Saturday, 9 March 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोयना जल पर्यटन शुभारंभ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोयना जल पर्यटन शुभारंभ

जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून

पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगारास प्राधान्य

                                                                        - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            सातारा दि.9 : कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र असून या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            सातारा जिल्ह्यातील  जावळी तालुक्यातील मुनावळे  येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटनाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंतराज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकरआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेआमदार मकरंद पाटीलजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेखएमटीडीसीच्या व्यवस्थापक श्रध्दा जोशी शर्माजलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेसह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. त्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती. त्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. मासेमारीबोटिंगजल पर्यटन यासाठी या बाबीचा फायदा होणार आहे. मात्र विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण पूरक असला पाहिजे. पाणी  प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा सूचना पर्यटन विभागाला आपण दिल्याचेही मुख्यमंत्री यांनी  यावेळी सांगितले. जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

स्थानिक बोट व्यावसायिकांना बोट  खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आपटी ते तापोळा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाटातील रस्ता या बाबीही प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत.

       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीरोजीरोटीसाठी गावापासून आई-वडिलांपासूनकुटुंबापासूनतरुणांना दूर जावे लागते. त्यांना रोजगारासाठी गाव सोडून जावे लागू नयेउलट गाव सोडून गेलेले पुन्हा आपल्या घरी यावेतत्यांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध व्हावेत हा आपला उद्देश आहे. विकासात्मक काम करणारे शासन असल्यामुळे राज्यात अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. एक लाख 37 हजार कोटीचे प्रकल्पांचे दावस येथील उद्योग परिषदेमध्ये करार झाले आहेत. तीन लाख 93 हजार कोटींचे उद्योग राज्यात येत आहेत. पाच लाख कोटींची गुंतवणूक आपण राज्याच्या विकासासाठी आणली आहे. उद्योग वाढीसाठी उद्योगांना सर्वतोपरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

            आमदार  श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले की, जल पर्यटन प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळावात्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावेमुनावळे गावचे सातबारे खातेदारांच्या नावावर करून मिळावेतअन्य उर्वरित रखडलेले प्रकल्पही मार्गी लावावेतजलाशयात मासेमारीचे परवाने मिळावेत.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी काउंटरवर तिकीट खरेदी केले. या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली.

        कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसलेसरपंच श्री. भोसले,  विविध विभागांचे अधिकारीपदाधिकारीग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi