Thursday, 1 May 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे प्रकाशन

  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबईदि. २९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या ७८ आणि ९ या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड ७९ ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमुख्य सचिव सुजाता सौनिकसमितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावेसदस्य योगीराज बागुलज.वि. पवारडॉ. संभाजी बिरांजे आदींसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

 

'जनताहे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९३० ते १९५६ पर्यंत प्रकाशित झाले होते. 'जनताहे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्ताऐवज आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनताचे ६ खंड प्रकाशित केले आहेत.

 

खंडांमध्ये काय असणार

 

'जनताखंड ७ - या खंडात १२ फेब्रुवारी १९३८ ते २८ जानेवारी १९३९ पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे.

'जनताखंड ८ - या खंडात ४ फेब्रुवारी १९३९ ते २७ जानेवारी १९४० पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे.

'जनताखंड ९ - या खंडात ३ फेब्रुवारी १९४० ते १ फेब्रुवारी १९४१पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे.


उदंचन जलविद्युत प्रकल्पांतील वीज निर्मितीतून राज्य ऊर्जा संपन्न बनवा

 उदंचन जलविद्युत प्रकल्पांतील 

वीज निर्मितीतून राज्य ऊर्जा संपन्न बनवा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन सामंजस्य करार;

८ हजार ९०५ मेगावॅट वीज निर्मिती

 

मुंबई दि.२९ :- राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभागमहाजेनकोमहाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामे विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेतअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात जलसंपदा विभागसोबत नऊ साईटसाठी तीन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलजलसंपदा ( विदर्भतापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन  मंत्री गिरीश महाजनमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणालेउदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील  वैशिष्ट्यपूर्ण व अद्ययावत तंत्रज्ञान आहे. या जलविद्युत प्रकल्पांव्दारे शेतीउद्योग व व्यावसायिक क्षेत्रासाठी विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबरच शाश्वत आणि हरित उर्जा निर्मिती होणार असल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल.  राज्याच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ५० टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याच्या शासनाचा मानस असून त्यादृष्टीने नियोजन व काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आज झालेल्या सामंजस्य करारामुळे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात ८ हजार ९०५ मेगावॅट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून ९ हजार २०० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.

जलसंपदा विभाग आणि महाजेनको यांच्यासोबतच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी ३१४५ मेगावॅट क्षमतेच्यामहाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत २११० मेगावॅट क्षमतेच्या  तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरिज यांच्यासोबतच्या ३६५० मेगावॅट क्षमतेच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

महाजेनको मार्फत घाटघर येथे १२५ मेगावॅटकोडाळी येथे २२० मेगावॅटवरसगाव येथे १२०० मेगावॉट आणि पानशेत येथे १६०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत मुतखेड येथे ११० मेगावॅटनिवे  येथे १२०० मेगावॅट आणि  येथे वरंढघाट येथे ८०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत पवना फल्याण येथे २४०० मेगावॅट आणि सिरसाळा येथे १२५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारप्रसंगी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी.जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरेमहानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर आणि अभय हरणे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नॅस्कॉमचे विशेषज्ञ

 नॅस्कॉमचे विशेषज्ञ

            'कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)' या विषयावर एलटीआय माईंडट्रीचे  'इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)' या विषयावर एलायड डिजिटलचे रवींद्र देशपांडे यांचे ,'ब्लॉकचेनया विषयावर बेकर ह्युजेस या विषय लौकिक रगजी यांचे ,'सायबरसुरक्षाया विषयावर नॅस्कॉमचे प्रसाद देवरेसुक्रित घोष यांचे,'स्मार्ट मिटिंग्स कशा घ्याव्यातया विषयावर झूमचे शैलेश रंगारी व मेहर उल्लीपालेम यांचे, 'डिजिटल जागरूकताया विषयावर मास्टेकचे प्राजक्ता तळवलकरराहुल मुळे यांचे व्याख्यान  होणार आहेत.

                   कर्मयोगी भारत हे डिजिटल शिक्षणासाठी मुख्य भागीदार,नॅस्कॉम हे  स्टार्टअप सहयोगी व तंत्रज्ञातील विशेषज्ञाचे भागीदारइन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - पोषण व आरोग्य संवर्धनासाठी पाककला सत्र या सर्वांचा या प्रशिक्षण उपक्रमात सहभाग असणार आहे.

आजीवन शिक्षणाचा प्रसार

              डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत, TECH- वारीने निरंतर शिक्षण संस्कृतीला चालना दिली आहे. आयगॉटसारख्या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मचा वापर वाढवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रेरित केले आहेत. महाराष्ट्रातील 5 लाख कर्मचारी आयगॉटवर आहेत व 10 लाखांहून अधिक कोर्स पूर्ण केले आहेत.

प्रशासनातील नवोपक्रमांना चालना

            TECH-वारी हे सिद्ध करते कीकेवळ खासगी क्षेत्रच नाही तर शासनही नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून परिवर्तन साधू शकते. सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना नवीन कल्पना आणि डिजिटल उपायांमध्ये सहभागी करून महाराष्ट्र एक अभिनवकार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासन घडवत आहे.

नवसंधी निर्माण करणारा उपक्रम

           TECH-वारी हे केवळ शिक्षणापुरते सिमित नसून, उद्योजकता व नाविन्यपूर्ण उत्पादने यांना संधी देणारे हे व्यासपीठ आहे. कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता विभागाच्या सहकार्याने "महाराईज- स्टार्टअप पिचिंग" हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. ज्यात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2025 मधून विजयी ठरलेल्या 24 स्टार्टअप्सना प्रशासनातील  वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपले उत्पादने व सेवा  सादर करण्याची संधी मिळणार आहे.

भविष्याकडे निर्धारपूर्वक पाऊल

            TECH-वारीच्या माध्यमातून महाराष्ट्र ठामपणे सांगतोय - आपण फक्त बदलाचा स्वीकार करत नाहीतर बदलाचे नेतृत्व करतो आहोत. प्रत्येक कर्मचारी हा परिवर्तनाचा वाहक आहे आणि एका तंत्रसज्जप्रगत व संवेदनशील महाराष्ट्रासाठी आपली जबाबदारी पार पाडत आहे.

                                                             

TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल",प्रशासनातील तंत्रज्ञान परिवर्तक

 TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल"

            मुंबई, दि. 29 : सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने "TECH वारी - टेक लर्निंग वीक" या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल युगासाठी आवश्यक ज्ञानसाधने आणि विचारसरणीने सज्ज करणारा हा उपक्रम आहे. ५ ते ९ मे२०२५ दरम्यान मंत्रालय, मुंबई येथे TECH-वारी हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. हा प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्राच्या प्रशासनात होणाऱ्या डिजिटल परिवर्तनातील आघाडीचा ठरणार आहे. वारी या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित TECH-वारी ही समर्पण व सामूहिक प्रगतीचे प्रतीक आहेजे शासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये निरंतर शिक्षण व सहयोगाची भावना जागृत करते. या सामूहिक प्रवासाचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनाकरीता सक्षम करणे हा आहे.

उदयोन्मुख तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण

                  TECH-वारीचा गाभा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सहजसोपे आणि समजण्याजोगे बनवणे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेनइंटरनेट ऑफ थिंग्ज् (IoT), सायबर सुरक्षाडिजिटल फायनान्स अशा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे हे जटिल विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जातील. प्रशासन सक्षमीकरण, सेवा प्रदान व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल हे सांगितले जाईल. केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर मानसिक व भावनिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी TECH-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपीध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवर विशेष सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे एक संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडवण्यास मदत होईल.

प्रसिद्ध वक्त्यांचा अपूर्व मेळा

            या कार्यशाळेत सुप्रसिद्ध वक्त्यांचा समावेश असून 'प्रभावी व तणावमुक्त जीवनया विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यांचे ५ मे २०२५ रोजी व्याख्यान होणार आहे. 'प्रवास पाककृतीचा'या विषयावर ६ मे २०२५ रोजी सुप्रसिद्ध शेफ माधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.'आरोग्यपूर्ण जीवनशैलीया विषयावर रूजता दिवेकर यांचे ७ मे रोजी तर,'जीवन संगीतया विषयावर डॉ.संतोष बोराडे यांचे ८ मे रोजी २०२५ रोजीध्यान आणि अंतरिक शांती या विषयावर व्याख्यान होणार आहेत.

प्रशासनातील तंत्रज्ञान परिवर्तक

              'तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तनया विषयावर सचिव (MeitY) श्री. एस. कृष्णन,'कृत्रिम बुद्धिमत्ता'या विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी एआय इंडिया मिशन चे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंह यांचे,'विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक'या विषयावर निती आयोगाच्या फेलो देबजानी घोष यांचे, 'भाषा अडथळे दूर करणारे तंत्रज्ञान'या विषयावर डिजिटल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाचे अधिकारी

              'महसूल विभागात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर'या विषयावर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांचे, 'स्टार्टअप डेमो डे - महा-राईज प्लॅटफॉर्म'या विषयावर कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, 'आपत्ती निवारण व पुनर्वसनात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर'या विषयावर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, 'कुंभमेळ्यात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांचे, 'नागरी क्षेत्रात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांचे, 'वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरया विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचे तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे.


वडाळा मुंबई येथील आधुनिकीकृत नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन

 वडाळा मुंबई येथील आधुनिकीकृत नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन

नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन

 

मुंबई, दि. 29 : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे. सामाजिक व आर्थिक कारणांमुळे अंधत्वावर उपचार करू न शकणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. या सर्वांना दृष्टिलाभ करून देण्यासाठी आधुनिक नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात वेळोवेळी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करावी. तसेच नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

वडाळा मुंबई येथील अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. आदित्य ज्योत नेत्र रुग्णालय हे 35 वर्षे जुने नेत्र रुग्णालय आता विविध देशांमध्ये नेत्र रुग्णालयांचे जाळे असलेल्या अगरवाल नेत्र रुग्णालय साखळीचा भाग झाले आहे.

आदिवासी भागांचे संविधानिक पालक या नात्याने आपण राज्यातील आदिवासी भागांमधील लोकांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहोत. या दृष्टीने नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण तसेच आदिवासी बहुल भागात नेत्र चिकित्सा शिबिरे आयोजित करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. अगरवाल नेत्र रुग्णालयाने गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी फिरते नेत्र रुग्णालय सुरु केल्यास ती भारतमातेची चांगली सेवा ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. 

आपण झारखंड येथे राज्यपाल असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला अनेक लोकांकडून नेत्रदानाची प्रतिज्ञा करवून घेतली होती तसेच आपण आपल्या कुटुंबीयांसह नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता असे सांगून यंदा प्रधानमंत्र्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७,५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करणार आहोतया दृष्टीने अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी संकल्प करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

सुरुवातीला राज्यपालांनी आधुनिकीकृत आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. एस. नटराजन यांनी राज्यपालांच्या दृष्टीची तपासणी केली.   

उद्घाटन सत्राला अगरवाल आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अगरवालडॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या मुख्य नियोजन अधिकारी डॉ. वंदना जैनराज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा

 शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे 

एक महिन्यात मार्गी लावा

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबईदि २९ :-  शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीतअशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज दिल्या.

 

मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांच्या आढावा बैठकीत बोलत होतेबैठकीला सह सचिव  कैलास गायकवाडअवर सचिव सुनील सामंत उपस्थित होते. नाशिकछत्रपती संभाजीनगरनागपूर विभागीय आयुक्त  दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी या बैठकीत सन २०२३ व २०२४ मधील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांचा आढावा घेऊन ही प्रकरणे  त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तालुकास्तरीय समितीने संबंधित यंत्रणांकडून आवश्यक असणारा अहवाल प्राप्त करून घ्यावा. जिल्हास्तरावरही प्रलंबित प्रकरणाचा  नियमित आढावा घेऊन प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावावीत. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणांचा आढावा घ्यावा. शेतकरी आत्महत्या मदतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही मंत्री श्री. जाधव -पाटील यांनी सांगितले.

००००

एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान थायलेसेमिया मुक्तीसाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा

 एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान

थायलेसेमिया मुक्तीसाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. 29 : थायलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृती ही सर्वात महत्वाची आहे. तसेच या आजाराविषयीच्या तपासण्याही होणे गरजेचे असल्याने थायलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा. तसेच या आजारापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे अभियान’ 8 मे 2025 पासून सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व थायलेसेमिया ग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

 

            थायलेसेमिया रुग्णांचा राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा डॉ . महेंद्र केंद्रेअवर सचिव अविनाश जाधव यांच्यासह परभणीचे थायलेसेमिया प्रतिसाद केंद्राचे डॉ लक्ष्मीकांत पिंपळगावकर आदी उपस्थित होते.  

            थायलेसेमिया हा एक अनुवंशिक अजार असून याविषयी पालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगून राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या कीयासाठी जनजागृती शिबिरांचे आयोजन करावे. या आजाराची कारणे आणि लक्षणे याविषयी लोकांना माहिती द्यावी. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी  आशा सेविकांना प्रशिक्षण द्यावे. राज्यात विविध विभागांचे समन्वयक नेमण्यात आलेले आहेत. त्यांनाही यामध्ये सहभागी करावे. तसेच याविषयी केलेल्या कामाचा नियमित आढावा घेण्यात यावा. गरोदर मातांची सिकलसेलसह थायलेसेमियाची तपासणी करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी सीएसआर फंड मिळण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. सध्या अस्तित्वास असलेल्या 104 या टोल फ्रि कमांकावरही या आजाराविषयीची माहिती  व समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, याकरिता संकेतस्थळ तयार करावेअशा सूचनाही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या.

00000

Featured post

Lakshvedhi