Tuesday, 27 July 2021

 मराठाकुणबी विद्यार्थ्यांना न्यायालयीन पदांसाठी

विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

 

          मुंबई, दि. 27 - मराठा,कुणबीकुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी  ऑनलाईन प्रशिक्षण छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) पुणे मार्फत प्रायोजित केले आहे. विद्यार्थ्यांना दरमाह 8,000 विद्यावेतन आणि प्रशिक्षणाचे संपुर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यात येणार असूनप्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत 18 ऑगस्ट 2021 आहे. अशी माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायीक सेवा परीक्षेमार्फत दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  यांची निवड केली जाते. त्यातील काही अधिका-यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती सुध्दा मिळते. या प्रशिक्षणाची संपुर्ण माहिती https://sarthi-maharashtragov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यातआले आहे.

            मराठा व कुणबी समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी अभ्यासाकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना माहे रु.8,000/ मासिक हजेरीच्या आधारे विद्यावेतन देण्याबाबत व त्याचे प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देणेबाबत संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. साधारणत: 400 विद्यार्थ्यांना या मार्फत दरवर्षी लाभ देण्यात येणार आहे.

            या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी सारथी मार्फत अर्ज मागविण्यात आले असून यासाठी विद्यार्थी विधी पदवीधर किंवा वकीलऑटोर्नी अधिवक्ता असावा. पात्र उमेदवारांना मुंबईपुणेऔरंगाबाद व नागपूर याठिकाणी नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येईल. हा उपक्रम पूर्वपरीक्षामुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड सामायिक प्रवेश चाचणी (CET) द्वारे     गुणवत्तेनुसार करण्यात  येईल.            

            महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज करत असतात परंतु योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणा अभावी निश्चित असे ध्येय प्राप्त करु शकत नाहीत. त्यासाठी सारथी ने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.

0000

 🛑 माझी आडाणी आई 🛑



मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला ... अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..!


 आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!


 इतक्यात,.. मुलगा पटकन बोलला ...

 "बाबा तिला कुठे Result दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!" 


भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.


ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले... "हो रे ! ते पण खरच आहे...! 


आमच लग्न झाल तेव्हा तीन महिन्यातच तुझी आई गर्भवती राहिली.. मी विचार केला लग्नानंतर कुठे फिरलो नाही.. व्यवस्थितपणे एकमेकांना समजल पण नाही,. तर ह्यावेळी गर्भपात करुन पुढे chance घेउया.. पण तुझी आई ठामपणे *"नाही"* म्हणाली.. नको ते नंतर वगैरे... फिरण, समजण पण नको... आणि तुझा जन्म झाला... *अशिक्षित होती ना...*


तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती... 

*अशिक्षित होती ना...*


तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची..... 

*अशिक्षित होती ना...*


तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची...

*अशिक्षित होती ना...*


तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास... तेव्हा रात्र-रात्र  जागुन ती परत सकाळी तिची काम चोख करायची....

*अशिक्षित होती ना...*

 

तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.

*अशिक्षित होती ना....*


बाळा.... चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात.. पण तुझ्य आईने आजवर कधीच तो बघितला नाही.

*अशिक्षित आहे ना ती...*


ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची... म्हणून  मी अभिमानाने सांगतो की *'तुझी आई अशिक्षित आहे...'*


हे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो.. "आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.

आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे Phd  च्या पण वरची Degree  आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल......!


*बोध:*.... प्रत्येक मुला- मुलीनी *जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात.* त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी काय काय सोसलय... आईवडिलांनी.🙏🏼

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

 [27/07, 09:25] Baby: 🌹 *सुप्रभात* 🌹                        


*यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणी हास्य ....* *कारण हास्य त्याचे प्रश्न दिसु देत नाही ... तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही*



👏 🙏🏻🌹*शुभसकाळ🌹🙏🏻* 👏

[27/07, 09:29] Baby: पावसात कार बुडाली तर इन्श्युरन्स क्लेम मिळणार का ?🤔 नक्की पूर्ण वाचा!

बंधू भगिनींनो,

गेले दोन-तीन दिवस पडणार्‍या पावसाने अनेक गावात -शहरात  पूर आला आहे. शहरात अनेक नव्या वसाहतीत पाणी साचल्याने बर्‍याचजणांना  एका अनपेक्षीत संकटाला सामोरे जावे लागते आहे. हे संकट म्हणजे अगदी 'सेफ पार्कींग लॉट' , 'ओपन गॅरेज' किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. 

या सर्व गाडी मालकांच्या समोर एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे तो म्हणजे या नुकसानाची भरपाई इन्शुरन्स कंपनी देणार का ?


आज या समस्येचे निराकरण आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत.


जर तुमची गाडी नवीन असेल तर तुमच्या गाडीची जोखीम सर्वसमावेशक म्हणजे 'काँप्रेहेन्सीव्ह रिस्क कव्हर' (Comprehensive Cover) इन्शुरन्स कंपनीने घेतलेली असेल. जर कर्ज घेऊन गाडी घेतलेली असेल तर गाडीचा विमा ''काँप्रेहेन्सीव्ह' असेलच याची खात्री बाळगा कारण कर्ज देणार्‍या अर्थसंस्थांची ही अनिवार्य अट असते आणि तसे केलेत नाही तर गाडीचा हफ्ता पण भरावा लागेल आणि गाडी दुरुस्त पण स्वतःच्या खर्चात करावी लागेल। 


पण.... पण ... 

पहिल्या काही वाहनमालक 1-2 वर्षांनंतर केवळ विम्याचा हप्ता (प्रिमियम) कमी भरायच्या हेतूने फक्त 'थर्ड पार्टी इन्शुरन्स' काढतात। 

असे असेल तर पाण्यात बुडालेल्या गाडीचे एकही रुपयाचे नुकसान इन्शुरन्स कंपनीभरून देणार नाही. 🚫


आता समजा, 

तुमच्या गाडीचा विमा सर्वसमावेशक म्हणजेच 1st Party (Comprehensive) आहे तर काय कराल ? 


गाडी जागेवरच उभी असेल तर ती तशीच ठेवा. जर वाहून दुसर्‍या जागेवर गेली असेल तर धक्का मारून बाजूला उभी करा. तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या हेल्प लाइनवर फोन करून तुमचे नाव , पॉलीसी नंबर आणि गाडीचे लोकेशन कळवा. कंपनीकडून  सर्व्हेअर येऊन गाडीचे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेईल. जर जागेवर आढावा घेणे शक्य नसेल तर गाडी टो करून गॅरेजला पाठवली जाईल आणि नुकसानीचा अंदाज कंपनीला कळवून गाडी इन्शुरन्स कंपनीच्या खर्चात  दुरुस्त होईल.


आता या सगळ्या धावपळीत एक मोठी घोडचूक तुमच्या हातून होण्याची शक्यता आहे ती म्हणजे सर्व्हेअरला बोलावण्याच्या आधीच इग्नीशन मारून गाडी चालवण्याचा प्रयत्न करणे. हे जर तुम्ही केलेत तर गाडीचे इंजीन 'हायड्रोलॉक' होईल. हायड्रोलॉक म्हणजे गाडी सुरु होताना इंजीनमध्ये पाणी घुसेल आणि इंजीन 'सिझ' होईल. इंजीन 'सिझ' झाले की ते कामातून जाईल.


इन्शुरन्स करारानुसार हा गाडी सुरु करण्याचा प्रयत्न आणि त्यातून झालेले इंजीनचे नुकसान 'कॉन्सिक्वेंशिअल लॉस ' म्हणजे तुमच्या हातून घडलेल्या चुकीमुळे 'मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान' या सदरात जाईल. परीणामी तुम्हाला इंजीनचा येणारा खर्च कंपनी देणार नाही. एकूण नुकसानीत इंजीन हाच मोठा खर्च असतो तोच मिळाला नाही तर इतर नुकसान भरपाई मिळूनही काहीच फायदा नाही.


तेव्हा लक्षात ठेवा, 

पाण्यात बुडलेली गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करू नका !!!🚫

आता हाच हायड्रोलॉकींगचा धोका जास्त साचलेल्या पाण्यातून गाडी नेण्यात उद्भवू शकतो, अशा परीस्थितीतही इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील नाही हे पण लक्षात ठेवा.

जर 'अ‍ॅड ऑन ' म्हणून इंजीनचा स्वतंत्र विमा (Engine Cover) त्याच पॉलीसीत घेतला असेल तर ही  'कॉन्सिक्वेंशिअल लॉस ' अट लागू पडत नाही.


थोडक्यात गाडी कितीही पाण्यात बुडाली आणि तुम्ही चुकून स्टार्ट करून अजून खराब झाली तरी 1st Party (Comprehensive + Engine Cover ) इन्शुरन्स असल्यास तुमचाच फायदा होतो। 🚘🚖🚗

 बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

·       अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी....

·       ....त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार

 

मुंबईदि. 26 : बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर सगळेच संपलेय अशी तिची अवस्था.. मात्र या अवस्थेवरयातनावर मात करीत तिने आज भरारी घेतली. दहावीच्या शालांत परीक्षेत तिने चक्क 97 टक्के गुण मिळवलेया यशाचे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले.

ही गोष्ट एकटीची नाही, तिच्यासारख्याच बालगृह आणि अनुरक्षण गृहातील अन्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याची ग्वाही मंत्री ॲड.ठाकूर यांनी दिली  आहे.

शासनाच्या बालगृहात तसेच अनुरक्षण गृहात असणाऱ्या 574 मुला-मुलींनी दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे. त्यांचे हे यश एक महत्वाचा टप्पा असून महिला व बालविकास विभाग यापुढेही त्यांच्या उच्चशिक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून या मुलांच्या पंखात बळ देण्याचे काम शासन निश्चितच करेलअशी ग्वाही ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

राज्यातील विविध कारणास्तव आधाराची गरज असलेली मुले बालगृहात तर विधीसंघर्षग्रस्त बालके (चाईल्ड इन कॉन्फ्ल‍िक्ट विथ लॉ) पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते. अत्याचार झालेल्या किंवा अन्य कारणांमुळे बालगृहात यावे लागलेल्या तसेच वाट चुकल्यामुळे अनुरक्षण गृहात यावे लागलेल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षण यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते.

दहावीच्या परीक्षेला राज्यातील विविध बालगृह आणि अनुरक्षण गृहातील सुमारे सहाशे विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते यापैकी 574 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 284 मुली आणि 290 मुले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे यातील सुमारे 60 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या श्रेणीत अथवा विशेष श्रेणीत प्राविण्य मिळवले आहे. या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

००००

 मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडवणार : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मागासवर्गीय समाजात उद्योजक निर्माण व्हावेत

 

            मुंबईदि. 26 राज्यातील मागासवर्गीय उद्योजकांचे अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्था महासंघातर्फे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मागासवर्गीय उद्योजकांना वीजपुरवठ्याशी संबंधित विविध योजनांचा लाभ व्हावा आणि त्यांना अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी एक कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

लोकशाहीची पाळेमुळे आर्थिक व सामाजिक समतेवर आधारलेली आहेतअसे सांगून डॉ. राऊत म्हणालेराज्यघटनेने जरी राजकीय समतेची हमी दिली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यावर समाधान झाले नव्हते. त्यांना अपेक्षित असलेली आर्थिक व सामाजिक समता निर्माण होण्याची गरज आहे. डॉ.आंबेडकरांना अपेक्षित आर्थिक व सामाजिक लोकशाही वास्तवात आणण्यासाठी मागासवर्गीयांचे आर्थिक सक्षमीकरण महत्वाचे असून मागासवर्गीयांच्या उद्योगांना शासकीय पाठबळ लाभल्याशिवाय हे शक्य होणार नाहीअसे स्पष्ट प्रतिपादन डॉ.राऊत यांनी केले.

मराठवाडा व विदर्भातील उद्योगांना देण्यात येणाऱ्या वीज सवलतीच्या धर्तीवर मागासवर्गीय उद्योजकांना देखील वीज सवलत व जोडणी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच मागासवर्गीय उद्योजकांना कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे थकलेल्या वीज बिलाचे हप्ते पाडून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक जिह्यात मागासवर्गीय समाजातून उद्योजक निर्माण झाले पाहिजे.  त्यासाठी लवकरच एक कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केले जाईल. आतापर्यंतच्या मागासवर्गीय सहकारी संस्थांचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील व भविष्यातील मागासवर्गीय उद्योजकता विकासाचा  आराखडा (रोडमॅप) तयार केला जाईल. मागासवर्गीय उद्योजकांना योग्य दर्जाचा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी काय पावले उचलावित याचाही विचार कृती दलातर्फे केला जाईल. यासाठी प्रसंगी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू,’ असे उर्जामंत्र्यांनी सांगितले.

 उर्जा विभागांतर्गत अनुसूचित जाती व जमातीतील घटकांना घरगुती वीज जोडणी देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ महाविकास आघाडी सरकारने आणली असून इतर घटकांनाही त्यात सामावून घेण्यासाठी याची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी उद्योजकांना दिली.

राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणा अंतर्गत उभारण्यात येणारे सौर ऊर्जा प्रकल्पइलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनसॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीगृहनिर्माणगटशेतीपायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्योगात मागासवर्गीय उद्योजकांना खास संधी निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलअसेही डॉ. राऊत म्हणाले.

या बैठकीला बाबासाहेब आंबेडकर सर्व्हिसेस अँड इंडस्ट्रीज चेंबर्सचे अध्यक्ष अरुण खोब्रागडेमहावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडेमराविम सूत्रधार कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टेमहाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्थाच्या महासंघाचे कार्याध्यक्ष मोहन मानेउपाध्यक्ष प्रमोद कदमसरचिटणीस गौतम गवई आणि मागासवर्गीय उद्योजकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

००००

 महाड दुर्घटनेतील जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू;

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जखमींची केली विचारपूस

 

 जखमींचा सर्व उपचार राज्य शासन करणार

 संकटात शासन पाठीशी असल्याची दिली ग्वाही

 

            मुंबईदि. 26 : अतिवृष्टीमुळे महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १६ जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असूनवैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींचा सर्व उपचार राज्य शासन करणार असून अशा संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली.

             सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट दिली. महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर येथे उपचार सुरू असून सर्व जखमींची यावेळी त्यांनी विचारपूस केली. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून ज्या जखमींवर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहेत्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही जखमींवर अतिदक्षता रुग्णालयात योग्य उपचार सुरू असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            दरडग्रस्तांना सर्व आवश्यक ती मदत पोहोचविण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलून उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही श्री. अमित देशमुख यांनी सांगून या नैसर्गिक संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

            कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्याशिवाय पूरग्रस्त भागात रोगराई पसरणार नाही यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. डेंग्यूसह इतर रोगांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवण्यात आली आहे.  या संकटाच्या काळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांचे अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

००००


 

पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते बंद,

469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित तर 140 पूल पाण्याखाली

 

            मुंबईदि. 26 : राज्यातील कोकण व पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना दौरा करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

            राज्यात गेल्या काही दिवसात पुणे तसेच कोकण विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक रस्ते व पूल नुकसानग्रस्त झाले आहेत. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसारसातारा व पुणे जिल्ह्यात पुण्याचे मुख्य अभियंता श्री. साळुंखेसांगली जिल्ह्यात औरंगाबादचे मुख्य अभियंता श्री. उकिर्डेकोल्हापूरमध्ये मुंबईचे मुख्य अभियंता के.टी. पाटीलसिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोलेपालघर व ठाणेमध्ये नाशिकचे मुख्य अभियंता पी.बी. भोसले आणि रायगडमध्ये सहसचिव श्री. रामगुडे हे भेट देणार आहेत. या अधिकाऱ्यांनी शासनास दररोज अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

            राज्यातील अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार290 रस्ते बंद झाले आहेत. तर 469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित झाली आहे. 140 पूल व मोऱ्या हे पाण्याखाली गेले आहेत.

 शूरवीर जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित

- राज्यपाल कोश्यारी

·       कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल योद्ध्यांचा राजभवन येथे सन्मान

·       वीरमाता अनुराधा गोरे यांच्या ‘अशक्य ते शक्य’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

 

            मुंबई, दि. 26 : हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहेदेशाचे शूरवीर जवान व  अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या धैर्य व त्यागामुळेच देश सुरक्षित आहेअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            कारगिल विजय दिनाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित 'अशक्य ते शक्य'...कारगिल संघर्षया पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.

            कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, भारताला शांती हवी असली आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून देशाच्या सुदूर सीमावर्ती भागात चांगले रस्ते व सुसज्ज हवाई तळ उभारण्यात आले आहेत. सन १९६२ मध्ये आपण विद्यार्थीदशेत असल्यापासून आजपर्यंत देशाचे अनेक जवान व अधिकारी हुतात्मा झालेले पहिले, खुद्द आपल्या २२ वर्षीय बहिणीचे पती १९६२ च्या युद्धात शहिद झाले, असे राज्यपालांनी सांगितले.

            कारगिल युद्धात भारताची रणनीतीही जिंकली आणि कूटनीतीही जिंकली असे सांगून डोकलाम व गलवान या ठिकाणी चीनने नव्या भारताचे सामर्थ्यवान रूप पाहिले असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 'अशक्य ते शक्यहे पुस्तक केवळ युद्धकथा नाही तर तो कारगिल युद्धाकडे पाहणारा समग्र ग्रंथ आहे असे त्यांनी सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते महावीर चक्र विजेते हवालदार दिगेन्द्र सिंहहवालदार दीप चंदघातक पलटणचे हवालदार मधुसूदन सुर्वेहवालदार पांडुरंग आंब्रे व हवालदार दत्ता चव्हाण,  स्क्वाड्रन लीडर राहुल दुबेकॅप्टन रुपेश कोहलीकॅप्टन विद्या रत्नपारखीसविता दोंदेकर्नल सुशांत गोखले यांच्या आई रोहिणी आनंद गोखले व कर्नल संदीप लोलेकर यांच्या भगिनी कोमल शहाणे यांचा सत्कार करण्यात आला. 

            लेखिका अनुराधा गोरे यांनी अशक्य ते शक्य’ हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा व भूमिका स्पष्ट केली. ग्रंथाली प्रकाशन संस्थेचे दिनकर गांगल व सुदेश हिंगलासपुरकर यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.    सुरुवातीला राज्यपालांनी कारगिल युद्धविषयक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

            कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढालोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढाअनुराधा गोरे व मुंबई प्रभागाचे प्रमुख एअर व्हाईस मार्शल एस आर सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. व्हॉइस ऑफ मुंबई व लोढा फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हर्शल कंसारा यांनी सूत्रसंचलन केले.

००००


Governor felicitates Kargil war heroes on Kargil Vijay Diwas

Releases book on Kargil conflict by Veermata Anuradha Gore

 

            Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated the warriors of the Kargil War and family members of the martyr jawans and officers on the occasion of the 22nd anniversary of the Kargil Vijay Diwas at Raj Bhavan Mumbai on Monday (26 July).

            The Governor also released the book ‘Ashakya Te Shakya…Kargil Sangharsh’ (Impossible to Possible) authored by Veermata Anuradha Gore, mother of late Captain Vinayak Gore on the occasion.

            Former Chief Minister Devendra Fadnavis, MLA Mangal Prabhat Lodha, Chairperson of the Lodha Foundation Manju Lodha, Anuradha Gore and Air Vice Marshal S R Singh were present.

            The felicitation of Kargil heroes was organized by The Voice of Mumbai and Lodha Foundation.

**

Featured post

Lakshvedhi