-मी कोण ?-
सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतात. आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?
®️ महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला.
®️ विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले.
®️ व-हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले.
®️ सुरदासही आंधळे होते.
®️ मुक्तेश्वर मुके होते.
®️ कुर्मदास पांगळे होते.
®️ चोखोबारायांचा मृत्यु भिंत आंगावर पडल्याने झाला.
®️ तुकोबारायांचा सर्व संसार दानादिन झाला.
®️ ज्ञानोबारायांच्या आई वडीलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.
®️ जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला.
®️ पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले.
®️ महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले.
®️ श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला.
®️ प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला.
®️ विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली.
®️ पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य,दु:ख भोगावे लागले इतकी कर्माची गति गहन असते तर आपल्या टिचभर पुण्याचे काय महत्त्व
🔰 "मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का" असे आपण विचार करण्यापेक्षा वरील उदाहरणे वाचून निरंतर प्रेमाने उपासना करीत रहावे व परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.
देवाचिया द्वारी ऊभा क्षण भरी
पुण्याची गणना कोण करी.___
🙏 राम कृष्ण हरी 🙏🌹