GR -
200408021505551001-1201
ग्रामपंचायतीतील कामाच्या पाच
टक्के इतकी रक्कम ग्राम निधीत जमा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन निर्णय क्रमांक : झेडपीए-२०००/प्र.क्र. १८/३३
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : १९ जानेवारी, २००१.
शासन निर्णय
:-
ग्रामपंचायतीना त्यांच्या हद्दीतील कामे करण्यास शासनाने
मंजूरी दिलेली आहे. यामागील उद्ेदश असा असाआहे की, ग्रामपंचायतीनी ही कामे केल्यास
ती अधिक काळजीपुर्वक व चांगली होतील. या कामांसाठी
ग्रामपंचातीकडून निविदा घेण्याची गरज नसते.
जिल्हा दरसूची ठरविताना सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्ह्यातील
दराचा अंदाज घेऊन त्यामध्ये नपयाचा समावेश करुन दरसूची निश्चित
करीत असतो. यानुसार ग्रामपंचायतीद्वारे जी कामे करण्यात येतात, त्यात प्रत्यक्षपणे
ग्रामपंचायतींना नफा जरी दिला जात नसला तरी तो सदर कामांत अंतर्भुत असतो, ग्रामपंचायतीची
आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत व्हावी यानुषंगाने आता शासन असे आदेश देत आहे की,
ग्रामपंचायती स्वत: जी कामे करतील त्यातील किमान ५ टक्के इतकी कामाची रक्कम त्यांनी
बचत करावी व ही रक्कम ग्रामनिधीत जमा करावी. सदरहू आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(भि. ना. पतिंगे)
अवर सचिव, महाराष्ट्र
शासन









