Saturday, 31 July 2021

 परस्पर सहकार्यातून राज्यातील रस्ते व लोहमार्ग

आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करु या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाण पुलाचा भूमीपूजन सोहळा

·       ब्रॉडगेजवरील 300 कोटींच्या उड्डाणपुलांचेही भूमीपूजन

 

       नागपूर दि. 31 : महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीत काही रस्ते-रेल्वे मार्ग नादुरुस्त झाले आहेत. ते दुरुस्त करताना तसेच नवे रस्ते करताना अनेक पिढ्यांसाठी टिकतील अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. यासाठी राज्य व केंद्र सरकार समन्वयातून काम करेल. देशभर उच्च दर्जाच्या महामार्गाच्या निर्मितीचे कार्य रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी करीत आहेत. या परिस्थितीत त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग राज्याच्या दर्जात्मक रस्ते निर्मितीसाठी होईल यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नागपूर-नागभीड रेल्वे मार्गावरील कोट्यवधीच्या महत्वाकांक्षी उड्डाण पुलांच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

             उत्तर नागपूरमधील वाहतुकीची कोंडी कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी कडबी चौक ते गोळीबार चौक दरम्यानच्या जवळपास तीन किलोमीटर लांबीच्या 146 कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते भूमीपूजन झाले. महाराष्ट्र राज्य रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने ( महारेल ) आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. या भूमीपूजन सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दूरस्थ प्रणालीद्वारे तसेच उर्जा तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊतपशुसंवर्धन मंत्री सुनील केदारनागपूरचे महापौर दयाशंकर तिवारीखासदार कृपाल तुमानेआमदार सर्वश्री विकास कुंभारेराजू पारवेकृष्णा खोपडेमोहन मतेमहारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवालजिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होते.

             उत्तर नागपूर परिसरातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी मोतीबाग येथील एसईसीआर नॅरोगेज संग्रहालयासमोर महारेलमार्फत भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 146 कोटीच्या कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाच्या भूमीपूजनासोबतच या कार्यक्रमामध्ये कळमना मार्केट ते नागपूर जोड रस्तारेल्वे फाटक क्रमांक - 73 ( 69 कोटी ) भांडेवाडी जवळ रेल्वे फाटक क्रमांक -69 (25 कोटी ) उमरेड शहराजवळील जोडरस्ता बसस्थानकाजवळील रेल्वे फाटक क्रमांक - 34 ( 26 कोटी ) उमरेड भिवापूर बायपास रोडवरील रेल्वे फाटक क्रमांक - 33 ( 38 कोटी ) अशा एकूण 158 खर्चाच्या नागपूर इतवारी ते नागभिड रेल्वे लाईनवरील चार नवीन उड्डाणपुलांचेही भूमीपूजन करण्यात आले. 304 कोटींच्या पाचही उड्डाणपुलांचे आज प्रत्यक्ष कामही सुरु झाले.       

            केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी भाषणात कौतुक केले. महाराष्ट्राचे तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या दर्जेदार कामाचे कौतुक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही केले होते याची आठवण सांगितली. राज्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची आठवण करुन देत सध्या कोरोनासोबतच नैसर्गिक आपत्तीशी महाराष्ट्र झुंजत आहे. तौक्ते वादळाचेपूर अतिवृष्टीचे संकटखचणारे रस्तेदरडी यातून राज्य निश्चितच सावरेल. मात्र यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून अनेक पिढ्यांसाठी टिकेल अशा नवीन तंत्रज्ञानाने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करावेअसे आवाहन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केले.

            समृद्धी महामार्गामुळे राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर जवळ येत आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम दृष्टीपथात आहे. मात्र नव्या पायाभूत सुविधा उभ्या राहत असताना सामान्य नागरिकांची काळजी घेतो तशीच काळजी वन्यजीव व वन्य प्राण्यांचीही घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केले. नागभीड येथे ब्रॉडगेज तयार करताना ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जंगलामध्ये उन्नत मार्गाचा वापर करा. जेणेकरुन वन्यजीववनसंपदा यांचे नुकसान होणार नाही. निसर्ग व पर्यावरणपूरक नवतंत्रज्ञानाची जोड असलेले रस्ते हे दिर्घकालीन प्रगतीसाठी गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग नितिन गडकरी यांनी यावेळी संबोधित करताना या प्रकल्पासाठी सर्व राजकीय पक्षांनीनेत्यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. ऊर्जा मंत्री व ऊर्जा विभागाने यासाठी केलेली मदत उल्लेखनीय आहे. उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करताना या ठिकाणचे अतिक्रमण अडचण ठरणार नाहीयासाठी स्थानिक नेत्यांनी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. नागपूर ते वडसा हा ब्रॉडगेज मार्ग पूर्णत्वास जाईल.  सोबतच उमरेड पुढील भिवापूर पर्यंतच्या चार पदरी रस्ते मार्गामध्ये वने व पर्यावरण विभागाच्या आक्षेपांची पूर्तता झाल्यास हा रस्ता देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुअसे श्री.गडकरी यांनी सांगितले. नव्या रेल्वे लाईन मुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरवताना 20 ते 22 तास याठिकाणी लागायचे. त्या ठिकाणी केवळ दोन तासांमध्ये कोळशाची सुलभ वाहतूक होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

             सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नितीन गडकरी यांनी समृद्धी महामार्गाला जालना येथून मराठवाड्याला जोडण्याचे आवाहन केले.

            नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, विकासकामात परस्परांना सहकार्य करण्याची नागपूरची संस्कृती असून नागपूरच्या मेट्रोला हिरवी झेंडी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले. नागपूरच्या विकासासाठी आजचा कार्यक्रम अतिशय उत्तम कार्यक्रम असून यामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्रालयसार्वजनिक बांधकाम खातेरेल्वे मंत्रालय यांनी समन्वयातून काम केले आहे. या प्रकल्पासाठी आमदार राजू पारवे यांनी घेतलेल्या पुढाकाराचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

             पशुसंवर्धन व क्रीडा विकास मंत्री सुनील केदार यांनी रस्ते, रेल्वेमार्ग तयार करताना शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. स्थानिक भूमिपुत्रांना प्रकल्पाचा त्रास होता कामा नये. याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष घालावेअसे आवाहन त्यांनी केले. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनीही यावेळी संबोधित केले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

 

 आश्रमशाळेतील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग

ऑगस्ट पासून होणार सुरु

 

नाशिक, दि.31 : मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होतेआता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेतअसे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

           कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होतेयाकाळात वाढते बालविवाहबालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार करता मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करणेसंदर्भात आदिवासी विकास मंत्री अॅडके.सीपाडवीआदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागातील शाळा आणि वसतिगृहे सुरु करण्यात येत आहेत.

            प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्यानुसारआश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी  सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्याप्रमाणेआश्रमशाळा या निवासी असल्याने पाल्याला शाळेत  वसतिगृहात पाठवणेपूर्वी पालकांचे संमतीपत्र घेणे बंधनकारक राहणार आहेतसेच शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणेशालेय वेळापत्रक बनवणेभोजन वेळेचे नियोजन करणेविद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे आणि संशयित किंवा कोविडबाधित आढळल्यास योग्य ती दक्षता घेणे याबाबत देखील सूचना  देण्यात आल्या आहेतयासोबतच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकशिक्षकअधीक्षिक-अधीक्षिका आणि गृहपाल यांची आहेत्याचप्रमाणे अपर आयुक्त  प्रकल्प अधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीनुसार  जिल्हा प्रशासनाच्या कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे पालन करण्यात यावेअशी सूचनाही आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत.

शाळा सुरु करताना ज्या ग्रामीण भागात किमान एक महिना आधी कोविड रुग्ण आढळलेला नाही अशा ग्रामपंचायत आणि तेथील पालकांशी चर्चा करून त्याप्रमाणे शाळा सुरु करणेसाठी मान्यता देण्यात आली आहेया शाळा सुरु करण्यापूर्वीच सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी यांनी किमान लसीकरणाचा पहिला डोस घेतला असणे आवश्यक आहे.  यासोबतच संपूर्ण आश्रमशाळा  वसतिगृहाचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करण्यात येवून त्या ठीकाणी गर्दी होणार नाही या दृष्टीने विविध समित्या गठीत करण्यात याव्यातत्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्गातील बैठक व्यवस्था  निवासव्यवस्था यांचे योग्य नियोजन करणेशारीरिक अंतर राखणे याबाबतच्या खुणा आणि चिन्हे आश्रमशाळेत आणि वर्गात लावण्यात याव्यात असेही प्रसिद्धी पत्रकामार्फत सूचित केले आहे.

0000

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

 
            मुंबई,दि. ३१ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळाचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेकापचे गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

            विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या श्री. देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

 
 

Governor Koshyari condoles the demise of Ganpatrao Deshmukh

 
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has condoled the demise of veteran PWP leader Shri Ganpatrao Deshmukh. In a condolence message, the Governor said:

 
“I was saddened to know about the demise of the senior most leader of the Peasants and Workers party and the longest term member of the State Legislature Shri Ganpatrao Deshmukh. A model People’s representative, Shri Deshmukh maintained his chord with farmers, workers and ordinary citizens all his life. He was an epitome of simple living and high thinking. A man of peace and restraint, Shri Deshmukh was a fearless leader, having friends across the political spectrum. In his demise the State has lost an institution in State legislature.”

0000

 [31/07, 14:32] Baby: राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला लग्नात ३ कोटींची हिऱ्यांची अंगठी घातली. ५० लाखांचा लग्नाचा शालू नेसवला. लग्नाच्या वाढदिवसाला दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये १९ व्या मजल्यावरील ५० कोटींचा फ्लॅट गिफ्ट केला. लंडनमध्ये १०० कोटींचा राजमहल नावाचा व्हिला गिफ्ट केला. मुंबईत जुहू बिचवर किनारा नावाचा १०० कोटींचा आलिशान व्हिला गिफ्ट केला. नोएडामध्ये ७ कोटींची सुपरनोवा नावाची ८० मजल्यांची अख्खी अपार्टमेंट गिफ्ट केली. २ कोटींची रेंजरोवर वोग, ८० लाखांची बीएमडब्ल्यू झेड फोर, ५ कोटींची लॅम्बोर्गिनी असे सगळे गिफ्ट केले आहे.


आता ही ४६ वर्षांची बया राज कुंद्राला म्हणते “तुझ्यामुळे बॉलिवूडमधील माझं करिअर संपलं, माझं आर्थिक नुकसान झालं...” 😀😅



शेवटी moral of the स्टोरी :


नवरा बायकोच्या आणि बायको नवऱ्याच्या पापात भागीदार नसते हे वाल्या कोळ्या पासून सत्य आहे. म्हणून गिफ्ट देताना आणि पाप करताना सावध रहा. 


सुख के सब साथी, पाप मे ना कोई.

[31/07, 14:33] Baby: धडा डेबिट कार्डचा -  नवरा - बायको एकमेकांचे कार्ड वापरू शकतात का ? कायदा काय म्हणतो..


ऍड. रोहित एरंडे ©


एटीएम मधून पैसे काढण्यासाठी   स्वतःहून आपले डेबिट कार्ड   आपल्या वैवाहिक जोडीदाराला देणे  ही    वरकरणी साधी  वाटणारी  गोष्ट चांगलीच महागात पडू शकते हे बेंगलोर येथे   घडलेल्या एका केस वरून  आपलयाला लक्षात येईल.  सुमारे २०१४ चे हे प्रकरण दिसत असले, तरी त्याची बातमी नुकतीच सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल  झाली होती.  बाळंतपणाच्या रजेवर असलेल्या वंदना नामक एका महिलेने तिच्या स्टेट बँकेमधील खात्यामधून  रू.२५,०००/- काढण्यासाठी तिच्या नवऱ्याला, राजेशला, स्वतःचे डेबिट कार्ड अर्थातच पिन नंबरसह दिले.  राजेशने जवळच्या एटीएम मध्ये जाऊन कार्ड स्वाईप केले आणि त्याला रू. २५,०००/- खात्यातून वर्ग झाल्याची   स्लिप देखील मिळाली, परंतु प्रत्यक्षात पैसे मात्र काही मिळाले नाही. त्यामुळे राजेशने लगेचच बँकेच्या कॉल सेन्टरला  फोन करून तक्रार नोंदवली आणि त्याला सांगण्यात  आले कि एटीएम मशीन सदोष असल्यामुळे असा प्रकार घडला आहे, तरी २४ तासांत  पैसे अकाउंटला  जमा होतील. परंतु प्रत्यक्षात बँकेकडून कोणतीच हालचाल झाली नाही आणि पैसेहि  परत मिळाले नाहीत. त्यामुळे खातेदाराने बँकेकडे पाठपुरावा सुरु केला आणि  खातेदाराला पैसे मिळाले आहेत, असे आधी  सांगून बँकेने तक्रार बंद केली. शेवटी खातेदाराने बँकेविरुद्ध  ग्राहक न्यायालयात दाद मागितली. खातेदाराने त्या दिवशीचे  सीसीटीव्ही  रेकॉर्डिंगही दाखल केले  ज्यात हे   स्पष्ट दिसून आले कि राजेशला पैसे मिळाले नाहीत. तसेच माहिती  अधिकारात देखील अर्ज केल्यावर खातेदाराला  कॅश व्हेरिफिकेशन रिपोर्ट बद्दल अशी माहिती मिळाली कि त्या दिवशीच्य हिशोबामध्ये रु.  २५,०००/- एटीएम मशीन  मध्ये जादा  होते. अर्थात हा रिपोर्ट बँकेने कोर्टात अमान्य केला आणि असा  बचाव घेतला कि  एकतर  डेबिट कार्ड हे "अहस्तांतरणीय" असते  आणि त्यातील  पिन नंबर सारखी माहिती कोणासहि सांगणे हे एटीएम कार्ड नियमांच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे खातेदाराने स्वतःच्या कार्डाचा  पिन नंबर तिच्या नवऱ्याला सांगणे हे  नियमाचे उल्लंघन  होत असल्यामुळे  बँक कोणतेही पैसे देणे लागत नाही. अखेर २०१८ मध्ये केसचा निकाल लागला आणि ग्राहक न्यायालायने तक्रार फेटाळताना नमूद केले कि पिन नंबर त्रयस्थ व्यक्तीस सांगणे हे नियमांचे उल्लंघन आहे,  त्या ऐवजी वंदनाने स्वतः सही केलेला  चेक किंवा पैसे काढण्याची स्लिप भरून दिली असती तरी चालले असते.  ह्या केस मध्ये पुढे अपील झाले की नाही हे समजून येत नाही.


आता आपल्या लक्षात येईल किती तरी वेळा आपल्या पैकी अनेकांनी आपले कार्ड आपल्या वैवाहिक जोडीदाराला किंवा मुलाला-मुलीला वापरण्यास दिले असेल, कारण काहीही असो. तुमचे नाते कितीही जवळचे असले तरी नियमाप्रमाणे अशी दुसरी व्यक्तीहि त्रयस्थच ठरते.   प्रत्येक बँकेची एटीम बाबतचे वेगळी नियमावली असते, त्याची माहिती करून घेणे इष्ट. तसेच  बहुतेक ठिकाणी एटीएम कार्डची माहिती कोणाशी देऊ नये असे लिहिलेलं आढळतेच. त्यामध्ये ग्राहकांची सुरक्षितता हेच ध्येय असते.  वरील केस बद्दल बोलायचे झाल्यास ही केस  सकृत  दर्शनी 'फेल्ड ट्रँजॅक्शन' मध्ये मोडते. अश्या  फेल्ड ट्रँजॅक्शन  बाबतीत आरबीआय ने २०/०९/२०१९ रोजीच्या एका  परिपत्रकामध्ये एसओपी   नमूद केली  आहे, परंतु त्यामध्ये ह्या वरील केस सारखेच   फेल्ड ट्रँजॅक्शन झाले तर बँक पैसे देणे लागत नाही असे स्पष्टपणे नमूद  केल्याचे आढळून येत  नाही. त्याचप्रमाणे ०६/०७/२०१७ रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे बेकायदेशीर इलेट्रॉनिक बँकिंग व्यवहार झाल्यास बँकेचे  आणि ग्राहकाचे हक्क आणि कर्तव्ये कोणती, ह्यांचा परामर्श घेतला आहे आणि त्या प्रमाणे, ग्राहकाने बेकायदेशीर इलेट्रॉनिक बँकिंग व्यवहार केला हे सिद्ध करण्याची  जबाबदारी बँकेवर आहे. थोडक्यात अश्या केसेस साठी एकच आणि स्पष्ट नियमावली करणे गरजेचे आहे.


वरील केसमध्ये  समजा जॉईंट अकॉउंट असते , तर प्रश्न आला नसता.  येथे विधिज्ञांची मतमतांतरे  आहेत. काहींच्या मते बँक नियमाप्रमाणे वागली आहे तर काहींच्या मते    बँकेने पैसे परत करायला पाहिजे होते कारण प्रत्यक्षात बँकेने पैसे कोणालाच दिले नव्हते किंवा सायबर  फ्रॉड देखील झाले  नव्हते आणि पैसे दिले नाही, हे सीसीटीव्ही मध्ये पण दिसत होते. काहींच्या मते आरबीआय च्या नियमाप्रमाणे जर  समजा बायकोने तक्रार केली असती कि नवऱ्याने माझ्या संमतीविरुद्ध कार्ड वापरून  पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तर  बेकायदेशीर इलेट्रॉनिक बँकिंग व्यवहार झाला म्हणून  बँकेने कदाचित पैसे दिले असते. असो. सध्याच्या ऑनलाईन घोटाळ्यांच्या ह्या जमान्यात जास्तीत जास्त काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. सोयी तितक्या गैरसोयी हे आपल्याला दिसून येईल.  ह्या विषयाचा  अजून एका  कंगोऱ्याबद्दल सांगावेसे वाटते. एकमेकांचे  अकाउंट डिटेल्स, अकॉउंट / फोन पासवर्ड इ. जोडीदाराला माहित असावेत कि नाही, ह्या बद्दल असलेली  अगदी टोकाची मते वकीली व्यवसायात आम्हाला  दिसून येतात. घटस्फोटांच्या केसेस मध्ये किंवा जोडीदार मयत झाल्यावर असे  प्रश्न ठळकपणे समोर येतात . 


https://vedhkaydyacha.blogspot.com/2020/11/blog-post_16.html


धन्यवाद. काळजी घ्या. God is Great 🙏🙏..


ऍड. रोहीत  एरंडे. 


पुणे.©

 [30/07, 20:46] Baby: *या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे)


1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.

2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा.                                     

3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले.

4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे)

5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा.

6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी.

7. लग्न तर आहेच, पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च.   

8. कर्जांचे व्याज फेडणे.

9. खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी, तणाव तणाव तणाव.

10.लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा.

11. पार्टी दारु कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. (उदा. घड्याळ घेतलं-द्या पार्टी, गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी, कपडे, दागिने, वस्तू घेतली-द्या पार्टी, 2-5शे रुपये पगार वाढला-द्या पार्टी,)


*🙏अनावश्यक खर्च कमी करा! गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि इच्छा स्वप्नं अनंत... आहेत त्यांचा अंत..... नाही... !*✍


 *लिमिटेड होतं तेच बरं होतं* ...


पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा..... 


टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर *छान गप्पा मारायची*.... 😊😃😁


दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. *प्रवासाचा आनंद मिळायचा* .... 😄


गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे *स्थूलतेचे प्रमाण कमी होते*.....😉


शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक *जडण घडण नीट व्ह्यायची*... 💪👍


बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून *कुटुंबासाठी वेळ द्यायची*...... 👏💞


अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले *आयुष्य खूप सुखी होते*......


........... पण आता सगळंच *अनलिमिटेड* झालंय.... 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच *लिमिटेड* झालंय !!😧😩

बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?


बेटा काळ खूप बदलला बघ...


तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.


तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.


तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.


तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.


तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी *गोड* लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.


तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.


मुळात काय की,


*तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं*


            आता


बरंच काही मिळत असूनही *आनंदी जीवन कसे जगावे* यांवरील *सेमिनर्स' अटेंड* करावे लागतात.


(कुणी लिहिलंय माहित नाही, पण तथ्य आहे)

[30/07, 20:49] Baby: 'देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी '... हे गाणं सगळ्यांनाच परिचित असेल. आपल्यापैकी किती जण यावर विश्वास ठेवतात? मी तर या ओळींशी पूर्णपणे सहमत आहे. 

मी लहानपणी परीक्षेला जाताना अगदी मनोभावे देवाला हात जोडून प्रार्थना करून जायचे. पण त्यानंतर आई पप्पाना नमस्कार करायला कधीच विसरायचे नाही. तेव्हापासूनच आई वडिलांना मी देवाच्या जागी मानत आलेय. माझे आई आणि पप्पा हे मला या आयुष्यात भेटलेले पहिले 'देव'. बाहेरच्या जगाशी ओळख झाल्यावर तर पावलोपावली नाही म्हणता येणार पण जिथे जिथे मला नितांत गरज होती तेव्हा तेव्हा हा देवबाप्पा कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने मला भेटायचा आणि चुटकी सरशी माझ्या अडचणी सोडवून जायचा. 

कधी कधी अशक्य गोष्टीदेखील आपल्या नकळत शक्य होऊन जातात. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपली जिद्द, परिश्रम आणि अथक प्रयत्न हे तर आवश्यक असतातच परंतु त्यापलीकडे जाऊन आशीर्वाद किंवा सकारात्मक ऊर्जा देखील गरजेची असते. आणि हे सगळं सगळं ज्याला मिळतं त्याला आपण नशीबवान म्हणतो. 

भर मुसळधार पावसात जेव्हा रिक्षा मिळत नसते, प्रत्येक रिक्षावाला नकार देत असतो, अशातच अचानक एक रिक्षावाला कुठून तरी येतो आणि चक्क आपल्याला इच्छित स्थळी पोचवतो त्याला मी देव समजते. अतिशय कठीण गेलेला एखाद्या परीक्षेचा पेपर, ज्यात केटी किंवा नापास होण्याची शक्यता असते अशा विषयात पास करणारा परीक्षक मला देव वाटतो. 

कुठेतरी वेळेवर पोचायचं असते, घाई घाई मध्ये रस्त्यातून चालत असताना अचानक चप्पल तुटते,  अशा वेळी अचानक थोडया अंतरावर दिसणारा मोची मला देवासमान वाटतो. करियर च्या एखाद्या वळणावर नोकरीची नितांत गरज असताना,  हातात एकही ऑफर नसताना, डोक्यावर EMI नावाचे भूत बसलेले असताना समोर interview  घेणारा परीक्षक आणि त्यानंतरच्या HR राऊंड चे परीक्षक देखील मला देवासमान भासतात. अशा कठीण परीक्षेच्या वेळी आपल्या मदतीला धावून आलेल्या व्यक्तीस आपण अगदी सहजपणे बोलून जातो, 'अगदी देवासारखा माझ्या मदतीला धावून आलास'. कधी कधी ही कृतज्ञता व्यक्त करणे सुद्धा राहून जाते. कितीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, जातात. काहींशी जुजबी ओळख होते, तर काही लोकांशी जिवाभावाची  मैत्री होते. प्रत्येका बरोबर आपले काही ना काही ऋणानुबंध असतातच. अगदी आपले सख्खे भाऊ बहीण,  जोडीदार,  मुलं, इतर अनेक नातेवाईक तसेच मित्रमैत्रिणी या प्रत्येकाचा आपल्या आयुष्यावर ठसा उमटलेला असतो. या सर्वांच्या रूपाने देव आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. 

थोडक्यात काय तर देव मानला तर सगळीकडे आहे. अगदी कुठे नाही दिसला तरी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा, आपल्याला तो नक्कीच दिसेल. 


--- कविता संकेत नाईक.

Featured post

Lakshvedhi