Monday, 2 June 2025

संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक-2025 कृषि विद्यापीठांनी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मॉडेल तयार करावे

 संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक-2025

कृषि विद्यापीठांनी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी

कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मॉडेल तयार करावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

परभणी दि. 29 (जिमाका) : शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषि विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वातावरणीय बदलकीड व्यवस्थापनतसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेकृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालपालकमंत्री मेघना बोर्डीकरखासदार संजय जाधवआमदार सर्वश्री सतीश चव्हाणराहुल पाटीलरत्नाकर गुट्टेराजेश विटेकर यांच्यासह कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवारकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीकृषि आयुक्त सुरज मांढरेवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंन्द्र मणिडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाखबाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावेजिल्हाधिकारी रघुनाथ गावडेसंशोधक संचालक डॉ. खिजर बेगडॉ. किशोर शिंदे उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईकमहाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकेंद्र शासनाने राज्यात आयसीआरच्या माध्यमातून सुरु केलेल्या नव्या योजनेत शेतीशी सबंधित विविध शास्त्रज्ञया क्षेत्रात कार्यरत संस्थाअधिकारी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाणार आहेत. संशोधक आणि शेतकरी यांच्यामध्ये या माध्यमातून एक नवीन नाते निर्माण होईल. या अंतर्गत पुढील पंधरा ते वीस दिवस एकात्मिक कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत असूनया कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रापासून होत आहे ही महत्त्वाची बाब आहे. या माध्यमातून संशोधक एका दिवशी तीन ते चार गावांमध्ये जातील व शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधतील. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेती क्षेत्राच्या विकासासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुखमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

वातावरणीय बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभा राहिली आहेत. बदलत्या तंत्राचा वापर करत गुंतवणूक आधारित शेती आपल्याला करावी लागणार आहे. संरक्षित शेतीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वातावरणीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या पावसातील खंड सारख्या संकटात तग धरू शकेलअसे वाण विकसित करावे लागणार आहेत. पावसाचा खंडकीड व्यवस्थापनवातावरणीय बदलात पावसाचा खंड आदी संकटात तग धरू शकणारे वाण विकसित करण्यासाठी कृषि विद्यापीठांमध्ये संशोधन होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला कामे करावे लागेल तसेच शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. हा वापर वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठांनी मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता’ सुरु करावे. या माध्यमातून प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे नवे मॉडेल विकसित करावे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

विकसित कृषि संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ

 विकसित कृषि संकल्प अभियाना’चे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ

परभणीदि. 29 (जिमाका) : राष्ट्रव्यापी ‘विकसित कृषि संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे या अभियानाच्या चित्ररथाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा शुभारंभ केला.

यावेळी कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणी पुरवठा व स्वच्छता,उर्जामहिला व बालकल्याणसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकृषिवित्तनियोजनमदत व पुनर्वसनविधी व न्यायकामगार राज्यमंत्री  अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषि पद्धतीसमृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषि क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात दि. 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत देशभरात विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या माध्यमातून खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने लाभणार असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईलअसे नमूद करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार संजय जाधवआमदार, कार्यकारी परिषद सदस्य सतीश चव्हाणआमदार व कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटीलआमदार रत्नाकर गुट्टेआमदार राजेश विटेकरप्रधान सचिव (कृषि) विकासचंद्र रस्तोगीपुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडेकृषि आयुक्त सूरज मांढरे (भाप्रसे)‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंहकृषी विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. डॉ. इन्द्र मणि‘पिडीकेव्ही’ अकोला आणि ‘एमपीकेव्ही’ राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख‘बीएसकेकेव्ही’ दापोलीचे  कुलगुरू डॉ. संजय भावेजिल्हाधिकारी रघुनाथ गावडेपोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  नतिशा माथुरमनपा आयुक्त धैर्यशील जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

विकसित कृषि संकल्प अभियानाच्या माध्यमातून  शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी कृषि क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील 723 जिल्ह्यांमधील 65 हजारपेक्षा जास्त गावांना भेट देणारी दोन हजार 170 तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषि विद्यापीठांचे वैज्ञानिकसंशोधन संस्थांचे तज्ज्ञशासकीय विभागांचे अधिकारीनाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील 1.3 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात हे अभियान कृषि विभाग आणि 50 कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून 4 हजार 500 गावांत राबविले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी  कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील 12 कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले असून याद्वारे प्रत्येक गावात 200 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जवळपास दोन लाख 1 हजार 600 शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार असून त्याद्वारे संपूर्ण परिसरात तंत्रज्ञान पोहोचले जाईल.

*-*

पाच किमीमध्ये वैद्यकीय सेवा

 पाच किमीमध्ये वैद्यकीय सेवा  आरोग्य राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर

राज्यात दर पाच किलोमीटरच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आरोग्य सुविधा उभारणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून वित्तपुरवठा करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने महिलांसाठी विविध योजना अंमलात आणल्या असूनया योजनांच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

***

थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिला

 थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिला

आज भारत जगामध्ये जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. येत्या दोन वर्षात भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अहवालात देशात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा सर्वाधिक 40 टक्के असल्याचे  म्हटले. महाराष्‍ट्र आता विकासात थांबणार नाही तर पुढेच जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शासकीय कार्यालये लोकाभिमूख, नागरिकांना सुकर सेवा

 शासकीय कार्यालये लोकाभिमूखनागरिकांना सुकर सेवा

राज्यात 100 दिवस कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालये लोकाभिमूख करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी 150 दिवसाच्या टप्पा 2 अभियानात 1,250 सेवा घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले. येत्या दोन वर्षात या सेवा व्हॉटसअपवरही उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिला सक्षमीकरण योजना बलशाली करणार

 महिला सक्षमीकरण योजना बलशाली करणार

महिला सक्षमीकरण योजना येणाऱ्या काळात अधिक बलशाली करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे सांगतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीसहकारी संस्था स्थापन करून त्यांना कर्ज पुरवठा केला जाईल व त्या माध्यमातून त्यांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मदत केली जाईल. राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी योजनेंतर्गत 1 कोटी महिलांना लखपती दीदी करणार आहोत. यात 25 लाख महिला लखपती दीदी झाल्याची माहितीही त्यांनी दिली. 

शेतीमध्ये गुंतवणूक वाढवणार

 शेतीमध्ये गुंतवणूक वाढवणार

शेती क्षेत्रात दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून शेतीत मोठे परिवर्तन करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ देण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भातील 5,000 गावांमध्ये जागतिक बँकेच्या साहाय्याने कृषी क्षेत्रात गुंतवणूक करून शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याला मॅग्नेट प्रकल्पाची जोड दिली. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना टप्पा 2  राज्यातील 7500 गावांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला  आहे. त्यात हिंगोलीचा समावेश आहे. मुख्यमंत्री सौर योजनेचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईलअसेही त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi