Friday, 28 February 2025

राज्य सीईटी सेलच्या ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी ‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

 राज्य सीईटी सेलच्या सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

 

मुंबईदि. 27 : शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात  येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  परीक्षांचा  सराव करता  यावा यासाठी   'अटलउपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या विशेष उपक्रमात आतापर्यंत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेया उपक्रमाअंतर्गत मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येतो. आणि या सराव परिक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर  त्या विषयातील शैक्षणिक संधी आणि प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण कमी होईल आणि शैक्षणिक वाटचालीत पुढे जाण्यास प्रोत्साहन  मिळेल. त्यामुळे या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

सायकोमेट्रिक टेस्टद्वारे  विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांची निवड करण्यास मदत होईल. हा उपक्रम" हे केवळ परीक्षा तयारीपुरता मर्यादित नसूनविद्यार्थ्यांना शैक्षणिक करिअरला प्रोत्साहन देणारा आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयांचा सहभाग असून कलावाणिज्यविज्ञानअभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या विद्याशाखांचा समावेश आहे. यासाठी विविध माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी  केली  आहे. यामध्ये ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी सराव करता यावा आणि विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकमाहिती उपलब्ध व्हावी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

अधिक माहीतीसाठीhttps://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

केळीचे झाड आपलं. केळीची पानं आपण अनेकदा वापरली. पण चायनीज लोकांची आयडिया! 👌🏼👌🏼pl share green tifin box


 केळीचे झाड आपलं. केळीची पानं आपण अनेकदा वापरली. पण चायनीज लोकांची आयडिया! 👌🏼👌🏼

तू स्वयंप्रकाशीत हो,

 *तू स्वयंप्रकाशीत हो, तूझा दीप तू स्वतःच आहेस. तुझा मार्ग तुला स्वतःलाच शोधायचा आहे. तो तुलाच सापडायचा आहे. तुलाच तुझा प्रकाश व्हायचं आहे*. 


*याचा साधा अर्थ असा आहे, की तुझ्या बाहेर अशी कोणतीही शक्ती नाही की जी शक्ती तुला जीवन प्रकाश दाखवू शकेल, की जी शक्ती तुला मार्गदर्शन करु शकेल, हे मार्गदर्शन करण्याचं काम, हा प्रकाश दाखवण्याचं काम तुला स्वतःलाच करावं लागेल.*

         

*विकसित झालेला अशा प्रकारचा हा माणूस आणि त्याला त्याचं जीवन घडवायचंय. हा स्वतःच्या प्रयत्नाने माणूस झालेला आहे. तुमच्या कृत्याला जर तुम्हीच कारणीभूत आहात असं एकदा तुम्हाला जाणवलं की तुमच्या प्रत्येक कृत्याला तुम्ही स्वतःच जबाबदार असता आणि मग ही स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ही साधी जाणीव नाही. ती माणसाला पूर्णपणे निराधार करणारी जाणीव आहे.*


*जगण्याच्या संघर्षामध्ये जेवढे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न पहिल्यांदा त्याची आपण उकल करुन घ्या. या सगळ्या प्रश्नाचं सम्यक आकलन करुन घ्या हे सगळे प्रश्न आपल्याला नीट समजल्या नंतर या सगळ्या आपल्या दुःखाची सगळ्या दैन्याची कोणती कारणं आहेत हे आपण स्वतः ती शोधून काढा. आणि ही कारणं एकदा शोधून काढली की ती नष्ट कशी करता येईल याचा संबधी चिंतन करा आणि एकदा कारणांचा नाश झाला, की आपोआप कार्याचा नाश होतो आणि मग आपण एक अर्थानं दुःखमुक्त होवू शकतो. आपण आनंदी होवू शकतो.*

          

*माणूस जगतोतरी कशासाठी ? माणसाला जगण्याला काहीतरी प्रयोजन असावं लागते. माणसाच्यां जगण्याला अर्थ प्राप्त होणे आणि माणसाचं जगणं सुंदर करणं हे स्वतः माणसालाचं करावं लागतं हे जर स्वतः माणसाला करावं लागत असेल तर मग माणसाने आपले चांगले वाईट जी कृत्यं असतील त्याची जबाबदारी त्याला स्वतःला स्वीकारावी लागेल. ती त्याच्या बाहेरच्या कुठल्याही शक्तीवर टाकता येणार नाही व त्याला या जबाबदारीतून मुक्त पण होता येणार नाही.*

          

*जर माणसं स्वतःच स्वतःचा प्रकाश बनू लागली, जर माणसं स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारु लागली आणि प्रत्येक कृती करतानां तिच्या परिणामाची साधक- बाधक चर्चा करु लागली तर माणसाला कोणतीही गरज वाटणार नाही.*

शेतीपूरक ई-वाहनामुळे शेतकऱ्यांना होणार लाभ - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कटरचा समावेश,pl share

 शेतीपूरक ई-वाहनामुळे शेतकऱ्यांना होणार लाभ

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरपॉवर टिलर व कटरचा समावेश

 

मुंबईदि. 27 : राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरपॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले होते. मात्रसुरुवातीला या धोरणात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरपॉवर टिलर आणि कटरचा समावेश नव्हता. त्यावर विचार करून, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या वाहनांचा समावेश धोरणात केला आहे. यासंबंधीच्या शासन निर्णयाचे शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांसाठी फायदे

शेतीकामांसाठी ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यास शेतकऱ्यांचा इंधनावरील खर्च कमी होईल आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभावही कमी होईल. यामुळे वातावरणातील वायू प्रदूषणात घट होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या देखील फायदा होईल. याशिवायइलेक्ट्रिक वाहने जास्त वेळ चालतातदेखभाल खर्च कमी होतो आणि कमी इंधनाची आवश्यकता भासते.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसारबॅटरीवरील वाहनांची खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा फायदा आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरपॉवर टिलर आणि कटर खरेदी करतांना होईल. राज्य सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या धोरणामुळे फक्त शेतकऱ्यांना फायदे होणार नाहीततर पर्यावरण व वातावरणीय बदलाचा प्रभावही कमी होईल. इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करण्यास मदत करतीलज्यामुळे स्वच्छ हवा मिळवता येईल. याशिवायग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची आवड निर्माण होईलजेणेकरून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची स्वीकृती वाढेल. या धोरणामुळे महाराष्ट्र राज्यात शेतीच्या कामामध्येही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि किफायतशीर साधने मिळतीलअसे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

००००

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना 'एचएसआरपी नंबर प्लेट' लावणे बंधनकारक राज्यात एचएसआरपी लावण्याचे दर फिटमेंट चार्जेससह

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना

'एचएसआरपी नंबर प्लेटलावणे बंधनकारक

राज्यात एचएसआरपी लावण्याचे दर फिटमेंट चार्जेससह

 

मुंबईदि. २७ : केंद्रीय मोटार नियम १९८९ च्या नियमानुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून ०१एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक केले आहे.

 

 देशातील बहुतेक राज्यात जुन्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार उच्चाधिकार समितीने ३ कंपन्यांचे दर अंतिम केले असून मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले आहेत.

 

 राज्यात ठरवून दिलेले दर हे 'एचएसआरपी नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत. तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती एसआयएएम (SIAM) च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेअसे सह परिवहन आयुक्त यांनी कळविले आहे.


साहित्य क्षेत्रात लवकरच युवक, महिला आणि बाल साहित्य संमेलनाचे आयोजन, व पुरस्कार,pl share

साहित्य क्षेत्रात लवकरच युवक, महिला आणि बाल साहित्य संमेलनाचे आयोजन


- मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांची घोषणा


मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की, राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा विभाग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून, परदेशातील मराठी बृहन्मंडळांची संख्या ५० पर्यंत वाढवण्याचा संकल्प आहे.


डॉ.सामंत म्हणाले की, सीमा भागातील मराठी संस्कृती आणि साहित्य संवर्धनासाठी सरकार विशेष निधी उपलब्ध करून देणार असून, साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. तसेच दिवंगत साहित्यिक रा.रं.बोराडे यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली असल्याचे मराठी भाषा मंत्री यांनी स्पष्ट केले.


विंदा करंदीकर पुरस्कार यापुढे गेटवे ऑफ इंडियावर प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कुसुमाग्रज यांच्या जन्मगावाला ‘कवितांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले असून, तेथे साहित्यिक उपक्रमांना चालना दिली जाईल, असेही मंत्री डॉ.सामंत यांनी यावेळी सांगितले.


या सोहळ्यात ‘पुस्तकांचे हॉटेल’ या अनोख्या उपक्रमाचा विशेष उल्लेख करण्यात आला, जिथे ग्राहकांनी जेवणासोबत वाचनाचा आनंद घ्यावा, अशी संकल्पना राबवली जाते, असेही डॉ.सामंत यांनी सांगितले. साहित्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी सरकार कटिबद्ध असून, युवक, महिला आणि बाल साहित्य संमेलनांच्या आयोजनाची घोषणा करण्यात आली.


या मराठी भाषा गौरव दिनी ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला आहे. प्रौढ वाडमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाडमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निंबाळकर यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.


त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना प्रदान करण्यात आला.


वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना प्रदान करणार आला.


वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.


वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला.


000कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना प्रदान करण्यात आला.

वाङमय पुरस्कार प्रकार  बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तरनाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांनाकादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांनाकथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांनासर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना प्रदान करणार आला.

वाङमय पुरस्कार प्रकार  प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांनानाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांनाकादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांनालघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांनाललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.

वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भरीव निधी : उपमुख्यमंत्री अजित पवार

 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भरीव निधी : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीराज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटीबद्ध असूननिधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मराठी कवी सुरेश भट यांच्या ओळींना स्मरूनमराठी भाषा ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण जगभरातील मराठी जनांची ओळख आहेअसे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीज्येष्ठ साहित्यिक आणि प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अतिशय मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या समितीतील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले असूनत्यांच्या योगदानाला संपूर्ण महाराष्ट्र कृतज्ञ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी संस्कृतीभाषा आणि परंपरेचा अभिमान बाळगण्याचा संदेश देण्यात आला.

Featured post

Lakshvedhi