Thursday, 9 December 2021

 #-> *महिलांनो, या साड्यांचे करायचे काय ?*

------>

----------/--> *आपल्या कष्टाचा पैसा असा विनाकारण वाया घालू नका.*

>----///--------------------->

     (वस्तूस्थितीवर बोलू काही: समाज सुधारला पाहिजे…समाज घडला पाहिजे…!!)

     घरी पाहुणी आली की, घ्या साडी- द्या साडी... देणारीच्याही कपाटात वीस साड्या आणि पाहुणीच्याही… म्हणजेच महाराष्ट्रातील 70 टक्के घरांमध्ये अशीच परिस्थिती असेल, असे वाटते. या साड्या अशा फिरत राहतात, एका घरातून दुसऱ्या घरात. तरीदेखिल कापड दुकानात जाऊन साड्या विकत घेणे सुरूच असते. अशा अनेक साड्या आहेत, की त्या वर्षातून दहा दिवस देखिल वापरल्या जात नाहीत. जी वस्तू वापरली जात नाही, ती देण्यात अर्थ काय, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. 

 *मला तर असे वाटते, की घरी पाहुणी आलेल्या महिलेला द्यायचेच असेल, तर एक पाव काजू किंवा बदाम द्यावे. किंवा खारिक-खोबरं देण्याची प्रथा सुरू केली तर चांगलेच होईल. ते लाखो माऊलींच्या पोटात तरी जातील. शरिराला आवश्यक पोषकतत्व भेटतील. तशाही बऱ्याच महिला उपवास-तापास करत असतात. त्यांना ते कामी येतील. चांगले बुक्स दिले तर इतिहास घडेल.*

    मध्यंतरी आमच्या घरी पाहुणी आली. पूर्णांगिनी अर्चनाने पाहुणचार करुन जेऊ घातले. साडीसुद्धा दिली. मी म्हटले ही प्रथा काही चांगली नाही. तर पत्नी म्हणे त्या पाहुणीच्या घरच्या आतापर्यंत मला दोन साड्या आल्या आहेत, मग आपण एकदा तरी द्यायला नको का ? मी म्हटले आपण घरी आलेल्यांना पुस्तक भेट द्यायचे हे ठरले आहे. तर ती म्हणे पुस्तकांचे मूल्य महिलांना कळत नाही. मी म्हटले, अशी वस्तू द्यावी की ती कामात पडेल. तिचा वापर होईल. खरंतर, असंच होत आहे. *थोडक्यात, साडीबाबत तर “ तिनं दिली म्हणून, मी दिली ” असेच प्रकार सुरू आहे.* हे सारं बदलण्याची आता वेळ आली आहे.

     मी पत्नीला दिवाळीला साडी घेणे बंद केले आहे. जोपर्यंत घरातील पूर्ण साड्या वापरल्या जाणार नाहीत, तोपर्यंत कापड दुकानात जायचे नाही, हे दोन वर्षांपासून पक्के ठरविले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. असा प्रकार सर्वच घरी व्हायला पाहिजे. घरी आलेल्या पाहुणीला-पाहुण्याला पाहुणचार केला पाहिजे. मनातून बोललं पाहिजे. शेवटी अतिथी देवो भव: ही आपली संस्कृती आहे. ती जोपासलिच पाहिजे. रक्ताच्या आणि मनाच्याही नात्यांना आपण अशा पद्धतीने जोपासतो सुद्धा. पण साडीच घेतली पाहिजे, असं नाही ना…? महिलांच्या साड्या असो, की माणसांचे ड्रेस, की मुलांचे कपडे हे आवश्यक तेवढेच असायला पाहिजे. 

    आपण विनाकारण कापड कंपनीवाल्यांचे घरं भरत आहोत. हे लक्षात घेतले पाहिजे. त्याऐवजी हा पैसा सकारात्मक कामात खर्च केला, किंवा कुटूंबियांना कुठे फिरायला घेऊन गेले तरी उत्तमच. पण आपल्या कष्टाचा पैसा असा विनाकारण वाया घालू नये. एवढेच मनापासून वाटते.

-विनोद बोरे, 

मो. 9075563754

स्वप्नपूर्ती मिडियya

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi