दिलखुलास’ कार्यक्रमात आयुक्त राजेश नार्वेकर यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात “सणांच्या काळातील अन्न व औषध प्रशासन विभागाची भूमिका व खबरदारी” या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत गुरुवार दि. 28, शुक्रवार दि. 29, शनिवार दि. 30 ऑगस्ट तसेच सोमवार दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. अन्नधान्य, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ तसेच औषधांच्या दर्जावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच ग्राहकांना सुरक्षित खाद्यपदार्थ व औषधे मिळावीत यासाठी ग्राहक जागरूकता मोहीम राबविणे, योग्य माहिती उपलब्ध करून देणे, खाद्यपदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक व एक्सपायरी तपासण्याचे आवाहन आदी उपक्रम सातत्याने राबविले जात आहे.
सणाच्या काळात मिठाई व खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, खराब झालेले पदार्थ विक्रीस येऊ नयेत तसेच औषधांचा गैरवापर टाळण्यासाठी विभागाकडून सतत तपासण्या केल्या जात आहेत. राज्यातील ही यंत्रणेविषयीची सविस्तर माहिती आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.
No comments:
Post a Comment