Sunday, 18 July 2021

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार

 ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे जारी होणार 10 लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे

 

            मुंबईदि. 18 : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण शैक्षणिक वर्षातील सुमारे 10 लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय यामुळे योग्य उमेदवारांचीही होणारी गैरसोय रोखली जाणार आहेअशी माहिती कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

 

            यासाठी क्रॉसफोर्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारा विकसित लेजीटडॉक हे इथरियम ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून या  प्रणालीच्या मदतीने  बनावटरहीत डिजिटल कागदपत्रे 10 सेकंदात जगभरातून कोठूनही ऑनलाईन पडताळणी करता येऊ शकतील. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत घेण्यात आलेल्या स्टार्टअप मेळाव्यातून ही संकल्पना पुढे आली असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाणपत्रांच्या हाताळणीकामी वापरले जाणारे मंडळाचे मनुष्यबळ आणि त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहेअशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली

 

            या उपक्रमाची नुकतीच जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्माकौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहकौशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधवमंडळाचे सचिव कृष्णा शिंदेव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवीसहसंचालक योगेश पाटीललेजीटडॉक स्टार्टअपचे सहसंस्थापक श्री. फ्रान्सिसश्री. नीलश्री. विष्णू आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मंत्री श्री. मलिक म्हणाले कीबनावटमुक्त शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले आहे. यामुळे सुमारे 10 लाख टँपरप्रूफडिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे ऑनलाईन पडताळणीसाठी त्वरित उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक दस्तऐवज नोंदणीची आतापर्यंत माल्टासिंगापूर आणि बहरैन या तीनच देशामध्ये पूर्ण अंमलबजावणी झाली आहे. त्यांच्यात सामील होऊन महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास मंडळ हे जगातील सर्वात मोठे चौथे सरकारी संस्था बनले आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रांकरिता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

 

शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचे अभ्यासक्रम वरदान

            मंत्री श्री. मलिक म्हणाले कीअर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत विविध 28 गटातील शैक्षणिक अर्हतेनुसारतसेच सहा महिने कालावधीचे 156, एक वर्ष कालावधीचे 100 आणि दोन वर्ष कालावधीचे 45 अर्धवेळ (234) व पूर्णवेळ (67) असे एकुण 301 अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हातालुकास्तरावर तसेच ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या हजार 269 संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. विशेषत: खेड्यापाड्यातीलगोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतातअसे त्यांनी सांगितले.

000

 

 

  

 

 

मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी;

धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश

-पालकमंत्री आदित्य ठाकरे

 

मृतांच्या वारसांना शासनामार्फत पाच लाखांची मदत जाहीर;

 जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या पालकमंत्री यांच्या सूचना

 

            मुंबईदि. 18- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूरविक्रोळीभांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्रीच प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांसाठी तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या अशा प्रसंगी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

            दुर्घटनांची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी चेंबूरमधील भारतनगरविक्रोळी येथील सूर्यानगरभांडुपमधील मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. 

 

            यावेळी खासदार राहुल शेवाळेआमदार रमेश कोरगावकरसुनील राऊतमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहलअतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेमुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकरस्थानिक नगरसेवक उमेश मानेनिधी शिंदेराजेश्वरी रेडकरदीपमाला बडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

            श्री. ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणालेरात्रीतून २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली. दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केले आहे. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात तेथे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पाणी साठवणाऱ्या मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

            हवामान विभागाने मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन श्री ठाकरे यांनी केले आहे.

000






Friday, 4 December 2020

 -मी  कोण ?-   

 सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतात. आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते.  पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?

 

® महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला.

 

® विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले.

 

® -हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले.

 

® सुरदासही आंधळे होते.

 

® मुक्तेश्वर मुके होते.

 

® कुर्मदास पांगळे होते.

 

 ® चोखोबारायांचा मृत्यु भिंत आंगावर पडल्याने झाला.

 

® तुकोबारायांचा सर्व संसार दानादिन झाला.

 

® ज्ञानोबारायांच्या आई वडीलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.

 

® जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला.

 

® पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले.

 

® महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले.

 

® श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला.

 

® प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला. 

 

® विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली.

 

® पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य,दु: भोगावे लागले इतकी कर्माची गति गहन असते तर आपल्या टिचभर पुण्याचे  काय महत्त्व

🔰 "मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का" असे आपण विचार करण्यापेक्षा  वरील उदाहरणे वाचून निरंतर प्रेमाने उपासना करीत रहावे परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.

 

देवाचिया द्वारी ऊभा क्षण भरी

पुण्याची गणना कोण करी.___

🙏 राम कृष्ण हरी 🙏🌹

 


 संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहलेले काही विचार :-

) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.

              -  संत ज्ञानेश्वर

 

) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.

                -  संत ज्ञानेश्वर

 

) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.

                 - संत ज्ञानेश्वर

 

) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.

                 - संत ज्ञानेश्वर

 

) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.

                - संत ज्ञानेश्वर

 

) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.

                 - संत ज्ञानेश्वर

 

) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !

                 - संत ज्ञानेश्वर

 

) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु: मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.

                 - संत ज्ञानेश्वर

 

) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.

                - संत ज्ञानेश्वर

 

१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु: करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.

                 - संत ज्ञानेश्वर

 

    🙏🏻  सात्वीक जीवनसारांश आपणांस समर्पीत 🙏🏻

Featured post

Lakshvedhi