मुंबई-जागतिक मनोरंजनाचे केंद्र
मुंबई ही भारताची आर्थिक आणि मनोरंजन राजधानी असून, याच पार्श्वभूमीवर ‘वेव्हज २०२५’ परिषदेचे आयोजन १ ते ४ मे २०२५ दरम्यान होणार आहे. या निमित्ताने मीडिया, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रांना चालना मिळेल आणि जागतिक नेतृत्वाना उद्योगाच्या भविष्यासाठी नवी दिशा ठरवण्याची संधी मिळेल.
सध्या जागतिक पातळीवरील माध्यम आणि मनोरंजन उद्योग झपाट्याने प्रगती करत असून, या क्षेत्राची बाजारपेठ वर्ष २०२४ पर्यंत २.९६ ट्रिलियन डॉलर्स होती, भारत या क्षेत्रात २०२९ पर्यंत ५० बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच, भारत सध्या ६० हून अधिक OTT प्लॅटफॉर्मसह जागतिक स्तरावर वेगाने विस्तार करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment