Monday, 3 March 2025

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम संपन्न संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

 अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम संपन्न

संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         आर्थिक शिस्त पाळतानाच कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही

·         छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांवर कारवाई होणारच

·         राज्यात यंदा सर्वाधिक सोयाबिन खरेदी

·         100 दिवस उपक्रमाचे त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन करणार

·         अधिवेशनात संविधान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यावर विशेष चर्चा होणार

मुंबईदि. 2 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतिशय चांगले व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाहीयाची काळजी घेत आहोत. हे करत असताना कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाहीअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

            विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटीलजलसंपदा मंत्री गिरीश महाजनपर्यटन मंत्री शंभूराज देसाईमत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकआदिवासी विकास मंत्री अशोक उईके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीनव्या सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असून हे अधिवेशन चार आठवड्याचे असणार आहे. या अधिवेशनात दोन विषयांवर महत्वाच्या चर्चा होणार आहेत. 8 मार्चला महिला दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी निमित्ताने विशेष चर्चा होणार आहे. तसेच भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवस संविधानावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात पाच विधेयकांवर चर्चा होईल. विधिमंडळात सर्व विषयांवर सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या नवीन सदस्यांना चर्चेत सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आरोग्य विभागाच्या एका फाईलवर स्थिगिती दिल्याच्या बातमीसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीअशा प्रकारची कोणतीही फाईल माझ्याकडे आली नाही व मी स्थगिती दिलेली नाही. आरोग्य विभागाच्या संबंधित विषयात केंद्र शासनाला सुचविलेल्या कामातील 9 टक्के निधी हा भांडवली खर्चावर खर्च करणार होते. मात्रकेंद्र शासनाने भांडवली खर्चावर 5 टक्के निधी खर्च करण्याची सूचना केली. त्यानुसारप्राधान्यक्रम ठरवून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीसचिवांनी प्राधान्य ठरविण्यासाठी माहिती मागविली आहे. त्यामुळे ही फाईल माझ्याकडे आली नाही. तसेच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भातही इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील दर कमी आहेत. इतर राज्यात या नंबर प्लेटची किंमत ही जीएसटी व ती प्लेट बसविण्याचा खर्च वगळून आहे तर महाराष्ट्रातील दर हे जीएसटी व प्लेट बसविण्याच्या खर्चासह आहे. गेल्या पंधरा वर्षातील सोयाबीनच्या सर्वाधिक खरेदीपेक्षा दहापट खरेदी यंदाच्या वर्षी सोयाबीनची झाली आहे. खरेदी केलेले सोयाबीन ठेवण्यास गोदामातही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे माध्यमांनी एखादी बातमी प्रसिद्ध करताना शासनाचीही बाजू मांडल्यास त्यातून होणारे गैरसमज पसरणार नाहीतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणीही चुकीचे बोलले तर खपवून घेणार नाहीत्यांच्यावर कारवाई होणारच असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असून त्यांच्या बद्दल आम्हाला पूरेपूर माहिती आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आम्ही काम करत आहोतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

100 दिवस उपक्रमाचे मूल्यमापन करणार

राज्य शासनाने राबविलेल्या 100 दिवसांच्या कामास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात मीदोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून आढावा घेतला. अनेक विभागांनी चांगली कामे केली आहेत. अनेक कार्यालये स्वच्छ झाली असून रेकॉर्ड रुम तयार झाले आहेत. दूरदृश्यप्रणालीद्वारे नुकत्याच घेतलेल्या बैठकीस राज्यातील सुमारे 7 हजार अधिकारीकर्मचारी उपस्थित होते. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर या उपक्रमाचे केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यातून उत्तम काम करणाऱ्यांना निवडण्यात येणार आहे. तसेच नेमून दिलेल्या कामांसाठी बेंचमार्क ठरविण्यात येणार असून त्या खाली कामगिरी असणाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विदर्भच्या संघाने विजय मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ संघाचे अभिनंदन केले.

सर्वसामान्यांसाठी व राज्य पुढे नेण्यासाठी काम करत आहोत - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्य शासन हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत आहे. विकास कामांबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्यासाठी व राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. राज्याच्या विकासाची वाटचाल दुप्पट तर वेग चौपट होईल. याचे प्रतिबिंब येणाऱ्या अर्थसंकल्पात दिसेल. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी कामकाजात सहभाग घेऊन नागरिकांचीमतदारसंघाची प्रश्ने मांडावीत. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील. 

प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीअर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेतया दृष्टिने कामकाज करण्यात येणार आहे. या अधिवेशनात राज्यपाल महोदयांचे अभिभाषण तसेच पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. तसेच दोन महत्त्वाच्या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी राज्य शासनाची आहे.

चहापान कार्यक्रम संपन्न

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील  मंत्रीराज्यमंत्री तसेच आमदार उपस्थित होते. 

०००००

 

जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर : नरहरी झिरवाळ विशेष साहाय्य विभागाच्या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ

 जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर : नरहरी झिरवाळ

विशेष साहाय्य विभागाच्या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ

मुंबईदि. 2 : विशेष साहाय्य विभागाच्या वतीने 'जनकल्याण यात्रा 2025' चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेचा शुभारंभ आज 2 मार्च रोजी विशेष साहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दिंडोरी येथे करण्यात आला. या जनकल्याण यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमास दिंडोरीचे नायब तहसीलदार श्री. बकरेनिर्माता दिग्दर्शक शंकर बारवे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणालेजनकल्याण यात्रेच्या माध्यमातून विशेष साहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मोबाईल एलईडी व्हॅनमार्फत राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. ही यात्रा पुढील पंधरा दिवस राज्यभर सुरू असणार आहे. विशेष साहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनाराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. या योजनाच्या लाभासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी अथवा संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

या यात्रे दरम्यान दाखविण्यात येणाऱ्या माहितीपटाची निर्मिती व दिग्दर्शन शंकर बारवे यांनी केले आहे. हा चित्रपट मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे राज्यातील विविध गावात दाखविण्यात येऊन जनजागृती करण्यात येईल व लाभार्थींपर्यंत योजनेची माहिती पोहचविण्यात येणार आहे.

राज्य शासन आणि केंद्र सरकार समाजातील गोरगरीबवंचितज्येष्ठवृद्धविधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन सर्वांसाठी विशेष अर्थसाहाय्य योजना राबवत आहे. या विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी डी.बी.टी. पोर्टलद्वारे त्यांना त्यांची विशेष साहाय्य मदत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेतून भ्रष्टाचारदिरंगाई थांबली आहे. समाजातील गरजूनिराधारनिराश्रीत आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य शासन नेहमीच कटीबद्ध आहे आणि यापुढेही राहील. समाजातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या विविध योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळावीयासाठी विशेष साहाय्य विभाग कार्यरत असून या योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येत आहे. तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहनही यावेळी मंत्री श्री. झिरवाळ यांनी केले.


Sunday, 2 March 2025

बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी आराखडा तयार करा,अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक उपाययोजना

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'परिवहन भवनया नव्या इमारतीचे भूमिपूजन

बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी आराखडा तयार करा

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.२ : राज्याच्या परिवहन विभागाला आधुनिक सुविधांनी युक्त मुख्यालय मिळावेया दृष्टीने ८५ वर्षांनंतर नव्या परिवहन भवनाच्या उभारणीस सुरुवात होत आहेही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच राज्यातील बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

१ मार्च  परिवहन दिन’ या दिवसाचे औचित्य साधून सर पोचखानवाला मार्ग वरळीमुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चार मजली परिवहन भवन’ या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री एकनाथ शिंदेकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढापरिवहन मंत्री प्रताप सरनाईकपरिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळआमदार मनिषा कायंदेपरिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले कीपरिवहन भवन या इमारतीसाठी चार मजल्याची परवानगी मिळाली असून पुढील परवानगीसाठी संरक्षण विभागाकडे प्रयत्न करण्यात येईल. तसेच परिवहन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याचे काम सुरू आहे. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विभागातील बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय. यामुळे आधीच्या गैरप्रकारांना आळा बसला. यासोबतच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 'फेसलेस सेवामोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या असूनआजवर ४५ हून अधिक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाचा वापर

परिवहन विभागाच्या सेवा आणखी सहज करण्यासाठी व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सच्या माध्यमातून ५०० हून अधिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेट्रोच्या तिकीट सेवेनंतर आता या नव्या सेवांमुळे नागरिकांना कार्यालयात न जाता घरबसल्या व्हॉट्सअॅप द्वारे सुविधा मिळतील.

अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक उपाययोजना

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २९ टक्के आणि समृद्धी महामार्गावर ३५ टक्के अपघातांमध्ये घट झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई होत आहेत्यामुळे शिस्तबद्ध वाहतुकीला चालना मिळत आहे.

पार्किंग समस्येवर उपाय

मुंबईठाणे आणि पुणे या महानगरपालिकांमध्ये पार्किंग स्पेसचे मॅपिंग करून सिंगल अॅपवर त्यांची नोंद केली जाणार आहे. नागरिकांना गाडी खरेदी करण्यापूर्वी पार्किंग सुनिश्चित करण्यासाठी भाडेतत्त्वावर पार्किंग देण्याची योजना आखली जात आहे. शासनाने आपल्या १८ हजार जुन्या गाड्यांचे स्क्रॅपिंग सुरू केले असूनत्यामुळे प्रदूषण रोखण्यास मदत होईल.

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सन्मान निधी

धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटोरिक्षा व मीटरटॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी महामंडळ कार्यान्वित करून त्यांना १० हजार रुपये सन्मान निधी देण्यात येत आहेही आनंदाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

परिवहन विभागाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण स्वतः पाठबळ देत राहूअसे आश्वासन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

परिवहन भवनाच्या उद्घाटनाने नवीन युगाची सुरुवात

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परिवहन भवनाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नव्या इमारतीमुळे परिवहन विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होईलअसे प्रतिपादन केले. त्यांनी सांगितले कीयोग्य जागेची निवड करून बांधण्यात आलेली ही इमारत विभागाच्या गतिशील कार्यपद्धतीला अधिक गती देईल. वेगवान निर्णय प्रक्रियेमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील. तसेचअपघात कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असूनपार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी लवकरच सरकार पार्किंग धोरण आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले कीस्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असूनत्याअंतर्गत लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. शासन परिवहन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असूननागरिकांसाठी अधिक सुरक्षितसोयीस्कर आणि आधुनिक परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील अडीच वर्षांत हे बांधकाम पूर्ण होणार

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

चार मजली आणि १२ हजार ८०० चौरस मीटर बांधकाम असलेल्या या इमारतीत अत्याधुनिक सुविधांसह भूमिगत पार्किंगची व्यवस्था असेल. पुढील अडीच वर्षांत हे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी यावेळी विभागाच्या ऐतिहासिक कार्याचा उल्लेख करताना सांगितले कीराज्याच्या महसुलात मोठा वाटा असलेल्या परिवहन विभागाला तब्बल ८५ वर्षांनंतर स्वतःचे मुख्यालय मिळणार आहे. विभाग दरवर्षी ५ व्या क्रमांकाचे उत्पन्न देतोमात्र आजवर भाड्याच्या इमारतीत कार्यरत होता. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत स्वतःच्या इमारतीसाठी संकल्प मांडला आणि सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असूनही इमारत विभागाच्या कामकाजाला अधिक गती देईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवहन विभागाच्या कार्याचे कौतुक

-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

परिवहन विभाग राज्याला मोठे उत्पन्न देणारा आणि प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला महत्त्वाचा विभाग आहेअसे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी वाहने यामुळे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत असला तरीही ते उत्कृष्ट सेवा देत आहेत. अपघातांचे प्रमाण कमी होत असूनभविष्यात ते आणखी कमी करण्यासाठी विभाग जनजागृती मोहीम राबवेल. विभागाचे काम अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातीलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी परिवहन विभागातील विविध उपाय योजना व नाविन्यपूर्ण माहिती यावरील चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटोरिक्षा व मीटरटॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ऑटोरिक्षा व मीटरटॅक्सी चालकांना प्रतिनिधी स्वरूपात पाच लाभार्थ्यांना रु. १० हजार निवृत्ती सन्मान निधीचे वितरण करण्यात आले.

यामध्ये बाबासाहेब रामभाऊ कदमअनंत सहदेव कदमलक्ष्मण तुकाराम गोळेअरुण नामदेव शिनलकरपुरुषोत्तम भिकाजी सहस्त्रबुद्धे यांना देण्यात आला. याबरोबरच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सेवांचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले.

००००००००००


महाड येथील दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला

 महाड येथील दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ

राज्य शासनाचे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड जिमाका दि. 2 :  राज्य सरकारने न्यायिक पायाभूत सुविधासाठी सातत्याने दरवर्षी सुमारे 1000 कोटी निधीची तरतूद केलेली आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या समितीकडून प्राप्त प्रस्तावाची तातडीने पूर्तता करून कामे मार्गी लावली आहेत. न्यायदानाच्या व्यवस्थेत असलेले पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्य दिले आहे. त्यामुळे राज्यात अधिक गतीने न्यायदानास चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

रायगड जिल्ह्यातील महाड येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधेमहिला व बालविकास मंत्री कु. आदिती  तटकरेरोजगार हमी योजना, फलोत्पादनखारभूमी विकासमंत्री भरत गोगावले, उच्च न्यायालय न्यायमूर्ती मकरंद कर्णिकन्यायमूर्ती मिलिंद साठयेग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष सुरेंद्र तावडेप्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशरायगड-अलिबाग डॉ. सृष्टि नीलकंठमहाड वकील संघाचे अध्यक्ष ॲड संजय भिसेमहाडचे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) प्रविण उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ असलेले महाड ही स्वराज्यक्रांती आणि समता भूमी आहे. या ठिकाणी न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे ही सन्मानाची गोष्ट असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चवदार तळे आंदोलन ही सत्याग्रह आणि कायदेशीर लढाई होती. हे केवळ पाण्याचे आंदोलन नव्हते तर यामुळे देशाची दशा आणि दिशा बदलली. यामुळे समतेचीमाणुसकीची क्रांती घडली. हा देशाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा विजय असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. 

महाड येथील न्यायालय इमारत सुसज्ज, दर्जेदार होण्यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. यासाठी निधीची कमतरता पडणार नाही तसेच इमारतीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले जाईलअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नव्या कायद्यांनुसारकेस लांबवण्यासाठी वारंवार तारखा मागता येणार नाहीतअशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खटल्यांचा निकाल लवकर लागेल आणि न्यायदान प्रक्रियेला गती मिळेलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. न्यायालयाच्या माध्यमातून प्रभावी न्यायदानाचे काम सुरु आहे. खटले लवकर निकाली निघावेतकिंवा खटले होऊच नये याकडे लक्ष द्यावे लागेल. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबईनागपूरछत्रपती संभाजीनगर येथे लॉ स्कुल उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून चांगले विधीज्ञ तयार होतीलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणालेमहाराष्ट्रात न्यायिक पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. न्याय हा पक्षकाराच्या दारी पोहोचला पाहिजे हे आपले धोरण आहे. यासाठी महाड येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालयास राज्य शासनाने मान्यता द्यावी. तसेच नवी मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या अॅडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. तसेच यासाठी वाढीव निधीची तरतूद करावीअशी मागणी न्यायमूर्ती श्री. गवई यांनी यावेळी केली.

ऐतिहासिक ठरलेल्या खटल्यामध्ये स्वतः डॉक्टर आंबेडकर यांनी महाड न्यायालयात येऊन सत्याग्रहींची बाजू मांडली होती असे सांगून या संदर्भातील संपूर्ण घटनाक्रम न्या. गवई यांनी यावेळी सांगितला.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणालेसर्व सामान्य माणसाला जलदगतीने न्याय देण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपारी प्रयत्नशील आहे. राज्यात 32 न्यायालये बांधली  गेली असून त्यामाध्यमातून न्यायासंदर्भात तातडीने कामकाज होत आहेत.गेल्या तीन वर्षात राज्यात 32 न्यायालय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच रिक्त पदे भरतीडिजिटायझेशन करण्यात आले आहे. यामुळे  न्यायव्यवस्थेला गती मिळाली आहे. सध्याच्या युगामध्ये आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काळाची गरज असून शेवटच्या घटकाला यामुळे अधिक गतीने न्याय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. महाड न्यायालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण  होईल तसेच या इमारतीच्या माध्यमातून न्याय दानाचे काम जलदगतीने होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्री कु. आदिती तटकरे यांनी सांगितले की, आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे.  2008 पासून या इमारतीसाठी प्रयत्न सुरु होते. या इमारतीच्या माध्यमातून जनतेला न्यायाची सुविधा मिळेल. न्यायचे विकेंद्रीकरण या निमित्ताने होईल. 33 कोटींचा निधी या इमारतीसाठी मंजूर झाला असून पुरेसा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावा असेही कु. तटकरे यांनी सांगितले.

महाडमध्ये दक्षिण रायगड साठी एसडीआरएफ एनडीआरएफ चा कायमस्वरूपी बेस कॅम्प तयार होण्याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी कु. तटकरे यांनी यावेळी केली. 

मंत्री भरत गोगावले यांनी महाड येथील दिवाणी न्यायधीशकनिष्ठ स्तरन्यायालयाच्या नूतन इमारतीची संरक्षक भिंत तसेच प्रशाकीय भवन इमारतकामास मंजुरी मिळावीअशी मागणी यावेळी केली.

महाड वकील संघाचे अध्यक्ष ॲड.संजय भिसे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती यशवंत चावरे लिखित "महाडचा  मुक्तिसंग्राम " या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाडचे दिवाणी न्यायाधीश ( वरिष्ठ स्तर) प्रविण उन्हाळे यांनी आभार मानले.

 

चवदार तळ्यास भेट

कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चवदार तळे येथे भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरेरोहयो मंत्री भरत गोगावलेविभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी किशन जावळेपोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा महाकुंभ' स्पर्धेचे आयोजन लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह 12 खेळांचा समावेश

 क्रीडा महाकुंभ' स्पर्धेचे आयोजन

लेझिमफुगडी आणि लगोरीविटी दांडूसह 12 खेळांचा समावेश

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना

मुंबई दि.2 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधत पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने कौशल्य विकासरोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाकुंभ स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे. येत्या 2 ते 9 मार्च पर्यंत हा क्रीडा महाकुंभ राज्यात सुरू राहणार आहे.

या क्रीडा महाकुंभात कब्बडी आणि खो-खो या जागतिक दर्जाच्या खेळांबरोबर लगोरीलेझिमलंगडीविटी दांडू यांसह 12 पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. 2 आणि 3 मार्च रोजी आय टी आय स्तरावर4 आणि 5 मार्च रोजी जिल्हास्तरावर तर 7 ते 9 मार्च पर्यंत नाशिक विभागीय स्तरावर या क्रीडा कुंभाची सांगता होईल. विजेत्यांना आकर्षक पारितोषिक तर सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. तसेच इच्छुक खेळाडूंनी क्रीडा कुंभसाठी नियुक्त केलेले प्रभारी किंवा संबंधित आय.टी.आयच्या मुख्याध्यापकांकडे नोंदणी करायची आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाममात्र 10 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले असून ते रिफंड अर्थात पुन्हा स्पर्धकांना परत देण्यात येणार आहे.

गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ...जोडूया भारतीय संस्कृतीशी नाळ हे ब्रीद वाक्य घेऊन मंत्री श्री.लोढा यांच्या पुढाकाराने या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तन आणि मन जोडून जागतिक स्तरावर दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 साली देशभरात 'खेलो  इंडियाही संकल्पना राबवली. या संकल्पनेच्या आधारावर आखिल  भारतीय विद्यार्थी परिषदेने देशभरात 'खेलो भारत'  ही क्रीडा मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत आता कौशल्य विकासरोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्राच्या मातीत खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांना पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्राची थोर सांस्कृतिक परंपरा आहे. इथल्या मातीतल्या खेळातूनही या मराठी संस्कृतीचे दर्शन होते. त्याचबरोबर शिवकालीन इतिहास खेळाच्या माध्यमाने नव्या पिढीला कळावा यासाठी पावनखिंड दौड या खेळाचा समावेशही या स्पर्धेत करण्यात आला आहे.

या क्रीडा महाकुंभात दंड बैठकलेझिमपंजा लढवणेरस्सी खेचलंगडीदोरीवरच्या उड्याकब्बडीफुगडीखो-खोविटी दांडू आणि लगोरी या पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. महिला आणि पुरुष दोन्ही गटात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

कौशल्य विकास विभागांतर्गत येणारे व्यवसाय प्रशिक्षण आणि संचालनालय आणि पुणे येथील क्रीडा भारती या संस्थेच्या सहयोगाने या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त तरुण तरुणींनी सहभाग घेऊन महाराष्ट्रातील पारंपरिक खेळांना आणखी दर्जेदार करून आपली मराठी संस्कृती जपावी आणि हे खेळ जागतिक स्तरावर पोहचवावे असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

000

हाताच्या ठश्याखाली काय आहे.... अप्रतिम कलाकृती.,आणि वास्तव चे दर्शन घडवले आहे,pl share

 हाताच्या ठश्याखाली काय आहे.... अप्रतिम कलाकृती.!👌👍🏻🪷💐


हृदयविकाराचा झटका* pl share

 ‼️ *हृदयविकाराचा झटका*‼️


 *3000 वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात खूप मोठे ऋषी होते.

 *त्यांचे नाव होते* *महर्षि वाग्भट जी!!*


 त्यांनी एक पुस्तक लिहिले

 *ज्याचे नाव* *अष्टांग* *हृदयम्!!*

 *(अस्तंग हृदयम्)*


 *आणि या पुस्तकात त्यांनी * *7000* रोग बरे करण्याचे सूत्र लिहिले!

 *हे त्यापैकी एक सूत्र आहे!!*


 *वाग्भट जी लिहितात की हृदयाला कधी झटका येतो!* *म्हणजे हृदयाच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेज होऊ लागले आहे!*


 *म्हणजे रक्तात आम्लता वाढली आहे!*

 *अॅसिडिटी तुम्हाला समजते!*

 *ज्याला इंग्रजीत acidity म्हणतात!!*

 *आम्लता दोन प्रकारची असते!


 *एक म्हणजे पोटाचा आंबटपणा!*


 *आणि एक म्हणजे रक्ताची आम्लता!!*


 *जेव्हा तुमच्या पोटात आम्लपित्त वाढेल!* *तेव्हा तुम्ही म्हणाल*

 ✔️ *पोटात जळजळ होते!!*

 ✔️*आंबट आंबट ढेकर येत आहेत!*

 ✔️ *तोंडाला पाणी सुटले!*

 *आणि ही आम्लता आणखी वाढली तर!*

 *म्हणून हायपर अॅसिडिटी होईल!*

 *आणि जेव्हा ही पोटाची आम्लता वाढून रक्तात जाते तेव्हा रक्ताची आम्लता होते!!*

 *आणि जेव्हा रक्तात आम्लता वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त (रक्त) हृदयाच्या नळ्यांमधून बाहेर पडू शकत नाही!* *आणि नळ्यांमध्ये अडथळा निर्माण होतो!*

 *तेव्हाच हृदयविकाराचा झटका येतो!!  त्याशिवाय हृदयविकाराचा झटका येत नाही !!*

 *आणि हे आयुर्वेदाचे सर्वात मोठे सत्य आहे जे तुम्हाला कोणताही डॉक्टर सांगत नाही!*

 *कारण त्याचा उपचार हा सर्वात सोपा आहे!!*


 *उपचार काय?*


 *वाग्भट जी लिहितात की रक्तात आम्लता वाढली की!* *म्हणून तुम्ही अशा गोष्टी वापरता ज्या अल्कधर्मी असतात!*

 *तुम्हाला माहीत आहे दोन प्रकारच्या गोष्टी आहेत!*


 *आम्लयुक्त आणि अल्कधर्मी!!*

 *आम्लीय आणि अल्कधर्मी*


 *आता आम्ल आणि क्षार मिसळले तर काय होईल!  ,


 *आम्ल आणि अल्कधर्मी मिसळल्यास काय होते????*


 ‼️*तटस्थ*‼️

 *असं सगळ्यांना माहीत असतं!!*


 *म्हणून वाग्भट जी लिहितात!* *रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारयुक्त पदार्थ खा!*

 *म्हणून रक्ताची आम्लता तटस्थ होईल!!!


 *आणि रक्तातील आम्लता न्यूट्रल झाली!*

 *म्हणून आयुष्यात कधीही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाही!!*


 *ही आहे संपूर्ण कथा!!!


 *आता तुम्ही विचाराल की कोणते पदार्थ अल्कधर्मी आहेत आणि आपण खावे????*


 * तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अल्कधर्मी आहेत!


 *आपल्या सर्वांना माहित आहे की सर्वात अल्कधर्मी गोष्ट कोणती आहे आणि ती सर्व घरी सहज उपलब्ध आहे, तर ती म्हणजे बाॕटल गार्ड!!*

 *ज्याला दुधी असेही म्हणतात!!*

 *इंग्रजीत याला bottle gourd म्हणतात!!!

 *जे तुम्ही भाजी म्हणून खाता!* *यापेक्षा जास्त अल्कधर्मी काहीही नाही!*


 *म्हणून तुम्ही दररोज लौकिचा रस प्या!!* *किंवा कच्चा लौकी खा!!


 * वाग्भट जी सांगतात की लौकीमध्ये रक्तातील आम्लता कमी करण्याची कमाल शक्ती असते.  * *म्हणून तुम्ही लौकीचा रस खावा!!


 *किती सेवन करावे?????????*


 *दररोज 200 ते 300 मिलीग्राम प्या!!*


 *कधी प्यावे?*


 *सकाळी रिकाम्या पोटी (शौचाला जाऊन आल्यावर) पिऊ शकतो!!* *किंवा नाश्त्याच्या अर्ध्या तासानंतर पिऊ शकतो!!*

 *तुम्ही या बाॕटल गाॕर्डचा रस अधिक अल्कधर्मी बनवू शकता!*

 *त्यात तुळशीची 7 ते 10 पाने टाका* *तुळशी खूप क्षारीय असते!!* *तुम्ही त्यात पुदिन्याची 7 ते 10 पाने मिक्स करू शकता!* *पुदिना सुद्धा खूप अल्कधर्मी आहे!* *यामध्ये तुम्ही काळे मीठ टाकू शकता किंवा खडकात मीठ घालावे!*

 *हे खूप अल्कधर्मी आहे!!*


 *पण लक्षात ठेवा*

 *फक्त काळे किंवा खडे मीठ घाला!* *इतर आयोडीनयुक्त मीठ कधीही घालू नका!!* *हे आयोडीनयुक्त मीठ आम्लयुक्त आहे!!!!*


 *म्हणून मित्रांनो, तुम्ही हा दूधीचा रस जरूर सेवन करा!!!


 *2 ते 3 महिन्यांच्या कालावधीत तुमच्या हृदयातील सर्व अडथळे दूर होतील!!*


 *आपल्याला 21 व्या दिवशीच खूप परिणाम दिसू लागतील!!!


 *तुम्हाला कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही!!*


 *आमच्या भारतातील आयुर्वेदाद्वारे घरच्या घरी उपचार केले जातील!!*


 *आणि तुमचे मौल्यवान शरीर आणि लाखो रुपये ऑपरेशनमधून वाचतील!!


 *संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!!

🍁

 *किमान पाच गटात पाठवावे*

 *काही लोक पाठवणार नाहीत*

 *पण मला खात्री आहे की तुम्ही नक्की पाठवणार.

Featured post

Lakshvedhi