Friday, 2 May 2025

संविधानाच्या द्विभाषिक आठव्या आवृत्तीचे प्रकाशन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

 संविधानाच्या द्विभाषिक आठव्या आवृत्तीचे


प्रकाशन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य


- मराठी भाषा मंत्री उदय सामंत


मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी


राज्यात लोकचळवळ उभारण्याची गरज


 


         मुंबई, दि. 1 : संविधानाच्या मराठी-इंग्रजी द्विभाषिक आठव्या आवृत्तीचे प्रकाशन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचा अभिमान आहे. तसेच मराठी भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यात लोकचळवळ उभारण्याचे आवाहन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छाही श्री. सामंत यांनी दिल्या.


             प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संविधानाच्या अनुवादित 8 व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अभिजात मराठी (ओ टी टी मंच) बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनी "राज्यभाषेची सद्यस्थिती - न्याय व्यवहार व मराठी" या विषयावर मार्गदर्शन केले.


 


यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि भाषा संचालक विजया डोनीकर उपस्थित होते.


 


मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, संविधानातील 106 सुधारणा समाविष्ट असलेली आणि मराठी-इंग्रजी भाषांत उपलब्ध असलेली आठवी आवृत्ती महाराष्ट्राने प्रकाशित केली असून, याचा आम्हाला अभिमान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मराठी भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी विभाग कार्यरत आहे. जगातील विविध देशात मराठीसाठी बृहन्मंडळे कार्यरत आहेत. या मंडळांनी त्या-त्या देशात मराठी शिकवण्यासाठीची जबाबदारी घ्यावी असे आवाहन श्री. सामंत यांनी यावेळी केले.


यावेळी त्यांनी "यशवंतराव चव्हाण अनुवाद अकादमी" सुरू करण्याची घोषणाही केली. तसेच, भव्य मराठी भाषा भवन उभारण्यात येत असल्याचे सांगितले.


प्रशासनात मराठी वापरावर भर


सोप्या मराठी भाषेचा शासकीय व्यवहारात अधिक वापर वाढवावा यासाठी मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मराठी भाषेला कमी लेखल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्हास्तरावर अशासकीय सदस्यांची संख्या वाढवणे, साहित्यिकांचा सन्मान करणे, आणि महिला, तरुण व बालकांसाठी विशेष साहित्य संमेलने घेणार असल्याचेही यावेळी सामंत यांनी सांगितले.


मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, राज्यातील शासकीय कार्यालयांत मराठी भाषा अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठीही नियोजन सुरू आहे. याशिवाय नवीन परिभाषा कोश ऑनलाइन सर्च करण्यायोग्य बनवण्याचे कामही सुरू आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाने उचललेली ही महत्त्वपूर्ण पावले राज्यातील जनतेला अभिमान वाटावा अशी आहेत, असेही त्यांनी सांगितले.


संचालक विजया डोनीकर यांनी आभार मानले.

महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर चमकणारी राज्य : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर

चमकणारी राज्य : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 




नवी दिल्ली दि. 1 : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भुमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा 1 मे हा राज्य दिवस या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत हा प्रवास असाच सुरू राहील असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

दिल्लीतील उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि  केंद्रीय मंत्री गृह श्री शाह यांच्या प्रमुख महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य दिवस डीडीए असिता ईस्ट पार्कविकास मार्ग येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री शाह बोलत होते.

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळेकेंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीयदिल्लीचे तसेच गुजरातचे राज्यमंत्रीमहाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमलामहाराष्ट्र आणि गुजरात चे दिल्ली स्टिक विविध क्षेत्रातील निवासी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्रीमती आर. विमला यांनी उपराज्यपाल श्री सक्सेना,  केंद्रीय गृहमंत्री श्री शाहश्रीमती रेखा गुप्ता यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

ते म्हणालेगुजरात व महाराष्ट्र यांनी स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत आणि आरोग्यदायी स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

पंतप्रधान मोदींनी "एक भारतश्रेष्ठ भारत" या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देतात.

महाराष्ट्रही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीत्यांनी आणि बाजीराव पेशव्यांसारख्या सेनानींनी मुगल सत्तेला जबरदस्त प्रतिकार देत स्वराज्यस्वधर्म व स्वभाषेचे रक्षण केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे लोकमान्य टिळकांनी ठणकावून सांगितले.

सामाजिक सुधारणाचळवळ यामध्ये महात्मा फुलेबाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांचे योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले.

गुजरातजेथे श्रीकृष्णांनी जीवन व्यतीत केलेतेथे स्वामी दयानंद सरस्वतीमहात्मा गांधी व सरदार पटेल यांसारख्या थोर नेत्यांचा जन्म झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळ घडवून आणली.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेसाठी व प्रगतीसाठी गुजरात व महाराष्ट्र या राज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज महाराष्ट्रात गरबा तर गुजरातमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. ही परस्पर संस्कृतीची देवाणघेवाण भारताची खरी ताकद आहे.

महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असून गुजरातची जीएसडीपी ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बंदररिफायनरीएशियातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्कपहिली बुलेट ट्रेनगिफ्ट सिटी आणि आता धोलेरा स्मार्ट सिटी उभी राहत आहे.

वायब्रंट गुजरात आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र हे दोन्ही राज्य भारताच्या विकासाचे मजबूत स्तंभ आहेत. दोन्ही राज्यांनी २०४७ पर्यंतचा आपला विकास आराखडा निश्चित केला आहे.

या दोन राज्यांनी आपल्या वारशाचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारले असून देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी मांडलेली महान भारताची संकल्पना साकार करण्यासाठी ही राज्ये आरोग्यदायी विकास स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत.

२०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेलतेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र यांचा सर्वाधिक वाटा असेल.

महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कला सादरीकरणाने ‘महाराष्ट्र दिन’ राजधानीत उत्साहात

 महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कला सादरीकरणाने

महाराष्ट्र दिन’ राजधानीत उत्साहात

 

नवी दिल्ली1 मे :  महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानी दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गणेशवंदनाआषाढी वारीगोंधळधनगर नृत्यभारूडपोवाडाअभंगदिवलीकोळी नृत्यासह महाराष्ट्र गीत’ अशा विविध समृध्द कलाकृतींचे दमदार सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.

दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेट हॉलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी श्री. संजीव कुमारश्री. राजेश अग्रवालश्रीमती सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावारस्मिता शेलारसारिका शेलारपरिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरामाहिती अधिकारी अंजु निमसरकरमहाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही यानिमित्त राज्याच्या समृद्ध सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने अमेय पाटील यांच्या भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स संस्थेच्या  कलाकारांनी 'गर्जा महाराष्ट्र माझाकार्यक्रम सादर केला.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन

श्री गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊ वंदनाछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक गीतमहाराणी ताराराणीपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वंदना गीतआषाढी वारीसादरीकरण झाले. आई अंबाबाईचे जागरणगोंधळ सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावले. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे  प्रति‍बिंब उभे केलेकार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद सृजन क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद

सृजन क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी

उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती

·         सृजन क्षेत्राच्या विकासासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मुंबईदि. १ : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमधील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला.

 

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील लोटस बॉलरूममध्ये विविध देशातील प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी उपस्थित उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली.

 

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवकेंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनकेंद्रीय सचिव संजय जाजू तसेच उद्योजक ॲडम ग्रॅनिटीॲडम मोसरीआदर पुनावालाअजय बिजलीअक्षत राठीअक्षय विधानीभूषण कुमारचांघाम किमचार्ली जेफरीडायन स्मिथ गंडरएकता कपूरप्रिन्स फैजल बिन बंदर बिन सुलतान अल सौदसुबासकरण अलीराजाहशूजी उत्सुमीशरद देवराजनशंतनू नारायणसंकेत शाहसंजीव गोयंकाराल्फ सिमोनराजन नवानीपिरोजशा गोदरेजनितीश मिटरसेनअलेक्झांडर झरोवक्रिस रिप्लेयदिनेश विजनलिझवेटा ब्रॉडस्कायाहर्ष जैनफरहान अख्तरहार्वेय मासोनहिरोकी टोटोकीजोंग बम पार्कलुईस बॉसवेलमहेश सामतमार्क रीडनमीत मल्होत्रानिल मोहन उपस्थित होते.

 

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार आहे. कंटेंटक्रिएटिविटी आणि कल्चर यावर आधारित ऑरेंज इकॉनॉमी पुढील १० वर्षांत दुप्पट होणार आहे. या इकॉनॉमीला आणखी गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावेअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

 

भारताने सृजन क्षेत्राच्या विकासासाठी उचलेले पाऊल अत्यंत सकारात्मक असून त्यास सर्व उद्योजक उत्स्फूर्तपणे साथ देतीलअसा विश्वास सर्व उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला.

0

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची

 महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ चे उद्घाटन

 

मुंबईदि. १ : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनरेल्वेमाहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमाहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील चित्रपटनगरीत मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ५०० एकरमध्ये असलेल्या मुंबईतील चित्रपटनगरीत अ‍ॅनिमेशनगेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी खास १२० एकरमध्ये मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प आगामी काही महिन्यांत प्रत्यक्षात येणार आहेत.

या वेव्हज परिषदेद्वारे भारताने क्रिएटिव्ह क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दाखविले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक महासत्ता म्हणून ओळख निर्माण केली असूनआता भारत क्रिएटिव्ह क्षेत्रातही नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेअसे  प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. माहिती तंत्रज्ञानकौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भारताच्या नव्या क्रिएटिव्ह वेव्हज'चे स्वागत करण्याचे आवाहन केले.

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’

 मुंबईत साकारणार आयआयसीटी

- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

मुंबईदि. १ : भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असूनत्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५  (व्हेव्ज) चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी श्री. वैष्णव बोलत होते. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकरमाहिती  प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

माहिती व प्रसारण मंत्री श्री.वैष्णव म्हणाले, ‘आयआयसीटीच्या स्थापनेसाठी गुगलॲपलमायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

सर्जनशीलतेच्या जगात सध्या मोठे परिवर्तन घडत आहे. तंत्रज्ञानामुळे सर्जनशील उद्योग आता सर्वांसाठी खुले झाले आहेत. कंटेंट तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहेतसेच कंटेंटचा उपभोग घेण्याचे माध्यमही बदलत आहे. या बदलत्या प्रक्रियेची समज आणि वाटचाल एकत्रितपणे करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण सर्जनशील जगाला वेव्हजच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हे व्यासपीठ जगभरातील निर्मात्यांसाठी खुले आहे. हे व्यासपीठ नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शनगुंतवणूकदारनिर्माते आणि खरेदीदार यांच्याशी जोडणारी संधी देईल. यामुळे नव्या आर्थिक संधींचा उगम होईल.

या परिषदेस जगभरातून धोरणकर्तेउद्योग नेते आणि ७५ देशांतील निर्माते सहभागी झाले असून पुढील चार दिवसांत १०० सत्रे विविध स्वरूपात पार पडणार आहेत. सर्जनशील समुदाय क्रिएट इन इंडिया स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले असून ३२ क्षेत्रांमध्ये ह्या स्पर्धा झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

0000

क्रिएट इन इंडिया चॅलेंज’मधील विजेत्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता

 क्रिएट इन इंडिया चॅलेंजमधील विजेत्यांशी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

मुंबईदि. १ : व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली सृजनशीलता प्रत्येकाने आपल्या परीने जोपासावी, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५ (जागतिक दृकश्राव्य मनोरंजन समिट) चा रंभ झाला. यावेळी 'क्रिएट इन इंडिया चॅलेंजमधील विजेत्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले कीभारताला संगीतनाटकासह विविध कला प्रकारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. तो अधिक वृद्धिंगत करण्यासाठी नव्या पिढीतील सृजनशीलतेला नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी विविध संधी उपलब्ध करून देत प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आपले शरीर कोणत्याही अपायकारक बाह्य गोष्टीला स्वीकारत नाहीत्याचप्रमाणे माणसाची सृजनशीलता वाईट गोष्टींना आपल्या मनामध्ये टिकू देत नाही. आपले मन उल्हसित ठेवण्याची महत्वाची भूमिका सृजनशीलता पार पडत असतेसंगणकावर आपल्या बोटांचा वापर करणारा संगणक अभियंता थकतो तर त्याचवेळी एखादा वयोवृद्ध सतारवादक त्या संगणक अभियंत्याच्या तुलनेत जास्त प्रसन्नउल्हासित राहतो. हा फरक सृजनशीलतेमुळे पहावयास मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील कलासृजनशीलतेला प्रोत्साहन देत जोपासली पाहिजे. भारत सर्व क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. त्याच धर्तीवर सृजनशीलतेच्या क्षेत्रात 'वेव्हज'च्या माध्यमातून पुढे आलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना यशाचा मोठा पल्ला गाठतील,असे सांगून प्रधानमंत्री मोदी  यांनी या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'मधील विजेत्यांच्या दालनांना भेट देऊन त्यांच्या संकल्पनांची माहिती घेतली.

Featured post

Lakshvedhi