Wednesday, 28 July 2021

 शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत

एमपीएससीकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

·       एमपीएसएसीच्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा;

·       विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट

 

           मुंबईदि. 28 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसहउच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दि. ४ मे २०२१ आणि दि. २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससीकडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणेसामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिकलेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रेविधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटेमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते.

             कोरोनाच्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दि. ४ मे २०२१ आणि दि. २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरतीप्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दि. ४ मे २०२१ आणि दि. २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देण्यात देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ही रिक्त पदे भरण्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी एमपीएससीकडे रिक्तपदांचा  प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

*****

 साताऱ्यातील भूस्खलनग्रस्त मीरगावआंबेघरहुम्बराळे गावाचे तात्पुरते पुनर्वसन

जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·       दरड कोसळून जीवितहानी झालेल्या मीरगावहुम्बराळे गावांना दिली भेट

·       दरडग्रस्त गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूचे केले वाटप

 

            मुंबईदि. 27 : कोयना धरणाच्या पट्ट्यातील भूस्खलनग्रस्त मीरगावआंबेघरहुम्बराळे गावातील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन सध्या जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये करण्याचे निर्देश  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. आज त्यांनी स्वतः जाऊन या जलसंपदा विभागाच्या निवासी वसाहतींची पाहणी केली. त्यानंतर त्यानी या वसाहतींची डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करून त्यात या 150 कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे निर्देश दिले.

            गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोयनानगर परिसराला देखील बसलेला होता.  यात या परिसरातील मीरगावआंबेघरहुम्बराळे गावात भूस्खलनात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नगरविकास मंत्र्यांनी तातडीने इथे येऊन मीरगाव आणि हुम्बराळे या गावांना भेटी देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या गावकऱ्यांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगर जिल्हापरिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. श्री. शिंदे यांनी या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे तुमच्यासोबत असून तुमच्या पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही त्यानी यावेळी दिली. त्यासोबतच या ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूचादरीकपडेसतरंज्याचटयाछत्र्या अशी मदत दिली. यासोबतच शासनाची मदत देखील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असेही सांगितले. 

            यानंतर या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करण्याचा पर्याय पुढे आला. कोयनानगर परिसरातील या वसाहती कोयना धरण बांधताना उभारण्यात आल्या होत्या. या वसाहतींची डागडुजी केल्यास तो पुनर्वसनासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल यावर एकमत झाल्याने त्यांनी तातडीने हे डागडुजीचे काम हाती घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच या भूस्खलनग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने ते देखील लवकरच करू असे ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.

            यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ठाण्याहून पुरग्रस्तांसाठी मदत घेऊन आलेले नगरसेवक राम रेपाळेनगरसेवक योगेश जानकरशशिकांत जाधव आणि स्थानिक अधिकारी  उपस्थित होते.

 नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी

कौशल्य विकास मंडळाचे विविध 301 अभ्यासक्रम

·       मंडळाचे नवीन संकेतस्थळ व बोधचिन्हाचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते अनावरण

 

            मुंबईदि. 27 : नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध 301 अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता नवीन संकेतस्थळावर मिळणार आहे. www.msbsd.edu.in या नव्या संकेतस्थळाचे तसेच मंडळाच्या बोधचिन्हाचे (Logo) नुकतेच कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

            कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले कीमंडळाचे पूर्वीचे नाव महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ होते व जुनी वेबसाईट कार्यरत होती. आता मंडळाच्या नावात बदल झाल्यामुळे नवीन अद्ययावत वेबसाईट बनविण्यात आली आहे. व्यवसाय शिक्षण या संकल्पनेतून स्थापन झालेल्या या मंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगारासाठी व्यवसायाभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यात येतात. औद्योगिकरणातील वाढबदलते तंत्रज्ञानसामाजिक व आर्थिक बदल इत्यादींमुळे मंडळाच्या अभ्यासक्रमात कालानुरुप सुधारणा तसेच वाढ करुन सद्यस्थितीत मंडळामार्फत 28 गटातील 6 महीने, 1 वर्ष व 2 वर्ष कालावधीचे अंशकालीन व पूर्णवेळ स्वरुपाचे 301 अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत.

शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचे अभ्यासक्रम वरदान

            कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले कीनियमीत विद्यार्थ्यांसह अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत 301 अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हातालुकास्तरावर तसेच ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या 1 हजार 269 संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. विशेषत: खेड्यापाड्यातीलगोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात. या सर्व अभ्यासक्रमांची माहिती आता नव्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळवावेअसे आवाहन त्यांनी केले.

००००

 कोकणपश्चिम महाराष्ट्र व इतर भागात अतिवृष्टीमुळे

बाधित 16 जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

·       पुरामुळे बाधित पाणीपुरवठा योजनांची तात्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

·       पूर्ण योजना बाधित झालेल्या गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविणारनिधीची कमतरता भासू देणार नाही

·       1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित

             मुंबई दि. 27 : कोकण किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून त्यादृष्टीने  युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित ;

42  कोटी 88 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित

           अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील कोकणपश्चिम महाराष्ट्र व  इतर अशा 16 जिल्ह्यांमध्ये 1 हजार 129  पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत.त्यापैकी काही योजना तातडीने सुरू करण्यासाठी डिझेल जनरेटरची व्यवस्था,क्लोरीनेशन करणेटँकरने पाणीपुरवठा करणेबोरवेलची किरकोळ दुरुस्ती,पंपाची दुरुस्तीपाणीपुरवठा लाईन दुरुस्त करणे या बाबींसाठी 11 कोटी 22 लाख रुपयांचा निधी तत्काळ लागणार आहे.तर जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी 31 कोटी 65 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असे एकूण 42 कोटी 88 लाख रुपयांचा खर्च या योजनांसाठी लागणार आहे. तातडीची बाब म्हणून जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासन त्यांच्या उपलब्ध निधीतून कामे सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भात महसूल तसेच मदत व पुनर्वसन विभागाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी किरकोळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा करणे शक्य आहे तेथे तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तथापि वीज पुरवठा खंडित झालेला असल्यामुळे ज्या पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा करता येत नाही अशा ठिकाणी स्थानिक स्रोतांमधून (बोअरवेलविहीर) पाणीपुरवठा करण्यात येत आहे असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

टँकरद्वारे पाणीपुरवठा

            काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे तर आणखी आवश्यकता भासल्यास टँकर उपलब्ध करून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत.

पुरेसा व शुद्ध पाण्याचा पुरवठा

            आपद्ग्रस्त भागातील जनतेला पुरेसा व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिसार व इतर साथीचे आजार होऊ नये म्हणून क्लोरीनद्वारे पाणी शुद्धीकरण करणे तसेच परिसर स्वच्छतेच्या संदर्भातही आवश्यक ती  खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्यासह विभागाचे अपर मुख्य सचिवमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिवजल जीवन मिशनचे अभियान संचालक तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक हे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

 

 

बदलापूरअंबरनाथ शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या

जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ दुरुस्ती

            सततच्या पावसामुळे उल्हास नदीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने बदलापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्याने येथील यंत्रणा पूर्णतः बिघडली होती. पुढील तीन दिवस ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी लागणार असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार होती.परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून ही यंत्रणा अवघ्या दीड दिवसात पूर्ण केल्यामुळे पाण्याचा प्रश्न सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला अशी माहितीही पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिली.

भूजल सर्वेक्षण यंत्रणेची ठिकठिकाणी पथके कार्यरत

            अतिवृष्टीमुळे जे हॅन्ड पंपविद्युत पंप सोलर पंप  नादुरुस्त झाले आहेत,ज्या विहिरींमध्ये गाळ साचला आहे अशा ठिकाणी स्वच्छता करून ते तत्काळ दुरुस्त करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची पथके प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. कोल्हापूर येथे 4 सांगली येथे 2 तर रत्नागिरी येथे 2 अतिरिक्त पथके पाठविण्यात आली आहेत.

पाण्याचे नमुने तपासणी

            अतिवृष्टीमुळे बाधित जिल्ह्यातील पाण्याचे नमुने तपासण्याचे कामही भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

पूर्ण योजना बाधित झालेल्या गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविणार ;

निधीची कमतरता भासू देणार नाही

            पूर्ण योजना बाधित झालेल्या गावांसाठी नवीन योजना राबविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी दिली.


 मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत

पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक प्रशिक्षणासाठी

इच्छुकांनी संपर्क साधावा

मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 

            मुंबईदि. 27 : कोविड १९ प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल  मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यात स्वारस्य असलेल्यांनी पुढील ठिकाणी तातडीने संपर्क साधावाअसे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

            या योजनेत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील युवा युवतींना जिल्ह्यातील प्रसिद्ध शासकीय व नामांकित खासगी रुग्णालयामध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमामध्ये विना शुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील रोजगार सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असलेल्यांनी तातडीने पुढील लिंकवर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdThDxq5zza8OfEP2uaKW-Q3RwpDz9l7zIVHAoORzBuhV8Biw/viewform?usp=sf_link  या ठिकाणी त्वरित आपली नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. अधिक माहितीकरिता दुरध्वनी क्र. ०२२-२२६२६३०३ यावर किंवा ईमेल mumbaicity.employment@gmail.com  वर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हाधिकारीमुंबई शहर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

००००


 चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

·       चिपळूणला पुन्हा उभे करण्यासाठी 5 मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची तातडीने होणार नियुक्ती

·       ठाणेनवी मुंबईतील स्वच्छता कर्मचारीही मदतीसाठी देणार

·       पूरग्रस्त चिपळूण शहर आणि बाजारपेठेची नगरविकास मंत्र्यांकडून पाहणी

 

            मुंबईदि. 27 : चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला श्री.शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

            गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचे या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचे देखील श्री. शिंदे यांनी जाहीर केले आहे.

            शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळ देखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवू असेही त्यांनी जाहीर केले.

            चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणारे बोटीलाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी महाड मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

            यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतचिपळूणचे आमदार भास्कर जाधवमाजी आमदार सदानंद चव्हाण, स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

 राज्यपालांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी

पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली

 

            अलिबागदि.27 : महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहेअशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाड मधील तळीये गावी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

             राज्यपाल श्री.कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होतेत्यावेळी ते बोलत होते.

             राज्यपाल श्री. कोश्यारी पुढे म्हणालेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते सर्व व्यवस्थित करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र सरकार व राज्य शासन करील.

              या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रध्दांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवोतुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेलअसेही ते यावेळी म्हणाले.

            यावेळी दरडग्रस्त तळीये गावाच्या स्थळी पुष्पचक्र अर्पण करुन मृतात्म्यांना श्री.कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली.

             यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरेआमदार भरत गोगावलेआमदार आशिष शेलारजिल्हाधिकारी निधी चौधरीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटीलजिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधेअपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळउपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबेमहाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाडमहाडचे तहसिलदार सुरेश काशीदसुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टीतळीये गावाचे सरपंचदुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi