Tuesday, 4 March 2025

बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

 बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या

विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

- प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा

- हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा

- प्रस्तावित प्रकल्पांच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करा

 

मुंबईदि. ४ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे  लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पायाभूत सुविधापाणीपुरवठा प्रकल्पमलनिःसारण प्रकल्पआरोग्य विभागाचे १ लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये ७०० किमी किलोमीटर रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाची कामेवर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्गगोरेगाव मुलुंड लिंक रोडसह गोखले पूलविक्रोळी पूलकर्नाक पूलसायन पूलमढ वर्सोवा पूल आदी पुलांची कामेदहीसरपोईसरओशिवरा नदी पुनर्जिविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्पयासह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवामालाडभांडूपघाटकोपर येथील मलजल उदचन केंद्रवर्सोवा मलजल बोगदामिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलःनिसारण प्रकल्पांचाही समावेश आहे.  याशिवाय आरोग्य विभागाच्यावतीने सायन केईएमसायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणीदहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे या प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

तसेच निक्षारीकरण प्रकल्पमिठी नदी पॅकेज ५पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्पदहिसर उद्यान विकासमानखुर्द वाहतूक केंद्रजिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालयदेवनार बायोमायनिंगदेवनार पशुवध आधुनिकीकरणमध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प या सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

बालस्नेही पुरस्कार २०२४’ चे वितरण राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार

 बालस्नेही पुरस्कार २०२४ चे वितरण

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. ४ :  बालकांना सुरक्षितसक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने बालस्नेही पुरस्कार २०२४  समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकरराज्यमंत्री पंकज भोयरआमदार संजय केळकरआमदार मनीषा कायंदेमहिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जेआयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरेआयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैनशिक्षण अधिकारी माधुरी भोसलेसदस्य नीलिमा चव्हाणजयश्री पालवेसायली पालखेडकरसंजय सिंगलचैतन्य पुरंदरेआदिसह जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी,  विभागीय आयुक्तपोलीस अधिकारीविविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा – अध्यक्ष सुशीबेन शाह

आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह म्हणाल्या कीमहिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा असण्यावर भर  देण्यात येत आहे. बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी चिराग ॲप विकसित करण्यात आले असूनआधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना सुर‍क्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.

            यासंदर्भातील जनजागृतीसाठी आवश्यक भित्तिपत्रिकेचे व मुलांच्या काळजी आणि संरक्षण नियमावलीत केलेल्या सुधारणा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीआयोगाने अनावरण केलेले भित्तीपत्रक हे सर्व पोलीस स्थानकात लावण्यात येणार असून  त्यावर असलेल्या क्यू-आर कोडमुळे बाल हक्क व संरक्षण आयोगाची सर्वांना माहिती मिळणार आहे.

बालकाच्या जन्मापासून ते १८ वर्ष होईपर्यंत शिक्षणआरोग्यसंरक्षणमूलभूत अधिकार त्यांना देण्याचे काम आयोग करीत आहे. आयोग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

 बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रिय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वयंसेवी संस्था यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारीउत्कृष्ट विशेषगृहउत्कृष्ट स्वयंप्रेरणेने सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रमउत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारीउत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सीपोलीस अधीक्षकउत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्वसहायक पोलीस आयुक्तउत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारीपोलीस निरीक्षकउत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयपोलीस उपनिरीक्षकउत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्षसहाय्यक पोलीस निरीक्षकउत्कृष्ट बाल कल्याण समितीपोलीस हवालदारउत्कृष्ट बालगृहपोलीस शिपाईबालस्नेही पुरस्कारपोलीस अंमलदारउत्कृष्ट परिविक्षा अधिकारीउत्कृष्ट खुले निवारा गृहउत्कृष्ट काळजी वाहकउत्कृष्ट समुपदेशकउत्कृष्ट विभागीय उपायुक्त यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


 

बालस्नेही पुरस्कार २०२४

उत्कृष्ट जिल्हाधिकारी :

नाशिक विभाग - श्री. जलज शर्मा, नाशिक. श्री. आयुष प्रसाद, जळगाव.

नागपूर विभाग- डॉ. विपिन इटनकर, नागूपर. श्री.जी.सी. विनय गौडा, चंद्रपूर.

पुणे विभाग - श्री. अमोल येडगे,कोल्हापूर. श्री. सुहास दिवसे, पुणे.

अमरावती विभाग - श्री. सौरभ कटीयार, अमरावती. अजित कुंभार, अकोला.

छत्रपती संभाजी नगर विभाग - दिलीप स्वामी, छत्रपती संभाजी नगर. डॉ. सचिन ओंबासे, धाराशीव.

उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी :

पुणे विभाग- श्री. रमेश चव्हाण,जिल्हा परिषद पुणे.

नाशिक विभाग -            श्रीमती आशिमा मित्तल,जिल्हा परिषद नाशिक. श्री. विशाल नरवाडे, जिल्हा परिषद धुळे.

अमरावती विभाग - श्रीमती संजिता मोहपात्रा,जिल्हा परिषद अमरावती.

नागपूर विभाग- श्रीमती आयुषी सिंह, जिल्हा परिषद गडचिरोली.

उत्कृष्ट विभागीय उपायुक्त :

पुणे विभाग- श्री. राहुल मोरे,पुणे.

नागपूर विभाग - श्रीममी अपर्णा कोल्हे,नागपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- श्रीमती हर्षा देशमुख, छत्रपती संभाजी नगर

कोकण विभाग- श्रीमती सुवर्णा पवार, कोकण

 उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी :

अमरावती विभाग - श्री. गिरीष पुसदकर, अकोला

नागपूर विभाग - श्री. दिपक बानाईत,चंद्रपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- श्री. कैलास तिडके,परभणी. श्री. जावेद शेख, लातूर.

पुणे विभाग- श्री. विजय तावरे, सातारा.

कोकण विभाग -श्रीमती शोभा शेलार, मुंबई शहर. श्री. विनीत म्हात्रे, रायगड.

नाशिक विभाग-श्री. सुनिल दुसाने, नाशिक.

उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष

कोकण विभाग- ठाणे, रत्नागिरी

नाशिक विभाग- नंदुरबार.

नागपूर विभाग- चंद्रपूर, नागपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर, परभणी

अमरावती विभाग-अमरावती, बुलढाणा.

पुणे विभाग- कोल्हापूर.

उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय :

कोकण विभाग- मुंबई उपनगर, पालघर

नाशिक विभाग- धुळे

अमरावती विभाग- बुलढाणा

नागपूर विभाग- गडचिरोली

पुणे विभाग- पुणे, कोल्हापूर

छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर,  धाराशीव.

उत्कृष्ट खुले निवारागृह :

नाशिक विभाग-आस्था    नाशिक,  कोकण विभाग- CCDT मुंबई आश्रय, मुंबई आणि आशा किरण, मुंबई


 

उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी :

छत्रपती संभाजी नगर विभाग- मंगेश जाधव, बीड. श्रीमती मनीषा तांदळे,       परभणी.

अमरावती विभाग- वैशाली चौरे,अमरावती

कोकण विभाग- योगीराज जाधव, रायगड

नाशिक विभाग- रविकिरण अहिरराव, जळगाव.

उत्कृष्ट काळजी वाहक :

नाशिक विभाग- संजय अहिरे,जळगाव. अश्विनी देवरे, नाशिक

पुणे विभाग- रंजना देवकाते, भगिनी निवेदिता विशेष मुलींचे बालगृहसांगली .

छत्रपती संभाजी नगर विभाग- सुरेश वाघमारे,परभणी.

उत्कृष्ट समुपदेशक : अनिता निकम,ठाणे.

उत्कृष्ट बाल कल्याण समिती :

नागपूर विभाग - चंद्रपूर, अमरावती विभाग - यवतमाळ, कोकण विभाग - रायगड, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग -  धुळे, छत्रपती संभाजी नगर विभाग - छत्रपती संभाजी नगर, लातूर, परभणी.  पुणे विभाग -  पुणे CWC-2, सातारा.

उत्कृष्ट बालगृह :

नाशिक विभाग- आशिर्वाद गार्डा बालसदन, नाशिक. नागपूर विभाग- श्री. श्रध्दानंद अनाथालय,  नागपूर

छत्रपती संभाजीनगर विभाग- जयकिशन (मुलींचे बालगृह), छत्रपती संभाजी नगर.

अमरावती विभाग- अधीक्षक शासकीय बालगृह कनिष्ठ मुलांचे बालगृह, अमरावती

पुणे विभाग- प्रादेशिक अनुरक्षण संघटना मुलांचे निरीक्षणगृह / बालगृहकराड, सातारा. नवरंगे संस्था, सोलापूर. कागल एज्युकेशन संस्था कोल्हापूर

कोकण विभाग- शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह कुर्ला कँम्पउल्हासनगर क्र. ४ ठाणे, समतोल फाऊंडेशन ठाणे.

उत्कृष्ट विशेषगृह :

छत्रपती संभाजी नगर विभाग- आपले सेवक, लातूर. तुळजाई प्रतिष्ठान, धाराशीव.

अमरावती विभाग- सुर्योद्य बालगृह, अकोला.

नागपूर विभाग- एकवीरा मतीमंद मुलांचे बालगृह रामटेक, नागपूर.

पुणे विभाग- मानव्य संस्था,पुणे. पालवी निवासी  संस्था, पंढरपूर

कोकण विभाग- MDC  होम मानखुर्द, मुंबई उपनगर.

उत्कृष्ट निरीक्षणगृह / बालगूह :

नागपूर विभाग-  शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह,नागपूर.

नाशिक विभाग- मुलीचे निरीक्षणगृह / बालगृह, नाशिक.

छत्रपती संभाजी नगर विभाग-  जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना निरीक्षणगृह, छत्रपती संभाजी नगर

पुणे विभाग-  दादुकाका भीडे मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, सांगली

कोकण विभाग-             निरीक्षणगृह / बालगृहलांजा, रत्नागिरी.

उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी :

कोकण विभाग - भारतीय समाज सेवा केंद्र, रत्नागिरी. बालआशा ट्रस्ट, मुंबई.

नाशिक विभाग - आधार आश्रम, नाशिक

छत्रपती संभाजी नगर विभाग - जीवन आशा ट्रस्ट ,परभणी

पुणे विभाग - जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संस्था शिशुगृह, कोल्हापूर, सोफोश संस्था, पुणे.    


 

उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम :

१. होप फाँर चिल्ड्रन फाऊंडेशनपुणेश्री. नागनाथ यमपल्लेजिल्हा शल्य चिकित्सकऔंध पुणे

२. डॉ. जयंत पाटीलअधीक्षकजिल्हा स्त्री रूग्णालयअकोला

३. सुनिल नायक, मुख्याध्यापक, ज्ञानविकास विदयामंदिरनंदननागपूर

४. किशोर देशपांडेसावली केअर सेंटरकोल्हापूर

५. रूद्रीतारा श्रॉफ, मुंबई.

 

बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रीय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वंयसेवी संस्था यांना सन्मानित करणे आले :

१. डॉ. कँरोलिन आँडाँयर डी व्हाँल्टरहोप फाँर चिल्ड्रन

२. युनिसेफमहाराष्ट्र

३. प्रेरणा

४. श्री. येशूदास नायडूइंटरनँशनल जस्टीस मिशन

५. श्रीमती शाहिन मिस्त्रीटिच फाँर इंडिया

६. कमिटेड कम्युनिटिज डेव्हलपमेंट ट्रस्टमुंबई

७. ओरियंट कन्सलटन्सी सर्व्हिसेसपुणे

८. श्रीमती किन्नी कौलमाइंड्स आई

९. श्रीमती आँड्रे डीमेलोमजलीस

 

उत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्व :

नागपूर- विशाल घोडमारे, शेखर संतोष उईके. अरूण आनंद मारकाम.

छत्रपती संभाजी नगर- कु. प्रतीक्षा तात्याराव बोर्ड, राजेश देविदास मिरगे, कु. बांगर शुभ होसराव.

पुणे - डॉ. शुभांगी किशोर भोर,

अकोला- सागर प्रकाश मोरे, योगेश गुजांळ, दिक्षा वाकोडे, प्रज्ञा वाकोडे, दिपाली इंगोले, सोनाली इंगोले. मुंबई -मनिषा खरात

 

पोलीस अधीक्षक : अमरावती ग्रामीण-  विशाल आनंद, कोल्हापूर- महेंद्र कमलाकर पंडित, वाशीम- श्री. अनुज तारे, गडचिरोली- निलोत्पल,जालना- अजयकुमार बंसल, मुंबई शहर- श्रीमती. रागसुधा आर. लातूर- सोमय मुंडे. धुळे- श्रीकांत धिवरे.  सोलापूर शहर -श्रीमती डॉ. दिपाली काळे.

सहाय्यक पोलीस आयुक्त :  पिंपरी चिंचवड शहर - डॉ. विशाल हिरे.

पोलीस निरीक्षक :मुंबई शहर- दिलीप प्रल्हाद तेजनकर, मीरा-भाईंदर वसई-विरार- सुजितकुमार तुकाराम गुंजकर, सोलापूर शहर -  महादेव राऊत, पिंपरी चिंचवड शहर - अरविंद पवार, नागपूर शहर -  महेश पाटीलबा-आंधळे, गोंदीया (गडचिरोली परिक्षेत्र ) - नंदिनी चानपुस्कार, छत्रपती संभाजीनगर - गजानन कामाजी कल्याणकर.

सहाय्यक पोलीस निरीक्षक : मुंबई शहर - दिनेश यशवंत शेलार,  नांदेड (नांदेड परिक्षेत्र ) - संजय देविचंद्र पवार, नांदेड (नांदेड परिक्षेत्र ) - सुधीर भालचंद्र खोडवे,  लातूर - दयानंद हरीचंद्र पाटील.

पोलीस उपनिरीक्षक :  मीरा-भाईंदर, वसई-विरार- प्रसाद शिवाजी शेनोळकर, छत्रपती संभाजी नगर शहर-इसाफ अस्मानखा पठाण आणि राधा काशिनाथ लाटे,  सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर परिक्षेत्र ) - सुरेखा शिंदे

गडचिरोली (गडचिरोली परिक्षेत्र)  - अमोल सूर्यवंशी.

पोलीस अंमलदार  : छत्रपती संभाजीनगर शहर- हिरा अशोक चिंचोलकर.

पोलीस हवालदार : लोहमार्ग मुंबई - निलीमा पदमाकर गांगवे,  पिंपरी चिंचवड शहर - दिपाली शिक्रे,

छत्रपती संभाजी शहर - वर्षा अण्णासाहेब पवार, रणजितसिंग मदनसिंग चव्हाण,  विजय उत्तमराव तेलुरे, गडचिरोली (गडचिरोली परिक्षेत्र) - जमीलखाँ  पठाण,  सातारा -  पी.व्ही. वाघमारे

पोलीस शिपाई :  लोहमार्ग मुंबई - पुजा सुरेश मोहेर,  बुलढाणा (अमरावती परिक्षेत्र ) - योगिता वासुदेवराव शेळके, गोपाल मूकूंदे, गोंदीया (गडचिरोली परिक्षेत्र ) - वैशाली प्रभाकर भांदक्कर, पुनम संतोष मंजुटे, प्रिती हेतराम बुरेले, गायत्री सेवकराम बरेजु, राजेंद्र मनोहर अंबादे. सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर परिक्षेत्र ) - अर्चना मस्के.

०००

विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,pl share & support

 विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी

 

मुंबईदि. : छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली.

दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेछत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यासारखी माणसं शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाच्या इतिहासाशीसंस्कृतीशी कसलेही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा आहे. पराक्रमाचा आहे. नऊ वर्षात 696 लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते. ते उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा असे त्यांनी सांगितले.

००००

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामे

 उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामे

गतीने पूर्ण करावीत

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबई, दि. ४ : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित धुळे जिल्ह्यातील तसेच शेगाव पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत श्री.पाटील बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलआमदार मोनिका राजळेपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  उपस्थित होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील शिंदखेडा तालुक्यातील (जि.धुळे) जल जीवन मिशन अतंर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी योजनांतर्गत कामांची पूर्तता विहीत कालमर्यादेत केली जात नाही, अशा विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले. धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या शिंदखेडा गावात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करावे जेणेकरुन उन्हाळ्यात त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाणीपुरवठा सहजतेने उपलब्ध राहील, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांतर्गत कामे दर्जेदार आणि कालमर्यादेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे तसेच त्यादृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने क्षेत्र पाहणी करुन वेळेत कामांची पूर्तता करण्याचे सूचित केले.

यावेळी शेगाव, पाथर्डी व परिसरातील गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत सुरु असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. योजना अंमलबजावणीतील अडचणी तत्परतेने दूर कराव्यात. त्यासाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्थानिक आमदारसरपंच तसेच शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घ्यावा. गावातील शाळाप्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातपाण्याची टाकी बसवण्यासाठी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. उन्हाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टाकी बसवण्याची कामे तातडीने सुरू करावी. तसेच गावात विहित मुदतीत काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांवर नियमानुसार दंड आकारण्यात यावा. सर्व गावात योजना अमंलबजावणीसाठी उपयुक्त जागा पाहणी करून त्याची माहिती संबंधितांनी आढावा बैठकीत सादर करावी, अशा सूचना श्री.पाटील यांनी दिल्या. 

बैठकीत शेगाव, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भगवान गड व ४६ गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच अमरापूर- माळीबाभुळगावबोधेगावशहरटाकळी या गावातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत चाकण औद्योगिक वसाहत व १९ गावातील पाणीपुरवठा योजनाच्या कामांचाही यावेळी सविस्तर आढावा  घेण्यात आला.

आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार pl share

 आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार 

(AI  technology) 👌

स्वर्गवासी पिता मुलाच्या लग्नात हजेरी लावून खाऊन पिऊन गेला 😊


*👉पाणी पिणे वाढवा* पाण्याचे महत्व ----- १) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. ४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे. ५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते. ६) B. P. संतुलित राहतो. ७) बद्धकोष्ठता नष्ट होते. ८) आळसपणा कमी होतो. ९) डोक्यावरील केस गळत नाहीत. १०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत. ११) तारूण्य टिकून राहते. १२) शरीर आतून स्वच्छ होते. १३) किडनी स्टोन होत नाहीत. १४) अन्नपचन चांगले होते. १५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो. १६) जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते. १७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते. १८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते. १९) जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे. २०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या. २१) तहान लागली की पाणी प्यावेच. २२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे. २३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील. २४) आजारपणात गरम पाणी प्यावे. २५) रात्री जास्त पाणी पिऊ नये. २६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल. २७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. २८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो. # *आरोग्य संदेश* # पाणी म्हणजेच आपले जीवन. करा आरोग्यासाठी भरपूर सेवन. *वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.....🙏 ह्या माहितीचा फायदा आपल्याबरोबर इतरांनाही होणं गरजेचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व ग्रुप वर हि माहिती पाठवा.* *ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा* ================= *------------------------------* *दवा ना खाना* *सही समय पर सही खाना, खाना.....* *🌺🌺🌺🌺🌺 *(कॉपी पेस्ट)* *आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂* *join होण्यासाठी 9130328672 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा* *किंवा लिंकला टच करा व join व्हा* *-------------------------* https://chat.whatsapp.com/J1wjhGKNuZt39QeDrLk6bv *------------------------* *आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*

 *👉*👉पाणी पिणे वाढवा* 


पाण्याचे महत्व -----

१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.

२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.

४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.  

५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.     

६) B. P. संतुलित राहतो.

७) बद्धकोष्ठता नष्ट होते.

८) आळसपणा कमी होतो.

९) डोक्यावरील केस गळत नाहीत.

१०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.

११) तारूण्य टिकून राहते.

१२) शरीर आतून स्वच्छ होते.

१३) किडनी स्टोन होत नाहीत.

१४) अन्नपचन चांगले होते.

१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.

१६) जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.

१७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते.

१८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते.

१९) जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.

२०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.

२१) तहान लागली की पाणी प्यावेच.  

२२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे.

२३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील.

२४) आजारपणात गरम पाणी प्यावे.  

२५) रात्री जास्त पाणी पिऊ नये.

२६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.

२७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

२८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.

      # *आरोग्य संदेश* #

पाणी म्हणजेच आपले जीवन.

करा आरोग्यासाठी भरपूर सेवन.

*वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.....🙏 ह्या माहितीचा फायदा आपल्याबरोबर इतरांनाही होणं गरजेचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व ग्रुप वर हि माहिती पाठवा.*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*

=================

*------------------------------*

         *दवा ना खाना*

*सही समय पर सही खाना, खाना.....*

*🌺🌺🌺🌺🌺


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*join होण्यासाठी 9130328672 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा* 

*किंवा लिंकला टच करा व join व्हा*

*-------------------------* 


https://chat.whatsapp.com/J1wjhGKNuZt39QeDrLk6bv

*------------------------*

*आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*


पाण्याचे  महत्व  -----

१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.

२)  दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे  आवश्यक आहे.

३)  कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.

४)  सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास  कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.  

५)  रक्ताभिसरण व्यवस्थित होते.     

६)  B. P.  संतुलित राहतो.

७)  बद्धकोष्ठता नष्ट होते.

८)  आळसपणा कमी होतो.

९)  डोक्यावरील केस गळत नाहीत.

१०)  स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.

११)  तारूण्य टिकून राहते.

१२)  शरीर आतून स्वच्छ होते.

१३)  किडनी स्टोन होत नाहीत.

१४)  अन्नपचन चांगले होते.

१५)  मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.

१६)  जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर  बारीक होते.

१७)  जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते.

१८)  जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी  प्यायल्यास शरीर मध्यम राहते.

१९)  जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.

२०)  आपण  गरम / मध्यम  गरम  जेवण  घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे  आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर  होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी  केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.

२१)  तहान  लागली  की  पाणी  प्यावेच.  

२२)  जास्तच  तहान  लागली  की  मात्र  गुळ  पाणी  प्यावे.

२३)  क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून  घ्या. अन्यथा आजार  होतील.

२४)  आजारपणात  गरम  पाणी  प्यावे.  

२५)  रात्री  जास्त  पाणी  पिऊ  नये.

२६)  पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा  उतार  वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.

२७)  पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात  जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात  लाळ मिसळून ती पोटात जाते आणि  रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

२८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.

      #  *आरोग्य  संदेश*  #

पाणी  म्हणजेच  आपले  जीवन.

करा आरोग्यासाठी भरपूर  सेवन.

*वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.....🙏 ह्या माहितीचा फायदा आपल्याबरोबर इतरांनाही होणं गरजेचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व ग्रुप वर हि माहिती पाठवा.*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*

=================

*------------------------------*

         *दवा ना खाना*

*सही समय पर सही खाना, खाना.....*

*🌺🌺🌺🌺🌺


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*join होण्यासाठी 9130328672 ह्या नंबर वर  Join Me असा what's up मेसेज करा* 

*किंवा लिंकला टच करा व join व्हा*

*-------------------------* 


https://chat.whatsapp.com/J1wjhGKNuZt39QeDrLk6bv

*------------------------*

*आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*

काठपदर, पहिली वस्त्र निर्मिती कोणी केला?pl share


 

Featured post

Lakshvedhi