Sunday, 1 June 2025

आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी

  आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनाशिकमध्ये येत्या काळात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डिजिटल कुंभ सोबतच आरोग्यदायी कुंभ अशी संकल्पना राबवून यामध्ये योगदान द्यावे. विद्यापीठाच्या प्रत्येक उपक्रमात राज्य शासनाच्यावतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.

 

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या 150 दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांबाबत आणि चक्र विषयक माहिती प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.

 

प्रास्ताविकात कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल श्रीमती कानिटकर यांनी प्रधानमंत्री यांच्या विकसित भारत संकल्पानुसार विद्यापीठाने काम सुरू केले असल्याचे सांगून चक्र आणि उत्कृष्टता केंद्र निर्मितीबाबतची माहिती दिली.

0000

वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन करावे

 वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन करावे

            परदेशी विद्यापीठे ज्याप्रकारे काम करताततसेच काम येथील विद्यापीठांनी करावे. विद्यापीठात संशोधनाला चालना मिळणे गरजेचे आहेवेगवेगळ्या विषयांचे संशोधन केंद्र म्हणून विद्यापीठांनी काम केले पाहिजे.  उत्कृष्टता केंद्रईन्क्यूबेशन  केंद्रस्टार्ट अप आणि विविध क्षेत्रात मार्गदर्शन करणारी केंद्रे म्हणून त्यांनी काम केले पाहिजेअसेही त्यांनी नमूद केले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात नवीन शिक्षण धोरण आणले. समाजाची गरज आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा धोरणात अंतर्भाव करण्यात आला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेलं 'चक्रहे त्याचेच उदाहरण असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले

 

सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे संशोधन व्हावे

'चक्र'सारखे मॉडेल आणि  हब अँड स्पोक ही पद्धती महत्वाची आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूर आयआयएम सोबत आदिवासी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था  निर्माण  होणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

जगातल्या विद्यापिठाप्रमाणेच आपली विद्यापीठे  स्वयंपूर्ण होत आहेत. त्यासाठी असे प्रयोग गरजेचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे. मोठे बदल होत आहेत. नवे तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायभूत सुविधांचा  लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे. राज्यातील 13 कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुकास्तरीय उपकेंद्रांनी या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे. असे केल्यास खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय यंत्रणांना संशोधन आणि इतर बाबीकडे लक्ष देता येणे शक्य होईलअसे मत त्यांनी व्यक्त केले.

 

चक्र'च्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आ byणि स्टार्टअपला बळ मिळेल cr, ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन · सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

 चक्र'च्या माध्यमातून संशोधननाविन्यता आणि स्टार्टअपला बळ मिळेल

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी

·         आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्रचे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

·         सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

 

नाशिक दि. १: विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधननाविन्यता आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले 'चक्र' ( सेंटर फॉर हेल्थअप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) हे उपयुक्त ठरेल. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण  होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्र’ चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा (विदर्भतापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजनवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (दूरदृष्यप्रणाली द्वारे)शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसेअन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य विभागाचे मंत्री  नरहरी झिरवळवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकरनाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडामविद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त),  -कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून  गेल्या 2 वर्षात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत.  आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या 25 वर्षात चांगले काम केले आहे.

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी केले बेंगळूर येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

 कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी केले बेंगळूर येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी  केंद्राच्या पाहणीनंतर  कृषी विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत नवप्रवर्तन केंद्राच्या कार्यपद्धती व पायाभूत सुविधाविद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानामुळे मिळणारे व्यावहारिक ज्ञान व कौशल्यशेतकऱ्यांच्या अनुभवांद्वारे मिळालेला फायदा — उत्पादनवाढखर्चात बचतआणि शाश्वत शेतीकडे वाटचाल याविषयी सविस्तर चर्चा झाली.

केंद्रात सादर करण्यात आलेल्या तंत्रज्ञान व नवकल्पनांनी कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे प्रभावित झाले. त्यांनी अशा केंद्रांचा शेतीतील क्रांतीसाठी असलेला उपयोग आणि विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी उपक्रमांची माहिती घेऊन राज्यात त्याबाबत नक्कीच कार्यवाही करू  असेही सांगितले.

• स्वयंचलित ट्रॅक्टर्स आणि कृषी अवजारे: स्वयंचलित ट्रॅक्टर व त्यांच्यासोबत चालणाऱ्या अवजारांची कार्यक्षमता व श्रमबचतीसाठी असलेले महत्त्व.

• कृषी ड्रोन: ड्रोनचा वापर पिकांचे निरीक्षणकीड ओळखआणि अचूक फवारणीसाठी कसा करता येतो याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलेशेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या उपक्रमाची माहिती घेतली.

• प्रेसिजन शेती तंत्रज्ञान: जी. पी. एस. आधारित प्रणाली व बदलत्या दराने खते व औषधे देण्याच्या प्रणालीसह अचूक शेती तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

• शेती उपकरण डिझाईन लॅब्स: स्थानिक गरजांसाठी उपयुक्त व नवोन्मेषक्षम शेती उपकरणे तयार करणाऱ्या लॅब्सची यावेळी माहिती  देण्यात आली.

 

0000


बेंगळुरू येथील इनोव्हेशन केंद्र आणि कृषी विज्ञान विद्यापीठाला कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांची भेट

 बेंगळुरू येथील इनोव्हेशन केंद्र आणि कृषी विज्ञान विद्यापीठाला

कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांची भेट

 

मुंबईदि.: स्मार्ट शेतीसाठी बेंगळूरच्या धर्तीवर  महाराष्ट्रात  प्रगत कृषी केंद्रांची (इनोव्हेशन केंद्र) उभारणी  करण्याचा धोरणात्मक आराखडा तयार करण्यात येईल. यामुळे शेतीत शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळेल व शेतकऱ्यांना नव्या साधनांचा लाभ होईलज्यामुळे शेती अधिक उत्पादनक्षमकार्यक्षम व शाश्वत होईल.असे मत कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

            बेंगळुरू येथील  स्मार्ट शेतीसाठी नवप्रवर्तन केंद्रकृषी विज्ञान विद्यापीठ (UAS) ला  कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. कृषी विज्ञान विद्यापीठचे  कुलगुरू, स्मार्ट शेतीसाठी इनोव्हेशन केंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी  व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने स्मार्ट शेतीसाठी (CDSA)इनोवेशन केंद्रात वापरल्या जाणाऱ्या प्रगत कृषी तंत्रज्ञान व नवकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव या भेटीदरम्यान घेतला. महाराष्ट्रात अशा प्रकारची अत्याधुनिक केंद्रे स्थापन करण्यासाठी शक्यता आणि कार्यपद्धती यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना लाभ देणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. यावेळी शिष्टमंडळाने संपूर्ण नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी केली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद

 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद

-सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

·         स्मारकाच्या जागेची पाहणी

 

        मुंबईदि. 1 : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

            सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणालेसद्यःस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अधिकाऱ्यासमवेत आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे. स्मारक उभारणीमुळे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी खासदार धैर्यशील मानेआमदार सत्यजित देशमुखआमदार सदाभाऊ खोतआमदार डॉ. अशोकराव मानेजिल्हाधिकारी अशोक काकडेबार्टीचे महासंचालक सुनिल वारे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबातील सदस्य सचिन साठे उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीला भेट देऊन शिल्पसृष्टीची ही पाहणी केली तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

जैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा · जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

 जैन समाजाच्या विकासाच नवीन अध्याय सुरु

-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

·         जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

 

मुंबईदि. 1 : जैन समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहेजैन समाजाच्य सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मुंबईशहरातील मल्होत्रा हाऊस इमारतीत जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आलेया कार्यालयाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या हस्ते तर अध्यक्षा आभा सिंह यांच्या उपस्थितीत झाले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीजैन समाजाच्या विकास व उत्थानासाठी शासन कटीबद्ध आहे. महामंडळाच्या सुयोग्य व प्रभावी संचालनासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल.

 महामंडळाचे अध्यक्ष श्री ललित गांधी यांनी महामंडळाचे कार्य विषद केलेत्यांनी 26 जिल्ह्यांचा दौरा करत 22 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केलेया दौऱ्यांदरम्यान जैन समाजासाठी महामंडळाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचारासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले.

  

महामंडळासाठी केंद्राच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक महामंडळअध्यक्षा आभा राणी सिंह यांनी सांगितले. सरकारच्या विविध महामंडळांमध्ये जैन महामंडळाची स्वतंत्र व विशेष ओळख निर्माण करणे तसेच समाजामध्ये विविध सरकारी योजनांबाबत जनजागृती निर्माण करणेहा एक सातत्यपूर्ण व यशस्वी प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभा महामंडळाचे उपाध्यक्ष मीतेश नहाटासमन्वयक संदीप भंडारीजवाहरभाई शाहहितेश मोताव्यवस्थापकीय संचालक जी.पी मकदूमपंजाबी अकादमीचे अध्यक्ष बल मलकत सिंहविकास आच्छा यांच्यासह जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi