Saturday, 3 June 2023

उष्णता वाढतेय काळजी घ्या - - -

 *उष्णता वाढतेय काळजी घ्या - - - - -*


शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.


उपाय ---

१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.

२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.

३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.

४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.

५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.

६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.

७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.

८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.

९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.

१०) प्रत्येक काम सावकाशच करा. 

११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.

१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.

१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.

१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.

१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.

१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.

१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.


 # आरोग्य संदेश #


पाणी प्यावे आवडीने,

आजार पळवा सवडीने.

: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*


❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄


कलिंगड - थंड

सफरचंद - थंड

चिकू - थंड 

संत्री - उष्ण

आंबा - उष्ण            

लिंबू - थंड

कांदा - थंड

आलं/लसूण - उष्ण

काकडी - थंड

बटाटा - उष्ण

पालक - थंड 

टॉमेटो कच्चा - थंड

कारले - उष्ण

कोबी - थंड 

गाजर - थंड 

मुळा - थंड

मिरची - उष्ण

मका - उष्ण

मेथी - उष्ण

कोथिंबीर/पुदिना - थंड

वांगे - उष्ण

गवार - उष्ण

भेंडी साधी भाजी - थंड

बीट - थंड 

बडीशेप - थंड 

वेलची - थंड 

पपई - उष्ण

अननस - उष्ण 

डाळींब - थंड 

ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड

नारळ(शहाळ) पाणी - थंड

मध - उष्ण

पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड

मीठ - थंड 

मूग डाळ - थंड 

तूर डाळ - उष्ण

चणा डाळ - उष्ण 

गुळ - उष्ण 

तिळ - उष्ण 

शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण 

हळद - उष्ण 

चहा - उष्ण

कॉफी - थंड

पनीर - उष्ण

शेवगा उकडलेला - थंड

ज्वारी - थंड

बाजरी/नाचणी -उष्ण

आईस्क्रीम - उष्ण

श्रीखंड/आम्रखंड - उष्ण

दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड 

फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण

फ्रिज मधिल पाणी - उष्ण

माठातील पाणी - थंड

एरंडेल तेल - अती थंड

तुळस - थंड

तुळशीचे बी - उत्तम थंड

सब्जा बी - उत्तम थंड

नीरा - थंड

मनुका - थंड 

पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण

हॉट ड्रिंक सर्व - उष्ण

कोल्डरिंग सर्व - उष्ण 

मास/चिकन/मटण- उष्ण

अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड


*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*



मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

(Chief Minister Employment Generation Programme- CMEGP)

राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी

 

            राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-२०१९ अंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना व कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहेत. सक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहर केली आहे.

राज्यातील युवक/ युवतींच्या सर्जनशिलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणेत्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सक्ष्मलघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे. हा या योजनेचा उद्देश आहे.

ही योजना पूर्णत: ऑनलाईन पद्धतीने राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेकरिता maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली DLTFC समितीमार्फत शिफारस करण्यात येते. राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) यांच्या मान्यतेने एकूण २३ सार्वजनिक क्षेत्रातील बँका व ११ खाजगी क्षेत्रातील तसेच १४ सहकारी बँकांचा समावेश या योजनेत आहे.

 

योजनेची ठळक वैशिष्ट्य :-

·       उत्पादन उद्योगकृषी रक उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजनेंतर्गत लाभासाठी पात्र.

·       उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पासाठी, सेवाक्षेत्रातील आणि कृषी आधारित/ प्राथमिक प्रकल्प मर्यादा २०-५० लाख रुपये आहे.

·       एकूण लक्षांकापैकी किमान ३० टक्के महिला लाभार्थी व किमान २० टक्के अनुसूचित जाती / जमाती.

पात्रता अटी:

·       राज्यात स्थानिक अधिवास असलेल्या व किमान १८ ते ४५ वयोगटातील स्वयंरोजगार करु इच्छिणारे उमेदवार विशेष प्रवर्गासाठी (अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/ अपंग/माजी सैनिक/ इतर मागास प्रवर्ग/ विमुक्त व भटक्या जमाती/ अल्पसंख्यांक) ५ वर्षाची अट शिथिल.

·       रु.१० लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ७ वी पास व रु. २५ लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान १० वी पास असावे.

·       अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या / महामंडळांच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

प्रकल्प मर्यादा किंमत :

·       प्रकिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रु.५० लाख व सेवा / कृषी पूरक उद्योग / व्यवसाय प्रकल्पांसाठी कमाल रु. २० लाख.

योजना अंमलबजावणी यंत्रणा :

अ) शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र

ब) ग्रामीण भागांसाठी : जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय

एकत्रित समन्वय व सनियंत्रणमहाव्यवस्थापकजिल्हा उद्योग केंद्र.

पात्र मालकी घटक :

वैयक्तिक मालकीभागीदारीवित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गटएकल मालकी कंपनी (OPC) व मर्यादित दायित्व संस्था (LLP).

 

बँक/वित्तीय संस्था यांचा सहभागः-(मार्जिन मनी- अनुदान) :

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत स्वय गुंतवणूक व राज्य शासनाचे (अनुदान स्वरुपातील) आर्थिक सहाय्य याव्यतिरिक्त आवश्यक ६० ते ७५ टक्के अर्थसहाय्य बँकांमार्फत उपलब्ध होईल. राज्यातील राष्ट्रीयकृत बँकाशेडयुल्ड बँकाखाजगी बँका व १४ जिल्हयांतील मध्यवर्ती सहकारी बँका इत्यादी


मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार

 मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार


-पालकमंत्री दीपक केसरकर


'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'जनतेशी सुसंवाद'


            मुंबई, दि. 2 : मुंबईतील धारावी परिसरात सुमारे 250 दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून त्या जागेवरच सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विभाग कार्यालयात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक दिन आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रहिवाशांच्या समस्या तत्का सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रहिवाशांना निश्चित न्याय मिळाला पाहिजे हेच शासनाचे धोरण असून या समस्या सोडविल्या जातात, अशी रहिवाशांची भावना निर्माण झाली पाहिजे, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.


            पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, दिव्यांग आणि महिलांना शासन आणि महानगरपालिकेच्या योजनांमधून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामधून तयार होणारे उत्पादन विकले जाईल यासाठी त्याचे मार्केटिंग करण्यात यावे. या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपला दवाखाना योजनेचा सर्वसामान्यांना मोठा लाभ होत असून आवश्यकतेनुसार त्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना करून अनधिकृत ड्रग्ज- दारूच्या व्यवसायाचे निर्मूलन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


            या सुसंवाद कार्यक्रमात विभागातील सुमारे 263 रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, गटारांची स्वच्छता, पाणी पुरवठा, रोजगार, शिधावाटप, कचरा निर्मूलन, फेरीवाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, पार्किंग आदी समस्यांचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


00000


विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा

 विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा


 


            मुंबई, दि. २ : बर्लिन येथे १७ ते २५ जून या कालावधीत होत असलेल्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंच्या 'स्पेशल ऑलिम्पिक' मध्ये महाराष्ट्रातून जात असलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांना राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. २) राजभवन येथे निमंत्रित करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


            यावेळी पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, 'स्पेशल ऑलिम्पिक्स भारत' च्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा तसेच विशेष ऑलिम्पिक महाराष्ट्रच्या अध्यक्ष डॉ. मेधा सोमैया उपस्थित होत्या.


            बर्लिन हे भारतासाठी भाग्यवान शहर आहे. या ठिकाणी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी देशाला १९३६ साली सुवर्णपदक मिळवून दिले होते, याचे स्मरण करुन बौद्धिक दिव्यांग खेळाडू विशेष ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकांची लयलूट करतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. देशभरात 'विशेष ऑलिम्पिक भारत' या संघटनेतर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी ७५० क्रीडा केंद्र उभारले जाणार आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून पदके जिंकून मायदेशी परत आल्यावर खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले. 


            संसदीय समितीचे अध्यक्ष असताना दिव्यांग लोकांसाठी विधेयक तयार केले होते असे सांगून कायद्यामध्ये दिव्यांगांसाठी २ टक्के नोकऱ्या आरक्षित करण्याची तरतूद असून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


            राज्यपालांनी बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्यामुळे संपूर्ण चमूचे मनोबल उंचावेल असे सांगून ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा राज्य शासनातर्फे यथायोग्य सन्मान होईल, याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.


            शासनाने दिव्यांग खेळाडूंना रोजगार उपलब्ध करून द्यावा - डॉ. मल्लिका नड्डा


            भारतातील बौद्धिक दिव्यांग खेळाडूंनी विशेष ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत १२०० पदके प्राप्त केली असून बर्लिन येथे होणाऱ्या विशेष ऑलिम्पिकमध्ये १९० देशातून ७ हजार खेळाडू सहभागी होत असल्याचे विशेष ऑलिम्पिक भारतच्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा यांनी यावेळी सांगितले. बर्लिन विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत देशभरातून १९८ खेळाडूंसह ३०० जण सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्धिकदृष्ट्या दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता त्यांना राज्य शासनाने रोजगार देण्याचा प्रयत्न करावा तसेच केंद्र सरकारप्रमाणे राज्याने देखील पदक विजेत्या खेळाडूंना पुरस्काराची भरीव रक्कम जाहीर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            यावेळी संघाच्या व्यवस्थापिक हंसिनी राऊत, उपाध्यक्ष परवीन दासगुप्ता तसेच संस्थेचे पदाधिकारी व माजी खेळाडू उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना ट्रॅक सूट देण्यात आला.


            विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातून १४ बौद्धिक दिव्यांग खेळाडू व ५ प्रशिक्षक जाणार असून त्यापैकी १६ महिला असल्याचे यावेळी सां

गण्यात आले.


००००


350वर्षानंतर राज्यभिषेक

 



व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश.....*

 *व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश.....*


सकाळी दिवस सुरू झाला की ओट्यापाशी नाश्ता, स्वयंपाक सगळ्यांचे डबे भरणे, मुलांचे आवरणे, साफसफाईची कामे आणि ऑफीसला जाण्याची घाई. पुन्हा ऑफीस सुटलं की घरी पोहचून स्वयंपाक करायचा असल्याने घरी पोहोचण्याची घाई. या सगळ्या धावपळीत महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ होतोच असे नाही. घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता आपण अनेकदा स्वत:कडे दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्याला नीट बसून खायलाही वेळ होत नाही. त्यामुळे व्यायामाला तर वेळ मिळेल याची शक्यताच नसते. घरातली कामे म्हणजे व्यायाम नाही. त्यातही दिवसभर बैठे काम असेल तर शरीराची फारशी हालचाल होत नाही. यामुळे कालांतराने पचनाच्या तक्रारी, लठ्ठपणा, सांधेदुखीच्या तक्रारी उद्भवायला लागतात.


आजकाल कमी वयातच या सगळ्या तक्रारी उद्भवत असल्याने आपण आपल्या हातानेच आरोग्याची हेळसांड करत असल्याचे दिसते. शरीराचे कार्य सुरळीत चालायचे तर शरीराला थोडा तरी व्यायाम हवाच. यासाठी रोजच्या दिनक्रमात सहज करता येतील अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया


*१. सूर्यनमस्कार...*

आपण सकाळी उठल्यावर ब्रश करतो, आंघोळ करतो. त्याचप्रमाणे १२ सूर्यनमस्कार घालण्याची शरीराला सवय लावली तर संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते. १२ सूर्यनमस्कार घालायला मोजून १२ ते १५ मिनीटे लागतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर इतर गोष्टींप्रमाणेच आपण स्वत:साठी हा वेळ आवर्जून काढायला हवा. यामुळे आपल्याला नक्कीच दिवसभर फ्रेश वाटेल.


*२. जीने चढ-उतार...*

आपण वरच्या मजल्यावर राहत असू तर लिफ्टचा वापर न करता आवर्जून जिन्यांचा वापर करायला हवा. ऑफीसमध्येही लिफ्टच्या ऐवजी जिन्यानेच चढ-उतार करायला हवी. यामुळे किमान व्यायाम होतो. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा जीने चढ-उतार केल्यास आपला एन्ड्युरन्स चांगला राहण्यास मदत होते आणि स्टॅमिनाही वाढतो. 


*३. शतपावली...*

दिवसभराचे काम करुन आपण आधीच थकलेले असतो. त्यातही संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक आणि मागची आवराआवरी, दुसऱ्या दिवशीची तयारी हे करता करता आपण पार थकून जातो. त्यामुळे जेवण झाल्यावर कधी एकदा आपण आडवे होतो असे आपल्याला होऊन जाते. अशावेळी कंटाळा घालवण्यासाठी आपण टिव्ही पाहणे किंवा एकमेकांशी गप्पा मारणे हे आवर्जून करतो. त्या वेळात आपण घराच्या आजुबाजूला १५ मिनीटे शतपावली केल्यास दिवसभराचा ताण तर निघून जातोच पण अन्न पचण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. शरीराची हालचाल झाल्याने झोपही गाढ लागण्यास मदत होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,




हा गेम कूणी खेळला आहे का ??-- आतापर्यंत " नवीन गेम आहे , सुरुवात करू शकता.😂😂🤪

 हा गेम कूणी खेळला आहे का  ??--  आतापर्यंत "  नवीन गेम आहे , सुरुवात करू शकता.😂😂🤪


Featured post

Lakshvedhi