महापुरुषांच्या चरित्र वाचनातून उद्याची पिढी सक्षम घडेल
· डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समित्यांची बैठक संपन्न
मुंबई, दि. 31 : महापुरुषांच्या चरित्र वाचनातून उद्याची पिढी सक्षम घडणार असल्याने महापुरुषांच्या चरित्र साधने समित्यांनी अतिशय वेगाने काम करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती यांच्या स्वतंत्र बैठका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. यावेळी ते बोलत होते.
शासनाने विविध चरित्र साधने समित्यांचे पुनर्गठन केल्यानंतर शासनाने संबंधित समित्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये त्या-त्या चरित्र साधने समित्यांच्या सदस्य सचिवांनी प्रकाशन समित्यांचा आजवर केलेल्या कामांचा अहवाल मांडला आणि पुढील वर्षभरामध्ये हाती घ्यावयाच्या उपक्रमांची माहिती दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशनातील सहाव्या खंडाचे प्रकाशन लवकर करून ते लोकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध नसलेले आणि लोकांची मागणी असलेले सर्व खंड तातडीने आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जावेत, अशा सूचना करून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र खंड 3 आणि खंड 4 चे नवीन प्रकाशन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. खंड 1 आणि 2 चे पुनर्मुद्रण करावे अशी सूचना यावेळी श्री. सामंत यांनी केली. चरित्राच्या खंडाचे प्रकाशन संबंधित महापुरुषांच्या जन्मस्थानी आणि त्यांच्या कर्मभूमीत व्हावे, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.
लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या साहित्याची निर्मिती करून सध्या टिळकांच्या वंशजांकडे उपलब्ध असलेल्या साधनांचे प्रकाशन करावे. अशा प्रकारचे सर्व साहित्य मुंबईतील अभिलेखांगारांमध्ये उपलब्ध असेल त्यासाठी गृह विभागाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या शासन तातडीने घेऊन देईल. राज्यात व राज्याबाहेर संसाधनांचा शोध घेण्यासाठी सोयीचे जावे यासाठी सर्व समित्यांचे सदस्य सचिव आणि सदस्य यांना तातडीने नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात यावीत असे निर्देश श्री.सामंत यांनी यावेळी दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, कोविड-19 ची स्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्यातील महाविद्यालयांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक तसे इतर महापुरूषांच्या नावाने अभ्यासमंडळे स्थापन करण्यात येतील.
सर्व चरित्र साधने प्रकाशन समित्यांची प्रकाशने नामांकित ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देऊन या पुस्तकांना ऑनलाईन स्वरूपात अधिक सुलभ पद्धतीने सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावे आयएसबीएन क्रमांक मिळण्यासाठी आणि सर्व समित्यांची ऑनलाईन पोर्टल तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
या बैठकीस डॉ.दीपक टिळक, डॉ.भालचंद्र मुणगेकर, प्रा.राजा दीक्षित, डॉ.प्रकाश बच्छाव, प्रा.अरविंद गणाचारी, प्रा.बळीराम गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव मल्लिका अमर शेख, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव डॉ.श्रद्धा कुंभोजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0000
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
डॉ. दिपक म्हैसेकर लिखित कोविड मुक्तीचा मार्ग पुस्तकाचे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई दि.31: निवृत्त विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोरोना काळातील सर्व वाटचालीचे संकलन करून लिहिलेल्या कोविड मुक्तीचा मार्ग या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की, गेले दीड-पावणेदोन वर्षांपासून आपण सर्वजण कोविडचा मुकाबला करतो आहोत. या सगळ्या प्रवासात आपण वेगवेगळ्या समस्यांना तोंड दिले, वेगवेगळी आव्हाने स्वीकारली, अनेक पावले उचलली. आज दुसऱ्या लाटेचा मुकाबला करत असताना तिसऱ्या संभाव्य लाटेची पण शक्यता आहे, अशा वेळी आपल्या सर्व अनुभवांचे संकलन आवश्यक आहे. जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण या संकटाचा मुकाबला कसा केला त्याविषयी विस्तृत माहिती मिळू शकेल.
कोविडच्या विषाणूमध्ये देखील उत्परिवर्तन होत आहे, आणि या विषाणूंच्या नवीन नवीन अवतारामुळे जगामध्ये आव्हाने उभी राहिली आहेत. आज आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये देखील परत एकदा संसर्ग वाढताना दिसतो आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना देखील संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावे लागेल आणि आरोग्याच्या नियमांचे चांगले पालन देखील करावे लागणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना कोरोनाविषयक कामासाठी पुढील चांगली दिशा मिळेल अशी आशा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्तीनंतर देखील स्वस्थ न बसता राज्य शासनाला या कोरोना संकटांमध्ये मदत करण्याच्या डॉ. दिपक म्हैसेकर यांचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. प्रारंभी डॉ. म्हैसेकर यांनी प्रास्ताविकात कोविड मुक्तीचा मार्ग हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू सांगितला.
0000
स्व. जगदेव राम उरांव व रामदास गावित यांचे वनवासी समाज उत्थानाचे कार्य प्रेरणादायी
- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 31 : कोरोना काळात निधन झालेले अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय अध्यक्ष जगदेव राम उरांव तसेच नाशिक जिल्ह्यातील पूर्णवेळ कार्यकर्ते दिवंगत रामदास गावित यांचे वनवासी-जनजाती समाज उत्थानाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
जगदेव राम उरांव यांच्या स्मृतीदिनानिमित्त हमारे जगदेव राम या सचित्र पुस्तकाचे राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते वनवासी कल्याण आश्रमातर्फे देण्यात येणारा पहिला श्री जगदेव राम उरांव स्मृती पुरस्कार 2021 स्व. रामदास गावित यांना मरणोपरांत देण्यात आला. स्व. रामदास गावित यांच्या पत्नी यशोदा व पुत्र डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारला.
वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांनी जगदेवराम उरांव, रामदास गावित यांसारखे अनेक कार्यकर्ते उभे केले असे नमूद करुन वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य व्यापक होत आहे, असे राज्यपालांनी सांगितले. दिवंगत जगदेव राम यांचे अपूर्ण कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.
उत्तराखंडच्या पहाडी भागात सुविधांचा अभाव आपण पहिला आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात देखील आदिवासी भागातील लोकांना दूरसंचार, मोबाईल सेवा याबाबत अडचणींचा सामना करावा लागतो हे पाहिल्याचे नमूद करुन समाजातील श्रीमंत-गरीब तफावत कमी करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य महत्वाचे असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी, महाराष्ट्र उपाध्यक्ष सोनु म्हसे व मुंबई महानगर अध्यक्ष मुकुंदराव चितळे, प्रांत कार्यवाहक विठठलराव कांबळे आदी उपस्थित होते. महेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर परशुराम गावित यांनी आभार मानले.
0000
Governor presents first Jagdeo Ram Oram memorial award to late Ramdas Gavit
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the first ‘Shri Jagdeo Ram Oram Memorial Award 2021’ of Vanavasi Kalyan Ashram to the full time activist of the Ashram from Nashik late Ramdas Punjaram Gavit posthumously.
The award was accepted by Smt Yashoda Gavit, wife of late Ramdas Gavit and Dr Harshvardhan Gavit, son at a programme held at Raj Bhavan, Mumbai on Saturday (31st July). The Governor also released a pictorial biographical book ‘Hamare Jagdeo Ram’ on the occasion.
Speaking on the occasion, the Governor said that founding fathers of the Vanavasi Kalyan Ashram including late Balasaheb Deshpande, Jagdeo Ram Oram and Ramdas Gavit dedicated their entire life for the upliftment of the forest residing tribal communities. He said carrying forward their legacy of the work of tribals would be a real tribute to them.
President of the All India Vanvasi Kalyan Ashram Ramchandra Kharadi, Vice President of Maharashtra chapter of Vanavasi Kalyan Ashram Sonu Mhase, Mumbai Mahanagar President Mukundrao Chitale were prominent among those present.
Ramdas Gavit born at village Devali Karad in the Surgana taluka of Nashik district was a full time activist of the Vanavasi Kalyan Ashram for 36 years. He passed away on 2nd June 2021 aged 55.
0000