Sunday, 7 September 2025

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

 जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • सामाजिक क्षेत्र वॉर रूम मधील योजनांची आढावा बैठक

 

मुंबईदि. २२ : जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजनाउपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यंत्रणांनी योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाहीयाबाबत यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मासूम या प्रकल्पासंदर्भात Mpower व आदित्य बिर्ला

 मुलांच्या कुटुंबियांनाही समुपदेशनाची सुविधा दिली जाते.  पालकांचे समुपदेशन केल्याने मुले घरी परतल्यावर त्यांना  पुर्वीप्रमाणे मोकळे वातावरण मिळेल हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.  मासूम प्रकल्प हा राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवांना बळकटी देणारा ठरला असून मुलांच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

या प्रकल्पासंदर्भात Mpower व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या की,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या मानसिक आरोग्याला दिलेले प्राधान्य हे दूरदर्शी नेतृत्वाचे द्योतक आहे. या सार्वजनिक-खागी भागीदारीद्वारे Mpower चे कार्य म्हणजे अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांना त्वरित ट्रॉमा रिलिफ व सर्वसमावेशक मानसशास्त्रीय आधार देणे. प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने विद्यमान प्रणालीला बळकटी देऊन मुलांच्या पुनर्वसन व समाजात पुन्हा समावेशक होण्यासाठी सुरक्षित व सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

00000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

१९ बालसंगोपन संस्थांना पाच मानसशास्त्रज्ञाच्या टीमकडून सेवा दिल्या जात आहेत

 महिला व बालविकास विभाग (WCD) सोबतच्या फेब्रुवारी २०२३ मधील सामंजस्य करारानंतर हा प्रकल्प मुंबईपुणेठाणेनागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये राबवला जात आहे. एकूण १९ बालसंगोपन संस्थांना पाच मानसशास्त्रज्ञाच्या टीमकडून सेवा दिल्या जात आहेत. या प्रकल्पांतर्गत मानसशास्त्रज्ञ रोटेशन पद्धतीने सीसीआयला भेट देतातस्तिथीपरत्वे समुपदेशन करतातमुलांचे मानसिक आरोग्य स्क्रिनिंग करतात आणि गरजेनुसार थेरपी सेवा पुरवतात. याशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये बालकल्याण समिती (CWC) आणि किशोर न्याय मंडळाला (JJB) तज्ज्ञांचे सहकार्य दिले जाते. थेरपिस्ट काही मुलांच्या आरोग्य आणि मानसिक परिस्थितीनुसार त्यांचे तणाव मापन पट्टी (Stress Scale), आक्रमकता मापन पट्टी (Aggression Scale), स्थिती-गुणधर्म चिंतामापन चाचणी (State Trait Anxiety Test), मानसिक आरोग्य व कल्याण मापन पट्टी (Psychological Well-Being Scale) यांसारख्या साधनांद्वारे सखोल परीक्षण केले जाते.

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी "मासूम"

 बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी "मासूम"

§  मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

मुंबई, दि.२८ : राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये (Child Care Institutions - CCI) राहणाऱ्या समस्याग्रस्त आणि विधी संघर्षीत मुलांना मानसिक आरोग्यसेवा व समुपदेशन करण्यासाठी  महिला व बालविकास विभाग एमपॉवर संस्थेच्या माध्यमातून "मासूम" प्रकल्प राबवित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयामुळे या प्रकल्पाचा आजपर्यंत ३,३३७ मुलांना लाभ झाला असून एकूण ९५९३ वैयक्तिक समुपदेशन सत्रे पार पडली आहेत.

महाराष्ट्रातील महिला व बालविकास विभाग (WCD) राज्यातील बालकल्याण व मानसिक आरोग्याच्या कार्याला बळकटी देण्यासाठीआदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या Mpower या उपक्रमामार्फत मासूम’ प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पांतर्गत अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांनाजे बाल संगोपन संस्थांमध्ये (Child Care Institutions – CCIs) राहतात, त्यांना मानसिक आरोग्य सेवा व समुपदेशन (counselling) पुरवले जाते. हा सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा उपक्रममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे.

उमेद जागतिक पातळीवरील मान्यता

 जागतिक पातळीवरील मान्यता

एक्स्पोचे उद्घाटन सियालचे महासंचालक श्री. निकोलस ट्रेंट्रेसॉक्स व एपीडा (APEDA) चे अध्यक्ष श्री. अभिषेक देव यांच्या हस्ते झाले.

श्री.ट्रेंट्रेसॉक्स यांनी उमेदच्या विविध स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची गुणवत्ता तपासली व उमेदला गल्फ सियाल आणि दिल्ली सियालमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. तसेच अभिषेक देव यांनी उमेदची उत्पादने अपेडा (APEDA) पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर व मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी ग्रामीण महिलांच्या कष्टाचे कौतुक करत हे यश महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ देईल असा विश्वास व्यक्त केला.

सियाल इंडिया 2025 मधील या यशामुळे ग्रामीण महिलांना जागतिक बाजारपेठेत प्रवेशाचे दार खुले झाले आहे. नुकतेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारामुळे उमेद’ अभियानातील महिलांच्या उत्पादनांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कायमस्वरूपी दालन उपलब्ध झाले आहे. त्यांची उत्पादने महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे प्रतिनिधित्व करत आहेत. हे यश महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरले आहे.

 ‘उमेद’ अभियानाच्या उत्पादनांची मोठी रेंज

या प्रदर्शनात ‘उमेद’ अभियानाने १७ प्रकारची उत्पादने सादर केली आहेतजी वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार आहेत.

 * माढा येथील डाळिंबकेळीशेवगा

 * नाशिकचा प्रसिद्ध लाल कांदा

 * धाराशिवचे न्यूट्री शेवया

 * वायगावची भौगोलिक निर्देशांक (GI) प्राप्त हळद

 * देवगडरत्नागिरीसिंधुदुर्ग येथील हापूस आंबा

 * साताराचे मिलेट कुकीज

 * सोलापूरची मालदांडी ज्वारी

 * प्रसिद्ध इंद्रायणी आणि चिनूर तांदूळ

 * चारू तूरडाळ

 * साताराचे घाण्यावरचे तेल (कोल्ड प्रेस ऑइल)

 * बाजरीनाचणी आणि मिरची यांसारखी इतर अनेक उत्पादने आहेत.

00000

सियाल इंडिया 2025 मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दालन खुले


सियाल इंडिया 2025 मध्ये उमेदचा डंका

ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दालन खुले

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे

उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

 

मुंबईदि. २८ : - मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया 2025 या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे उमेद’ अभियानातील महिलांच्या सियाल इंडियामधील सहभागामुळे त्यांची उत्पादने या व्यासपीठामार्फत थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचणार आहेत. ग्रामीण महिलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरली आहे.

या प्रदर्शनात १७ हून अधिक उत्पादने सादर करण्यात आली असून त्यामध्ये माढ्याचे डाळिंबकेळी, शेवगानाशिकचा लाल कांदाधाराशिवच्या न्यूट्री शेवयावायगावची GI हळददेवगडरत्नागिरी व सिंधुदुर्गचा हापूस आंबासाताराचे मिलेट कुकीज व घाण्यावरचे तेलसोलापूरची मालदांडी ज्वारीप्रसिद्ध इंद्रायणी व चिनूर तांदूळचारू तूरडाळ तसेच बाजरीनाचणी व मिरचीसारखी उत्पादने विशेष आकर्षण ठरली.

तुझे रूप चित्ती राहो



दो. सिंधूताई सकपाळ यांचा पर्यावरणपूरक गणपती.

Featured post

Lakshvedhi