Saturday, 1 March 2025

राज्यात वाहनांची ' एचएसआरपी ' प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांतील दरांप्रमाणेच नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यां pl share ची निविदा प्रक्रिया नियमानुसार

 राज्यात वाहनांची एचएसआरपी प्लेट लावण्याचे दर 

अन्य राज्यांतील दरांप्रमाणेच

नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार

 

मुंबईदि. २८ : देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकीतीन चाकीचार चाकी व जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे

 

राज्यात एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. उच्चाधिकार समितीने  कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत. मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले. राज्यात ठरवून दिलेले दर हे 'एचएसआरपी नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत.

 

अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन ४२० ते ४८० रुपयेतीन चाकी वाहन ४५० ते ५५०चार चाकी वाहन व जड वाहने ६९० ते ८०० रुपये आहेत. तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन ४५० रुपयेतीन चाकी ५००चार चाकी व जड वाहने ७४५ रुपये आहे. यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते.

 

 केंद्रीय मोटार नियम १९८९ चे नियमानुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून ०१एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक आहे.

 

 तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती भारतीय वाहन उद्योगाच्या एसआयएएम (SIAM) या संकेतस्थळावर उपलब्ध आहेअसे परिवहन विभागाने कळविले आहे.


मुंबई आणि अलेक्झांड्रिया शहरांमध्ये भगिनी शहर करार व्हावे

 मुंबई आणि अलेक्झांड्रिया शहरांमध्ये भगिनी शहर करार व्हावे

- इजिप्तचे राजदूत गलाल

 

मुंबई, दि. 28 : इजिप्त आणि भारत यांच्यात हजारो वर्षांपासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध असून सहकार्याच्या आजच्या नव्या युगात मुंबई आणि अलेक्झांड्रिया शहरांमध्ये भगिनी शहरांप्रमाणे परस्पर सहकार्य प्रस्थापित केले जावे अशी अपेक्षा इजिप्तचे भारतातील नवनियुक्त राजदूत कामिल झाएद गलाल यांनी आज येथे व्यक्त केली.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील घनिष्ठ मैत्रीचा उल्लेख करूनभारतातील आपल्या राजदूत पदाच्या कार्यकाळात दोन्ही नेत्यांनी स्वाक्षरी केलेला भारत-इजिप्त भागीदारी करार प्रत्यक्षात आणण्याचा आपण प्रयत्न करू असे राजदूतांनी सांगितले.

इजिप्तच्या राजदूतांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवनमुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला इजिप्तच्या मुंबईतील नवनियुक्त कॉन्सुल जनरल दहलीया तवाकोल या देखील उपस्थित होत्या.

भारताप्रती इजिप्तचे हृदय आणि मन सदैव मोकळे असल्याचे सांगताना राजदूत गलाल यांनी सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य मजबूत करण्यासाठी इजिप्तमधील सर्वात मोठे अलेक्झांड्रिया ग्रंथालय आणि एशियाटिक सोसायटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्याबाबत उत्सुकता दाखवली.

आगामी काळात आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (एजीआय) आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात उभय देशांमध्ये सहकार्य वाढावे असे सांगताना भारतीय कंपन्यांनी इजिप्तमध्ये कार्यालये आणि गोदामे स्थापन करावी असे त्यांनी सांगितले.

सन २०१४ या वर्षी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष सिसी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही देशांमध्ये परिवर्तनकारी बदल झाले असून आज इजिप्त-भारत संबंध वाढवण्याच्या बाबतीत अनेक क्षेत्रांमध्ये प्रचंड वाव असल्याचे त्यांनी सांगितले.

इजिप्तचे युरोपियन युनियनअरब राष्ट्रे आणि लॅटिन अमेरिका यातील देशांसह ११० देशांसोबत मुक्त व्यापार करार आहेत. त्यामुळे भारत आणि इजिप्तमधील व्यापार संबंधांमुळे भारतीय व्यवसायांसाठी जागतिक बाजारपेठ खुली होईल असे त्यांनी सांगितले.

राजदूतांचे महाराष्ट्रात स्वागत करतानाराज्यपालांनी इजिप्त आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक बंधाची आठवण करून दिली. देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांनी अलिप्त राष्ट्र चळवळ उभारली होती याचे राजदूतांनी स्मरण केले. आगामी काळात नवी मुंबई विमानतळ आणि मुंबईजवळील वाढवण बंदराच्या कार्यान्वयनानंतर भारत-इजिप्त व्यापाराला मोठी चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.


गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार pl share

 गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन 

जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 28 : राज्यात मागील अनेक वर्षे गावठाण क्षेत्राचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यासाठी नगररचना नियमांनुसार अंतर्भाव करण्याच्या बाबींसंदर्भात नगररचना विभागाने माहिती सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

गावठाण क्षेत्राबाहेरील मिळकतींसाठी स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारयशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू यावेळी उपस्थित होते. तर जमाबंदी आयुक्त सुहास दिवसेनगर रचना संचालक श्री.पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेपहिल्या टप्प्यात गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन त्याच्या नोंदी तयार केल्या जातील. यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न ग्रामपंचायतींना मिळू शकेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या क्षेत्राच्या विकासाबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल. यासाठी सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प स्वरुपात काही गावठाणांचा विस्तार करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात 'एक खिडकी'

 पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात 'एक खिडकी'

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २८ : राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहेअसे सांगून महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले कीराज्यात याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. एका अहवालानुसार ३० हजारांवर रोजगानिर्मिती होऊ शकेल. पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण व्हावी यादृष्टीने परवानगी देताना अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी शर्ती ठेवण्याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाने तयार करावी. विभागीय आयुक्तांनी याबाबत तातडीने सूचना पाठवाव्यात.

दोन हजार पेट्रोल पंपांचे नियोजन

राज्यात दोन हजार पेट्रोल पंप वाढविण्याचे नियोजन असून पंप उभारणीमध्ये इंधन कंपन्यांना महसूल विभागाकडील एनएसह पोलीससार्वजनिक बांधकाम विभागातील विविध ‘ना हरकत’ परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्यात येईलअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने १६६० पंप मंजूर केले. हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे ३० हजारांवर तरुणांना रोजगार मिळेल. राज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. रोजगानिर्मिती व गुंतवणूक याला प्राधान्य असल्यानेएक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी इंधन कंपन्यांच्या अडचणीसमस्यांचा आढावा घेण्यात आला. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारसह सचिव अजित देशमुखबीपीसीएल चे सुंदर राघवनराज्य प्रमुख राकेश सिन्हामुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ.आनंद बंगसमन्वयक संतोष निरेंदकरएचपीसीएल चे बी.अच्युत कुमारमुकूंद जवंजाळ आदी उपस्थित होते.

-----

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा

 विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी 

सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा

 

मुंबईदि. २८ :  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च २०२५ पासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी  सुरक्षा व्यवस्थापार्किंगवैद्यकीय  सुविधा आणि अधिवेशन पूर्व तयारीचा आढाव घेतला.

विधानभवनमध्ये झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिकविधान मंडळाचे सचिव (१) जितेंद्र भोळेसचिव (२) विलास आठवले यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरपोलिस उपायुक्त  अविनाश देशमुख संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अधिवेशन कालावधीत विधान भवन परिसरात गर्दी होणार नाही याची  पोलिस  विभागाने दक्षता घ्यावी. या काळात वाहतूक व  पार्किंग व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करावे. अधिवेशन कालावधीत मंत्रालय  अधिकारी, कर्मचारी यांचा प्रवेशस्वच्छता, पाणीपुरवठा यासंदर्भात चर्चा झाली. अधिवेशन कालावधीत प्रत्येक विभागाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावीअसे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस गृहसामान्य प्रशासनमहापालिकाआरोग्यवाहतूकटेलिफोन निगमसार्वजनिक बांधकामअग्निशमनरेल्वे यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा

 अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

 

 

मुंबई, दि. 28 : अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला.

मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा विभागांतर्गत वितरीत करण्यात येणा-या प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय योजनेच्या इष्टांक अंमलबजावणीसंदर्भात ऑनलाईन माध्यमाद्वारे जिल्हानिहाय आढावा बैठक श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस सर्व संबंधित अधिकारी, ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

अंत्योदय योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हयाला  इष्टांक निर्धारित करुन देण्यात आलेले आहे. ज्या जिल्ह्याने निर्धारित इष्टांक पूर्तता केली आहेत्यांची अतिरिक्त  मागणी असल्यास वाढीव इष्टांक देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ज्या जिल्ह्यांची  इष्टांक पूर्तता झालेली नाहीत्यांचा उर्वरित इष्टांक इतर इच्छुक जिल्ह्यांना हस्तातंरित करण्याच्या अनुषंगाने जिल्हानिहाय मागणीइष्टांक पूर्तता याची माहिती सादर करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिल्या.  

अंत्योदय योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला प्राप्त इष्टांक आणि त्याची आतापर्यंत झालेली अमंलबजावणी याची माहिती घेऊन जिल्ह्यांकडून असलेली वाढीव मागणी याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत

 जागतिक महिला दिनानिमित्त’

'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत

 

मुंबई दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात 'जागतिक महिला दिनानिमित्तमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

 

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 4 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.  तर दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 6शुक्रवार दि. 7शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

महासंचालनालय समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

 

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

समाजाच्या विकासात महिलांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. महिलांना समान हक्क मिळणे तसेच त्यांच्या अधिकारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिवसजगभरात साजरा केला जातो. याअनुषंगानेच महिला सबलीकरणत्यांच्या हक्कांचे संरक्षणलहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली शासन सातत्याने प्रयत्न करित आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाया आणि अशा अनेक योजनाधोरणात्मक निर्णय आणि विविध उपक्रम महिलांसाठी राबविण्यात येत आहेत. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजना आणि निर्णयांबाबत महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.


Featured post

Lakshvedhi