सायबर क्राईम
सायबर गुन्हे
म्हणजे काय ?
“फौजदारी
गुन्ह्यांचे कोणत्याही स्वरुपातील उल्लंघन, ज्यामध्ये संगणकीय तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा
वापर करुन तपास किवा अन्वेषण आणि खटला चालविण्याच्यसा कामकाजातील प्रक्रियांचा समावेश
म्हणजे “सायबर गुन्हे” होय. (उदा. बँक फ्रॉड, फेसबुक, व्हॉटस अप, टि्वटर, इन्स्टाग्राम
इ. संदर्भातील गुन्हे).
सायबर
गुन्ह्यांचे प्रकार :
फिशींग,
हॅकिंग, नायजेरियन फ्रॉड, सायबर बुलिंग, डेटा थेप्ट, क्रिप्टोग्राफी, सॉपटवेअर पायरसी,
सायबर स्टॉकिंग, पोर्नोग्राफी.
फिशींग
:
लोकांना
फसवून त्यांची व्यक्तीगत खोटी माहिती, बँक अकाऊंट व क्रेडिट कार्डची माहिती वगैरे काढणे
किंवा चोरणे, तसेच तुमचा पासवर्ड संस्थेच्या मूळ अधिकृत संकेतस्थळावर वापरुन तुमचे
पैसे तुमच्या खात्यातून एका तात्पुरत्या बोगस खात्यात पाठवून नंतर लंपास करणे ह्या
प्रकारच्या गुन्ह्याला “फिशींग” गुन्हा असे म्हणतात.
हॅकिंग
:
संगणक,
संगणक यंत्रणा आणि संगणक नेटवर्क यांचा मालक किंवा त्यांची प्रभारी व्यक्ती यांच्या परवानगीशिवाय जर
एखादी व्यक्ती संगणक, संगणकीय यंत्रणा व संगणक नेटवर्कमध्ये किंवा साधनांमध्ये प्रवेश
करील किंवा प्रवेश मिळवेल त्यांस इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कायदा, २००० प्रमाणे कलम ४३(अ)
अनुसार “हँकिग” गुन्हा असे
म्हणतात.
नायजेरियन
फ्रॉड
काही
परदेशात स्थायिक झालेल्या कंपनया किंवा व्यक्ती संगणक धारकांशी ई-मेलद्वारे संपर्क
करुन त्यांना मोठ्या रकमेचे बक्षीस लागल्याचे सांगून किंवा त्या देशातील त्यांचे नातेवाईकाचे
पैसे हस्तांतरीत करण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिष दाखवून ते मिळविण्यासाठी आधी काही रक्कम
जुजबी कामासाठी खर्च करण्यासाठी देण्यास किंवा पाठविण्यास भाग पाडून फसवणूक करणे म्हणजे
“नायजेरियन फ्रॉड“ होय.
सायबर
बुलिंग (इंटरनेट माध्यमांद्वारे छळणे) :
एखाद्या
व्यक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशाने किंवा मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने ई-मेल,
इन्स्टंट मेसेजिंग, चॅट रुम्स, एसएमएस, मोबाईल सोशल नेटवर्किंग साईट, वेबसाईट, यांचा
वापर करुन त्या व्यक्तीला घाबरवणे किंवा त्या व्यक्तीची बदनामी करणे, ह्या प्रकाराला
“सायबर बुलिंग” गुन्हा असे
म्हणतात.
डेटा
थेप्ट (डेटा चोरी करणे) :
जर
कोणी संगणक, संगणकीय यंत्रणा आणि संगणक नेटवर्कमधून कोणताही आधार सामग्री साठा किंवा
माहिती उतरवून घेईल, नक्कल करील किंवा त्याचा गोषवारा घेईल तसेच काढून घेण्याजोगी साठवण
माध्यमात, माहिती किंवा आधार सामग्री साठवून ठेवील त्यास इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कायदा,
२००० प्रमाणे ४३(ब) नुसार “डेटा थेप्ट” करणे हा गुन्हा असे म्हणतात.
साफ्टवेअर
पायरसी :
सॉफ्टवेअर
पायरसी म्हणजे अवैधरित्या नक्कल आणि अधिकृत पत्रकाशिवाय (लायसन्स) सॉफ्टवेअरचा वापर
करणे. त्याचबरोबर एकदाच वापरात येणाया अधिकृत पत्रकाचा वापर एकापेक्षा जास्त वेळा
अवैधरित्या एकापेक्षा जास्त लोकांनी केला तर त्याला “ सॉफ्टवेअर पायरसी” असे म्हणतात.
सायबर
स्टॉकिंग :
नेटवर
सातत्याने एखाद्याचा पाठलाग करणे, पिच्छा पुरविणे किंवा पाठपुरावा करीत त्या व्यक्तीचे
मानसिक स्वास्थ हरपून टाकणे होय. बुलेटीन बोर्डवर काही संदेश पाठविणे, जे बळी ठरलेल्या
व्यक्तीच्या अनुभवात वारंवार येतात, त्याचप्रमाणे चॅटरुममध्ये अनधिकृतरित्या शिरकाव
करुन अशा व्यक्तीस हैराण करण्यांत येत असते. त्यांस “सायबर स्टॉकिंग” असे म्हणतात.
पोर्नोग्राफी
(अश्लिल छायाचित्रण) :
अश्लिल
छायाचित्रे, चित्रफिती (क्लीपींग), अश्लिल मासिके जी इंटरनेटचा वापर करुन करण्यांत
येतात त्याला “पोर्नोग्राफी” असे म्हणतात. (अश्लिल छायाचित्रे उतरविणे, उतरवून घेणे, छायाचित्रे
अश्लिल स्वरुपात काढणे किंवा अश्लिल स्वरुपाचे लिखाण करणे इत्यादी).
सोशल
मिडीया (फेसबुक, व्हॉट्स-अॅप, टि्वटर) :
विवाह
विषयक फसवणुक, बदनामी, पोर्नोग्राफी, अफवा पसरविणे, खोटी बातमी पसरविणे, पाठलाग करणे,
ब्लॅक मंलींग.
विवाह
विषयक फसवणूक :
शादी
डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम अशा मेट्रोमोनीयल वेबसाईटवर लग्नासाठी स्वत:चे प्रोफाईल
तयार केले जाते व त्यानुसार वधू-वर शोधाशोध सुरु होते मग नंतर एखाद्या दुसया देशातून
एखाद्या परदेशी नागरिकांची फ्रेंड रिक्वेस्ट येते. मग दोघांमध्ये संवाद सुरु होतो.
त्यानंतर एखादा बहाणा करुन पैसे उकळले जातात व आपण भावनेच्या भरात बळी पडतो. (उदा.
हयात गिपट पाठवले
आहे ते रिसिव्ह करायचे असेल तर करन्सी बदलावी लागेल, माझ्या आईला कॅन्सर झाला आहे.
औषधोपचार करायचा आहे, अशा विविध प्रकारचे बहाणे करुन पैसे कधी कॅश डिपॉझिट तर कधी नेट
बँकींगद्वारे भरायला सांगून नंतर संभाषण बंद करतात. आपण त्यात कसे गुंतत जातो याची
आपल्याला कल्पना सुध्द्ा येत नाही).
बदनामी
:
बदनामी
म्हणजे सायबर बदनामी जेव्हा संगणकाच्या वा इंटरनेटच्या मदतीने कोणातरी व्यक्ति, संस्था
वा कार्य यांची बदनामी करण्यांत येते, तेव्हा त्यास “सायबर बदनामी”म्हणतात.
उदा. कोणीतरी व्यक्तीने कोणासाठी तरी अवमान, अपमानकारक असे वक्तव्य केले किंवा संकेतस्थळावर
काही माहिती दिली जी त्या व्यक्तीबद्दल बदनामी करणारी असेल, किंवा असे काही ई-मेल पाठवले
की ज्यात अवमानकारक माहिती ही व्यक्तीच्या सर्व मित्र मंडळीमध्ये पोहोचविण्यांत आली
असेल.
अफवा
पसरविणे :
सोशल
मिडीयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे सोपे असल्यामुळे अल्पावधीतच याची लोकप्रियता
वाढली पण याचा वापर आता अफवा पसरविण्यासाठी अधिक होऊ लागला आहे. समाजात केवळ भिती पसरविणे
आणि लोकांची फसवणूक करणे ही काही लोकांची मानसिकता झाली आहे. त्यातुनच असे संदेश तयार
होत असतात. दंगली किंवा इतर घटनांवेळी समाज विघातक संघटना अशा प्रकारच्या अफवा पसरवत
असतात. तरी नागरिकांनी अशा अफवांना बळी न पडता शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा.
खोटी
बातमी पसरविणे :
हल्ली
जगात कुठेही अपघात, घातपात, हल्ले, बॉम्बस्फोट अशा कोणत्याही दुर्घटनांच वृत्त त्या
घडल्याक्षणी सोशत मिडीयावर येतात. सोशल मिडीयासारख्या तात्काळ व्यक्त होणाया माध्यमात
वावरणाया बहुसंख्य
माणसांकडे पेशन्स असतातच असे नाही. कोणतीही गोष्ट पाहिल्या क्षणी किंवा आपल्याला समजता
क्षणी जशी दिसत आहे तशीच फेसबुक, टि्वटर, व्हॉटस् अॅपवर लवकरांत लवकर टाकण्यासाठी
जणू काय स्पर्धा लागलेली असते, ङक्ष्घ्, निषेध, भावपूर्ण श्रध्द्ांजली अशा पोस्ट,
कमेंटस सारख्या सोशल मिडीयावर दिसत असतात, त्यामुळे नागरिकांनी खरे काय घडले आहे याचा
तपास करुनच बातम्यांवर विश्वास ठेवावा.
पाठलाग
करणे :
नेटवर
सातत्याने एखाद्याचा पाठलाग करणे, पिच्छा पुरविणे किंवा पाठपुरावा करीत त्या व्यक्तीचे
मानसिक स्वास्थ त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ हरपून टाकणे होय. बुलेटीन बोर्डवर काही
संदेश पाठविणे, जे बळी ठरलेल्या व्यक्तीच्या अनुभवात वारंवार येतात, त्याचप्रमाणे चॅटरुममध्ये
अनधिकृतरित्या शिरकाव करुन अशा व्यक्तीस हैरान करण्यात येत असते. त्यास “पाठलाग करणे” (सायबर स्टॉकिंग)”
असे म्हणतात.
ब्लॅक
मेलींग :
बँकिंग
व इन्श्युरन्स संदर्भातील गुन्हे :
अेटीएम
संबंधीत गुन्हे, ओटीपी, डेबीट/क्रेडीट कार्ड नंबर, सीव्हीव्ही/पीन पासवर्डचे महत्व,
फसवणूकीचे फोन कॉल्स, लॉटरी लागलेबाबतचे फोन, एसएमएस द्वारे फसवणूक, बिटकॉईन क्रिप्टाकरन्सी,
मल्टिलेवल मार्केटींग
अेटीएम
संबंधीत गुन्हे :
आजकाल
आपल्यातील प्रत्येकजण सोयीसाठी अेटीएम कार्ड आपल्याजवळ बाळगतो, पण या तंत्रज्ञानाच्या
फायद्याप्रमाणेच त्यात काही धोकेही आहेत त्यामुळे अेटीएम वापरताना खालीलप्रमाणे काळजी
घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन अेटीएम संबंधी गुन्ह्यांना आळा बसेल.
फसव्या कॉल्सपासून सावध रहा, एटीएम
कार्डविषयी कोणतीही माहिती अज्ञात व्यक्तीला देवू नका.
·
तुमचा पिन नियमीतपणे बदला.
·
तुमचा पिन क्रमांक लक्षात ठेवा, तो कुठेही लिहून ठेवू
नका, खास करुन तो कार्डावर लिहू नका.
·
तुमचे एटीएम कार्ड, पिन आणि इंटरनेट बँकींग यासंबंधीचा
तपशील कोणत्याही देवू नका.
·
एटीएम बुथमध्ये कोणालाही आपल्याजवळ येऊ देवू नका किंवा
एटीएम व्यवहारासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत मागू नका.
·
एटीएम मशीनला कोणतेही अज्ञात उपकरण किंवा संशयास्पद
मशीन लावले आहे असे वाटल्यास तुमचे कार्ड स्वाईप करु नका.
·
तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी तुमच्या शाखेला
भेट द्या, बँकेच्या व्यवहारासंबंधी एसएमएस अलर्ट मिळवा.
ओटीपी, डेबीट/क्रेडीट
कार्ड नंबर, सीव्हीव्ही/पीन पासवर्डचे महत्व (ओटीपी, डेबीट/क्रेडीट कार्डद्वारे फसवणूक)
:
डेबीट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा
पासवर्ड चोरुन एटीएम मधून पैसे काढणे, दुकानातून खरेदी करणे, इत्यादी गुन्हे करणे होय.
डेबीट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा नंबर कार्डधारकाचे सर्व डिटेल्स वापरुन इंटरनेटवरती
खरेदी करणे, कार्डधारकाचा नंबर व माहिती दुसयाला विकणे, कार्डचा उपयोग करुन परदेशात खरेदी
करणे, बनावट डेबीट/क्रेडिट कार्ड बनविणे किंवा कार्ड बनविण्यासाठी बँकेला खोटी माहिती
देणे अशाप्रकारे घडणाया गुन्ह्यांना ओटीपी, डेबीट/क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक म्हणतात.
फसवणूकीचे
फोन कॉल्स :
लॉटरी
लागलेबाबतचे फोन :
आपणास
लॉटरी लागली आहे अशा प्रकारचे फसवे कॉल्स/मेसेजेस आपणांस येऊ शकतात, लॉटरीत लागलेली
कार, लॅपटॉप, मोबाईल, टिव्ही, फ्रिज अशा प्रकारच्या वस्तू सोडविण्यासाठी टॅक्स भरावा
लागेल वगैरे अशी कारणे दाखवून पैसे लूटले जातात. अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका
आपले कष्टाचे पैसे दुसयाच्या स्वाधीन करु नका.
एसएमएस
द्वारे फसवणूक :
सायबर
गुन्ह्यांचे स्वरुप :
सायबर
गुन्हे म्हणजे असे गुन्हे की ज्या गुन्ह्यात कॉम्प्युटर व नेटवर्क सामील आहे. गुन्हा
घडल्यानंतर त्या ठिकाणी कॉम्प्युटर मिळणे किंवा कॉम्प्युटर द्वारा गुन्हा करणे म्हणजे
सायबर गुन्हा होय. एखाद्याच्या खाजगी माहितीचा गैरवापर करणे, माहितीची चोरी करणे म्हणजे
कॉम्प्युटरमधून काढून घेणे. सायबर गुन्हे वेगवेगळ्या स्वरुपाचे असू शकतात. डाटा चोरी
करणे, डाटा नष्ट करणे, माहितीत फेरबदल करणे, एखाद्याची माहिती दुसयाच एखाद्या
व्यक्तीला देणे, कॉम्प्युटरच्या विशिष्ट भागांची चोरी करणे किंवा नष्ट करणे यास सायबर
भाषेत स्पॅम ई-मेल, हॅकींग, फिशींग, व्हायरस टाकणे, एखाद्याची माहिती ऑनलाईन प्राप्त
करणे, कोणावर कायम पाळत ठेवणे (पाठलाग करणे).
सायबर
गुन्हा घडल्यानंतर काय कराल ?
सायबर
गुन्हा घडला आहे असे लक्षात आल्यावर सर्वप्रथम नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून काय
घडले आहे ते सविस्तर सांगावे. त्याबाबत सविस्तर लेखी तक्रार नजिकच्या पोलीस स्टेशनमार्फत
सायबर पोलीस स्टेशनकडे पाठवावी. बँक फ्रॉडबाबत तक्रार असेल तर बँकेचे स्टेटमेंट घेणे
गरजेचे असते. डेबीट/क्रेडिट कार्डची फ्रंट साईडची सुस्पष्ट छायांकित (झेरॉक्स) प्रत
अर्जासोबत जोडावी.
सायबर
गुन्हे रोखण्याच्या उपाययोजना :
संगणक
तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे व संगणक तंत्रज्ञान हा महत्वाचा घटक
बनला आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग दिवसेंदिवस वाढत असून त्यातील सर्व बाबींच्या
सुरक्षिततेला महत्व प्राप्त झालेले आहे. भविष्यांत देखील माहिती तंत्रज्ञानात भरपूर
वाढ होणार असून त्याच प्रमाणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर व गैरवापर होत आहे. भविष्यांत
होणारा हा गैरवापर टाळण्यासाठी खालील गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
उपाययोजना
:
१) संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि त्यावरील आपला डेटा सुरक्षित
करण्यासाठी उच्च प्रतिचा अद्ययावत अॅन्टीव्हायरसचा वापर करा.
२) संगणक, लॅपटॉप, मोबाईल यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स
साधनांचे पासवर्ड वेळोवेळी बदला तो ओळखण्याइतका सोपा ठेवू नका.
३) विविध ई-मेल, सोशल मिडीया, नेट बँकिग किंवा इतर
ऑनलाईन व्यवहारांसाठी कधीही एकच पासवर्ड वापरु नका त्यात विविधता ठेवा.
४) मोबाईल - स्मार्टफोनला देखील पासवर्ड ठेवा, बँकेसंदर्भात
किंवा इतर महत्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करु नका.
५) क्रेडिट/डेबीट कार्ड यांचेवरील १६ अंकी नंबर/सीव्हीव्ही नंबर/पासवर्ड
कुणालाही देवू नये.
६) बँकेचे खाते अेटीएम/डेबीट/क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड,
आधारकार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही दुरध्वनीवर-मोबाईलवर देवू नका.
७) लॉटरी, नोकरी, बक्षीस लागल्याचे ई-मेल/कॉल/एसएमएस
आल्यास त्यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका त्याकडे दुर्लक्ष करु नका.
८) संपूर्णपणे खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तींची
फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर
फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका.
९) फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट
आदी समाज माध्यमांद्वारे स्वत:चे सध्याचे लोकेशन शेअर करणे टाळा.
१०) विविध समाज माध्यमांतून धार्मिक भावना भडकवणारे संदेश,
व्हिडीओ, छायाचित्रे किंवा अश्लिल साहित्य पोस्ट करु नका अथवा फॉरवर्ड, लाईक व शेअर
करु नका.
११) कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपन्यांकडून आलेल्या
ई-मेलवर क्लिक करु नका अथवा त्यांना कोणतीही संवेदनशील माहिती पुरवू नका.
१२) https ने सुरुवात होणाया सुरक्षित
संकेतस्थळाचाच वापर करावा.
१३) संगणक, मोबाईल विविध साईटस व अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यानंतर आठवणीने लॉगआऊट
करा.
१४) ऑनलाईन शॉपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळांचाच वापर
करा. सायबर गुन्हा घडल्यास आपल्या पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा क्षेत्रात कार्यरत
असलेल्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
सायबर
गुन्ह्यांबाबत नागरिकांची कर्तव्ये :
हे
करावे
१) संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि त्यावरील आपला डेटा सुरक्षित
करण्यासाठी उच्च प्रतिचा अद्ययावत अॅन्टीव्हायरसचा वापर करा.
२) विविध ई-मेल, सोशल मिडीया, नेट बँकिग किंवा इतर
ऑनलाईन व्यवहारांसाठी कधीही एकच पासवर्ड वापरु नका त्यात विविधता ठेवा.
३) https ने सुरुवात होणाया सुरक्षित
संकेतस्थळाचाच वापर करावा.
४) संगणक, मोबाईल विविध साईटस व अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यानंतर आठवणीने
लॉगआऊट करा.
५) ऑनलाईन शॉपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळांचाच वापर
करा. सायबर गुन्हा घडल्यास आपल्या पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा क्षेत्रात कार्यरत
असलेल्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
सायबर
गुन्ह्यांबाबत नागरिकांची कर्तव्ये :
हे
करु नका
१) संगणक, लॅपटॉप, मोबाईल यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स
साधनांचे पासवर्ड वेळोवेळी बदला तो ओळखण्याइतका सोपा ठेवू नका.
२) मोबाईल - स्मार्टफोनला देखील पासवर्ड ठेवा, बँकेसंदर्भात
किंवा इतर महत्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करु नका.
३) क्रेडिट/डेबीट कार्ड यांचेवरील १६ अंकी नंबर/सीव्हीव्ही नंबर/पासवर्ड
कुणालाही देवू नये.
४) बँकेचे खाते अेटीएम/डेबीट/क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड,
आधारकार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही दुरध्वनीवर-मोबाईलवर देवू नका. लॉटरी, नोकरी,
बक्षीस लागल्याचे ई-
५) संपूर्णपणे खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तींची
फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर
फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका.
६) फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट
आदी समाज माध्यमांद्वारे स्वत:चे सध्याचे लोकेशन शेअर करणे टाळा.
७) विविध समाज माध्यमांतून धार्मिक भावना भडकवणारे
संदेश, व्हिडीओ, छायाचित्रे किंवा अश्लिल साहित्य पोस्ट करु नका अथवा फॉरवर्ड, लाईक
व शेअर करु नका.
८) कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपन्यांकडून आलेल्या
ई-मेलवर क्लिक करु नका अथवा त्यांना कोणतीही संवेदनशील माहिती पुरवू नका.