भाताची पेरणी चालू असेल असेल तिथे घेऊन जा. *मुलांना चिखलात खेळू द्या कारण आयुष्याच्या अखेरीस अभ्यास किती लक्षात राहिला हे आठवणार नाही तर आनंदाचे क्षण किती निर्माण झाले तेच लक्षात राहतील.*


*इस्पॅलियर स्कूल* मध्ये हे आनंदाचे क्षण आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी सातत्याने पावसाळ्यामध्ये "मड पार्टी" आयोजित केली जाते. विद्यार्थी त्यांच्या टीचर सोबत मनसोक्त चिखल खेळतात. कारण ही शाळा असा विचार करते की *विद्यार्थ्यांना खेळायला भरपूर टॉईजची आवश्यकता नाही.. आवश्यकता आहे ती थोड्या साहसी खेळाची..*



😜😜😝😂😂

 तांडा-वस्तीच्या विकासासाठी निधीची वाढीव तरतूद करणार

- इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबईदि. 10 : राज्यातील बंजारा समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध विकासयोजनांच्या तरतुदीत वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे. बंजारा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत करून या समितीमध्ये बंजारा समाजाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

         मंत्रालयातील दालनात वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना निधी वाटपाबाबत इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश राठोड, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्तायासह ओबीसी व्हिजे-एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानपप्रकाश राठोड, साधनाताई राठोड यासह या समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, बंजारा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यवतमाळ, नांदेड, जालना, परभणीबीडसोलापूर, औरंगाबादलातूरहिंगोलीवाशिम या दहा जिल्ह्यात वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करून या समितीमध्ये बंजारा समाजाचे प्रतिनिधी नेमण्यात यावेत. जेणेकरून या समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल. तांडा/वस्तींचा विकास करताना पाणी, रस्ते व समाज मंदिर या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देशही मंत्री श्री. वडेट्टीवार

 बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात

पॅराग्लायडर्सबलून उडविण्यास प्रतिबंध

 

            मुंबईदि. 10 : बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत  पॅराग्लायडर्सबलूनउंच जाणारे फटाके  तसेच लेसर प्रकाश (बीम) यांना प्रतिबंध करण्याचे आदेश दि. 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर2021 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

          बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हे आदेश जारी केले आहेत. असा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईलअसेही आदेशात नमूद असून मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारीबृहन्मुंबईएस.चैतन्य यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.

 महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक

पणन महासंघाच्या समायोजनाबाबत बैठक

           

            मुंबईदि. 10 : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामध्ये समायोजन करण्याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

            बैठकीला सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळेमहाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, पणन महामंडळाचे संचालक सतिश सोनी, व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सहकार मंत्री श्री. पाटील म्हणालेकापूस हे राज्यातील नगदी पीक असून  विदर्भ-मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचे  मुख्य पीक आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे हित जोपासणे आवश्यक आहे. कापूस खरेदी प्रक्रियेचे योग्य नियोजन करून हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस खरेदी  प्रक्रिया अत्यंत व्यवस्थित राबवली पाहिजे.

            कापूस एकाधिकार खरेदी योजना 1972-73 पासून राज्यात सुरू करण्यात आली होती. सन १९९९-२००० मध्ये गँट करार अस्तित्वात आल्यामुळे केंद्र शासनाने यासंबंधीच्या अधिनियमास मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने २००१ एकाधिकार कापूस योजना बंद करण्यात आली. त्यामुळे महासंघ तोट्यात गेल्याने सन २०११पासून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ यांचे एकत्रिकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

            कापूस पणन महासंघाकडील अद्यावत माहितीअभावी हे प्रकरण  प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने कापूस पणन महासंघाचे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघमुंबई यांच्यामध्ये समायोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. महासंघाला कापूस खरेदी योजना राबविताना झालेल्या संचित तुटीचे निर्लेखनमहासंघाकडे प्रलंबित हमीशुल्क व त्यावरील व्याज यांचे पुस्तकी समायोजन करुन माफ करणे व महासंघाकडे थकित असलेले लेखापरिक्षण शुल्क माफ करणे इ.बाबत तात्काळ निर्णय घेणे आवश्यक असल्याने याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

 हृदय शस्त्रक्रिया होणाऱ्या बालक व त्यांच्या पालकांची

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली भेट;

·       शस्त्रक्रियेसाठी दिल्या शुभेच्छा

 

          मुंबईदि. 10 : सांगली जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या ४० बालकांवर मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात पुढील दोन दिवस हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या बालकांची आणि त्यांच्या पालकांची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री.नितीन बानुगडे पाटील यावेळी उपस्थित होते.

            शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या बालकांच्या पालकांशी संवाद साधताना श्री ठाकरे म्हणालेडॉक्टरांना आपण देव मानतो. कोविडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटक आपले योगदान देऊन समाजसेवा करीत आहेत. या काळात काही डॉक्टर कोविड व्यतिरिक्त इतर आजार असणाऱ्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी गावोगावी जाऊन सेवा देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सांगली जिल्ह्यातील या बालकांना असलेला आजार वेळेत लक्षात आल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व घटकांना यावेळी श्री ठाकरे यांनी धन्यवाद दिले.

            राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी आणि शाळेतील बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम राबवला जातो. मागील मार्चपासून राज्यात कोरोना आपत्ती व सद्यस्थितीत महापुराची परिस्थिती यामुळे अंगणवाडी व शाळा बंद असल्याने योजनेअंतर्गत नियुक्त पथकांनी सांगली जिल्ह्यातील बालकांची गावागावात शिबिरांद्वारे तपासणी केली असता ४० बालकांवर हृदयशस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या शस्त्रक्रियांकरिता अंदाजे दोन कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून सर्व बालके ही गरीब परिवारातील असल्याने शस्त्रक्रिया पूर्ण करणे त्यांच्या पालकांना अवघड होते. त्यासाठी सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध होणारा निधीआणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या बालकांवर मुंबई येथील एसआरसीसी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

 विविध मच्छिमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद

मासेविक्रेत्यांसाठी राज्यात शीतगृहे उभारण्याचा आराखडा सादर करा

मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख

            मुंबईदि. 10 : मच्छिमार संस्थांना डिझेल परताव्याची थकित रक्कम देण्यात येत आहे. मच्छिमारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यशासन सकारात्मक काम करत आहे. मासे विक्री वाढविण्यासाठी राज्यात शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारण्यासंदर्भात आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

            सह्याद्री अतिथीगृहात मच्छिमार समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मंत्री श्री. शेख यांनी लागोपाठ बैठक घेतल्या. बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवारआमदार भाई जगतापविभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्तामत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणेमच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी विजय वैतीदेवेंद्र तांडेलरामदास संघेधनाजी कोळीसंतोष कोळीजोसेफ कोलासोअमोल रोगेदिलीप कोळीलिओ कोलासो आदी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी कोवीड प्रादुर्भावामुळे व वादळांमुळे उद्भवलेल्या समस्यातौक्ते व निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना मदत देणेवादळग्रस्तांच्या मदतीसंदर्भातील निकषात सुधारणा करणेकर्ज व व्याजामध्ये सवलत देणेगोराई कोळीवाड्यातील समस्याजमशेटजी बंदराचे बंद पडलेले काममासळी विक्रेत्यांना अनुदान देणेमुंबईतील विविध मच्छिमार्केटला पर्यायी जागा देणेट्रॉम्बे येथील जेट्टीतील सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

            मंत्री श्री. शेख म्हणाले कीचक्रीवादळातील नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. अवैध मासेमारीविरुद्ध लवकरच कडक कायदा येत आहे. तसेच राज्याबाहेरील बोटींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अवैध डिझेल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

 कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी

प्रस्तावित नवीन योजनेसंदर्भात आढावा बैठक

 

            मुंबई, दि. 10 : कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित योजनेसंदर्भात  सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमारउपसचिव का.गो.वळवी, पणन संचालक सतीश सोनी, व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवारसहसंचालक विनायक कोकरेसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

             बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण, विक्रीयोग्य उत्पादनांच्या प्रभावी हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी विपणनाच्या पायाभूत सुविधांचा विकासशेतमालाची साफसफाईप्रतवारी करुन तात्पुरती साठवणूकफळेभाजीपाला व फुले यासारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जावाढ, काढणी-पश्चात आणि आणि हाताळणी दरम्यान होणारे नुकसान कमी करुन अंतिमत: शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणेबाजार समितीसाठी नविन उत्पन्नाचे स्त्रोत निर्मिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००

Featured post

Lakshvedhi