Friday, 30 July 2021

 अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान;

सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज

मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

 

            मुंबईदि. 30 : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे.

            सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले कीराज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टीपूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे 700 कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले असूनत्याखालोखाल पुणे विभागअमरावती विभागऔरंगाबाद विभागनागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असूनदरडी साफ करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहेतर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रिकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज काढण्यात आला आहे.

            प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती तर 140 पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी 3 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईत बैठक होणार असून त्यावेळीही राज्यातील परिस्थितीचा पुनःश्च आढावा घेतला जाईल. दरम्यानराज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

 कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूरबाधित भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

 

       कोल्हापूरदि. 30 : पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूर बाधित भागाची पाहणी करताना नागरिकांना दिला.

            यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफपालकमंत्री सतेज पाटीलआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरमुख्य सचिव सीताराम कुंटेजिल्हाधिकारी राहुल रेखावारमहापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेपोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

            यावेळी पंचगंगा हॉस्पिटल परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले.

0000

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा

 

            कोल्हापूर, दि. 30 :- नागरिकांनो ! घाबरू नकाकाळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे . संयम बाळगा . येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहुपूरी 6 व्या गल्लीतील पूरबाधित राहिवाशांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापूरात आले होते.

      यावेळी स्थानिक रहिवासी पूजा नाईकनवरे यांनीआपत्कालीनस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिला असल्याचे सांगितले .तर पूरबाधित गणेश पाटील म्हणालेयंदा २००५ व २०१९ पेक्षाही मोठा असून शासनाने भरीव मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

            यावेळी पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफखासदार  संजय मंडलिकखासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकरआमदार ऋतूराज पाटीलमुख्य सचिव सिताराम कुंटेजिल्हाधिकारी राहूल रेखावार ,मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

0000

 कोरोना काळातील सेवाकार्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले

राज्यपाल कोश्यारी

 

            मुंबई, दि. 30 : समाजातील अधिकांश लोक चांगले काम करण्यास उत्सुक असतात. कोरोना संसर्गाच्या सव्वा वर्षाच्या काळात शासकीय अधिकारीकर्मचारीअशासकीय संस्था व एकूणच समाजातील सर्व लोकांनी कर्तव्यापलीकडे जाऊन सेवाकार्य केल्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले. कोरोना हे जसे आव्हान होते तसेच ती एक सेवेची संधी ठरली, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत कोविड टास्क फोर्सच्या माध्यामातून कोरोना काळात कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते ठाणे सिटिझन्स प्राईड’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

            कार्यक्रमाला पोलीस महासंचालक व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसळकरठाणे सिटिझनस फोरमचे अध्यक्ष कॅस्बेर ऑगस्टीन व जेव्हीएम धर्मादाय फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मेहता उपस्थित होते.

            कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून सर्व कोरोना योद्ध्यांनी यानंतर जनतेमध्ये जाऊन मास्क वापरसुरक्षित अंतर राखणे आदी कोरोना विषयक सावध आचरणाबाबत जनजागृती करावी असे आवाहन राज्यपालांनी केले. 

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी पोलीस महासंचालक विवेक फणसळकरठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडेनिवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटीलउपजिल्हाधिकारी रेवती गायकरएस डी ओ अविनाश शिंदेजिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ कैलाश पवार, तहसिलदार अधिक पाटीलमनोरुग्णालयचे अधिक्षक डॉ संजय बोदडेसर्कल अधिकारी संजय पतंगेतलाठी आरती नितीन यशवंतरावपरिचारिका वर्षा दळवीसारिका ढोकलेठाणे पोलीस दलातील जहांगीर चोहारीवॉर्डबॉय विक्की धाकोलियाठाणे महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्स टीमचे वैद्यकिय अधिकारी डॉ वैजयंती देवगेकरछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भीमराव जाधवउपजिल्हाधिकारी वर्षा दिक्षीतठाणे महानगरपालिकेचे गिरीश झलकेडॉ प्रेषिता क्षिरसागरडॉ अनिता कापडणेवैद्यकिय अधिकारी डॉ मिलींद उबाळेडॉ योगिता धायगुडेडॉ खुशबू टावरीडॉ अदिती कदम,  डॉ ए ए माळगावकरडॉ प्रज्ञा जाधवडॉ जयेश पानोतडॉ स्मिताली हमरूस्करडॉ अयाझ शेखअधर कुलकर्णी,  डॉ समिधा गोरेदिलीप सुरेश महालेठाणे अग्निशामक दलाचे निलेश वेताळसिस्टर मंगल पवारफादर बापटीस्ट विगासबेथानी रुग्णालयाचे मुख्याधिकारी स्टीफनडॉ संतोष कदमडॉ अंकित ठक्करडॉ संदीप कदमडॉ रहीश रवीन्द्रनडॉ मुकेश उदानीआदींना ठाणे सिटीझन्स प्राईज ॲवार्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले.

**


 

Ex Thane CP Vivek Phansalkar, Addl. Collector Vaidehi Ranade receive Thane Citizen’s Pride Awards

 

            Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Thane Citizen’s Pride Awards to COVID Task Force officials working under the Thane Collector and Thane Municipal Corporation at Raj Bhavan, Mumbai on Friday (30th July).

            Director General of Police and former Commissioner of Thane Vivek Phansalkar, Additional Collector Vaidehi Ranade, RDC Dr Shivaji Patil, Dist Civil Surgeon of Thane Dr Kailash Pawar, Dy Collector Revati Gaikar were among those honoured with the Thane Citizen’s Pride Award.

            Kasber Augustine, President of Thane Citizen’s Foundation and Jitendra Mehta of JVM Charitable Foundation were present.

००००

 बरेच लोक मुंबई येथे वैद्यकीय उपचारासाठी जातात.  ही उपयुक्त माहिती आहे.  कृपया ते जतन करा:


  * डीमार्ट * * डी मार्ट चे प्रमोटर  राधाकिशन दमानी यांनी * गोपाळ हवेली * येथे * ए * मेट्रो सिनेमा क्वीन्स रोड मुंबई जवळ एक सुविधा बांधली असून मुंबईत उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांसाठी rooms 53 खोल्या आहेत.  काल त्याचे उद्घाटन झाले.  हे खूप छान केले गेले आहे.  हितचिंतकांच्या अशा कोणत्याही वास्तविक गरजेचा उल्लेख केला जाऊ शकतो.

  पत्ता:

  गोपाळ हवेली

  50, क्वीन रोड (सिनेमा लेन)

  मेट्रो सिनेमा जवळ

  मुंबई 400 020

  संपर्काची माहिती:

  व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन.  मोबाईल

  91 88799 86893

  ई-मेल:

  fd@gpalmansion.com

  gm@gpalmansion.com

  दूरध्वनी क्रमांक: 022 22055001/02

  www.gpalmansion.com

  दर आहेत

  खूप वाजवी

  न्याहारी 30

  लंच प्लेट 75

  डिनर प्लेट 75

  800 खोल्या

  स्वयंपाकघर आणि जेवणाचे खूप प्रशस्त.

  कृपया व्यापकपणे सामायिक करा.  तुम्ही सगळे कसे आहात

  मुंबईत आप्त नातेवाईक असल्यास पी.एल.  ही माहिती प्रत्येकासह सामायिक करा.  * आम्ही रुग्णांना आणि नातेवाईकांना विनामूल्य टिफिन प्रदान करतो.  * क्षेत्र - दक्षिण मुंबई

  हॉस्पिटल्स: - जसलोक, सैफी, बॉम्बे, नायर, जेजे, मुंबई सेंट्रल जवळ आणि व्हीटी ....

  संपर्काची माहिती: -

  आपण आम्हाला व्हॉट्सअ‍ॅप देखील करू शकता

  * कल्पेश लोढा 9967236006 *

  * मनोज पटवारी 9820645070 *

  * अमृत जैन 9029373751 *

  कमीतकमी अशा लोकांसह पुढे जा जे अग्रेषित करुन इतरांना मदत करू शकतील.

  * आर.के.  घरगुती वैद्यकीय उपकरणे चॅरिटेबल ट्रस्टने सुरू केली आहेत.

  * * व्हीलचेअर *

  * * सक्शन मशीन *

  * * वॉटरबेड *

  * * एअरबेड *

  * * केर कर *

  वापरण्यास विनामूल्य (परताव्यायोग्य ठेवीसह)

  संपर्क व्यक्ती: -

  * संजय शाह 9322516628 *

  * चिंतन पांड्या: - 7666311942 *

  * जोडा: -17-डी, निसारगा उपट.  आयडीबीआय बँक जवळ, महावीर नगर, कांदिवली पश्चिम मुंबई 67 67 *

  * साई वल्यात्री साक्षरता पॉलीक्लिनिक *

  "कंबर दरबार" शांतीलाल मोदी रोड, भुराभाई हॉल समोर, कांदिवली (प.), मुंबई.

  * टी: 02265811644 *

  * 0222865 9615 *

  * www.kambardarbar.org *

  * दिवसाची वेळ *

  1. * सामान्य ओपीडी * ₹ 1 / - केवळ औषधांसह

  दररोज सकाळी _11-30 आणि संध्याकाळी 4-30_

  २. * एक्स-रे * ₹ 100 / -

  दररोज _9 ते 5-00 वाजता_

  3. * ईसीजी * ₹ 70.00

  दररोज _ * * * 9.00 ते सकाळी 11.00 * _

  *.  * पॅथॉलॉजी * अत्यधिक अनुदानित दर.  केवळ सीबीसी ₹ 20 / -.

  दररोज _8.30 ते 12.00_

  *. * नेत्र तपासणी * २० / -

  दररोज _3.30.30_

  सकाळी _ सकाळी 9 वाजता: बुध, शुक्र, शनि ._

  मोतीबिंदू शस्त्रक्रिया: सर्वोत्कृष्ट भारतीय लेन्ससह विनामूल्य.

  लेझर (फाको) शस्त्रक्रिया:

  5,3०० / - यू.एस.  फोल्डेबल लेन्स आयात करीत आहे

  / 10,000 / - यूकेने फोल्डेबल herफेरिक लेन्स आयात केले.  (बाहेरील दर 40,000 / - आहे

  *. * स्त्रीरोगशास्त्र / आयव्हीएफ / हिस्टेरोस्कोपी *

  _ट्यू / थुर / शुक्र.  1 p.m.

  7. * त्वचेचे विभाजन.  * .00 20.00

  सोमवारी दुपारी ..pm० वाजता_

  8. * ऑर्थोपेडिक * 20.00

  मंगळ _3.30.30__

  9. * मधुमेह आणि कार्डिओ * .00 20.00

  बुधवारी दुपारी 8.30 वाजता_

  10. * मुलाचे विभाजन.  * .00 20.00

  शुक्रवारी _5.30 pm_

  11. कान / नाक / घसा * .00 20.00

  बुधवारी / शुक्र 4-30 संध्याकाळ_

  12. * दंत * नाममात्र शुल्क आरसी शुल्क: ₹ 750 / -.

  दररोज _9.00 ते दुपारी 1.00_दिली दुपारी ०.०० वाजता ते सायंकाळी 00.००_

  १.. * डायलिसिस * बीपीएल रूग्णांसाठी विनामूल्य

  दैनिक (फोन: 28067645)

  14. * ग्रीवाचा कर्करोग * (ग्रीवाचा कर्करोग) चाचणी मोफत

  15. * अँटी कॅन्सर इंजेक्शन * 14 ते 24 वर्षांच्या मुलींसाठी.

  16. * ज्येष्ठ नागरिकांसाठी वास्तविक सुनावणी *, प्रत्यक्ष खर्चाच्या 50%.  जन्मतःच पात्र मुलांसाठी विनामूल्य.

  १.. * उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात नोटबुक आणि इतर हार्डवेअर वस्तू.

  18. * * बी.बी.  एमबीबीएस  सी.ए.  सी.एस.  बी.पी.एच.आर.एम.  एम.सी.ए.  आणि एमबीए निवडले.  विद्यार्थ्यांसाठी पात्र उमेदवारांसाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती *.  * भेट *

  www.kambarda bar.org आणि सर्व आवश्यक तारणांसह फॉर्म सबमिट करा.

  कृपया p_zijn zasainani@rediffmail.com ईमेल वर संपर्क साधा

  * कोणत्याही शिफारसी आवश्यक नाहीत.  * कृपया शेअर करा.  ********** प्राप्त केल्यानुसार


*👉🏼 आपल्या ओळखीच्या ग्रुपमध्ये पाठवा कोणाला तरी फायदा होईल 🙏*

 "jai bharat, Jai Maharashtra "🇬🇭                 *   ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात. .*

*आठवणींच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात. .*

*आपली होणारी आठवण हा तोच सुगंध असतो. .*

*जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधांचा तो दरवळ असतो. .*


  *💐🌹 good day🌹💐

 *बघण्याची नजर प्रामाणिक* 

*असेल तर नजरेला दिसणारी*

*प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते...💯🤞*


lakshvedhimm. blogspot. com📞9876824365,lakshvedhimm@gmail.com

 पूरग्रस्त नागरिकव्यावसायिकदुकानदारांच्या विम्याची

किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी

.............

विमा कंपन्यांना निर्देश देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

 

            मुंबई, दि. 29 : ज्या व्यावसायिकदुकानदारांचे आणि नागरिकांचे  पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावीविमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर मिळावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त भागातील व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने विमा कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती  त्यावेळी ते बोलत होते.

            बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  उद्योग मंत्री सुभाष देसाईराज्य मंत्री कु.आदिती तटकरेआमदार भास्कर जाधवमुख्य सचिव सीताराम कुंटेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहप्रधान सचिव विकास खारगेमदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ पी गुप्तारायगडरत्नगिरीसांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह 11 विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कीजुलै महिन्यात मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रायगडरत्नागिरीकोल्हापूरसांगली आणि सातारा अशा जिल्हयांना पूराचा मोठा फटका बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. सर्व पूरग्रस्त भागांमध्ये महसूल यंत्रणेस तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक दुकानेवाहने आणि घरे यांचे नुकसान झाल्याने लोक विमा कंपन्यांकडून विमा मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आपण आजच काही विमा कंपन्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत विमा कंपन्यांनी पंचनाम्यांच्या आधारे एकूण विम्याच्या 50 टक्के रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र यासाठी केंद्र शासनाकडून विमा कंपन्यांच्या मुख्यालयास आणि आयआरडीएला योग्य ते निर्देश किंवा सूचना मिळणे आवश्यक आहे. यापुर्वी देखील जम्मू काश्मिर आणि केरळमधील मोठ्या पूराच्या वेळेला अशा प्रकारे केंद्र सरकारने विमा कंपन्यांना निर्देश दिले होते असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बँकांनाही सवलतीच्या व्याजदरात कर्ज द्यावे

            मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या प्रतिनिधींसमवेतही बैठक घेतली. या बैठकीच्या अनुषंगाने देखील मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती दिली. सर्व बँकांनी पूरग्रस्त भागातील शाखांमधून बँकींग व्यवसाय त्वरित सुरु करावाज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहेत्यांना वर्किंग कँपिटल- खेळते भांडवलाकरिता सवलतीच्या व्याज दरात कर्ज द्यावेज्या लोकांना कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. त्यांना काही महिन्यांची सवलत द्यावी अशा सूचना बँकांना दिल्या असून आपल्यास्तरावरून देखील असे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

प्रक्रिया सुटसुटीत करावी

            दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना म्हणाले की,  दावे निकाली काढताना त्यांची नियमावली दाखवून अडचणीत असलेल्या विमाधारक उद्योग व्यावसायिकाना आणखी अडचणीत आणू नयेदावे निकाली काढण्याची पद्धत सुटसुटीत आणि सोपी करावीपॉलिसी घेतानाचे प्रश्न आता दावे निकाली काढताना विचारू नयेत. रोगराई पसरू नये म्हणून पूरग्रस्त भागाची स्वछता लवकरात लवकर करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे  झालेल्या नुकसानीचे दावे निकाली काढण्यासाठी  नुकसान झालेल्या वस्तू  आणि वाहने  आहे त्या नुकसानग्रस्त स्थितीत ठेवणे शक्य होणार नाही.  त्यामुळे महसूल यंत्रणेने पंचनामे करताना झालेल्या नुकसानीचे सुस्पष्ट छायाचित्रे काढावीतमहसूल यंत्रणेचे हे पंचनामे आणि छायाचित्रे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावीत व  त्यावरून नुकसानग्रस्ताना विम्याची रक्कम देण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी.

दावे तातडीने निकाली काढावेत

            बैठकीत उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले कीविमा कंपन्यांनी विमा दावे तातडीने निकाली काढावेतपुराच्या पाण्याने उद्योग व्यावसायिक आणि विमाधारक नागरिकांची कागदपत्रे  वाहून गेली आहेत त्यामुळे या गोष्टीसाठी त्यांच्याकडे  आग्रह धरू नयेत्यांच्या दाव्याची खातरजमा करून नुकसानीची विमा रक्कम पूर्णत्वाने द्यावी.

            नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा दावे तातडीने निकाली काढण्याची आवश्यकता व्यक्त केलीत्यांनी विमा दाव्याची रक्कम मिळवताना नागरिकांना येत असलेल्या अडचणीची माहिती दिली

            राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विमा कंपन्यांनी विमा दाव्याची 100 टक्के रक्कम प्रदान करावी, यात कपात करू नये अशी मागणी यावेळी केली.

            जिल्हाधिकाऱ्यांनी विमा दावे निकाली काढताना महसूल यंत्रणेचे पंचनामे ग्राह्य धरावेत या मागणीसह त्यांना असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या.

000

 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती

विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            मुंबई,  दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरीता वैयक्तीक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सूरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

            महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. 18 ते 50 वर्ष वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तींनी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीकरीता गृहनिर्माण भवनखो.क्र.३३कलानगरबांद्रा (पू)मुंबई. दुरध्वनी क्रमांक २५४२८९०७ येथे संपर्क साधावाअसे आवाहन  अरुण माने जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुंबई शहर व उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००

 

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 30 : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांकरीता बीज भांडवल योजनावैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजना व थेट कर्ज योजना (महामंडळ) सुरू असून मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

            महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. १८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तीनी महामंडळाच्या www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेतस्थळावर करावाअसे आवाहन जिल्हा व्यवस्थापकशामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. मुंबई शहर व उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००


 

एनएसएफडीसी योजनेअंतर्गत स्माईल योजना

 

              मुंबईदि. 30 : कोरोना विषाणुच्या महामारीमध्ये अनुसूचित जातीमधील ज्या कुटुंबप्रमुखाचे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निधन झाले आहे. अशा कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याकरिता एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘स्माईल योजना’ राबविण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            अनुसूचित जातीतील 18 ते 60 या वयोगटात असलेल्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 मुळे मृत्यु झाला आहे. अशा कुटुंबाचे पुर्नवसन करण्यासाठी माहिती एकत्रित करण्यात येत आहे. यासाठी संबंधितांनी https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर अर्ज भरावा. या योजनेची अधिक माहिती www.mahatmaphulecorporation.com  या संकेतस्थळावर नोटीस सेक्शन मध्ये मिळेल.

            या योजनेला अधिकाधिक कुटुंबांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे

Featured post

Lakshvedhi