*🫀घरच्या घरी जाणून घ्या हृदयात ब्लॉकेज आहे की नाही, डॉक्टरांनी सांगितल्या सोप्या टिप्स.🧠*
*🍁संदर्भ : हेल्थ मंत्रा ~ आरोग्य मंत्र*
*🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,*
चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीराची हालचाल न करणे अशा अनेक कारणांमुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. हृदय रोगांमुळे जीव जाणाऱ्यांची संख्या जगभरात जास्त आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हृदयरोग होतात आणि हृदय काम करणं बंद करतं. अशात हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ईसीजी आणि इकोसारख्या टेस्ट करून हृदयाच्या क्रिया कशा होत आहेत याची माहिती मिळते.
सामान्यपणे हृदयाचं आरोग्य कसं आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर या टेस्टची मदत घेतात. मात्र, काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरीच हृदयाचं आरोग्य कसं आहे याची माहिती मिळवू शकता. यासाठी ना तुम्हाला मशीन लागते ना पैसे. ॲडल्ट ॲन्ड पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर चंद्रिल चुग यांनी सांगितलं की, कशाप्रकारे घरी बसूनच तुम्ही हृदयाच्या कमजोरीची माहिती मिळवू शकता.
*🔸कंबरेची साईज मोजा :*
जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, हार्ट अटॅकचा धोका जाणून घेण्यासाठी कंबरेची साईज मोजणे हा एक उपाय आहे. एका अंदाजानुसार, कोणत्याही पुरूषाच्या कंबरेची साईज ३७ इंचापेक्षा जास्त असेल तर त्यांचं हृदय कमजोर असू शकतं. तेच महिलांमध्ये हे याची सीमा ३१.५ इंच असते. पुरूषांमध्ये ४० इंच आणि महिलांमध्ये ३५ इंच हृदयासाठी गंभीर ठरू शकते. कारण लठ्ठपणामुळे हृदयावर अधिक दबाव पडतो. लठ्ठपणा असल्यावर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं कॉमन आहे आणि याने फॅट नसांमध्ये ब्लॉकेज करण्याचं कारण ठरतं.
*🔸हार्ट ब्लॉकेज जाणून घेण्याची घरगुती टेस्ट*
नसांच्या माध्यमातून तुम्ही पल्स रेट किंवा हार्ट रेट जाणून घेऊ शकता. पल्स रेट मोजून हे जाणून घेता येतं की, नसांमध्ये ब्लॉकेज आहे की नाही. ब्रिटिश हार्ट फाउंडेशन नुसार, एक सामान्य हालचाल आणि वयाच्या व्यक्तीची नस आरामाच्या स्थितीमध्ये एक मिनिटामध्ये ६० ते १०० बीट्स दरम्यान असली पाहिजे. हार्ट रेट कमी असल्यावर श्वास भरून येणे, चक्कर येणे अशी लक्षणं दिसली तर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
*🔸४० पायऱ्या चढा :*
डॉक्टर चंद्रिल चुग यांच्यानुसार, ही टेस्ट एक्सरसाईज टॉलरेन्स दाखवते. जर तुम्ही ४० पायऱ्या दम न लागता किंवा न थकता चढू शकत असाल तर तुमचं हृदय चांगलं आहे. कमजोरी किंवा ब्लॉकेज असल्यावर हृदयावर दबाव पडतो. अशात हृदय वेगाने धडधडतं आणि दमही लागतो.
*🎯हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?*
*🔸काय खाणं टाळावं? :*
अनेकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय त्यांच्यासाठी फार जास्त घातक आहे. तसेच वेगवेगळ्या फास्ट फूडमध्येही मिठाचं प्रमाण अधिक असतं. जास्त मिठामुळे हृदयाचं नुकसान होतं. त्यामुळे मीठ आणि साखरेचं सेवन कमीत कमी करा. तसेच जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खावीत. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खावेत. कारण मार्केट मधील हे पदार्थ फारच स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या तेलात बनवलेले असतात. याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो. एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं.
*🔸पाकिटातील पदार्थ टाळा :*
प्रोसेस्ड आणि प्रिजर्व्ड म्हणजे डब्यात बंद असलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य खासकरून हृदयाला जास्त नुकसान होतं. रेडी टू इट म्हणजे सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेट मधील ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा हृदयासाठी नुकसानकारक ठरतं.
*🔸एक्सरसाईज गरजेची :*
कितीही कंटाळा आला तरी रोज कमीत कमी अर्धा तास तुम्ही कोणतीही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. पायी चालावं किंवा रनिंग करावी यानेही बराच फायदा मिळतो. एक्सरसाइजने शरीरातील नसा मोकळ्या होतात, फॅट बर्न होतं, रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे हृदय निरोगी राहतं.
*हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा आणि इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा 📲*
*(
👆👆👆👆👆👆👆