Tuesday, 23 July 2024

दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प

 दुर्बलवंचितउपेक्षितमागासअल्पसंख्याक घटकांच्या

विकासावर भर देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प

-उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

            मुंबईदि. 23 :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या एनडीए सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणाराशेतीउद्योगव्यापारशिक्षणआरोग्यसहकाररोजगारस्वयंरोजगारविज्ञानसंशोधनकौशल्यविकाससामाजिक न्यायमहिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारामजबूत-विकसित भारताची पायाभरणी करणारादेशाला विश्वशक्ती बनवण्याच्या मार्गावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारासमाजातील दुर्बलवंचितउपेक्षितमागासअल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा एक चांगलादूरदृष्टीपूर्णलोककल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

            केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतानाउपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. पवार म्हणाले कीदेशाला विकसित राष्ट्रविश्वशक्ती बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 1) शेती क्षेत्रात उत्पादकतावाढ2) रोजगारस्वयंरोजगारकौशल्यविकासावर भर3) मनुष्यबळ विकास व सामाजिक न्यायाकडे विशेष लक्ष4) उत्पादन व सेवाक्षेत्राचा विकास 5) शहरांच्या नियोजनबद्ध विकासावर भर6) ऊर्जासंरक्षण 7) पायाभूत सुविधांचा विकास 8) संशोधन व विकासाला प्राधान्य9) नव्या पिढीसाठी सुधारणा या नऊ क्षेत्रांना दिलेले प्राधान्य देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारादेशाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाणारा निर्णय आहे.

            शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची केलेली तरतूद महत्वाची आहे. त्यातून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. कमी खर्चातअधिक उत्पादन देणाऱ्या शास्त्रशुद्ध शेतीचा प्रचार-प्रसार देशाच्या शेतीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत पाच वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे देशातील 80 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा मिळणार आहे.

            युवकांना शिक्षणरोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यातून येणाऱ्या 5 वर्षात 20 लाख युवकांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ईपीएफओमधील नोंदणीवर आधारित योजनेंतर्गतपहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना एक महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात दिला जाणार आहे. 21 कोटी युवकांना याचा फायदा होणार आहे. पुढील पाच वर्षात देशातील 500 कंपन्यांमध्ये किमान 1 कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. देशात 12 इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्रालाही होईल असा मला विश्वास आहेअसेही अर्थमंत्री श्री. पवार म्हणाले.

            रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काही औषधांना अबकारी शुल्कातून वगळण्याचा निर्णय असेलमोबाईल चार्जर आणि इतर गोष्टींवरील अधिभार 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय असेललिथियम बॅटरी स्वस्त करण्याचा निर्णय असेलपीएम आवास शहरी योजनेंअंतर्गत शहरात राहणाऱ्या एक कोटी गरीब नागरिकांना 10 लाख कोटी रुपये खर्चून बांधून देण्याचा निर्णय व त्यासाठी  पुढील पाच वर्षात 2.5 लाख कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे ठरतीलअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

            प्राप्तीकराअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी महत्वाचा आहे. यातून त्यांची किमान  17 हजार 500 रुपयांची बचत होणार आहे. स्टॅण्डर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारांवरून 75 हजारांपर्यंत वाढवणे. पेन्शनची मर्यादा 15 हजारांवरून 25 हजारांपर्यंत वाढवणे. हेही निर्णय महत्वाचे असून चार कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहेमी या निर्णयाचेही स्वागत करतोअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi