*हाताला धागेदोरे बांधून जर स्त्रियांवरील अन्याय अत्याचार दूर होत असतील ,तर रक्षाबंधन अवश्य साजरा करा. पण आज भारतातील स्त्रियांवरील अत्याचार आणि समाजातील तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसेच वर्षानुवर्षे चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे नेहमी स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान अशा एक दिवसाच्या धाग्यादो-यांनी उंचावणार आहे का?*
*बहिण भावाला राखी बांधते म्हणजे स्वतःच्या रक्षणाची अपेक्षा करते. यातून काय सिध्द करायचंय? आजही स्त्री एवढी परावलंबी आहे का? स्त्रिया कालही परावलंबी आणि कमजोर नव्हत्या ना आज आहेत. त्या स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात. पण अशा सणांद्वारे तिला कमजोर सिद्ध करून आपण आपली कोणती नैतिकता दाखवतोय?*
*बहिण भावाचे प्रेम सिध्द करण्यासाठी एखाद्या धाग्याची गरज आहे ,असे मलातरी वाटत नाही. त्यापेक्षा त्यांच्या मनगटात सामर्थ्य निर्माण करा म्हणजे ती स्वतः अन्यायाचा प्रतिकार करू शकेल. ख-या अर्थाने या सणाला स्त्रीवर्गाकडूनच विरोध व्हायला हवा. जो भाऊ वर्षातील प्रत्येक दिवस आपल्या बहिणींच्या रक्षणासाठी तत्पर असतो तेव्हा अशा एका दिवसासाठी त्याला राखी बांधण्यासाठी आग्रह का करायचा? भावांनीही भावनेच्या भरात वाहून जात केवळ प्रेमापोटी राखीचे समर्थन न करता त्याऐवजी आपल्या बहिणींचे प्रबोधन करावे*
✍🏻
No comments:
Post a Comment