Tuesday, 5 March 2024

परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी -


परिचारिका संवर्गातील रिक्त पदे

सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी

-  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

            मुंबईदि. 5 : परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील शुश्रूषाशैक्षणिक व प्रशासकीय विभागातील तसेच प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

            परिचारीका संघटनांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरउपसचिव वैशाली सुळे तसेच परिचारिका संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीमेट्रन तसेच परिचारिकांच्या रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी.  परिचारिकांना शुश्रूषा अधिकारी  पदनाम देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गातील काम देऊ नये तसेचरिक्त लिपिक पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. वैद्यकीय महाविद्यालयात पाळणाघर असणे अत्यावश्यक आहे. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत कार्यवाही सुरू असूननव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानात या कर्मचाऱ्यांना सोयी देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

            सहसंचालक पद निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावाकेंद्राप्रमाणे नर्सिंग भत्तेमहात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत देय असलेला भत्तागणवेश भत्ता मिळण्यासंदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

००००

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची बैठक १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’मध्ये संयुक्त भागीदारी करार वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी ; आता एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह -

)

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची बैठक

१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’मध्ये संयुक्त भागीदारी करार

वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी ;

आता एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. ५: महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत हा करार झाला. यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी मान्यता दिली.

            दरम्यानमुंबई महापालिकेप्रमाणेच एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईमुख्य सचिव डॉ. नितीन करीरएम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जीइंडिपेंडंट स्टडी ग्रुपचे अध्यक्ष जॉनी जोसेफगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहनगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आदीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.

पॉड टॅक्सी

            वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान वांद्रे - कुर्ला संकुलामधून ‘पॉड टॅक्सी’ धावणार असून त्याची लांबी ८.८० कीमी एवढी आहे. त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल ४० किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहेहा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास

            मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामांना चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबईठाणे महानगरपालिकामुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणसिडको व म्हाडा यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. एसआरए आणि एमएमआरडीए यांच्यात याअन्वये माता रमाबाई आंबेडकर नगरकामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून करण्यात आहे. या प्रकल्पात पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे २००० झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असून त्यामुळे हा रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत हा संयुक्त करार करण्यात आला.

झोपडपट्टी मुक्त ठाणे

            ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा यांच्या मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास व सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

            यावेळी बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम (ठाणे कोस्टल रोड)पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगरघाटकोपर ते ठाणे पर्यंत विस्तारीकरण प्रकल्पपूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या ८.२५ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे कामकासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्पविस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (Extened MUIP) ऐरोली बोगदा ते कटाई नाकागायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे कामकल्याण बाह्यवळण रस्ता भाग ८ च्या (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आली.

            ‘एमएमआरडीए’मार्फत विशेष प्रयोजन वाहन (SPV) कंपनीची स्थापना करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. याव्दारे सल्लागाराची कामे हाती घेण्यास व व्यवसाय विकास कक्षाची स्थापना करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

०००००

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराच्या सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी देणार

 नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराच्या

सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी देणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            रायगड, दि. ०५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचापराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे.  तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळ्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावीम्हणून ऐतिहासिक स्थळांचागावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या समाधीस्थळाचे सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

            तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 354 व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसर सुशोभिकरण कामाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, (ऑनलाईन)उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंतखासदार सुनिल तटकरेआमदार भरत गोगावलेजिल्हाधिकारी किशन जावळेज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परबस्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

             सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या समाधीस्थळाचे सुशोभिकरण होणार असून यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभिकरणसमाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकामबुरुजाचे बांधकामप्रसाधनगृहेअंतर्गत रस्ते काँक्रीट गटारकंपाउंड वॉलचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत.

            उमरठच्या ऐतिहासिक भूमीत नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या समवेत कोंढाणा किल्ल्यावरील लढाईत लढलेल्या शेलार मामा यांची समाधी आहे. या दोन्ही शूरवीरांना अभिवादन करुन मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं’..ही घोषणा इतिहासात अजरामर आहे. स्वामीनिष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा इतिहास कधीही विसरू शकणार नाही. राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 32 शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.  तसेच रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या  शिवसृष्टीसाठी 50 कोटी देखील मंजूर केले आहेत.  या सर्व कामांसाठी पुरेसा  निधी उपलब्ध करुन देण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्य शासनामार्फत आग्र्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. याबरोबरच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि शिरूरच्या वढू येथील समाधीस्थळी भव्य स्मारक उभारण्यात येत आहे.

            रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुका दुर्गम आणि डोंगराळ आहे. या भागातील युवकांचे रोजगारासाठीच्या स्थलांतराचे  प्रमाण अधिक आहे. हे लक्षात घेवून या भागातील पर्यटन विकासाला चालना देवून स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी  राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            पालकमंत्री उदय सामंत म्हणाले कीशिवकालीन इतिहास पुढील पिढीपर्यंत  पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने हे ऐतिहासिक पाऊल उचलेले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ आणि परिसराचे सुशोभिकरण करताना त्यांच्या वाड्याचे देखील या निधीमधनू सुशोभिकरण करण्यात येईल असे जाहीर केले.  तसेच या परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे देखील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून प्राधान्याने नूतनीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी  यावेळी दिल्या.

            यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी या भागाच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत प्रभावी  उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

            प्रास्ताविक आमदार भरत गोगावले यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री उदय सामंत आणि उपस्थित मान्यवरांनी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  तसेच यावेळी ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब यांना शौर्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

००००००


बाराखडी*

 🙏🏻

*बोधकथा*      

                       *बाराखडी*             


*प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात*


*तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो..*


*एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे.* 


*नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे. हा दिनक्रम रोजचाच झाला होता.*


*देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्यांना वाटू लागली.*


*त्यांना वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य. तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ !*


*असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्यांची बेचैनी वाढू लागली.* 


*एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर ते तिथे पोहोचले. तिचा नित्यक्रम संपण्याची त्यांनी वाट पाहिली. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,* 


*मागील १५ दिवसांपासून तू नियमितपणे येथे येते हे मी पहात असतो. तू काय करतेस ? ती एकदम म्हणाली*


*" प्रार्थना "* 


*पुजारी यांनी जरा साशंकतेनेच  विचारले, तुला एखादी प्रार्थना येते ?* 


*" नाही " असे ती म्हणाली.*


*मग तू डोळे मिटून रोज काय करते ? असे त्यांनी हसून विचारले.* 


*अगदी निरागसपणे ती म्हणाली, मला कोणतीच प्रार्थना येत नाही "*


*अ, आ,इ, ई  पासून  ज्ञ  पर्यंत माहित आहे. ते ५ वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या बाराखडी च्या बाहेर असूच शकत नाही.*  


*ही बाराखडी तुझ्या इच्छेनुसार क्रमश: लावून घे आणि तीच माझी प्रार्थना !!.* 


*ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली. ती दिसेनाशी होई पर्यंत निरखून तिच्याकडे पहात पुजारी नि:स्तब्ध होवून उभे राहिले.* 


*ज्याची आपण मनोभावे पूजा करतो अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा...!!*


*अगा बावन्न वर्णा परता।*

 *कोण मंत्रु आहे पांडुसूता।।*


*c/p ज्ञानेश्वरी*

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी -

 ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी

उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

           

               मुंबईदि. ४ : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुढील एक महिना संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. मोहीम कालावधीत ग्रामीण भागात असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. महामार्गांच्या आजुबाजूला असलेला कचरा उचलून रस्ते स्वच्छ करावेअसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

               सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्वच्छता अभियान बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेजिल्हा पोलीस अधिक्षक श्री. स्वामीउपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

              ग्रामपंचायत हद्दीतील कचरा उचलून त्याचे निर्मूलन करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. देसाई म्हणालेपुढील आठ दिवसात संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट करावी. कचऱ्यातून प्लॅस्टीक वेगळे काढून अन्य कचऱ्यावर कंपोस्ट खताची प्रक्रिया करावी. महानगरपालिका व नगरपालिका यांनी त्यांच्या हद्दी लगतच्या भागातील कचरा उचलावा. पुढील एक महिना प्रभावीपणे ही मोहीम राबवावी. रस्त्यांच्या आजुबाजूला असलेला मागील कचरा जोपर्यंत उचलला जाणार नाहीतोपर्यंत रस्ते स्वच्छ होणार नाहीत.

            याबाबत सर्व गटविकास अधिकारीनगरपालिका मुख्याधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

****

वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

 वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

             वाशिम दि. ४ : मुंबई येथे आयोजित सेंद्रिय उत्पादनांच्या विक्री स्टॅालसाठी वाशिम येथील कृषी विभागाचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेंद्रिय रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

            आत्माच्या बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान हा सेंद्रिय रथ रवाना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलखासदार भावना गवळीप्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील त्रिमूर्ती प्रांगण येथे सेंद्रिय उत्पादनांचे विक्री स्टॉल उभारण्यात येत आहे. त्यासाठी वाशिमचा सेंद्रिय रथ रवाना करण्यात आला आहे.

०००

राज्यातील जनतेच्या जीवनात सुख, समाधान यावे असेच शासनाचे धोरण

 राज्यातील जनतेच्या जीवनात सुखसमाधान यावे

असेच शासनाचे धोरण

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकास हेच व्हिजनसामान्य माणूसच केंद्रस्थानी

            मुंबईदि. ४ :- महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात सुखाचेसमाधानाचे क्षण यावेत. त्यासाठीच आम्ही धोरण आखतो आणि त्यावरच काम करतो. राज्याचा विकास हेच आमचे महाराष्ट्रासाठीचे व्हिजन आहेअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

            एबीपी माझा वृत्त वाहिनीच्यावतीने आयोजित 'निवडणुकीआधी चर्चा उद्याच्या महाराष्ट्राचीया विशेष कार्यक्रमात एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच आम्ही काम करत आहोतअसे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, 'आमचे शासन येताच जनतेच्या हिताचे प्रकल्प सुरु केले. मग तो मेट्रो कारशेडचा प्रकल्प असेल किंवा अन्य महत्वाकांक्षी प्रकल्प. महाराष्ट्राच्या सर्वदूर भागात आज विकास कामांची घौडदोड सुरु आहे. महाराष्ट्र हे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाच्या बाबतीत देशातील पहिल्या क्रमाकांच राज्य आहे. यात शिवडी न्हावा- शेवा अटल सेतूहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे शी संबंधित मिसींग लींकमेट्रोचे ३३७ किलोमीटरचे जाळेवर्सोवा ते पालघर पर्यंतचे तीन कोस्टल रोडजे ठाणेरायगड आणि पालघर यांना जोडणारे आहेत. या सर्व प्रकल्पांतून सामान्य जनतेला फायदा होणार आहे. त्यांच्यासाठी हे प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे शेतमाल वेगाने शहरात पोहचवता येणार आहे. हे सर्व पर्यावरणपूरक व्हावेतलोकाभिमुख व्हावेत असाच प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            शपथविधीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासजलयुक्त शिवार अभियानाला गती देण्याचा आणि शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीमराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आला होतात्याला आपण गती दिली. राज्यात आता १२० सिंचन प्रकल्प मार्गी लावले आहेतत्यामुळे सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. देशाला फाईव्ह ट्रीलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डोळ्यासमोर ठेवले असून त्यात एक ट्रीलियन डॉलरची भर महाराष्ट्र टाकेलत्यासाठी राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. महिलाशेतकरीकष्टकरीविद्यार्थी सर्वांना न्याय देणारे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेतअसेही त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री म्हणाले कीमहिला सक्षमीकरणासाठी आपण अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेलेक लाडकी लखपतीमहिलांना एसटी बस प्रवासासाठी पन्नास टक्के सवलत दिल्याने त्यांच्या अनेक गोष्टी सुलभ झाल्या. यातूनच आमच्या विकासाचा लाभ त्यांच्यापर्यत पोहचल्याचे आपण पाहतोय. शासन आपल्या दारीकौशल्य विकास आणि नमो महारोजगार मेळाव्यातून आपण थेट नागरिकांपर्यंत पोहचत आहोत. पायाभूत सुविधांचा विकासशिक्षण आणि आरोग्यकौशल्य विकास या क्षेत्रातील आमुलाग्र बदल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन करणे सुरू आहे. आता पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतीलअशी व्यवस्था निर्माण केली आहे. गुंतवणुकीच्या क्षेत्रातही महाराष्ट्राची जगभर उद्योगस्नेही आणि मनुष्यबळकायदा-सुव्यवस्था या दृष्टीने चांगली राज्य अशी ओळख आहे. गतवेळी आपल्याला दावोस येथील परिषदेतून एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक मिळाली होती. यंदा तीन लाख ७३ हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात यश आले आहे. यातूनही लाखो रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

             आपला महाराष्ट्रआपलं व्हिजन’ अशी भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत. यातून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सुखाचेसमाधानाचे क्षण यावेतअसेच धोरण आखतो आहोतत्यासाठीच आम्ही काम करत आहोत. विकास हेच आमचे व्हिजन आहेअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल असेही ठामपणे सांगितले. या आरक्षणामुळे अन्य कुठल्याही समाजावरओबीसींवर अन्याय होणार नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

००००


Featured post

Lakshvedhi