Monday, 2 June 2025

भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध

 भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध –केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

·         वेव्हज 2025 मध्ये भारतात निर्मिती करण्याच्या आव्हानांतर्गत 32 सर्जनशील आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान

·          60 हून अधिक देशांमधील 750 हून अधिक अंतिम स्पर्धक नाविन्य आणि प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र

·         तरुण मने सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचे सुंदर संमिश्रण कसे करतात याचे हे व्यासपीठ एक उत्कृष्ट उदाहरण : राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

 

मुंबई२ :-जगभरातील सर्जकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारतात निर्मिती आव्हानाच्या (सीआयसी) पहिल्या सत्राचा समारोप वेव्हज 2025 मध्ये एका भव्य समारंभात झालाज्याने भारताच्या सर्जनशील परिदृश्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा चिन्हांकित केला. या ऐतिहासिक कार्यक्रमात माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या 32 विविध आव्हानांच्या  विजेत्यांचा सन्मान करण्यात आलात्यात अॅनिमेशनगेमिंगचित्रपट निर्मितीकृत्रिम प्रज्ञासंगीत आणि डिजिटल कला यांचा समावेश होता.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी तरुण सर्जक आणि दूरदृष्टी असलेल्यांना संबोधित करताना हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले.

तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार,जिओ वर्ल्ड सेंटर मधील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील राऊंडटेबल बैठकीत

 तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिओ वर्ल्ड सेंटर मधील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील राऊंडटेबल बैठकीत निर्मातेउद्योजकस्टार्टअप्स आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीतील तज्ञांशी सकारात्मक चर्चा

 

मुंबईदि. २ : मुंबई हे सर्जनशीलतेचे केंद्र असून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमधील भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (एफआयसीसीआय) यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘स्टुडिओ आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील राऊंडटेबल बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेउद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगनएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासूविकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाहअभिनेते आणि निर्माते अमीर खानएफआयसीसीआयचे आशिष कुलकर्णीपी.जयकुमार रेड्डी यांच्या यांच्यासह या क्षेत्रातील तज्ञ मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीनवी मुंबईत जागतिक थीम पार्कबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याकरिता प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत दोन महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले आहेतयामुळे मुंबईत जागतिक दर्जाचे स्टुडिओ सुविधा उपलब्ध होणार आहेत.

‘आयआयटी’ मुंबईच्या तांत्रिक सहकार्याने ‘आयआयसीटी’ उभारले जाणार आहे. यामध्ये सर्जनशील उद्योग अभ्यासक्रमात समाविष्ट करून नव्या पिढीला करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ई-स्पोर्ट्ससाठी धोरणात्मक पाठबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

चित्रपटवेबसिरीज जाहिरात आणि इतर व्हिज्युअल कंटेंटसाठी चित्रीकरण परवानगी मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली असून नोंदणीअर्ज भरणेशुल्क भरणेपरवाना प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर सात दिवसात परवानगी मिळतेअसे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञउद्योजकस्टार्टअप्स आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

अपस्किलिंग, ‘आयपी’ हक्क आणि शैक्षणिक गुंतवणूक

 अपस्किलिंग‘आयपी’ हक्क आणि शैक्षणिक गुंतवणूक

अपस्किलिंगसाठी विविध इंडस्ट्रीने पाठबळ देणे अपेक्षित आहे. राज्य शासन टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून पूर्णपणे सहकार्य करत आहे. ‘आयपी’ (बौद्धिक संपदा) विषयावर जनजागृती करणे देखील  गरजेचे आहे. माध्यम व मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष आर्थिक क्षेत्र तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. शूटिंगसाठी 'एक खिडकी प्रणालीमहाराष्ट्रात सुरु करण्यात आली असून यामुळे सर्व परवानग्या एका पोर्टलवरून मिळतात. शासकीय ठिकाणी शूटिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेउद्योग विभागाचे सचिव पी. अन्बळगनविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यासह विविध क्रिएटर कंपनीचे संस्थापकमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मराठी कंटेंटपरवाना याबाबत सूचना मांडल्या.

गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने या क्षेत्रातील नवनिर्मात्यांना नवनवीन संधी उपलब्ध होणार

 गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने या क्षेत्रातील


नवनिर्मात्यांना नवनवीन संधी उपलब्ध होणार


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


क्रिएटर आणि प्लॅटफॉर्मस गोलमेज परिषदेत गेमिंगसह


मराठी, कला संस्था आणि मनोरंजन क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा


 


मुंबई, दि. २ : महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने क्रिअटर आणि प्लॅटफॉर्मस उद्योगातील प्रमुखांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस गोलमेज बैठकीत बोलत होते.


महाराष्ट्रात या क्षेत्रातील निर्मात्यांना प्रेरक आणि पूरक वातावरण आहे. त्यासोबतच त्यांना चित्रीकरण करप्रणाली सवलती देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय पारंपरिक खेळांचे आधुनिक स्वरुपात रूपांतर करून त्यांचे ‘आयपी’ (बौद्धिक संपदा) तयार करणे, आणि त्या ‘आयपी’चं संपूर्ण भारतात व जागतिक स्तरावर व्यावसायीकरण करणे ही कल्पना उत्कृष्ट ठरेल.


मराठीचा कंटेंट जागतिक स्तरावर नेणार


ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक मराठी कंटेंट जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मराठी कंटेंट क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी या क्षेत्रातील संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांनी सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

वेव्हेज २०२५' आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक समृद्धीला जागतिक व्यासपीठ

 'वेव्हेज २०२५' आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून


भारताच्या सांस्कृतिक समृद्धीला जागतिक व्यासपीठ


- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार


· वेव्हज-२०२५ समिटमध्ये स्पॉटीफाय यांच्यावतीने


साऊंडस ऑफ इंडिया सांस्कृतिक कार्यक्रम


· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती


 


मुंबई, दि. २ :- ' वेव्हेज २०२५' या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक समृद्धीला जागतिक व्यासपीठ मिळत आहे. 'वेव्हेज २०२५' ही केवळ एक परिषद नाही तर भारतीय सर्जनशीलतेचा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा उत्सव असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.


जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५ समिटमध्ये दुसऱ्या दिवशी स्पॉटीफाय यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या साऊंडस ऑफ इंडिया या सांस्कृतिक कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची प्रमुख उपस्थिती होती.


सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. शेलार म्हणाले हा सांस्कृतिक कार्यक्रम भारताची पारंपरिक संगीतशैली आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारा आहे. मनोरंजन क्षेत्रातील नवप्रतिभांना प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक वारसा जपणे आणि जागतिक स्तरावर भारताच्या सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


मुंबई केवळ आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक राजधानी असल्याचे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. शेलार म्हणाले, या शहरात निर्माण होणाऱ्या कलाकृतींनी जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


यावेळी संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक शंतनु मोईत्रा आणि त्यांच्या चमूने भारतातील विविध भागामधील शेतातील पेरणी आणि कापणी संदर्भातील लोकगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.


या संस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक वाद्य, आधुनिक साउंड आणि सांस्कृतिक विविधतेच्या अद्वितीय मिलाफामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी सोनटक्के यांनी केले.


००००

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार,नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल

 युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत सामंजस्य करार

----

नवी मुंबईतील एज्युकेशन सिटीमध्ये

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २ - विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या एज्यूकेशन सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न येथेच पूर्ण होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज २०२५ परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकउद्योग विभागाचे सचिव डॉ.अन्बलगनसिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासूउद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेव्हज परिषदेत हा करार करण्यात आला. हे विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी’ प्रकल्पामध्ये आपले कॅंपस उभारून जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहे. यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने १५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

या करारावर सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर यांनी स्वाक्षरी केली.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त 

जागतिक पातळीवर सर्वोत्तम ठरेल असा स्टुडिओ निर्माण करा

 जागतिक पातळीवर सर्वोत्तम ठरेल असा स्टुडिओ निर्माण करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 मुंबईदि. २ : गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन हजार कोटी रुपयांचा करार झाला. गुणवत्तपूर्ण संस्थांच्या निवडक यादीत गोदरेज कंपनीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यामुळे हा स्टुडिओ जागतिक पातळीवर सर्वोत्तम होईलयादृष्टीने कार्य कराअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन यांनी आणि 'गोदरेजच्या वतीने महाव्यवस्थापक हरसिमरण सिंग यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकसिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासूउद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

या कराराचा पहिला टप्पा ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ६०० रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प २०२७ मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये १९०० रोजगार निर्मिती होईल तर हा टप्पा २०३०  पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण २००० कोटी रुपयांची गुंतवणूक तर २५०० रोजगार निर्मिती होईल.

Featured post

Lakshvedhi