Saturday, 28 September 2024

केळीच्या पानावर जेवण का करावे ?* ☘

 ☘ *केळीच्या पानावर जेवण का करावे ?* ☘


🙏🏻🙏🏻🙏🏻☘️☘️☘️☘️☘️🙏🏻🙏🏻🙏🏻


नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व नातेवाईकांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी .... 


🌴  हिंदू धर्मग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. काही विशेष पूजन कार्यामध्ये या झाडाच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो. केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होतो आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितली जाते. वास्तूनुसारही केळीचे झाड घराच्या समोर अथवा बागेत लावणे शुभ मानले जाते. 


☘ भारतातील बऱ्याच भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो. यामागे धार्मिक तसेच वैद्यकीय कारणही आहे. केळीच्या पानावर जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत. 


🌱  केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानवर जेवण केल्यास डाग- खाज , पुरळ , फोडं अशा समस्या दूर होतात. केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात "एपिगालोकेटचीन गलेट" आणि इजीसीजीसारखे "पॉलिफिनोल्स अँटिअॉक्सीडेंट " आढळतात. याच पानांमार्फत अँटिऑक्सीडेंट आपणास मिळतात. यामुळे त्वचा दिर्घकाळा पर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते. मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू रहातो. केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोप्पे जाते. 


🍃 केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचा आजार ठीक होतो. 


☘ केळीचे पान पूर्ण सुकल्यावर त्या पानांचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहात टाकला तर फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात. 


    *केळीच्या पानावर जेवायचे महत्व*


अ. पाटावर बसून केळीच्या पानावर जेवणे, हे आरोग्यदायी असते.


आ. केळीचे पान हे पवित्र, चैतन्ययुक्त आणि दैवी असते.


इ. केळीच्या पानात जेवणार्‍या व्यक्तीला होणारे लाभ 


१. केळीचे पान सात्त्विक असल्याने जेवणार्‍या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्त्विकता २ टक्के वाढू शकते.


२. केळीच्या पानातील चैतन्यामुळे शरीराची शुद्धी होते.


३. केळीच्या पानावर जेवल्यामुळे व्यक्तीला ‘चांगले वाटणे’ हा अनुभव येतो. तसेच पोटाचे विकार होत नाहीत.


४. व्यक्तीचे मन शुद्ध होते आणि ते शांत रहाते

          

        धार्मिक कार्यक्रमात केळीचे खुंट अतिशय उपयुक्त असते. केळीच्या पानामधील आहार हा पवित्र, प्रसन्न व पर्यावरण समृद्ध मानला जातो. ही पाने जेवणानंतर जनावरांना खाद्य म्हणून देशातील विविध भागामध्ये दिली जातात. केळीचे फुल, कच्चे कमळ व कच्ची केळी याच्या दक्षिण भारतामध्ये भाज्या केल्या जातात. यामध्ये लोह, पालाश, विटामिन 'ए' हे अन्नघटक जास्त असतात. केळी ही विकसनशील राष्ट्रामध्ये प्रामुख्याने अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. विविध राष्ट्रामध्ये उपवासामध्ये चालणारे फळ म्हणून याचा उपयोग होतो.


केळीची पाने, खोड हे घडाची काढणी केल्यानंतर दुभत्या व कामाच्या जनावरांना खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. वाळलेली पाने ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांना स्वस्त जळण म्हणून वापरता येते. वाळलेली केळीची खोडे आणि वाळलेल्या पानाचे सोपट (sheaths) हे ग्रामीण भागामध्ये जळण म्हणून प्रचलित आहे.


नवीन निरिक्षणामध्ये केळीच्या अंगभुत गारव्याच्या गुणधर्मामुळे खोडांचे छोटे तुकडे करून फळबागांच्या भोवती आच्छादन अथवा मुख्य खड्ड्यामध्ये कंपोस्ट म्हणून केले तर कंपोस्ट खत तर होतेच शिवाय एकूण गांडूळांची संख्या नैसर्गिकरित्या वाढते. केळीचे औषधी गुणधर्म हे तर अतिशय उपयुक्त आहेत. जसे अशक्तपणा, उच्च रक्तदाब, स्मृतीभ्रंष, मानसिक नैराश्य छातीतील जळजळ, सकाळचा आळस, मानसिक दुर्बल्य अवस्था, अकल्पीत शरीराची वाढ (Obesity), अल्सर (आतड्याचे व्रण) या विविध रोगामध्ये केळी अतिशय उपयोगी आहे. केळ्यामधील उच्च पालाशच्या प्रमाणामुळे ज्यांचे शरीरातील पालाशचे प्रमाण कमी आहे. यांना केळी खाण्याची शिफारस केली जाते. तसेच केळामध्ये अ, ब, क जीवनसत्वे आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जास्त या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. या गुणधर्ममुळे केळी हे कुपोषित लहान मुलांची प्रकृती सुधारण्यामध्ये एक आदर्श फळ म्हणून गणले गेलेले आहे. केळीचे खोड शिजून उकडल्यानंतर त्यातील घटकद्रव्ये जीवनसत्त्वे. मुलद्रव्यांचे प्रमाण किंचीत वाढते. तथापि त्यातील प्रथिने व धाग्याचे प्रमाण (Fiber) हे केळफळाएवढेच असते.


केळीचे खोड व पाने गार (थंड) असल्यामुळे ज्याप्रमाणे औदुंबराच्या झाडाचे पाणी ग्राईप वॉटरमध्ये वापरून लहान मुलांचे दातदुखी व पोटदुखी थांबविण्यासाठी उपयोग होतो. त्याचप्रमाणे केळीच्या खोडाचे व पानांचे पाणी मुत्रपिंडाचे विकार यावर सारक म्हणून हमखास उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे केळीच्या खोडातील पाण्यामुळे गोवर, कांजण्या, कडकी यासारखे उष्णतेचे विकार बरे होतात. या खोडाचे पाणी मुतखडा झाल्यावर सारक म्हणून वापरल्यास लघवीद्वारे विष बाहेर काढण्याचे कार्य करते.


पापड तयार करताना पीठ भिजविण्यासाठी केळीचे पाणी वापरतात, तसेच ते अनके विकारांवर गुणकारी आहे.


केळीचे विविध उपयोग जसे अन्न, धागा, जळण आणि औषधी अशा उपयोगामुळे केळी हे फळ प्रचलित होत आहे. त्यामुळे केळी हे 'कल्पतरू' म्हणून संबोधले जाते. 


🙏🏻🙏🏻🙏🏻☘️☘️☘️☘️☘️🙏🏻🙏🏻🙏🏻


*जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे*


*१- पचन सुधारते*


जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.


*२-वजन घटवण्यास मदत होते* 


जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.


*३-लवचिकता वाढवत*े 


पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.


*४-मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते*


जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. 


*५-कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते*


दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा.दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते.


*६-शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते* 


शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे.शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.


*७-दीर्घायुषी बनवते* 


ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे. कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.


*८-गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात*


Yoga for Healing या पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.


*९-चंचलता कमी होत*े 


मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.


*१०-हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो* 


काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ? हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.


🙏🏻🙏🏻🙏🏻☘️☘️☘️


☘️🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi