Thursday, 8 May 2025

प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार,एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ

 प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

·       ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ

 

मुंबईदि. ८ : थॅलेसेमियासारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचारपद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

 ८ मे आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत "एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे" या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर व राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक आरोग्य अभियान श्री. रंगा नायकसंचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन अबांडेकरसंचालक (शहरी) आरोग्य सेवा डॉ. स्वप्नील लाळेअतिरिक्त संचालक डॉ. विजय बाविस्करसहसंचालक श्री. तुळशीदास सोळंकेडॉ. सुनीता गोल्हाईतडॉ. गोविंद चौधरीडॉ. सरिता हजारेसहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे (राज्य रक्त कक्ष)तसेच थॅलेसेमिया ग्रुप परभणीचे डॉ. लक्ष्मीकांत पिंपळगावकर उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, थॅलेसेमिया रुग्णांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्याकरिता आणि त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. यामध्ये नियमित रक्त संक्रमणबोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या उपचारपद्धती उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यासोबतच मोफत आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्रांची उभारणी देखील करण्यात आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न

 पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून

नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न

- मधुरा बाचल

 

   मुंबईदि. ६ : सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडत असतानाआता पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासाठीही डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला जात आहे. आपल्या आजीआईकडून शिकलेले पारंपरिक पदार्थमराठी खाद्यसंस्कृती नव्या पिढीला डिजिटल भाषेत सांगणे काळाची गरज आहेअसे मधुरा'ज रेसिपी, चॅनेलच्या प्रमुख मधुरा बाचल यांनी सांगितले.

 

 टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात "प्रवास पाककृतींचा" या विषयावर मधुरा बाचल यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

 मधुरा बाचल म्हणाल्यानोकरी किंवा व्यवसायात टिकण्यासाठी तंत्रज्ञानाचे सर्व पैलू आत्मसात करणे आवश्यक आहे. माझ्या यशस्वी प्रवासामध्ये डिजिटल कौशल्यांचा फार मोठा वाटा आहे. मराठी खाद्यसंस्कृती खूप समृद्ध आहे. आजवर मी तीन हजार पेक्षा अधिक रेसिपी पोस्ट केल्या असूनबँकेतील नोकरी सोडून पाककलेच्या प्रवासाला सुरुवात केली. २००९ मध्ये मधुरा रेसिपीज’ या डोमेनची नोंदणी केली आणि कंटेंट रायटिंगएडिटिंगसारखी कौशल्ये आत्मसात केली. मागील १७ वर्षांपासून हा प्रवास सुरू आहेअसेही त्यांनी सांगितले.

  कोणत्याही व्यवसायात मार्केटिंग महत्त्वाची भूमिका बजावते. आज तंत्रज्ञानाच्या युगात ‘एआय’ टूल्समुळे व्यवसाय आणि नोकरी करणे अधिक सुलभ झाले आहे. मात्रयशस्वी होण्यासाठी कौशल्य आणि आवड दोन बाबी महत्त्वाची आहेत. स्वतःचे अस्तित्व निर्माण करून टिकवून ठेवण्यासाठी सातत्य आवश्यक असूनयासाठी प्लॅन बी’ आणि प्लॅन सी’ देखील तयार ठेवावेत. आपल्या कार्याला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे म्हणून त्यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात मधुरा रेसिपीज क्लब’ सुरू केला आहे. सोनी मराठीवर आज काय बनवू या५ मेपासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

  आपली खाद्यसंस्कृती ही केवळ चवीनुसार नसूनती आरोग्यदायी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पारंपरिक धान्यांमध्ये असलेल्या पोषणमूल्यांचा उल्लेख करत त्यांनी ज्वारीबाजरीनाचणी यासारख्या अन्नधान्यांचा नियमित आहारात समावेश करण्यावर भर दिला. आपण जे खातो तेच आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब असतं आणि ती चव पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच आपली जबाबदारी आहे. मराठी पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा गोडवा आता केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित न राहता डिजिटल माध्यमांतून जगभर पोहोचू लागला आहे. मराठी पदार्थांच्या रेसिपीज यूट्यूबइन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या माध्यमांद्वारे रोज शेकडो लोक  बनवण्यास शिकत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

*****

इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार

 इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानामुळे 

कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार

- नॅसकॉमचे तज्ज्ञ रवींद्र देशपांडे

मुंबईदि. ६ - इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानामुळे शासनाच्या विविध सेवांमध्ये गतिमानता येऊन कार्यक्षमता वाढीस लागणार आहे. तसेच नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन नॅसकॉमचे सिस्टिम इंटिग्रेशन तज्ज्ञ रवींद्र देशपांडे यांनी केले.

            सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या विषयावर श्री. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसचिव दिलीप देशपांडेअवर सचिव स्मिता जोशी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

इंटरनेट ऑफ थिंग्ज हे इंटरनेटसेवेवर आधारित असून याद्वारे रिअलटाईम लक्ष ठेवून एखादे काम परिपूर्ण करता येते. स्मार्ट सिटीमधील वाहतूक संचालनपाण्याचे नियोजनरस्त्यांची देखभाल दुरुस्तीवाहनतळ नियोजनकचरा व्यवस्थापनसार्वजनिक सुरक्षा प्रणाली आदीसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. त्याचप्रमाणे कृषी, औद्योगिक क्षेत्रातही इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचेही त्यांनी यावेळी उदाहरणांसह सांगितले.

इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेटवर माहिती पाठविली जात असल्याने सायबर सुरक्षाविषयक संभाव्य जोखमीही पहावीअसेही श्री. देशपांडे यांनी सांगितले.

उपसचिव श्री. देशपांडे व श्रीमती जोशी यांनी स्वागत केले.

0000

भाषिणी' च्या माध्यमातून आता विविध भाषातील संवाद सुलभ होणार

 भाषिणीच्या माध्यमातून आता 

विविध भाषातील संवाद सुलभ होणार

- अमिताभ नाग

मुंबईदि. ६ :-  आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित भाषिणी’ हा संवादाचा नवीन सेतू ठरत आहे. भाषिणी’ च्या माध्यमातून संवादासाठी भाषा-भाषांमधील अंतर कमी होऊन नागरिकांचा अन्य भाषेतील संवाद अधिक सुलभ होईलअसे प्रतिपादन डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांनी भाषिणी- भाषेचा अडसर दूर करणे या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमलामराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

'भाषा इंटरफेस फॉर इंडिया’ या संकल्पनेवर आधारित भाषिणी’ प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याचे सांगून श्री. नाग म्हणाले, ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून एक सर्वंकष संवादव्यवस्था उभी केली जात आहे. भाषिणीच्या माध्यमातून नागरिक संवादासाठी केवळ मजकूर नव्हे तर थेट आवाजातून आवाजात भाषांतर करू शकतील असेही त्यांनी सांगितले.

'भाषिणीमध्ये ऑडिओ-टू-टेक्स्टटेक्स्ट-टू-ऑडिओटेक्स्ट ट्रान्सलेशन अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. केवळ मजकुराचे नाही तर आवाजावरून थेट आवाजात भाषांतरही शक्य झाले असल्याने एक व्यक्ती एका भाषेत बोलल्याससमोरची व्यक्ती तो संवाद दुसऱ्या भाषेत सहज समजू शकतोअसे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नाग यांनी सांगितले.

शासकीय योजनांची माहितीहेल्पलाईन सेवाशिक्षणविषयक साहित्य हे सर्व भाषिणीच्या मदतीने प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याने योजनांचा लाभ मिळण्यास निश्चित उपयोग होईलअसेही त्यांनी सांगितले.

०००००

इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार - मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची माहिती,https://forms.gle/E2K5a5wwssuwQ9Pt6

 इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार

- मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची माहिती

 

मुंबईदि. ६ : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहेत. यानुसार मुंबई विभागातील मार्च २०२५ मध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी कळविले आहे.

 

मुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक (दक्षिण/ उत्तर/ पश्चिम) मुंबई व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद ठाणे/ रायगड/ पालघर यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील मार्च २०२५ मध्ये इयत्ता १० वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत अवगत करावेअसे सूचित करण्यात आले आहे.

 

सन २०२५-२६ या वर्षामध्ये राज्य मंडळाच्या मुंबई विभागातील मान्यताप्राप्त सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी (सन २०२४-२५ मध्ये रजिस्ट्रेशन केले असले तरीही) आपल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची रजिस्ट्रेशन बाबतची सर्व माहिती https://forms.gle/E2K5a5wwssuwQ9Pt6 या लिंकवर भरावी. जी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये सदर कालावधीत उपरोक्त लिंकमध्ये माहिती भरणार नाहीतअशा उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना सन २०२५-२६ या वर्षामध्ये इयत्ता ११ वी मध्ये ऑनलाईन विद्यार्थी अलॉट होणार नाहीत व याची सर्व जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक/ प्राचार्य यांची राहीलअसेही कळविण्यात आले आहे.

 

प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकमुंबई यांच्या कार्यालयात स्वतंत्र प्रवेश नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या प्रवेश नियंत्रण कक्षामार्फत या कार्यालयात प्रत्यक्ष आलेल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले जात असल्याचे या कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्रातील इयत्ता १० वी च्या ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांना त्यांच्या संबंधित माध्यमिक शाळेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्यामार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व लिपीक यांचे वार्ड/ तालुका स्तरावर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच विद्यार्थी व पालकांना ऑनलाईन मदतीसाठी हेल्प सेंटरची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना व मार्गदर्शन इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून दिले जाईल. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन सादर करण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी सदर सूचनांचे बारकाईने वाचन करूनच आपला प्रवेश अर्ज सादर करावाअसे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 

विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन

 

अहिल्यानगरदि. ६ :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे मंत्रीपरिषदेच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले.

 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.

 

यावेळी पुणे विभागाचे टपाल सेवा संचालक अभिजीत बनसोडे यांनी यातील पहिला अल्बम मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

 

टपाल विभागाने प्रकाशित केलेल्या या विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे

मुलींसाठी अहिल्या नगरला उभारणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 मुलींसाठी अहिल्या नगरला उभारणार 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 

अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक २७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची १२ अशा एकूण ३९ पदांना मान्यता देण्यात आली. या पदासाठी आवश्यक वेतनासाठी दरवर्षी २३२.०१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चासाठीही मान्यता देण्यात आली. या पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यासही आज मंजुरी देण्यात आली. संस्थेकरिता आवश्यक यंत्रसामग्रीहत्यारे आणि इतर खर्च यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात अकरा कोटी ऐंशी लाख एकोणीस हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

००००

Featured post

Lakshvedhi