Saturday, 25 May 2019

ग्रामपंचायतीतील कामाच्या पाच टक्के इतकी रक्कम ग्राम निधीत जमा करणेबाबत.


GR - 200408021505551001-1201

ग्रामपंचायतीतील कामाच्या पाच टक्के इतकी रक्कम ग्राम निधीत जमा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन निर्णय क्रमांक : झेडपीए-२०००/प्र.क्र. १८/३३
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : १९ जानेवारी, २००१.

शासन निर्णय :-
    
ग्रामपंचायतीना त्यांच्या हद्दीतील कामे करण्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे. यामागील उद्‌ेदश असा असाआहे की, ग्रामपंचायतीनी ही कामे केल्यास ती अधिक काळजीपुर्वक व चांगली होतील.  या कामांसाठी ग्रामपंचातीकडून निविदा घेण्याची गरज नसते.

जिल्हा दरसूची ठरविताना सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्ह्यातील दराचा अंदाज घेऊन त्यामध्ये नप­याचा समावेश करुन दरसूची निश्चित करीत असतो. यानुसार ग्रामपंचायतीद्वारे जी कामे करण्यात येतात, त्यात प्रत्यक्षपणे ग्रामपंचायतींना नफा जरी दिला जात नसला तरी तो सदर कामांत अंतर्भुत असतो, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत व्हावी यानुषंगाने आता शासन असे आदेश देत आहे की, ग्रामपंचायती स्वत: जी कामे करतील त्यातील किमान ५ टक्के इतकी कामाची रक्कम त्यांनी बचत करावी व ही रक्कम ग्रामनिधीत जमा करावी. सदरहू आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

  
                                            (भि. ना. पतिंगे)
                                      अवर सचिव, महाराष्ट्र शासन

ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान व वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची राज्यांमध्ये अंमल बजावणी करणेबाबत





Friday, 24 May 2019

खेकडा व जिताडा या बहुप्रजातीय मत्स्य बीज उत्पादन केंद्राची उभारणी करण्यास प्रशासकीय मान्यता....


Happy Thoughts

 Happy Thoughts 

जन्म दिनांकाच्या दिवशीच 
मृत्यू दिनांक ठरलेला असतो
मधला काळ कसा जगायचा
ज्याचा त्यानी ठरवायचा असतो

इतरांवर टीका करत जगायचं
का जीवनाचा आनंद घेत जगायचं
हे आपलं आपण बघायचं

सोबत येतानाच
दुःख किती भोगायचं
सुख किती द्यायचं
सार ठरलेलं असतं

माणूस विनाकारण: विचार करत बसतो
असं कसं झालं?
आणि तसं कसं झालं ?

तुमच्या अवती भवतीचे पात्रं  सुद्धा
किती चांगले , किती वाईट 
कोण किती शिकणार ,
कोण कसं निघणार ?

लग्न होणार का नाही
झालं तर टिकणार का नाही
हे सर्व
"आयुष्य " नावाच्या नाटकातले सिन असतात
आपण फक्त आपला रोल करायचा
बस्स !

विधात्याने एकदा तुमची स्क्रिप्ट लिहिली की लिहिली 
त्यात आपण बदल करू शकत नाही
हे नीट समजून घ्या 
आणि आपलं आयुष्य मस्त पैकी जगा

जग बदलण्याच्या भानगडीत न पडता
आयुष्य " जगण्याच्या " भानगडीत पडा
पुढचा माणूस असाच का वागतो ,
तसाच का बोलतो,
अशा फालतू प्रश्नांवर विचार करू नका 
तो त्याचा रोल आहे , त्याला दिलेले डायलॉग वेगळे आहेत 
त्याचा रोल त्याला करू द्या
तुमचा रोल तुम्ही करा !
"कुणालाही कमी लेखू नका"

आयुष्य खुप सुंदर आहे,
नेहमी हसतमुख आणि आनंदी रहा.

राज्य शासनाच्या सहकार्याने विविध सामाजिक संस्थानी सर्व सामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सेवा पुरविण्यास मंजुरी देण्याबाबत






सखी


आर्टिस्ट - सायली भोस्तेकर 

बांगडी, पैजण आणी जोडवी केवळ सौभाग्याचे वान नसुन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

बांगडी, पैजण आणी जोडवी केवळ सौभाग्याचे वान नसुन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

     सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणी शितलतेचे संतुलन राहते.



● बांगडी घालण्याचे फायदे ●

1) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताच रक्तसंचार वाढतो.
2) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
3) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रद्यासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
4) बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते.
5) तुटलेली बांगडी घालुन नये, याने नकारात्मक उर्जा वाढते.

● जोडवी घालण्याचे फायदे ●

1) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तु नाही.
2) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील " Hormonal System " योग्यरित्या कार्य करत.
3) जोडवी घालण्याने " Thyroid " चा धोका कमी होतो.
4) जोडवी " Acupressure " उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणी स्नायु मजबूत होतात.
5) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते.

● पैजण घालण्याचे फायदे ●

1) पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.
2) पैजण स्त्रीयांचे पोट आणी त्यांच्या शरीरातील खालील भागातील " Fat's " कमी करण्यात मदत होते.
3) वास्तुशास्त्रानुसार पैजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते.
4) चांदीच्या पैजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते.
5) पायातील पैजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.
6) पायात सोन्याचे पैजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.

डॉ. सौ.निलिमा सावंत
(आयुर्वेदाचार्या)
शिवम: क्लिनिक
मुंबई

 धन्यवाद  

Featured post

Lakshvedhi