Saturday, 1 February 2025

शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प

 शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प"

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

 

मुंबई,दि. 1:  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची  जोड देऊन देशातील शेतकरीनोकरदारवर्ग,कष्टकरीव्यापारीउद्योजकमहिलायुवकविद्यार्थीसर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधीप्रत्येक समाज घटकाला बळ  आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन  देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प मांडला अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांतदादा पाटीलयांनी दिली.

या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 1.28 लाख करोड रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 50,067 करोड रुपये केवळ उच्च शिक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे.

मेडिकलच्या एका वर्षात 10 हजार आणि पुढील 5 वर्षात 75 हजार जागा वाढवण्यात येणार आहेत.

उच्च शिक्षण विभागामध्ये डिजिटल संसाधनांची सुरुवात करण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक ही योजना राबविण्यात येणार आहे. उच्च शिक्षण संस्थांना भारतीय भाषेतील पुस्तकांची डिजिटल आवृत्ती प्रदान करणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

याशिवाय आयआयटी पाटणा चा विस्तार आणि 5 नवीन आयआयटी मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. आयआयटीचे आणखी 6 हजार 500 जागा वाढवण्यात येणार आहेत. संशोधनासाठी 10 हजार फेलोशिप दिल्या जाणार आहेत तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्सचा स्थापना करून पुढील 5 वर्षात 50, हजार लॅब्सची  स्थापना करण्यात येणार आहे. या अर्थसंकलपात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात  देशभरात तीन कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापित करण्याची घोषणा केली आहे. या केंद्रांचे उद्दीष्ट AI तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक ठोस पायाभूत सुविधा तयार करणे आणि उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण संशोधन करणे आहे. देशात AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगतीसाठी एक मजबूत पाया तयार केला आहेज्यामुळे उद्योग आणि अर्थव्यवस्था अधिक डिजिटल आणि तंत्रज्ञानावर आधारित होईल.असेही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

00000

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi