Friday, 2 May 2025

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला भेट

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारत पॅव्हेलियन,

महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला भेट

 

मुंबईदि. १ : वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनमहाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.

 यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारआदी उपस्थित होते.

    भारत पॅव्हेलियनमध्ये राज्य शासनाच्या 'मॅजिकल महाराष्ट्रया पॅव्हेलियनलाही प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी भेट दिली. यावेळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध पॅव्हेलियनला भेट देत करमणूक आणि दृकश्राव्य माध्यमांमधील नवनवीन तंत्रज्ञानासंदर्भात माहिती त्यांनी जाणून घेतली. तर गेमिंग आर्केडला भेट दिल्यानंतर त्यांनी गेमिंग क्षेत्रातील नव तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील विविध संधी याविषयी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

भारत पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्रासह हरियाणापंजाबराजस्थानमध्यप्रदेशआंध्र प्रदेशतेलंगणा  राज्यांसह या क्षेत्रातील नेटफ्लिक्सजिओयू ट्यूबतसेच विविध मानोरंजन आणि वृत्त वाहिन्याचित्रपट निर्मिती संस्था यांनी त्यांचे पॅव्हेलियन उभारले आहेत.

००००

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची,मुंबईतील चित्रपटनगरीत मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी

 महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ चे उद्घाटन

 

मुंबईदि. १ : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनरेल्वेमाहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमाहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील चित्रपटनगरीत मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ५०० एकरमध्ये असलेल्या मुंबईतील चित्रपटनगरीत अ‍ॅनिमेशनगेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी खास १२० एकरमध्ये मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प आगामी काही महिन्यांत प्रत्यक्षात येणार आहेत.

या वेव्हज परिषदेद्वारे भारताने क्रिएटिव्ह क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दाखविले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक महासत्ता म्हणून ओळख निर्माण केली असूनआता भारत क्रिएटिव्ह क्षेत्रातही नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेअसे  प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. माहिती तंत्रज्ञानकौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भारताच्या नव्या क्रिएटिव्ह वेव्हज'चे स्वागत करण्याचे आवाहन केले.

0000

मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले ध्वजवंदन जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन

 मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले ध्वजवंदन

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन

          

मुंबईदि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त माहिती तंत्रज्ञानसांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री श्री. शेलार यांच्या  हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.  

            पालकमंत्री ॲङ शेलार म्हणाले की, दुर्धर व्याधींवर खर्चिक उपचार घेण्याची क्षमता नसणाऱ्या रुग्णांना सहाय्य मिळविण्यासाठी मंत्रालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करावा लागे. पंरतूआता 01 मे2025 पासून या कक्षाची सुविधा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होत आहे. लवकरच ही सेवा ऑनलाईन स्वरुपात सुरु होणार असून यामध्ये वैद्यकीय लाभाच्या विविध शासकीय योजनांची सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था या कक्षामध्ये उपलब्ध होत आहे. या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारीसमाज विकास अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियमित उपलब्ध असणार आहेत. या कक्षाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री श्री. शेलार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास  मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडनिवासी उपजिल्हाधिकारी सतिष बागलउपजिल्हाधिकारी सुभाष काकडेवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीपाद टाकळीकरतहसीलदार राजेंद्र चव्हाण  व इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

00000

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजवंदन सोहळा साजरा

 महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजवंदन सोहळा साजरा

 

        मुंबईदि.1 : महाराष्ट्र राज्य 66 व्या स्थापना दिनानिमित्त विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा साजरा झाला.

            यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठमोळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य प्राप्त झालेल्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी अभिवादन केले.

सभापती प्रा.शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे. राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या  शुभेच्छा दिल्या. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या  गोळीबारात मृत्यमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रध्दाजंली अर्पण केली.

ध्वजवंदन सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळेसचिव डॉ.विलास आठवलेसचिव शिवदर्शन साठ्येसह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवीसह सचिव नागनाथ थिटेउप सचिव सुभाष नलावडे  यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ आणि राखीव पोलीस उपनिरीक्षक अरुणा जॉन्सन बुरकेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

                         

सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी,शिक्षण व क्रीडा विकास

 सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी

राज्य शासनाने मुंबईत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णयही घेतला आहे. महाराष्ट्रातील सागरी किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळावायासाठी  शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. हरियाणातील पानिपत येथे 'मराठा शौर्य स्मारकबांधण्याचा निर्णयही  शासनाने घेतला आहे. तसेच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत असलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

शिक्षण व क्रीडा विकास

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे .उत्तराखंड येथे झालेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 201 पदके जिंकली आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 31 खेळाडूंची शासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जात आहे.

मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला. यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बलबृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलनिशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वजबृहन्मुंबई पोलीस ध्वजराज्य राखीव पोलीस बल ध्वजमहाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वजबृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज)बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलमुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलसुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हाब्रास बँड पथकपाईप बँड पथक यांनी सहभाग घेतला.


कल्याणकारी योजनांचा लाभ आणि शेतकऱ्यांना दिलासा

 कल्याणकारी योजनांचा लाभ आणि शेतकऱ्यांना दिलासा

 

राज्यपाल म्हणालेप्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी कुटुंबास राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. अडचणीमध्ये आलेल्या धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने 2024-25 या हंगामासाठी प्रती हेक्टर 20 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 31 लाख 36 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 3,389 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यात एक लाख सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या 45 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मागील हंगामात 11.21 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली असूनही देशातील सर्वाधिक खरेदी असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी नमो दिव्यांग अभियान’ राबविण्यात आले असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

राज्यपाल म्हणालेप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा एक अंतर्गत राज्यात 12 लाख 69 हजार 785 म्हणजेच 93.6 टक्के घरे पूर्ण झाली आहेत. तरदुसऱ्या टप्प्यात 18 लाख 47 हजार 291 घरे प्रगतीपथावर आहेत. राज्याने नुकतेच सुधारित वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे.

Thursday, 1 May 2025

मूल्य, परंपरा और संस्कृति से ब्रांड निर्माण – प्रेम नारायण • जिओ वर्ल्ड सेंटर में आयोजित वैश्विक दृश्य-श्रव्य मनोरंजन शिखर सम्मेलन 2025 की परिचर्चा

 मूल्यपरंपरा और संस्कृति से ब्रांड निर्माण – प्रेम नारायण

• जिओ वर्ल्ड सेंटर में आयोजित वैश्विक दृश्य-श्रव्य मनोरंजन शिखर सम्मेलन 2025 की परिचर्चा

मुंबई, 1 मई: संस्कृति का बहुत महत्व हैऔर यदि किसी देश की संस्कृति को समझा जाएतो यह स्पष्ट हो जाता है कि ब्रांड कैसे बनाए जाते हैं। लोगों की आस्थामूल्यपरंपराएं और संस्कृति का अध्ययन करके विज्ञापन के माध्यम से ब्रांड को गहराई से स्थापित किया जा सकता हैऐसा मत ओगिल्वी इंडिया के मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम नारायण ने व्यक्त किया।

वे जिओ वर्ल्ड सेंटर में आयोजित वैश्विक दृश्य-श्रव्य मनोरंजन शिखर सम्मेलन 2025 के अंतर्गत "ब्रांड निर्माण के लिए संस्कृति ही ईंधन है" विषय पर हुई एक परिचर्चा में बोल रहे थे। इस अवसर पर कई क्रिएटर्स और कंटेंट राइटर्स उपस्थित थे।

श्री नारायण ने कहा कि किसी राष्ट्र की संस्कृति उसके लोगों के दिलों और मन में बसती है। सभी ब्रांड और विज्ञापन लोगों की भावनाओं से गहराई से जुड़े होते हैं। इसलिएअगर किसी देश की संस्कृति को समझा जाएतो वहां के लोगों से संबंध बनाना आसान होता है।

उन्होंने यह भी कहा कि यदि कोई विज्ञापनदाता या फिल्म निर्माता भारत के लिए कुछ बना रहा हैतो उसे इस भावनात्मक जुड़ाव को तलाशना होगा।

संस्कृतिक सन्दर्भों के माध्यम से परिवर्तन लाया जा सकता है। उदाहरण के तौर परभारत में पहले प्रति व्यक्ति चॉकलेट की खपत केवल 20 ग्राम थी। आज यह 160–170 ग्राम के बीच पहुंच गई हैऔर इसका एक बड़ा हिस्सा ब्रांडिंग की वजह से संभव हुआ है। हमारे देश में कोई भी त्यौहार होकोई शुभ अवसर होया किसी काम की शुरुआत – मिठाई उसका अभिन्न हिस्सा होती है। इसी विचार के आधार पर ब्रांड विकसित किए जाते हैं। सांस्कृतिक स्थल या क्षण ब्रांड स्थापित करने के लिए बड़े अवसर प्रदान करते हैंऐसा भी उन्होंने कहा।

श्री नारायण ने इस अवसर पर विभिन्न ब्रांड के विज्ञापनों के उदाहरण देकर ब्रांड निर्माण के लिए संस्कृति ही ईंधन है इस विषय पर विस्तार से जानकारी दी।

0000

Featured post

Lakshvedhi