🌹⚜🌹🎼🌅🎼🌹⚜🌹
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*'भारतरत्न' लतादीदींच्या*
*जन्मदिनाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*दैवी चमत्काराला वंदन करणारी*
🌸🌿🔆🌺🎶🌺🔆🌿🌸
*चमत्कार. अर्थात जे अद्भुत.. विस्मयकारी आनंदमय असते असे. चमत्कार नेहमी घडत नाहीत. पण आजच्या पिढीने हा चमत्कार अनुभवलाय. असे भारतरत्न बघितले ज्यांचा जन्म शतकानुशतकात क्वचितच होतो. हे पण अनुभवलेय की या प्रतिभावंत भारतरत्नाने सचिन सारख्या दुसऱ्या भारतरत्नाच्या प्रतिभेला दाद देत पुत्र मानले.. पुत्र प्रेम दिले.*
*भौतिक जगातील जीवन संघर्षात मानवी जीवन सुंदर, आनंदी व्हावे म्हणून ईश्वरी योजनेप्रमाणे पृथ्वीवर लता दिदींचा जन्म झाला. त्यांचा जीवनप्रवास.. संघर्ष.. परिश्रम.. कुटुंबावरचे.. समाजावरचे प्रेम सारेच आदर्श ठरलेय.*
*पु. ल. म्हणायचे, प्रत्येक सेकंदाला जगातील कुठल्यातरी भागात ज्यांचे सूर ऐकू येतातच. अशा या दिदींना बघणारे भाग्यवानच.*
*आपल्या दैवी स्वरांनी लोकजीवन सुसंपन्न.. प्रफुल्लीत.. आनंदी करणाऱ्या दिनानाथ मंगेशकर घराण्यातील लतादीदी या संपूर्ण कुटुंबाच्या कळसस्थानी विराजमान आहेत.*
*बालवयातच लतादिदींचा गानविश्वात प्रवेश झाला. दिदींनी लाभलेल्या दैवी देणगीला संपूर्ण न्याय दिला. गाणे ही कर्मसाधना मानली. मग त्यासाठीचे कष्टही त्यांना आनंदच देवू लागले.*
*श्रोत्यांना दिदींच्या गाण्यातील गोडवा हा ज्ञानेश्वरीतील ओवींचा गोडवा आहे असे वाटते. दिदींच्या व्यक्तिमत्वावर भारतीय संस्कृतीचा.. संतसाहित्याचा मोठा प्रभाव आहे. माऊली असो वा तुकोबा वा रामदास स्वामी. त्यांना दिदींचीच प्रतिक्षा असावी. मग दिदींनी मनामनात मोगरा फुलविला.. कधी आनंदाच्या डोहातील आनंद तरंग मनामनात प्रकटवले, तर कधी दिदी श्रोत्यांना आनंदवन भूवनी घेऊन गेल्या. गाण्यातील अंतरंग भाव 'ये हृदयीचे ते हृदयी' नेण्याचे सामर्थ्य दिदींच्या स्वरसाधनेत आहे.*
*नामवंतांनी दिदींच्या गाण्याबद्दल सहस्त्रावधी पाने खर्चूनही त्या स्वर मोहिनीचे रहस्य उलगडत नाही. एकच उत्तर सापडते ते म्हणजे दैवी चमत्कार.*
*दिदींनी करोडो लोकांच्या जीवनाला अर्थ दिला. जीवनातील सुखदुःखात दिदींचे गाणे हे नेहमीच संजीवक.. उभारी.. उर्जा देणारे ठरलेय.. ठरणार आहे. त्यांनी जात.. धर्म.. भाषा.. प्रांत.. देश.. खंड यापलीकडे नेत आपल्या जादुई स्वरांनी सर्वाना एका धाग्यात जोडलेय. दिदी म्हणजे भारतीय संस्कृतीचे.. शालीनतेचे चालते बोलते प्रतिक होत्या.*
*लतादिदींचा स्वर्गीय स्वर लाभला म्हणजे गाण्याचे सोने झाले हे समीकरणच होते. गरीबातला गरीब पण वर्षानुवर्षे हे सोने मनसोक्त लुटत आहे. दिदींनी पण कर्णाच्या उदारतेने हा आनंद वाटला. त्यांची दानशूरता वेळोवेळी सिद्ध झालीय.*
*दिदींच्या सुरेल स्वरांनी सदैव "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे" ही अनुभूती प्राप्त होते. प्रत्येकाचे भावविश्व संपन्नतेची श्रीमंती अनुभवते.*
*जगात जो पर्यंत कान आहेत तोपर्यंत लता दिदींचे स्वर मनात रुंजी घालणारच. हे जीवन आनंदी करणाऱ्या दिदींना 'आनंदी पहाट' च्या सहस्त्रावधी रसिकांतर्फे विनम्र अभिवादन.*
🎊🌸🎊💐💐🎊🌸🎊
*आनंदी आनंद गडे,*
*इकडे तिकडे चोहीकडे*
*वरती खाली मोद भरे,*
*वायूसंगे मोद फिरे*
*नभांत भरला,*
*दिशांत फिरला,*
*जगात उरला*
*मोद विहरतो चोहीकडे*
*सूर्यकिरण सोनेरी हे,*
*कौमुदी ही हसते आहे*
*खुलली संध्या प्रेमाने,*
*आनंदे गाते गाणे*
*मेघ रंगले, चित्त दंगले,*
*गान स्फुरले*
*इकडे, तिकडे, चोहीकडे,*
*आनंदी आनंद गडे*
*वाहती निर्झर मंदगती,*
*डोलती लतिका वृक्षतती*
*पक्षी मनोहर कुजित रे,*
*कोणाला गातात बरे*
*कमल विकसले,*
*भ्रमर गुंगले,*
*डोलत वदले*
*इकडे, तिकडे, चोहीकडे,*
*आनंदी आनंद गडे*
🌺🌿🌺🎶🎉🎶🌺🌿🌺
*गीत : बालकवी* ✍
*संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर*
*स्वर : लता मंगेशकर*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-२८.०९.२०२४-*
🌻💐🌸🎶💐🎶🌸💐🌻
No comments:
Post a Comment