Wednesday, 30 November 2022

प्रधानमंत्री आवास योजनेतील निवासी सदनिकांसाठी मुद्रांक शुल्क घटविले

 प्रधानमंत्री आवास योजनेतील निवासी सदनिकांसाठी मुद्रांक शुल्क घटविले.


            प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना १ हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थींना होणार फायदा होणार आहे.


            महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ मधील कलम ९ च्या खंड अ मधील अधिकारांचा वापर करुन लोकहितास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी सदनिकांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तांना अटी व शर्थींच्या अधीन राहून हे मुद्रांक शुल्क निश्चित केलेले आहे.


--00--

अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार

 अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार

अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरणार

            अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टीकोनातून तांत्रिक खंड देऊन पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.


            अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ३ हजार ८९८ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे.


            आज घेण्यात आलेल्या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील. या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनवाढ मिळणार नाही तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही.

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

 स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

            दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा विभाग ३ डिसेंबरपासून कार्या‍न्वित होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्देश दिले होते.


            सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करुन हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंड‍ळ व त्यांची कार्यालयं यांचा देखील समावेश असेल. या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी-कर्मचारी मिळून २०६३ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. यामध्ये सचिवस्तरापासून ते शिपायांपर्यंतच्या पदांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ११८ कोटी खर्चासही मंजूरी देण्यात आली.


            सध्या महाराष्ट्रात ३० लाखांपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात. जिल्हास्तरावर देखील जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे काम पाहतात. या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणारे अधिनियम आणि योजना राबवण्यात येतील. यामध्ये विशेषत: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल, विविध पारितोषिके, क्रीडा स्पर्धा, व्यवसायासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग दिन साजरा करणे, मतिमंदाकरीताची बालगृहे, दिव्यांग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन यासारखे बाबींचा समावेश आहे.


--00--

शासन कलावंतांच्या पाठीशी

 शासन कलावंतांच्या पाठीशी

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. 30 : “राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी ही देशातील एक प्रतिष्ठित संस्था आहे. संगीत तसेच नाटक क्षेत्रासाठी अकादमीकडून देण्यात येणाऱ्या गेल्या तीन वर्षांतील पुरस्कारांची अलीकडेच घोषणा झाली असून महाराष्ट्रातील तब्बल 17 कलावंतांना हे मानाचे पुरस्कार घोषित झाले आहेत, ही अतिशय गौरवास्पद बाब असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.


          राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बांबू निर्मित तिरंगा भेट देऊन डॉ. संध्या पुरेचा यांचा सांस्कृतिक मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सत्कार केला.


          “महाराष्ट्राला संगीत नाटकांची समृद्ध परंपरा लाभलेली असून, भविष्यातही संगीत नाटकांच्या वाटचालीसाठी शासन संगीत नाटक कलावंतांच्या पाठीशी राहील”, असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


          यावेळी अकादमीचे कार्यकारी सदस्य डॉ. विद्याधर व्यास, डॉ. उमा डोगरा, डॉ. प्रकाश खांडगे उपस्थित होते.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना

 राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना.

            मुंबई, दि. 30 : सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतांना ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री हे अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील.


            तसेच नाटक या कलाक्षेत्रासाठी सतिश पुळेकर, कंठसंगीतासाठी मृदला दाढे- जोशी, उपनशास्त्रीय संगीतासाठी मंजूषा पाटील, चित्रपटासाठी सुमित राघवन, कीर्तनासाठी विजय बोधनकर, शाहिरीसाठी शाहीर नंदेश उमप, नृत्यासाठी राजश्री शिर्के, कलादानासाठी जयराज साळगांवकर, वाद्यसंगीतासाठी तौफिक कुरेशी, लोककलासाठी सत्यपाल महाराज चिंचोलकर आणि आदिवासी गिरीजनसाठी डॉ. बाळु धुटे हे नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये अशासकीय सदस्य असतील. सदर समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत राहील.

महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची

 महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

            मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपाध्यक्ष असतील. या समितीत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार सदस्य असतील.


            याशिवाय या समितीमध्ये विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. याशिवाय डॉ. अनिल काकोडकर, डॉ. शशिकला वंजारी, वासुदेव कामत, ॲड. उज्वल निकम आणि डॉ. जयंत नारळीकर हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य असतील. सदर समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत राहील.


००००

थेट कर्ज योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन अनुसूचित जाती

 थेट कर्ज योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. ३० : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मुंबई उपनगरमधील अनुसूचित जातीतील व्यक्तींना उद्योग तसेच व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपये इतके थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाने केले आहे.


            अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनी मादींग, दानखनी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी, मादगी या १२ पोट जातींतील थेट कर्ज योजनेतंर्गत लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांनी अटी, शर्ती निकषांची पूर्तता करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय मुंबई उपनगर शहर, जिल्हा कार्यालय मुंबई उपनगर शहर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. 33, बांद्रा (पू), मुंबई- 4000 051 या पत्त्यावर अर्ज पाठवावेत असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ तर्फे करण्यात आले आहे.


००००

जिंदगी







 

बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा

 बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा

- आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावत.

    

            मुंबई, दि. 29 : गोवर संसर्ग आढळणाऱ्या भागात नियमित लसीकरणाबरोबरच अतिरिक्त लसीकरणही केले जावे. बालकांच्या लसीकरणावर भर देण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या.


            आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, आर



रिक्त मरण (Die Empty)*

 🪷 *रिक्त मरण (Die Empty)*

🪷 *रिक्त मरण (Die Empty)*


वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे *"Die Empty"*


हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली.

मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की *"जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?"*


प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : "तेलाने समृद्ध गल्फ राज्ये." 


तर दूसर्‍याने उत्तर दिले : "आफ्रिकेतील डायमंड खाणी."


त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले.  नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे *स्मशानभूमी.* कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या स्मशानभूमीत 7 बाय 5 च्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

     याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी "Die Empty" हे पुस्तक लिहले.


    सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे *" तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका.* निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा.

      रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे, जे काही चांगले तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा.

    *जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा.*

     *जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या.*

     *जर तुमच्याकडे खूप धन सम्पति आहे ती गरजुना दान करा, त्यांचे अश्रु पूसा. त्यांना माया द्या. (Art of Giving)*.

     *जर तुमच्याकडे एखादे ध्येय असेल तर ते साध्य करा.*

     तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, इतरांना सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्येच दडवून ठेवू नका.

    आपल्यामध्ये जे काही चांगले आणि आपण जे काही चांगले या जगाला देऊ शकतो ते सर्व  आपल्यामधून काढून या जगामध्ये पसरवा.


🏃‍♂️शर्यत सुरु झाली आहे....🏃‍♀️

    *चला, हे जग सोडण्या आधी रिक्त होऊया.*   

🙏

वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे *"Die Empty"*


हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली.

मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की *"जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?"*


प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : "तेलाने समृद्ध गल्फ राज्ये." 


तर दूसर्‍याने उत्तर दिले : "आफ्रिकेतील डायमंड खाणी."


त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले. नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे *स्मशानभूमी.* कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या स्मशानभूमीत 7 बाय 5 च्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

     याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी "Die Empty" हे पुस्तक लिहले.


    सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे *" तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका.* निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा.

      रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे, जे काही चांगले तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा.

    *जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा.*

     *जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या.*

     *जर तुमच्याकडे खूप धन सम्पति आहे ती गरजुना दान करा, त्यांचे अश्रु पूसा. त्यांना माया द्या. (Art of Giving)*.

     *जर तुमच्याकडे एखादे ध्येय असेल तर ते साध्य करा.*

     तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, इतरांना सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्येच दडवून ठेवू नका.

    आपल्यामध्ये जे काही चांगले आणि आपण जे काही चांगले या जगाला देऊ शकतो ते सर्व आपल्यामधून काढून या जगामध्ये पसरवा.


🏃‍♂️शर्यत सुरु झाली आहे....🏃‍♀️

    *चला, हे जग सोडण्या आधी रिक्त होऊया.*   

🙏

मराठा समाजाच्या विद्यार्थीनींच्या वसतिगृहासाठीजागा

 सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थीनींच्या वसतिगृहासाठीजागा उपलब्धतेबाबत सकारात्मक विचार करणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबई दि. 29 : सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील मुलींच्या  वसतिगृहासाठी सोलापूर येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे महसूलपशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

            मुलींच्या वसतिगृहासाठी सोलापूर येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत शिष्टमंडळ, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मंत्रालयातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेमराठा समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यात ही वसतीगृहे तयार आहेत किंवा जागा उपलब्ध आहेअशा ठिकाणी त्याचे नूतनीकरण करुन तातडीने सुरु करण्यात येतील. त्याप्रमाणे सोलापूर येथेही वसतिगृह बांधण्यात येईल.

            सोलापूर येथे शिष्टमंडळाने मागणी केलेल्या जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित जागेचा ताबा कोणत्या विभागाकडे आहे, सध्या स्थिती काय आहे. यासाठी शासनस्तरावर काय करता येऊ शकते याचा आढावा घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

स्वयंअर्थसहाय्यित शाळांना इरादा आणि मान्यता पत्रे प्रदान शैक्षणिक संस्थांनी आदर्श विद्यार्थी घडवावेत

 स्वयंअर्थसहाय्यित शाळांना इरादा आणि मान्यता पत्रे प्रदानशैक्षणिक संस्थांनी आदर्श विद्यार्थी घडवावेत

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 29 :- विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. शैक्षणिक संस्थांनी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक संस्थांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्यासाठी तसेच विद्यमान शाळांच्या दर्जावाढीसाठी इरादा पत्रे आणि मान्यता पत्रे प्रदान केली जात आहेत, हा पारदर्शक पायंडा सुरू झाल्याबद्दल विभागाचे अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक संस्थांना शुभेच्छा दिल्या.


            महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम व नियमातील तरतुदीनुसार निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांना मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते इरादा पत्रे आणि मान्यता पत्रे प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई व इतर मंडळांच्या संलग्नतेकरीता ना हरकत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा अभियान संचालक कैलास पगारे, उपसचिव समीर सावंत यांच्यासह स्वयंअर्थसहाय्यित शाळाचालक उपस्थित होते.


            विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर म्हणाले, भारत हा तरूणांचा देश असल्याने जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याची संधी मिळणार आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तिपर्यंत मूलभूत शिक्षण पोहोचणे गरजेचे असून ते केवळ शासनापर्यंत मर्यादित न राहता खाजगी संस्थांनी दर्जेदार शिक्षण देणे क्रमप्राप्त आहे. उत्कृष्ट भारत निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे असल्याने कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नागरिकशास्त्राचा अभ्यास करताना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यादृष्टीने विधानमंडळामार्फत विद्यार्थ्यांना संसदीय कामकाज पाहण्याची संधी उपलब्ध उपलब्ध करून दिली जाते, याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून उत्तम लोकप्रतिनिधी घडावेत यासाठी विधानमंडळामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांनी विभागाचे काम पारदर्शक आणि गतिमान करण्यात येऊन स्वयंअर्थसहाय्यित शाळांना इरादा आणि मान्यता पत्रे देण्यासाठी यापुढे ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत मातृभाषेतून शिक्षण देण्याला प्राधान्य देण्यात येणार असून कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी कौशल्य विकास तसेच शिक्षणेतर उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. स्वयंअर्थसहाय्यित शाळांना शासनाचे अनुदान मिळणार नाही तथापि या संस्थांनी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


            या अधिनियमांतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे 15 हजार नवीन शाळांना मान्यता प्रदान करण्यात आली असून या शाळांमध्ये सुमारे 51.43 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच या शाळांमधून सुमारे 1.80 लाख शिक्षक कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमात 22 मान्यता पत्रे, 123 इरादा पत्रे तर 19 ना-हरकत प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.


00000

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर पुरस्कार

 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या

मराठी चित्रपटांना दुप्पट अनुदान देणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. 29 : गेल्या काही वर्षात मराठी सि चित्रपटांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. अशा पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले.


            सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे चित्रपट उद्योगातील चित्रपट / टिव्ही / ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, कोल्हापूर चित्रनगरीचे संजय पाटील, दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक, लेखक आणि दिग्दर्शक संतोष आयाचित, निर्माते सुनील भोसले, निर्माते संदीप घुगे,अभिनेत्री सुषमा शिरोमणी, शामाशिष भट्टाचार्य, शेमारू कंपनीचे केतन मारू, चैतन्य चिंचलीकर यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


            श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचावे आणि या चित्रपट निर्मात्यांनी भविष्यात अधिक चांगल्या सिनेमांची निर्मिती करावी हा उद्देश आहे. मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल.


            गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगावच्या चित्रनगरीत अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. या मालिका निर्मात्यांना पहिल्या वर्षी चित्रीकरण भाड्यात ५० टक्के तर दुसऱ्या वर्षी २५ टक्के सूट देण्यात येते. यापुढे मालिका पहिल्या वर्षानंतर चालू राहिल्यास त्यांना चित्रीकरण भाड्यात २५ टक्के सूट देण्यात येईल. चित्रनगरीत चित्रीकरण करण्यासाठी दर आकारण्यात येतात, हे दर किती असावे, ते कधी नेमके वाढवण्यात यावे याबाबत धोरण ठरविण्यात येणार असल्याने श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            चित्रनगरीमध्ये एक खिडकी योजना सुरू असून यामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली जाते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटन क्षेत्रात चित्रीकरण करावयाचे असल्यास पूर्वी 54 हजार प्रती दिवस शुल्क होते. मात्र, यापुढे मराठीसाठी ३० हजार रुपये आणि अन्य भाषेसाठी ३५ हजार रुपये प्रती दिवसाचे चित्रीकरण शुल्क असेल, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


            दादासाहेब फाळके चित्रनगरीचा परिसर ५२१ एकरने व्यापलेला आहे. चित्रनगरी परिसरात एकूण १५ कलागारे असून ७० बाह्य चित्रीकरण स्थळे आहेत. आजपर्यंत चित्रनगरीत अनेक मराठी, हिंदी अन्य भाषांच्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात येत असून आजही अनेक चित्रपट, मालिका तसेच प्रसिध्द कथाबाहय कार्यक्रमांचे चित्रीकरण होत आहेत. येणाऱ्या काळात या चित्रनगरीचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत आराखडा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ६५ जागांचे नूतनीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील नाट्यगृहांचे अत्याधुनिकीकरणाबाबतही नियोजन करण्यात येत आहे.


            बैठकीत महेश कोठारे, प्रसाद ओक, सुषमा शिरोमणी आदींनी सूचना मांडल्या; त्या सूचनांची दखल श्री. मुनगंटीवार यांनी घेतली व तशा सूचना विभागाला दिल्या.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी

 राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय

पुढील हंगामापासून डिजिटल वजन काटे सुरू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

            मुंबई, दि. 29 : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरऊर्जेवर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सदाभाऊ खोत, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कामगार विभागाच्या सचिव विनिता सिंघल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. बळीराजाला कसे सुखी करता येईल यासाठी त्याच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दोन साखर कारखान्यांमध्ये असणारे हवाई अंतर याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले.

            तोडणी आणि वाहतुकीबाबत निकष ठरवितानाच पुढील हंगामापासून वजनासाठी डिजिटल वजन काटे सुरू करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ऊस वाहतुकदारांच्या समस्यांबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

            तोडणी आणि वाहतूक (एचएनटी) संदर्भात साखर कारखान्यांचे लेखा परीक्षण करण्यात यावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली. शेतीला वीज पुरवठ्यासाठी सगळे कृषी फिडर सौरऊर्जेवर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी २ हजार मेगावॅट वीजेचा प्रकल्प करीत असून त्यासाठी शासनाची जमीन देखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकप्रतिनीधींनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

            यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.


००००



महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समिती

 महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समितीच्या

अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन!.

            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्री. माने यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.


            या समितीच्या सदस्यपदी ॲड. राम आपटे, दिनेश ओऊळकर तर विशेष निमंत्रित म्हणून ॲड. र. वि. पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे विशेष निमंत्रित असून सीमा प्रश्नाविषयी काम पाहणाऱ्या विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य सचिव आहेत.


0000

पीक विम्याबाबत

 पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्या

विमा कंपनी प्रतिनिधींना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 29 - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. या भरपाईपोटीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करा. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या. अशा तक्रारी आल्यास त्याची तात्काळ दखल घ्या आणि त्याची सोडवणूक कराअसे स्पष्ट निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत.

            नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प येथे आज मंत्री श्री. सत्तार यांनी सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेकृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटेएआयसी इन्शुरन्सच्या प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती शकुंतला शेट्टीडी.पी. पाटीलएचडीएफसी इरगोचे  सुभाषिष रावतयुनायडेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे पराग मासळेआयसीआयसीआय लोंबार्डचे निशांत मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना मंत्री श्री. सत्तार म्हणाले कीनैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई रक्कम लवकरात लवकर देण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपन्यांची आहे. वारंवार सूचना देऊनही कंपन्यांकडून कार्यवाही गतीने होताना दिसत नाही. त्यामुळे विमा कंपन्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. त्याची दखल घेऊन कंपन्यांनी शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम तात्काळ अदा करावी. विनाकारण शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांविरूद्ध कार्यवाही करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

            विमा कंपन्यांकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने विमा मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपन्यांनी विचारात घेण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्याची कार्यवाही प्रलंबित ठेवू नये. नोंदणी केलेला कोणताही शेतकरी या प्रक्रियेपासून आणि विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहणार नाहीअसे स्पष्ट करुन मंत्री श्री. सत्तार यांनीविमा कंपन्यांनीही याबाबत दक्षता घ्यावीअसे निर्देश दिले.

०००

Tuesday, 29 November 2022

कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामाला गती द्यावी

 कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामाला गती द्यावी

- मंत्री शंभूराज देसाई

            मुंबई दि. २९ : पाटण तालुक्यातील काळोली येथे बाळासाहेब देसाई अद्यावत बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करावयाची आहे. या बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामकाजाला गती द्यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.


            आज मंत्रालयात पाटण तालुक्यातील काळोली येथे होणाऱ्या बाळासाहेब देसाई अद्यावत कृषी प्रशिक्षण केंद्राच्या बांधकाम कामकाजाबाबत आढावा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.


              प्रशिक्षण केंद्र इमारतीच्या बांधकामाबाबत निविदा प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी मंत्री देसाई यांनी दिल्या. या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे काम दर्जेदार व उत्कृष्ट झाले पाहिजे तसेच बांधकाम प्रक्रिया तात्काळ सुरुवात करावी, अशाही सूचना मंत्री देसाई यांनी संबंधितांना दिल्या.


            या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. नवघरे, अवर सचिव श्री. चिवटे, तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यकारी अभियंता श्री. सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी श. ना. माळी उपस्थित होते.

0000


 



 




मराठी बाणा फक्त

 *मारवाडी मित्राच्या दुकानाच्या उद्घाटनाला जाऊन आलो, सोबत Rs 300/- चा बुके घेऊन गेलो.*

 *पण.... तिथे आलेले सगळे मारवाडी रिकाम्या हाताने आले होते.*

 *आणि जाताना गल्यात 300-200-500 Rs टाकून जात होते, मी विचारलं मित्राला असं का❓*

*तो बोलला एक दो महिना दुकान चले ना चले भाडा तो इसीसे निकल जायेगा!*


 निशब्द झालो ऐकून मराठी माणूस दुकान टाकलं तर दुसऱ्याच्या डोक्यात विचार येतो लवकर बंद करील हा दुकान...


*हा विचार बदलण्याचा संकल्प करा...मराठी उद्योग आणि उद्योजक वाढविण्यासाठी एक मेकांना मदत करा... खड्ड्यात टाकण्यासाठी प्रयत्न करू नका...*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार


            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले.


            रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी पदभरती होणार आहे. यासंदर्भातील जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार आहे. या अनुषंगाने १५ डिसेंबर पर्यंत सर्व विभागांनी आपली मागणीपत्र आयोगाकडे पाठवलीच पाहिजेत, असे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            रिक्त पदांची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत. आकृतीबंध अंतिम झालेल्या विभागांना सरळसेवा कोट्यातील १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृतीबंध अंतिम नसलेल्या विभागांना सरळसेवा कोट्यातील ८० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे अराजपत्रित गट-ब, गट- क व गट-ड मधील पदे टीसीएस व आयबीपीएस या कंपन्यांमार्फत परीक्षा घेऊन भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            सध्या सर्व प्रशासकीय विभागांना पदभरती लवकर करण्याच्या अनुषंगाने निर्देश आले असून आढावाही घेण्यात येत आहे. बिंदूनामावली प्रमाणित नसल्याने होणारा विलंब टाळण्यासाठी सर्व विभागीय कार्यालये, मागासवर्ग कक्ष यांना व्हीसीव्दारे बिंदूनामावली तात्काळ तपासून देण्यास सांगितले आहे.



भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक

 भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

            मुंबई, दि. २९ : भारत व रशिया राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध शेकडो वर्षे जुने आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाण भारत रशिया संबंधाला पूरक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

            रशिया - भारत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील रॉयल ऑपेरा हाऊस येथे सोमवारी (दि. २८) रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी रशियातील ५० कोसॅक कलाकारांच्या चमूने 'क्रिनित्साहे संगीतलोककला व युद्धकला यावर आधारित नृत्य सादर केले.  

            भारत व रशिया यांच्यात घनिष्ठ राजनैतिक संबंध आहेत. सांस्कृतिक संबंध वाढल्याने हे बंध आणखी दृढ होतीलअसे मत राज्यपालांनी मांडले. त्याचपद्धतीने आज भारतीय योग रशियात लोकप्रिय असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलेक्सी सुरोवत्सेव यांनी हिंदी भाषेत स्वागतपर भाषण केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.

            कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह,  रशियाचे मुंबईतील उपवाणिज्य दूत जॉर्जी ड्रीअरभारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पश्चिम विभागीय अधिकारी अनुराग सिंहरॉयल ऑपेरा हाऊसचे संचालक आशिष दोशी व निमंत्रित उपस्थित होते.     

            रशियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मुंबईतील रशियन वाणिज्य दूतावासभारतीय सांस्कृतिक संबंध परिषद पश्चिम विभाग व रॉयल ऑपेरा हाऊस यांच्या सहकार्याने केले होते.  महोत्सवानिमित्त दिल्ली व कोलकाता येथे देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वाणिज्यदूतांनी सांगितले.

००००


 

 

Governor inaugurates Russian Cultural Festival in Mumbai;

Describes Tolstoy, Gorky, Chekhov as all time great writers

 

            Mumbai 29 : Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Festival of Russian Culture in India on the occasion of the completion of 75 years to the establishment of diplomatic relations between India and Russia at Royal Opera House in Mumbai on Monday (28 Nov).

            A Music, Dance and Marshal skills ensemble 'Krinitsa' was presented by a group of Russian folk artists Cossacks on the occasion.   

            Governor Koshyari said even though the diplomatic relations between Russia and India are 75 years old, the two countries have had cultural and trade exchanges dating back to several centuries. He said he had read the works of Russian writers Maxim Gorky, Leo Tolstoy and Anton Chekhov and described their literary work as all time great, comparable to Ramcharit Manas and Gyaneshwari.

            The Governor said India and Russia share a strong bond of political, economic and strategic partnerships and added that growing cultural exchanges will further strengthen these relations. The Governor said he was happy that Raj Kapur was popular in Russia and in the present era, Yoga is gaining popularity in Russia.

            The Governor complimented the Russian Consul General in Mumbai Aleksei Surovtsev for making his entire welcome speech in Hindi.

            The Governor complimented the Director and artists of the dance ensemble 'Krinitsa' for the beautiful presentation and invited them to Raj Bhavan.

            The Russian Festival of Culture was organised by the Ministry of Culture of Russia, Consulate General of Russia in Mumbai in association with the Indian Council of Cultural Relations and the Royal Opera House Mumbai.

            

सूचना

 किसी से पैसे प्राप्त करने के लिए आपको OTP देने या बारकोड/QR कोड स्कैन करने या MPIN दर्ज करने की आवश्यकता नहीं है। कभी कोई ऐसा करने को कहे या मेसेज भेजे, तो सावधानी बरतें। -RBI

हा खडक म्हणे देवीने नखाने कोरला .

 हा खडक म्हणे देवीने नखाने कोरला .

कोणी म्हणतं हा खडक देवीने नखाने कोरून ही कुंडं तयार केली... कोणी म्हणतं ही कुंडं इतकी खोल आहेत की त्याचा ठाव लागत नाही... तर कोणी आणखी काही म्हणतं!

एखाद्या गोष्टीचा नेमका अर्थ लागत नाही, तेव्हा कशा कहाण्या तयार होतात याची ही उदहरणं! अशी खोल खोल कुडं आणि रांजणखळगे महाराष्ट्रात जागोजागी सापडतात. त्यांचं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे कुकडी नदीवरील निघोज किंवा हाजी टाकळी. मग यांचा नेमका अर्थ काय?... तो आहे पाण्याशी आणि पाणी वाहत असताना करत असलेल्या करामतींशी! पाण्याच्या आणि खडकाच्या या करामती समजून घेण्यासाठी ‘भवताल’ प्रस्तुत,

वंडर्स ऑफ जिऑलॉजी !

- अनोखा महाराष्ट्र एक्सप्लोर करणारी फिल्ड टूर

माहिती व नावनोंदणीसाठी:

https://bhavatal.com/EcoTours/Geology

संपर्कासाठी :

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

विशेष आकर्षण:

· ६.५० कोटी वर्षे जुना खडक, त्यातील पुराव्यांची ओळख

· लाव्हारसामुळे तयार झालेल्या नैसर्गिक बोगद्यात प्रवेश

· सत्तर हजार वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या राखेचा शोध

· आशियातील सर्वांत मोठ्या रांजणखळग्यांचा अनुभव

· इतिहास घडवणाऱ्या दगडी भिंतीची (डाईक) ओळख

· प्राचीन हवामानबदलाची कहाणी सांगणाऱ्या दगडाचा शोध

· ठिबकणाऱ्या पाण्याने घडवलेल्या लवणस्तंभांची गोष्ट


· नदीकाठी आदिमानवाच्या दगडी हत्यारांच्या खाणाखुणा

· प्राचीन हिमयुगाच्या नदीपात्रातील पुराव्यांची हाताळणी

· आणि खडकात दडलेल्या बऱ्याच रहस्यमय गोष्टी...


(महाराष्ट्र एक्सप्लोर करणारा ‘भवताल’चा उपक्रम...)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

जिवन हसत खेळत


*जबरदस्त* 


👸: अय्या फोन किती छान.! 

🧏: भावाने घेतला, ४० हजाराला पडला.. 


👸: नेकलेस मस्त गं.! 

 🙋: यांनी घेतला, दिड लाखाला पडला.



👸: खरच ? नवरा छानच तुझा.! 

🤦: वडिलांनी घेतला, चाळीस लाखात पडला.. 


😃🤣😄😂😜

 *बाबा नेहमीच मागे का असतात*.??? हे माहित नाही. 🤔


◆ आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात. दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही... *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही. 


◆ आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. दोघांचे प्रयत्न समान आहेत. तरीही... *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.


◆ आई आपल्याला पाहिजे ते शिजवते. बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात. दोघांचे प्रेम समान आहे, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते. *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.


◆ जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असेच ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही, की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. पिढ्यानपिढ्या मुलांचे प्रेम मिळवतांना आपण पाहतो, की *बाबा नेहमीच मागे पडतात* का...??? हे माहित नाही.


◆ कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरलेले असतात, परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे असतात. कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नसते. तरी... *बाबा अजूनही मागे का आहेत* ??? हे माहित नाही.


◆ आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात, पण वडिलांकडे एकच रिंग असते, कदाचित ती ही नसते. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते, आणि बाबा कधीच करत नाहीत. तरी अजूनही *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही.


◆ आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात. पण घरातच जेव्हा जेव्हा ओळख मिळते, तेव्हा *बाबा नेहमीच का मागे पडतात*??? हे माहित नाही. 


◆ आई म्हणते, ह्या महिन्यात मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका, परंतु वडिल स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही. तरीही... *बाबा का मागे पडतात* ??? हे माहित नाही.


◆ आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीत कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा निरुपयोगी आहेत. *बाबा मागे का पडतात*..??? हे माहित नाही.


●●● वडील *मागे, ‘मागच्या बाजूला’* आहेत. कारण *ते कुटुंबाचा कणा आहेत.* त्यांच्यामुळेच आपण सगळे उभे आहोत.

म्हणून तर ते... *मागे* आहेत.


●●● *आई श्रेष्ठ आहे.* पण, म्हणून... *बाबा कनिष्ठ नाहीत,* एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, ...

*❤️...कुठलाही मोठेपणा न मिरवणारा बाबा आमचा भक्कम आधार आहे.*❤


🙏🙏 🙏*सर्व बाबांना समर्पित..* 🙏🙏🙏

: *

जिंदगी

 आज़ की जिंदगी सिर्फ दो चीज पर टिकी है ...


एक तो पापी पेट,,,,

aur

दूसरा कॉपी पेस्ट,,,,


ऐसे ही और ज्ञान के लिए मुझे फॉलो करे 🙏😁😁 _😃😃आज तक मैंने किसी का दिल नहीं चुराया...!!.._ 🥺🥺😫


_ये अलग बात है की पोस्ट हर ग्रुप से चुरा लाता हूँ...!!!!_


 🤫😁😅😂🤣

जिंदगी

 *जब इंसान खुद कमाने लगता है,*

*तब कद्दू में भी पनीर का स्वाद आने लगता है।*

          *🧀सुप्रभात🧀*

 


मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार.

 मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 28 : मुंबई हे जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


            ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई सुशोभीकरण, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आदीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेचे नरींदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्व‍िनी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई हे जगातील सर्वांत सुंदर शहर करण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे. मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना साकारली जाणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी चौक, रस्ते, पदपथ, उड्डाणपूल यांच्या सुशोभीकरणाला सुरूवात झाली आहे.


            कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत २२७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून त्या माध्यमातून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आपला दवाखाना उपक्रमाचे मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. मुंबईमध्ये ग्लोबल वॉर्मिंग, बदलती शहरे, वातावरणीय बदल यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


००

सुविचार

 🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌹🌹🌹

*आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,* 

*फक्त दोनच कारणं असतात…* 

*एकतर आपण ’ विचार न करता कृती करतो,* 

*किंवा कृती करण्याऐवजी,* 

*फक्त विचारच करत बसतो…*


*🙏🙏शुभ सकाळ🙏🙏*

*🌹 आपला दिवस आनंदात जावो🌹*

मुलुंड आयटीआय येथे मंगळवारपासून तंत्रप्रदर्शन

मुलुंड आयटीआय येथे मंगळवारपासून तंत्रप्रदर्शन

            मुंबई, दि. 28  : मुलुंड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


            प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या तांत्रिक विषयावर आधारित वस्तू व मॉडेलचे तंत्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शालेय विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4.00 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजतंत्री इमारत, पहिला माळा, मुलुंड येथे खुले ठेवण्यात येणार आहे.


            या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, प्राचार्च एस. एस. गोरे यांनी केले आहे.

Monday, 28 November 2022

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी

 मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय सहायता निधी कार्यालयास भेट

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


            मुंबई, दि. 28 : वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध होण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी दुपारच्या सुमारस अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत नक्कीच मदत मिळेल, अशी ग्वाही देत त्यांना दिलासा दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.


            नियोजित बैठका आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे दुपारी तीनच्या सुमारास अचानक मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आले. त्यांनी याठिकाणी मुख्यमंत्री डॅशबोर्डसाठी असलेल्या कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कार्यलयाकडे आले. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आर्थिक मदतीच्या प्रकरणांना किती दिवसात मंजुरी मिळते, मंजुरीचा कालावधी आदीबाबत त्यांनी माहिती घेतली.


            राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचविण्यासाठी प्रयत्न करा, रुग्णांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्याकरिता त्याच्या समन्वयासाठी विशेष कर्मचाऱ्याची नेमणूक करा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देताना उपचारासाठी मदत नक्की मिळेल, काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अवघ्या चार महिन्यात १ हजार ०६२ रुग्णांना ६ कोटी ४० लाखांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली या कक्षाच्या कामाच्या पद्धतीत, मदतीचे निकष यात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून कक्षाचे काम अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे.


            मुख्यमंत्री सहायता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या अनेक खर्चिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे.

450 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरीसर्वांनी मिळून मुंबईचा विकास करूया

 मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2023-24 च्य450 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरीसर्वांनी मिळून मुंबईचा विकास करूया

- पालकमंत्री दीपक केसरकर

            मुंबई, दि. 28 :- मुंबई शहर जिल्ह्याच्या 2023-24 या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 450 कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2022-23 च्या 315 कोटींच्या तुलनेत यावर्षीच्या आराखड्यात 135 कोटींची वाढ करण्यात आली आहे. पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी मिळून मुंबईचा विकास करूया, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी केले.


            मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार अरविंद सावंत, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, अजय चौधरी, सदा सरवणकर, सुनील शिंदे, अमीन पटेल, तमिल सेलवन, श्रीमती ॲड.मनीषा कायंदे, यामिनी जाधव आदींसह मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुंबई हे राज्याचे हृदय आहे. मुंबईच्या वैभवात अधिक भर घालून त्याला नवीन झळाळी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रूग्णालयांमध्ये अधिक सुविधा, कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास, पोलीस वसाहतींची दुरूस्ती, कामगार कल्याण केंद्राच्या मैदानाला आधुनिक स्वरूप देणे आदींवर भर देण्यात येणार आहे. मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात येऊन शहरात रोजगार निर्मिती वाढविण्यात येणार आहे. शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मुंबईतील फॅशन स्ट्रीट, भेंडीबाजार, बाणगंगा, भायखळा आदी ठिकाणी सायंकाळनंतर खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. याअनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातील निधी वेळेत खर्च करून दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश त्यांनी कार्यान्वयन यंत्रणांना दिले. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या ज्या मुद्यांवर अद्याप कार्यवाही झालेली नाही त्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री.लोढा यांनी शिवडी किल्ल्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यासाठी समिती तयार करण्यात यावी अशी सूचना केली. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामे हटविण्यात यावीत. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडविण्यात याव्यात. केम्प्स कॉर्नर जवळील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 


            जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यापूर्वी पालकमंत्री श्री.केसरकर यांनी मुंबई जिल्हा क्षेत्रातील विविध कामांची आणि समस्यांची स्वतः पाहणी केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष श्री.नार्वेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील मूलभूत पायाभूत सुविधा, गलिच्छ वस्ती सुधार, कोस्टल रोड प्रकल्पाच्या निधीतून समुद्र किनारी संरक्षक भिंत बांधणे आदींबाबत कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.


            मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीत सन 2023-24 साठीच्या वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 450 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 19.28 कोटी तर आदिवासी उपयोजनेच्या 0.14 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तर, सन 2021-22 च्या तरतुदीमधील 99.91 टक्के रक्कम खर्च करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


            प्रारंभी जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून मुंबई शहरात झालेल्या विविध विकास कामांची माहिती सादर केली.


000




 



महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान

 महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान


            नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.


            येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018, आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय शिल्प पुरस्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


             ‘शिल्प गुरू’ पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक ताम्रपत्र आणि दोन लाख रूपये रोख असे आहे. तर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्त शिल्पकारांना ताम्रपत्र आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कारास्वरूप प्रदान करण्यात आले.


महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकार सन्मानित


            कोल्हापूरचे अमर सातपुते यांना चामडयापासून कोल्हापुरी चपला हाताने बनविण्याच्या कारागिरीसाठी आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. सातपुते यांना वर्ष 2019 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. सातपुतेंचा चामडयापासून चपला बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.


            अमर सातपुते हे या व्यवसायात वर्ष 2005 पासून स्वच्छेने काम करीत आहेत. वडिलांकडून चपला तयार करण्याचे बारकावे शिकल्याचे अमर यांनी मनोगतात सांगितले. हस्तकला विभागाकडून महाराष्ट्राबाहेर अनेक‍ ठिकाणी प्रदर्शनानिमित्त स्टॉल लावण्याची संधी मिळते. यातून आणखी काही कल्पना सुचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


            यवतमाळच्या रजनी शिर्के यांना भरतकाम हस्तकलेसाठी वर्ष 2019 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती शिर्के यांनी 32 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातून भरतकामाचे विशेष प्रशिक्षण घेतले. सध्या त्या यवतमाळ आणि परिसरात बचत गटांतील मुलींना- महिलांना भरतकाम शिकवित असल्याचे त्यांनी सांगितले.


            अभय पंडित यांना कुंभार कामासाठी वर्ष 2018 च्या राष्ट्रीय हस्त शिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


०००








विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करावे

 विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच

 प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 28 : राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे; जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.


            याबैठकीत राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी चर्चा करण्यात आली. राज्यात एकूण १५ विमानतळ असून, २८ धावपट्ट्या (एअर स्ट्रीप्स) आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत असून, शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठविण्यात आल्याचे श्री. कपूर यांनी सांगितले.


            विमानतळांच्या विस्तारीकरणासोबतच राज्यात असलेल्या धावपट्ट्यांचे देखील विस्तारीकरण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्च‍ित करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरिता वैद्यकीय मदतीसाठी देखील हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            पर्यटनदृष्ट्या गोसीखुर्द, कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी याभागात सी - प्लेन सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी अमरावती, शिर्डी, गोंदीया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबत चर्चा करण्यात आली.


००००


 



अर्थसहाय्य दुर्घटना

 बल्‍लारपूर दुर्घटनेतील मृत शिक्षिकेच्या कुटुंबियांना

मुख्‍यमंत्री निधीतून 5 लाखांचे अर्थसहाय्य


चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मान्‍य


            मुंबई, दि. 28 : बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुटुंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर शासकीय खर्चाने योग्‍य उपचार करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.


            रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटुंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांच अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटुंबियांना जाहीर केले आहे.

अभियंत्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक -

 अभियंत्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            मुंबई दि. 28 : देशाच्या, राज्याच्या विकासात अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. शासकीय सेवेतील त्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल. अभियंत्यांच्या सर्व मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.


           यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमास संघटनेचे मुख्य सल्लागार सुभाष चांदसुरे, संघटनेचे अध्यक्ष सुरेश नलावडे, अशोक ससाणे आदी उपस्थित होते.


            मंत्री चव्हाण म्हणाले, “जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याचा आपला कायम प्रयत्न असला पाहिजे. आपल्या मागण्याबाबत शासनाची सहकार्याची भूमिका असेल”.


     यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. संघटनेच्या स्मरणिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


       कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष चांदसुरे यांनी केले तर आभार अशोक ससाणे यांनी मानले. सूत्रसंचालन श्याम मिसाळ यांनी केले.

नाशिकच्या अनाथ आश्रमातील

 नाशिकच्या अनाथ आश्रमातील लैंगिक छळ प्रकरणाच्याचौकशीसाठी समिती स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करा

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

            मुंबई, दि. 28 : नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.

            दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


फुकटची फु


 

सप्नतल्या कल्यानो उमलू नकाच केव्हा.

: अलिबाग तालुक्यातील नागरिकांसाठी खुश खबर❤️

अलिबाग शहर अंतर्गत, हेलिकॉप्टर प्रवास सेवा सुरु करण्यासाठी मागणीचा पाठपुरावा केल्यामूळे.

आता एस टी स्टैडं गाठावे लागणार नाही.

या वर्षात (जुने बस स्टँड) एस टी स्टेंड जवळ लवकरच हेलिपॅड उभारले जाणार आहे.

ज्याच्याने अलिबाग शहरातुन बाहेर गावी जाण सोपे होणार आहे.

काल दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला ,

त्यात तीन हजार करोड रुपये हेलिपॅड उभारणीसाठी देणार आहेत ,

अशी घोषणा सरकारने केली आहे.

हेलिपॅड बनवायचे कार्य लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

हेलिपॅड साठी १ एकर जमीन देण्यात येणार आहे.

हेलिकॉप्टर दर आर्ध्या तासाला उड्डाण करतील ,

ती खालील प्रमाणे-


1. अलिबाग ते मुंबई ५ फेरी

2.अलिबाग ते पुणे ३ फेरी

3.अलिबाग ते कोल्हापूर ३ फेरी

4.अलिबाग ते अहमदनगर ३ फेरी

5.अलिबाग ते नाशिक ३ फेरी 

6. अलिबाग ते धुळे ३ फेरी

7. अलिबाग ते ठाणे ५ फेरी

8. अलिबाग ते भिवंडी ५ फेरी

9. अलिबाग ते पनवेल ५ फेरी

10.अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया दिवसभर


आणि दोन हेलिकॉप्टर आरक्षित ठेवले जातील ,

ते वेळेनुसार वापरले जातील.

अलिबाग परिसरातील नागरिकांना ही खुष खबर आहे.

श्रीमानणीय पंतप्रधान महोदयांनी सांगितले की...

हेलिपॅड दोन आठवड्यात आत पूर्ण होईल.

एक ट्रायल उड्डाण झाले की नियमित त्याचा वापर सुरू होईल.


🚁🚡🚁🚁✈️🚁🚁🛰🚁🚁🛩.


*हे पहाटेच्या सुमारास मला पडलेले स्वप्न*.!!


संपूर्ण बातमी मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद !


वर्षोनूवर्ष रस्त्याचे खड्डे बुजवत नाहीत ,

चांगले सिमेंट कॉक्रीटचे रस्ते देत नाहीत ,

हेलिकॉप्टर सेवा देणार .????    

😱😂: .

महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

 महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण


             मुंबई,दि.28- महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले.


            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक , चित्रकार राजेश सावंत, तसेच इतर मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.


              मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस लावण्यात आलेल्या या भव्य तैलचित्रांचे अनावरण करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. उपस्थित सर्वांनीही यावेळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

One likes briliant engineer

 👇You will never find such brilliant engineer again. What a technology ?


दोस्त को सलाम करो


 

शुभ प्रभात*

 ✍🏻... *जब तक साँस है,* 

          *"टकराव" मिलता रहेगा।*

              *जब तक रिश्ते हैं,* 

           *"घाव" मिलता रहेगा।*

           *पीठ पीछे जो बोलते हैं,*

            *उन्हें पीछे ही रहने दे।*

              *अगर हमारे कर्म,* 

       *भावना और रास्ता सही है ..*

            तो,

   *गैरों से भी " लगाव " मिलता रहेगा..*

       *शुभ प्रभात*

शुभ दिनी

 *🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*

*भूतकाळाचा जास्त विचार करू नये, डोळ्यात पाणी येईल,* 

*भविष्याचीही काळजी करू नये, मनात समस्या निर्माण होतील*,

 *पण वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे गेलात तर,*  

*जीवनात आनंद निर्माण होईल*.

    *🌷‼️विचार पुष्प‼️🌷*

_*मान देता आला पाहिजे. आणि अपमान सहन करता आला पाहिजे. कारण अपमान करणारा एक ना एक दिवस तुमच्या समोर मान खाली घालून उभा असेल, माणूस एक अजब रसायन आहे आवडला तर त्यांचे दोष दिसत नाहीत. आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाही. वर्तमानातून सूख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धूर्त आहे ते फक्त आश्वासन देते पण खात्री नाही.*_

-" चांगल्या वागणुकीचे आर्थिकमूल्य नसले तरी,*

 *चांगल्या वागणुकीत*कोट्यावधींची मने*

*जिंकण्याची शक्ती असते."*

    ****************

 

जय साईनाथ





 जय साई, साईनाथ तेरे हजारो हाथ,comment मध्ये जय साईनाथ लिहा,साई दरबारी जाण्याची प्रेरणा मिळेल.

सैनिक हो तुमच्यसाठी

 जय हिंद लिहा, सियाचीन सैनिकांसाठी.


जिंदगी








 

सुप्रभात






 

Sunday, 27 November 2022

व्यर्थ चिंता !

 ◆ व्यर्थ चिंता !

असे म्हणतात की ही एक आयरिश फिलॉसॉफी आहे . 

तुम्ही आजारी आहात व काळजी करीत आहात . 

यामध्ये दोनच शक्यता आहेत......


पहिली , तुम्ही बरे होणार आहात. जर बरे होणार असाल तर काळजीचं कांहीच कारण नाही , नाही का ? 


आणि बरे होणार नसाल तर पुन्हा दोन गोष्टी शक्य आहेत .....


तुम्ही उशिरा बरे तरी व्हाल किंवा तुम्हास मरण येईल . 


जर उशिरा बरे होणार असाल तर काळजी करण्याचे काय कारण ? तुम्ही उशिरा बरे होणारच आहात . 


मृत्यू पावणार असाल तरीही काळजी कसची ? कारण तिथेही दोन शक्यताच फक्त आहेत......


 तुम्ही एकतर स्वर्गात जाल किंवा दुसरी शक्यता नरकात जाल . 


स्वर्गात जाणार असाल तर काळजीच मिटली . पण जरी नरकात जाणार असाल तरीही काळजीचे कारणच काय ? 


कारण तिथे तुमचे सर्व मित्र असणार आहेत व सर्वाना एकत्र भेटल्याचा 'न भूतो न भविष्यती' असा आनंद तुम्हास मिळेल . सर्व मित्रांबरोबर गप्पा मारण्यात तुम्ही नरकात आला आहात हे विसरून जाल व तुमचा वेळ आनंदात कसा संपेल , तुम्हांसही पत्ता लागणार नाही ! 


म्हणून कोणत्याही गोष्टीची व्यर्थ चिंता वा काळजी करू नका !


🤔😀🤣🙏

..

नंदुरबार जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांनादहा लाख

 नंदुरबार जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांनादहा लाख देण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश


             मुंबई, दि. १४ : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथील मोगराबाई रुमा तडवी या महिलेचा १९ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीमती तडवी यांच्या कायदेशीर वारसांना दहा लाख रु. रक्कम लवकरात लवकर द्यावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वन विभागास दिले आहेत.


             या महिलेच्या कुटुंबियांना वन विभागाकडून दिली जाणारे आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वन अधिकारी यांच्याकडून या प्रकरणाबाबत दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती घेतली. सर्व शासकीय स्तरावरील यंत्रणेला आदेशित करुन सर्व प्रक्रिया पूर्ण करुन जिल्हा वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांना अहवाल प्राप्त करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशित केले.


            या अहवालानुसार जिल्हा वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी श्रीमती मोगराबाई रुमा तडवी यांच्या कायदेशीर वारसांना रू १० लाख तत्काळ मंजूरीचे आदेश पारित केले.


0000

विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही.

 विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही.

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मृद्गंध पुरस्कारांचे वितरण .

        मुंबई, दि. 27 : शाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            12 व्या शाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार 2022 चे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार आशीष शेलार, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, पद्मभूषण उस्ताद राशीदजी खाँ, पराग लागू, नंदेश उमप मंचावर उपस्थित होते.


            मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात फ.मुं. शिंदे, रवींद्र साठे, डॉ.रवींद्र कोल्हे, डॉ.स्मिता कोल्हे, संजय मोने, सुकन्या मोने, कमलाबाई शिंदे, श्रेया बुगडे यांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित केले गेले.


            यावेळी बोलताना मं श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आज ज्यांना मृद्गंध पुरस्कार दिला गेलाय त्या सर्व व्यक्ती कर्तृत्वाने हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत. त्यांना पुरस्कार द्यायला मिळणे हाच माझ्याकरता एक मोठा पुरस्कार आहे.या सर्व लोकांच्या मनोगतातून, गायनातून या कार्यक्रमाची उंचीही प्रचंड वाढली आहे. राजकारणात तिरस्कारालाही तोंड द्यावे लागते, मात्र या मंचावर येऊन जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे.



पर्यटकांना मिळणार १६० वर्षे जुन्या वास्तूला भेट देण्याची संधी -पर्यटन

 पर्यटकांना मिळणार १६० वर्षे जुन्या वास्तूला भेट देण्याची संधी

                                         -पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबई, दि. २७ : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल. या टूरची तिकिटे bookmyshow.com वर बुक करता येतील अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            जागतिक पर्यटन दिनानिमित्त हेरिटेज वॉक सुरु करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. हेरिटेज चाहत्यांसाठी पहिली हेरिटेज टूर २७ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु करण्यात आला.हा वॉक सकाळी १०, ११ आणि दुपारी १२ वाजून 54 मिनिटांनी करण्यात आला होता.या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त अभ्यासक आणि पर्यटन प्रेमी याचा लाभ घेतील अशी आशा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.


            प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीसाठी हाफकिन संस्था ही भारतातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे आणि त्याची स्थापना १८९९ मध्ये झाली. प्लेगच्या लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्डेमार माईकाय हाफकिनच्या नावावरून ह्या संस्थेला 'हाफकिन इन्स्टिटयूट" असे नाव देण्यात आले. सांसर्गिक रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी यामध्ये अग्रेसर असलेली एक बहुविद्याशाखीय संस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे. ही संस्था राज्य आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणांसोबत काम करते. या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने प्लेगसाठी संदर्भ प्रयोगशाळा म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे.


            पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, "या हेरिटेज टूरचा एकमेव उद्देश लोकांना विज्ञान आणि कला यांची सांगड असलेल्या वास्तूचे दर्शन घडवणे हा आहे. येथे लोकांना संस्थेच्या वैभवकालीन दिवसाचे दर्शन घडविणरे व्हिटेज फोटो गॅलरी तसेच बॉम्बे गव्हर्नर यांचे निवासस्थान असलेल्या स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट इमारतीचे दर्शन घेता येईल. ह्या संस्थेकडे विविध सूक्ष्मजंतूंच्या प्रतिकृति आहेत तसेच प्लेगची लस कशी विकसित झाली ह्याची प्रतिकृति देखील येथे पहायला मिळेल."


0000



एक सवाल मै करू,जबाब आपका






 

Featured post

Lakshvedhi