Wednesday, 15 December 2021

 कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे

आयोजन सामाजिक न्याय विभाग करणार

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

· विजयस्तंभ शौर्यदिनाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना

· विजयस्तंभ परिसर विकास व सुशोभिकरणासाठी आराखडा समिती

            मुंबई, दि. 14 : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी-सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची कामे तसेच शौर्य दिन, अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.

            सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, दरवर्षी 1 जानेवारी रोजी देशभरातून कोरेगाव भीमा येथे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात, त्यांना आवश्यक सोयी-सुविधा तसेच विजयस्तंभ व परिसराचा विकास कमीत कमी वेळेत केला जावा यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे. विजयस्तंभ ऐतिहासिक असून लाखो अनुयायांचे प्रेरणास्थळ आहे. या स्थळाचा विकास व सुशोभीकरण यासाठी 100 कोटी रुपयांचा बृहत विकास आराखडा तयार करून मान्यतेसाठी एक महिन्याच्या आत सादर करावा, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

             विजयस्तंभ व परिसराचा विकास करताना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जावी यासाठी जिल्हाधिकारी, पुणे, यांच्यामार्फत भूसंपादन प्रक्रियेचा 30% निधी तातडीने वितरित करण्याच्या सूचनाही सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे यांनी दिल्या.

            यापुढे 1 जानेवारी शौर्यादिनाचे आयोजन व नियोजन देखील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत केले जाणार असून, 1 जानेवारी, 2022 च्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन केले जावे, तसेच या अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना देखील श्री.मुंडे यांनी पोलीस, महसूल व अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

            बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांची समितीही गठीत करण्यात आली आहे. याशिवाय एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.  

            बैठकीस अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहसचिव दिनेश डिंगळे, गृह विभागाचे सहसचिव संजय खेडकर, पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखरे आदी उपस्थित होते.


***




 जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

· पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली

उच्चाधिकार समितीची बैठक

            मुंबई, दि. 14 : जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  

            बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषीकेश यशोद यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील मजीप्राअंतर्गत मान्यता मिळालेल्या योजना

            पुणे जिल्हा : थोपटेवाडी- लाटे प्रा.पा.पु. यो. ता. बारामती, गोजुबावी खराडेवाडी प्रा.पा.पु. यो. बारामती, देऊळगाव-रसाळ प्रा.पा.यो. ता. बारामती, कटफळ- तैनकवाडी प्रा.पा.पुर यो, ता. बारामती, पुणे, लोणी भापकर प्रा.पा.पु. यो. ता. बारामती, निमसाखर पा.पु. यो. ता. इंदापूर, पुणे, सुपे प्रा.पु.यो. ता.बारामती,

            अहमदनगर जिल्हा : बेलवंडी बु. पा. पु. योजना, ता. अहमदनगर, वाढीव मिरजगाव पा. पु. योजना ता. कर्जत, अहमदनगर, वारी कान्हेगाव पा. पु योजना ता. कर्जत, जि.अहमदनगर, माळेगाव थडी पा. पु. योजना ता. कोपरगाव अहमदनगर, निमगाव भोजापूर व ३ गावे पा. पु योजना ता.संगमनेर जि. अहमदनगर, जवळेकडलग व १ गावे पा. पु. योजना ता. संगमनेर जि.अहमदनगर, गुंजाळवाडी व १ गावे पा. पु. योजना, ता.संगमनेर जि. अहमदनगर,

            नाशिक जिल्हा : चिंचवड व ६ गावे पा. पु. योजना ता. त्र्यंबक, जि. नाशिक

            लातूर जिल्हा : निटूर, ता. निलंगा जि. लातूर, कासारशीरसी, ता. निलंगा, जि. लातूर, पाखरसांगवी, ता जि. लातूर

            जळगाव जिल्हा : धानोरा, ता. चोपडा जि. जळगाव, उचंदे व ७ गावे, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

            अमरावती जिल्हा : 19 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता.चांदूरबाजार जि. अमरावती, नांदगाव पेठ व ३२ गावे प्रा. पा.पु. यो., ता. जि. अमरावती, तेल्हारा व ६९ गावे प्रादेशिक पा.पु. यो. जि. अमरावती, १०५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना,अमरावती

            बुलडाणा जिल्हा : चिंचोली व ३० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. खमगांव व ता. शेगांव, बुलढाणा, मौ. पाडळो व ५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बुलडाणा

            नागपूर जिल्हा : घोट, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली नळ पा.पु. योजना, नागपूर

            रत्नागिरी जिल्हा : मौ. धोपवे, ता.गुहागर, जि.रत्नागिरी, मौ.पालगड, ता.दापोली, जि.रत्नागिरी

            रायगड जिल्हा : मौ.कडाव, ता.कर्जत, जि.रायगड, मौ.देवन्हावे, ता.खालापूर, जि.रायगड

            ठाणे जिल्हा : मौ.रायता व 14 गावे प्रा.पा.पु ता.कल्याण, जि. ठाणे

महाराष्ट्र जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेस मान्यता मिळालेल्या योजना

            कोल्हापूर जिल्हा : बहिरेवाडी, ता. आजरा जि. कोल्हापूर, मो. हरपवडे ता. आजरा जि. कोल्हापूर, मौ. न्हाव्याचीवाडी, ता. भुदरगङ जि. कोल्हापूर,

            परभणी जिल्हा : मौ. जलालपूर, ता. परभणी, जि. परभणी, मौ. बानेगाव व मौ. माहेर ता. पूर्णा, जि. परभणी

            अमरावती जिल्हा : मौ. काट आमला, ता. जि. अमरावती नळ पा. पु. योजना अमरावती, मौ.वडाळा नळ पा.पु. योजना, ता.वरूड, जि.अमरावती, मौ. टेंभर्णी नळ पा.पु. योजना, ता.चांदुररेल्वे, जि. अमरावती, मौ.तुळजापूर नळ पा. पु. योजना, ता. चांदुररेल्वे,जि. अमरावती, मौ. बहादरपुर नळ पा. पु. योजना, ता.भातकुली जि. अमरावती, मौ.खल्लार नळ पा.पु. योजना, ता. भातकुली, जि. अमरावती, मौ. भोपापुर नळ पा.पु. योजना, ता.अचलपूर,अमरावती, मौ.बगदरी नळ पा.पु. योजना, ता. चिखलदरा, जि. अमरावती, मौ.बबईढाणा नळ पा.पु. योजना, ता.धारणी, जि.अमरावती, मौ.बागापूर नळ पा.पु. योजना, ता. चांदूररेल्वे, जि.अमरावती

            भंडारा जिल्हा : मौ. घोडेझरी (सोनेगाव) नळ पा.पु. योजना, ता. लाखांदुर, जि. भंडारा, मौ.डोंगरदेव नळ पा.पु. योजना, ता.मोहाडी, जि.भंडारा, मौ.मेहगांव नळ पा.पु. योजना, ता.मोहाडी, जि.भंडारा

            वर्धा जिल्हा : मौ.सेलू (कोल्ही) नळ पा.पु. योजना ता. हिंगणघाट, जि. वर्धा, मौ.कोल्ही नळ पा.पु. योजना ता.हिंगणघाट, जि.वर्धा

            वाशिम जिल्हा : मौ.मोहजा इंगोले नळ पा.पु. योजना, मौ.पार्डी आसरा नळ पा.पु. योजना, मौ.तपोवन व पुंजाजी नगर नळ पा.पु. योजना, मौ.मसोला बु.न.पा.पु. योजना, मौ.बांबर्डा न.पा.पु. योजना, मौ.शिंगणापूर नळ पा.पु. योजना, मौ. जानोरी नळ पा.पु. योजना, मौ. गिर्डी नळ पा.पु. योजना, वाशिम

            या 60 पाणीपुरवठा योजनेस उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.


००००



 ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी

ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन

 

        मुंबईदि. 14 : ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ऊर्जा संवर्धन आठवड्या’ चे औचित्य साधून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आज चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. महाऊर्जातर्फे दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आणि दिनांक 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ऊर्जा संवर्धन आठवडा म्हणून राज्यात साजरा केला जातो. यानिमित्त ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानाहून ऊर्जा संवर्धनाचे महत्व चित्रफितीद्वारे दाखवणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखूवन सुरूवात केली. या चित्ररथावर राज्यातील विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयीची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे. या चित्ररथावर लावलेल्या पोस्टर्सद्वारे सर्वसामान्यांना ऊर्जा बचतीचा संदेश दिला जाणार असून ऊर्जा बचतीचे महत्व पटवून दिले जाणार आहे.

          महाऊर्जातर्फे राज्यात ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा व्यवस्थापन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक योजनेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या योजनेमध्ये 17 विविध क्षेत्रामधून विविध घटक (औद्योगिकव्यावसायिक इमारतीशासकीय इमारतीलघु व मध्यम उद्योगएमआयडीसी इ.) सहभागी होतात. 16 व्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांतर्गत एकूण 78 घटकांनी सहभाग नोंदविला असून 46 विजेत्यांची यादी महाऊर्जा संकेतस्थळावर ऊर्जा संवर्धन दिन दि. 14 डिसेंबर, 2021 रोजी जाहिर करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी सांगितले.

          राज्यातील आकाशवाणीरेड एफ.एम. व 91.1 एफ.एम. या रेडिओ चॅनलद्वारे ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान एक मंत्र आणि एक विचारवीज बचतीचा करु प्रसार...." या रेडिओ जिंगलचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृतीसाठी पोस्टर्स व बॅनर्सचे वितरण महाऊर्जा विभागीय कार्यालयांमार्फत ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत असल्याचे मंत्री  डॉ.राऊत यांनी सांगितले.

          महाऊर्जामार्फत राज्यातील 400 शाळांमध्ये ऊर्जा क्लबची स्थापना करण्यात आली असून ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने चित्रकला स्पर्धावादविवाद स्पर्धानिबंध स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात येत आहे. वास्तुविशारद / कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित Graffity / Wall painting चे आयोजन करण्यात आले असून त्यातून निवड केलेले चित्र महाऊर्जा कार्यालयाच्या भिंतीवर रंगविण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच इतर शासकीय / निमशासकीय कार्यालयांच्या भिंतीवर ही चित्रे रंगविता येणार असल्याची माहिती मंत्री डॉ.राऊत यांनी दिली.

          राज्यातील विविध घटकांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रमांतर्गत दृकश्राव्य माध्यमातून वेबिनारचे आयोजन ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत आहे. तसेच अभियांत्रिकी / औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धन संयंत्राची माहिती होण्यासाठी तसेच ऊर्जा परीक्षणासाठी या संयंत्राचा वापर कशाप्रकारे केला जातो याची संक्षिप्त माहिती देण्यासाठीमहाऊर्जा मुख्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा परीक्षण संयंत्राचे प्रदर्शन शिबीर आयोजित करण्यात येत असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले.

 वसतिगृह प्रवेश, स्वाधार व परदेश शिष्यवृत्ती प्रक्रिया

आता संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने राबविणार

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

· जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन

          मुंबई, दि. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील प्रवेश पूर्णपणे संगणकीकृत करून ऑनलाईन पद्धतीने राबविण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

            मंत्रालयात संगणकीकृत ऑनलाईन प्रणालीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, बार्टीचे महासंचालक डॉ.धम्मज्योति गजभिये, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे आदी बैठकीस उपस्थित होते.

            यापुढे विद्यार्थी व निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या लोकप्रतिनिधींना पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र पडताळणी करून मिळावी यासाठी ही प्रक्रिया सुद्धा पूर्णपणे ऑनलाईन केली जावी, यात असलेल्या सर्व त्रुटी दूर करून पासपोर्टच्या धर्तीवर सुटसुटीत व अद्ययावत प्रणाली तातडीने विकसित करून कार्यान्वित केली जावी असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

            सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये 42 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु त्यांना प्रवेशासाठी अर्ज करायला थेट जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जावे लागते. त्याचप्रमाणे वसतिगृहात प्रवेश न मिळलेल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या स्वाधार शिष्यवृत्तीची अर्ज व छाननी आदी प्रक्रिया देखील ऑफलाईन आहे. परदेश शिष्यवृत्ती सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिष्यवृत्ती योजनेची निवड प्रक्रिया आजच्या युगात ऑनलाईनच असणे गरजेचे आहे, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

            सध्या सीईटी प्रवेश व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पासपोर्टच्या धर्तीवर ऑनलाईन केली जावी, या प्रक्रियेमध्ये त्रुटी येणे किंवा विलंब होणे पूर्णपणे टाळून पारदर्शक पद्धतीने काम केले जावे. ही प्रक्रिया एक महिन्याच्या आत कार्यान्वित केली जावी, असे निर्देश श्री.मुंडे यांनी दिले.

            जुन्या 100 शासकीय निवासी शाळांची ठिकाणे वगळून अन्य तालुक्यांमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवासी शाळांबाबत शासकीय जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा असल्यास तसे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना श्री.मुंडे यांनी दिल्या.

            तसेच राज्यस्तरीय केंद्र पुरस्कृत योजनांसाठी अर्ज केलेल्या स्वयंसेवी संस्थांचे प्रस्ताव अंतिम करून केंद्र शासनास शिफारशीसह पाठविण्याचे निर्देशही श्री.मुंडे यांनी दिले.

            सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील समता प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाची आढावा बैठक देखील झाली.

****

बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

            मुंबई, दि. 14 : बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व तत्सम पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसेच पोलीस व मिलीटरी भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता काही तांत्रिक अडचणीमुळे दि. 22 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

            तसेच चाचणी परिक्षेचा दिनांक 26 डिसेंबर 2021 रविवार रोजी असा बदल करण्यात आला आहे. देण्यात आलेल्या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांच्या अर्जाचा स्वीकार करण्यात यावा असे संबंधित प्रशिक्षण संस्थेस कळविण्यात आलेले असुन, जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी अर्ज करावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना यासंदर्भात काही अडचणी आल्यास बार्टी, पुणे या कार्यालयाच्या 020-26343600/ 26333330 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे बार्टीमार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

*****

गणेश मंडळांनी पर्यावरण जागृतीचे कार्य करावे

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 14 : गणेश मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तीचा आग्रह न धरता आपल्या कार्याची उंची व व्याप्ती वाढवावी तसेच मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील निवडक विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन लोकशाही न्यूज चॅनेल तर्फे करण्यात आले होते.

            यावेळी लोकशाही न्यूज चॅनेलचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर, संचालक गणेश नायडू व शिरीष गदिया प्रामुख्याने उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विदेशातही साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य सर्वदूर झाले पाहिजे. गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासोबतच स्वच्छतेचेही काम केले पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते ठाणे येथील संदीप गाढवे, विले-पार्ले येथील प्रकाश महाडिक, बदलापूर येथील पुंडलिक नरेकर, ठाणे येथील गौरव गावंड, विरार येथील दिलीप माने, रविंद्र आणि साक्षी चौघुले, भांडुप येथील आकाश चंद्रशेखर उद्धारकर, रत्नागिरी येथील संजय वर्तक, कुर्ला येथील प्रकाश कटके व आग्रीपाडा येथील प्रेतेश राजेश शिंदे यांना पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील पुरस्कार देण्यात आले.

            हिमांशु वसंत पवार, संकल्प मित्र मंडळ, अभिषेक नामदेव जोरी, बालगोपाल मित्र मंडळ, अलिशा दीपक भोगले, युवा गणेशोत्सव मंडळ, दादर, लौकिक श्रीरंग चव्हाण, नायगाव जयभवानी मित्र मंडळ व अक्षय अशोक पाटील शिवछत्रपती मंडळ यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            यावेळी लोकशाही न्यूज चॅनेलच्या विविध पदाधिकाऱ्यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नरेंद्र कोठेकर यांनी प्रास्ताविक केले तर न्यूज अँकर विशाल पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

000

Governor Koshyari felicitates winners of

Eco Friendly Ganeshotsav competition

            Mumbai, Dt. 14 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the awards to individuals and Ganesh Mandal winners of the Eco Friendly Ganeshotsav competition at a function held at Raj Bhavan, Mumbai on Tuesday.

            The Eco Friendly Ganeshotsav competition was organised by Marathi news channel ‘Lokshahi News’.

            Director of the news channel Ganesh Naidu, Director Shirish Gadiya and Executive Editor Narendra Kothekar were prominent among those present.

            Speaking on the occasion, the Governor called upon the Ganesh Mandals to increase the outreach and quality of their work rather than insisting on increasing the height of Ganesh Murtis. He said, the Ganeshotsav started by Lokmanya Tilak has today spread to the nook and corner of the country and is celebrated even in other countries. He called upon Ganesh Mandals to work with the spirit of unity and contribute to strengthening democracy.

            Five Ganeshotsav Mandals namely Sankalp Mitra Mandal, Balgopal Mitra Mandal, Yuva Ganeshotsav Mandal Dadar, Jaibhavani Mitra Mandal, Naigaum and Shiv Chhatrapati Ganeshotsav Mandal were given the top awards by the Governor. Ten individual awardees were also felicitated by the Governor.

            Executive Editor Narendra Kothekar delivered the welcome speech, while news anchor Vishal Patil conducted the proceedings.

0000



 बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

            मुंबई, दि. 14 : बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व तत्सम पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसेच पोलीस व मिलीटरी भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता काही तांत्रिक अडचणीमुळे दि. 22 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

            तसेच चाचणी परिक्षेचा दिनांक 26 डिसेंबर 2021 रविवार रोजी असा बदल करण्यात आला आहे. देण्यात आलेल्या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांच्या अर्जाचा स्वीकार करण्यात यावा असे संबंधित प्रशिक्षण संस्थेस कळविण्यात आलेले असुन, जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी अर्ज करावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना यासंदर्भात काही अडचणी आल्यास बार्टी, पुणे या कार्यालयाच्या 020-26343600/ 26333330 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे बार्टीमार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

*****

 उद्योग व स्वयंरोजगाराला अर्थसहाय्याद्वारे

गरजू घटकांना सक्षम बनवावे

- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित यांची कार्यशाळा

       मुंबई, दि. 14 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व महाप्रित कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना ग्रामीण भागात उद्योग, स्वयंरोजगार यासाठी चालना मिळावी, अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे. केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ गरजू घटकांना मिळावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

          महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ तसेच महाप्रित कंपनी अंतर्गत असलेले मुख्यालयातील तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची राज्यस्तरीय कार्यशाळा नाशिकमध्ये घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना दूरदृश्यप्रणालीद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री श्री.मुंडे बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे उपस्थित होते.

         सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, महामंडळाच्या जुन्या योजनांसोबतच आता विविध कृषी प्रक्रिया उद्योग राबविण्यासंदर्भात नावीन्यपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन भाजीपाला, फळे आदी प्रक्रिया उद्योग व विक्रीसाठी १०० महिला बचतगटांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बायोगॅस, फ्लाय ॲशपासून विस्तारित होणारे प्रकल्प यांनाही आर्थिक प्रोत्साहन मिळाल्यास या क्षेत्रातही रोजगारासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. बीड व सांगली जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. मर्यादित ऊर्जास्रोतांच्या काळात सौरऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन दिल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार तर मिळतीलच, शिवाय शासनाला देखील ऊर्जा नियमनासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. उद्योग उभारणीसाठी, रोजगारासाठी अर्थसहाय्य, कर्ज अशा शासनाच्या अनेक योजना आहेत. एखाद्या योजनेचा एखाद्या गरजू व्यक्ती किंवा समूहाला लाभ मिळवून द्यायचा असेल तर त्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

            सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला जास्तीत-जास्त अर्थसहाय्य मिळावे, विभागाकडे आलेल्या प्रत्येक प्रकरणाला योग्य न्याय मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे महामंडळ अशी ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण सर्वांनी मिळून व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

            व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन माळी म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी झटले पाहिजे. काही सकारात्मक बदल केले तर खऱ्या अर्थाने योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. कोणत्याही योजनेचे यश हे त्यातून किती गरजूंना प्रत्यक्ष लाभ मिळाला यावरच मोजले जाते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे, असेही श्री.माळी यांनी सांगितले.

            याप्रसंगी महाप्रितचे संचालक विजयकुमार काळम-पाटील, मुख्य महाव्यवस्थापक गणेश चौधरी, महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम, केशव कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेत महामंडळांतर्गत कार्यरत असलेले प्रादेशिक व्यवस्थापक तसेच जिल्हा व्यवस्थापक आणि मुख्यालयातील महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक तसेच तांत्रिक अधिकारी व सल्लागार उपस्थित होते.


*****


Tuesday, 14 December 2021

Mulagi-Heera hai anmol

 ज्याला मुली आहे त्याच्या साठी हा मेसेज माझ्या कडून सर्वांनी नक्की वाचावा🌹🌹🍫🍫🍫🍫

*💕💕मुलीची तक्रार*💕💕

एकदा एका मुलीनं👩💕

तक्रार केली बापाकडे👴💕

मलाच का बंधने ??💕

जाऊ नको कुणीकडे....💕

का सारखे कपडयांवरून बोलणे👗💕

आणि माझ्या मित्रां बाबत नेहमी चौकशी करणे??....

का मीच उंबर्‍याच्या आत राहायचं,💕

आणि उठता बसता स्वतःला सावरायाचं.....💕

बाप बोलला,💕

बेटी म्हणणे तुझं पटतयं,💕

चल जरा बाहेर,💕

आत खूप उकडंतयं..💕

बाजारपेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं,💕

बाहेरच पडल होत अवजड सामान लोहाचं.....💕

बाप बोलला,💕

बेटी, हे ऊनपावसात इथंच असतं💕

तरी पण याला काही होत नसतं, कोणी नेत नसत.💕

किमतीत पण याच्या अधिक उणं होत नसतं...💕

जरा पुढे जाताच,💕

ज्वेलरी💍 शाँप दिसलं💕

आत जाऊन मग बापाने *हिर्‍याच* मोल पुसलं,💕

तिजोरीतून बंद पेटी हळूवार पुढे मांडली,💕

त्याच्या झगमगाटात, नजरच दिपली...💕

सराफ बोलला किमती आहे,💕

फार जपावं लागतं,💕

जरा सुद्धा चरा पडता,💕

मोल याचं कचर्‍याच होत.💕

काळजी घेऊन खूप,💕

मलमली कपड्यात जपून ठेवावं लागतं,💕

तिजोरीच्या आत लपवावं लागतं...💕

फिरून घरी येताच बाप बोलला बेटी!💕

*तूच तर माझी हिर्‍याची पेटी,*💕

*सांग तुला जपण्यात काय माझं चुकतं*💕

तुझ्यामुळेच माझं, घर सारं झगमगतं"...💕

"तुझा दादा म्हणजे लोखंड, जपावं लागत नाही,💕

तू म्हणजे अनमोल हिरा,💕

सांग चुकतं का काही.....💕

तुझ्यामुळेच घर प्रकाशित, आमचा तु अभिमान,💕

तुझ्यासाठी काळीज तुटतं,💕

तु आमचा जीव की प्राण"...💕

💕

सर्व बघुन मुलीचे डोळे पाणवले,💕

बापापुढे झुकली मान शरमेने...💕

कळलं तिला सगळं,💕

मन तीचं हेलावल...💕


"बस्स! करा बाबा "💕

ऎकवत आता नाही,💕

तुमच्याकडे माझी तक्रार मुळीच नाही....💕

मीच मला आता,💕

जीवापाड जपेन,💕

हिर्‍याच्या तेजानं,💕

चौफेर चमकेन."...💎💕

    

मुलगा मुलगी समसमान,💕

हे जरी असलं खरं,💕

पण आपल्या बहीण-लेकीला अधिक जपलेलेच बरं...💕

पटवून द्या तिला --💕

बेटी! तू हिरा आहेस,💕

आमच्या आनंदाचा तू झरा आहेस...💕

म्हणुन जपाव लागत 😌😌😌💕

😌 ही कविता प्रत्येक मुली पर्यंतष पोचावी व तिने💕 वाचवी ही अपेक्षा.💕💕 वाचुन झाल्यावर पुढे पाठवा

Featured post

Lakshvedhi