Monday, 2 June 2025

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक

 आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नाशिकदि. २ : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे  विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलहार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर नाशिकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनखासदार डॉ. शोभा बच्छावआमदार सीमा हिरेआमदार राहुल ढिकलेआमदार हिरामण खोसकररुग्णालयाचे प्रमुख डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारीडॉ.पल्लवी धर्माधिकारीअण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेरुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे हा रुग्णालय काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा येथे होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावेअशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi