विद्यापीठाशी संबंधित ५६ अधिसूचित ऑनलाइन सेवा
‘आपले सरकार’ पोर्टलवर
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठाशी संबंधित पुरविण्यात येणाऱ्या ५६ अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्रालयात लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विद्यापीठाशी संबंधित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
No comments:
Post a Comment