Friday, 7 March 2025

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर ‘विशेष ग्रामसभा’

 जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर विशेष ग्रामसभा

- महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे

 

          मुंबईदि. ७ : महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करूनबालविवाह होऊ नये यासाठी लोकचळवळ राबविणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेतअशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

 

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले कीया विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी रहावीमहिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणे गावपातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाव्यातहा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक प्रशासनस्वयंसेवी संस्थामहिला बचतगटअंगणवाडी सेविकाआशा सेविका आणि नागरिकांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.

 

महिला सुरक्षासक्षमीकरण आणि मुलभूत हक्कांसाठी लढा देण्याची महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेबपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आजच्या काळातही महिलांसाठी न्याय आणि सुरक्षा देणे तसेच प्रत्येक गाव आणि खेड्यापर्यंत महिला व बालकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून बालविवाहजाचक विधवा प्रथाअन्यायकारक अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच मुलींच्या जन्मदर वाढीसाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे

समारंभातील पिण्याचे पाणी बाबत va सार्वजनिक पाणी पिताना काळजी घ्या


 

फांदी वरच्या पिवळ्या पानांना, तोडू नका,* *एक दिवस ती आपोआप गळून पडतील.*ज्येष्ठ नागरिक din

 *फांदी वरच्या पिवळ्या पानांना, तोडू नका,*

*एक दिवस ती आपोआप गळून पडतील.*


*बसत जा घरातील वडीलधारी मंडळीं बरोबर,बोलत राहा,*

*एक दिवस ती आपोआप शांत होतील.*


*होवू द्या त्यांना बेहिशेबी,*

*खरचू द्या,*

*मनासारखं वा


गू द्या,*

*एक दिवस ती आपोआप तुमच्या साठी,इथेच सर्व सोडून जातील.*


*नका टोकू त्यांना सारखं सारखं, तेच तेच बोलत राहतात म्हणून,*

*एक दिवस तुम्ही तरसून जाल,त्यांचा आवाज ऐकायला,जेव्हां ती अबोल होतील.* 


*जमेल तेव्हढा आशिर्वाद घ्या त्यांचा,*

*वाकून,पाया पडून,*

*एक दिवस ती आपोआप जातील वर तसबीर बनून,*

*अर्थ नाही मग तुमच्या माफीला,नतमस्तक होऊन,कान धरून.*


*नका बोलू चार चौघात त्यांना, खाऊ दे थोडे,मनासारखं,*

*मग बघा येणार पण नाही जेवायला,* 

*भले करा श्राद्ध,सारखं सारखं....*

 

*पेंशनर डे च्या शुभेच्छा💐*

*फारच सुंदर भावनिक पोस्ट आहे* 😔 

 *🌸आजच्या नव्या पिढीला समर्पित.* 🌸

पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन

 पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन

- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. 6 : पुणे शहरजिल्हाच नव्हेतर राज्यात कर्क रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाला नियंत्रित करण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. कर्क रुग्णास कमी खर्चात उपचार मिळण्यासाठी शासनाच्यावतीने पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहेअशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे शहरातील ससून रुग्णालय गोरगरिबांचे मोठे अशास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी 5.50 लाख इतके रुग्ण बाह्य रुग्ण म्हणून येताततर आंतर रुग्ण 60 हजारपेक्षा जास्त दाखल होतात. या रुग्णालयात दाखल होणारी रुग्ण संख्या लक्षात घेता येथे रुग्ण नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

ससून रुग्णालयाबाबत सदस्य सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य सिद्धार्थ शिरोळेभीमराव तापकीरनाना पटोले यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्याससून रुग्णालयात औषधांची कमतरता नसून 12 कोटी 84 लाख रुपयांची औषधी खरेदी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे अधिकची औषध खरेदीसाठी पैशांची मागणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात उपकरणांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. रुग्णालयात 155 अति दक्षता विभागातील खाटा आहेत. बाल रुग्णांसाठी यामधील काही खाटा राखीव ठेवण्यात येत वेगळा कक्ष सुद्धा ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयाच्या विविध प्रश्नांवर अधिवेशन संपल्यानंतर पुणे शहरातील लोकप्रतिनिधींच्या दौऱ्याचे आयोजन करून त्यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल. ससून रुग्णालयातील वर्ग 4 ची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडे मागणी पत्र पाठवून पदभरती बाबत कार्यवाही करण्यात येत आहे. ससूनमध्ये व्हील चेअर उपलब्ध असून उपयोग करण्यासाठी मनुष्यबळची व्यवस्था करण्यात येत आहे. ससूनमध्ये स्वच्छतेची काम होत नसल्यास संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात येईल. रुग्णासोबत रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांची चांगली व्यवस्था करण्यात येईल. रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येईलअसेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार, कृपया जास्तीत जास्त शेअर करा

 सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार

-         सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

 

मुंबईदि.६ : राज्यासह देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या प्रकारची उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेअसे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत विभागावरील पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना सांगितले.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्यावर्ग ३ व ४ ची रिक्त पदे ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कंत्राटी स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी जिल्हा पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. राज्यात कर्क रुग्णालयांची मागणी लक्षात घेता याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्क रुग्णालय उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत रुग्णालय सूचीबद्ध करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

 कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू तसेच माता मृत्यू थांबवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग व महिला आणि बाल विकास विभाग समन्वयाने काम करेल. राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

000

पायाभूत सोई सुविधांनी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करणार

 पायाभूत सोई सुविधांनी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करणार

- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 मुंबईदि. ६ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यात रुग्णालयपोलीस स्टेशन  शासकीय कार्यालयरस्तेपूलइमारती आदी पायाभूत सुविधांची कामे केली जातात. ही कामे दर्जेदार करून पायाभूत सोई सुविधांनी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी शासन काम करेलअसे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

सन 2024 25 च्या आर्थिक वर्षाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 45.35 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.

चर्चेला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणालेकामांच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नसून रस्त्यांच्या कामांमध्ये अद्ययावत यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येईल. मागणीप्रमाणे व कामानुसार प्रत्येक मतदारसंघासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल. कंत्राटदारांची 19 हजार 550 कोटी पर्यंत देयके प्रलंबित आहेत. याबाबत नियोजन करण्यात आले असून तातडीने ही देयके अदा केली जातील. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे की,  देशाच्या पायाभूत सुविधा प्रगत असल्यास देश किती प्रगती करू शकतो.भारताची अर्थव्यवस्था त्यामुळेच जगातील पहिल्या पाच देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आहे. 

रस्त्यांची कामे घेताना वाहनांची वर्दळ तेथील लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहेत. राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले व पर्यटन स्थळांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यात येईल.  रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम शास्त्रोक्त पद्धतीने करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याचेही मंत्री भोसले यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणालेरस्त्यांची कामे करताना झाडे तोडली जातात. त्यानंतर त्याच ठिकाणी वृक्ष लागवड करण्याची अट कंत्राटदारांना आहे. झाडे लावताना जीपीएस लोकेशन व फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. झाडे जगल्यानंतरच संबंधित यंत्रणेला पैसे देण्यात येणार आहेत. विभाग अंतर्गत  निविदा प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकपणा आणण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेत कुठेही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांची दर्जोन्नती  करण्याचे प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाले असून ती तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

- महिला व बाल विकास मंत्री दिती तटकरे

 

मुंबईदि. ६ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याचे आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका आहे. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाहीलाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईलअशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

            चर्चेदरम्यान महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्याअंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अनाथ बालकांच्या पुनर्वसनाबाबत प्रक्रिया सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून नियमानुसार उपाययोजना करण्यात येतील. गर्भाशय मुखाच्या कर्करोग लसीकरणाबाबत आरोग्य विभागासोबत समन्वय साधून उपयुक्त असा उपक्रम पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने शासन राबविणार आहे.

            कुपोषणचे प्रमाण जास्त असलेल्या 11 जिल्ह्यात विविध उपयोजना राबविण्यात येत आहे. कुपोषण आणि ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येईल. मागणीनुसार व आवश्यकतेप्रमाणे राज्यात स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. बाल संगोपन योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत देण्यात येईल. भिक्षेकरी गृहांच्या दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन ५००० रुपयांनी वाढविण्यात आले आहे. आजपर्यंत ही सर्वात मोठी मानधन वाढ आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहेअसेही तटकरे यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi