इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक,
कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता
- इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. 27 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मंत्री श्री.विजय वडेट्टीवार म्हणाले यामध्ये नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे तो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. तसेच विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यात शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.
मागासवर्गीय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतुने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी संपूर्ण ६०५ अभ्यासक्रम होते आता एकूण ७३६ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात २०२०-२०२१ सालापासून ४० तर २०२१-२०२२ पासून २४ अभ्यासक्रम नव्याने सुरु केल्याची माहिती यावेळी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.
*****
वृत्त क्र. 1309
कृषि पुरस्कारांनी 198 शेतकऱ्यांचा होणार सन्मान!
2 मे रोजी नाशिक येथे कृषि पुरस्कार प्रदान सोहळा
- कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई, दि. 27 : राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दि. 2 मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषि विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता 2 मे रोजी होणार आहे. कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2 मे रोजी सकाळी 11 वा. तीन वर्षातील 198 पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कारार्थींना रोख रकमेसोबत स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारप्राप्त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्हणून कृषि विभागातील विविध योजनांमध्ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
कष्टातून आपल्या शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या या गौरव सोहळ्याचे थेट प्रसारण https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युट्यूब चॅनेलवरुन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.
पुरस्कारांच्या संख्येत सन 2020 पासून वाढ
सन 2020 पासून विविध कृषि पुरस्कार मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले असून यामध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार संख्या 10 वरुन 8 करण्यात आली आहे. राज्याच्या सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी विभागनिहाय एक याप्रमाणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारांची संख्या 25 वरुन 40 करण्यात आली असून जिजामाता कृषिभूषण पुरस्कार संख्या 5 वरुन 8 तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 3 वरुन 8, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार 9 वरुन 8 करण्यात आली आहे. सन 2020 पासून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगून पीकस्पर्धा रब्बीच्या तालुका, जिल्हा ,विभाग व राज्य पातळ्यांवरील बक्षीसांच्या रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
198 पुरस्कारार्थ्यांचा 'या' पुरस्कारांनी होणार सन्मान
• डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - 4 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 75 हजार रुपये)
• वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार -28 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
• जिजामाता कृषिभूषण पुरस्कार - 9 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
• कृषिभूषण (सेंद्रिय शेती) - 23 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
• वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार - 9 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 30 हजार रुपये)
• उद्यानपंडीत पुरस्कार - 25 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 25 हजार रुपये)
• वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार - सर्वसाधारण गट - 57 पुरस्कारार्थी, आदिवासी गट - 18 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 11 हजार रुपये)
• राज्यस्तरीय पीकस्पर्धा- खरीप भात - 9 पुरस्कारार्थी, खरीप सोयाबीन 9 पुरस्कारार्थी - प्रत्येकी प्रथम क्रमांक - 10 हजार रुपये, व्दितीय क्रमांक- 7 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक 5 हजार रुपये
• पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार - 7 पुरस्कारार्थी.
0000
वृत्त क्र. 1308
‘महा आवास अभियान 2020-21’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये गोंदिया
तर राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल
मुंबई, दि. 27 : महा आवास अभियान 2020-21 अन्तर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरले आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हाप व्दितीय क्रमांक आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हे ठरले आहेत. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान 2020-21 चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान– 2020-21 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अभियानात 5 लाख पेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.
या अभियानामधे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थाना, 10 अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन पुढीलप्रमाणे महा आवास अभियान पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिली.
1) सर्वोत्कृष्ट विभाग : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- कोकण – प्रथम, नागपूर – द्वितीय, नाशिक – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- कोकण – प्रथम, नाशिक – द्वितीय, पुणे – तृतीय.
2) सर्वोत्कृष्ट जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोंदिया – प्रथम, धुळे - द्वितीय, ठाणे – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, रत्नागिरी - द्वितीय, वर्धा – तृतीय.
3) सर्वोत्कृष्ट तालुके : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोरेगाव (जि.गोंदिया) - प्रथम, गगनबावडा (<span lang="HI" style="font-size: 12.0pt; font-family:
त
00
.
०००
इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक,
कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता
- इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार.
मुंबई, दि. 27 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मंत्री श्री.विजय वडेट्टीवार म्हणाले यामध्ये नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे तो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. तसेच विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यात शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.
मागासवर्गीय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतुने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी संपूर्ण ६०५ अभ्यासक्रम होते आता एकूण ७३६ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात २०२०-२०२१ सालापासून ४० तर २०२१-२०२२ पासून २४ अभ्यासक्रम नव्याने सुरु केल्याची माहिती यावेळी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.
****
कृषि पुरस्कारांनी 198 शेतकऱ्यांचा होणार सन्मान!
2 मे रोजी नाशिक येथे कृषि पुरस्कार प्रदान सोहळा
- कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती.
मुंबई, दि. 27 : राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दि. 2 मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषि विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता 2 मे रोजी होणार आहे. कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2 मे रोजी सकाळी 11 वा. तीन वर्षातील 198 पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कारार्थींना रोख रकमेसोबत स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारप्राप्त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्हणून कृषि विभागातील विविध योजनांमध्ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
कष्टातून आपल्या शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या या गौरव सोहळ्याचे थेट प्रसारण https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युट्यूब चॅनेलवरुन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.
पुरस्कारांच्या संख्येत सन 2020 पासून वाढ
सन 2020 पासून विविध कृषि पुरस्कार मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले असून यामध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार संख्या 10 वरुन 8 करण्यात आली आहे. राज्याच्या सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी विभागनिहाय एक याप्रमाणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारांची संख्या 25 वरुन 40 करण्यात आली असून जिजामाता कृषिभूषण पुरस्कार संख्या 5 वरुन 8 तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 3 वरुन 8, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार 9 वरुन 8 करण्यात आली आहे. सन 2020 पासून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगून पीकस्पर्धा रब्बीच्या तालुका, जिल्हा ,विभाग व राज्य पातळ्यांवरील बक्षीसांच्या रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
198 पुरस्कारार्थ्यांचा 'या' पुरस्कारांनी होणार सन्मान
• डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - 4 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 75 हजार रुपये)
• वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार -28 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
• जिजामाता कृषिभूषण पुरस्कार - 9 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
• कृषिभूषण (सेंद्रिय शेती) - 23 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
• वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार - 9 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 30 हजार रुपये)
• उद्यानपंडीत पुरस्कार - 25 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 25 हजार रुपये)
• वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार - सर्वसाधारण गट - 57 पुरस्कारार्थी, आदिवासी गट - 18 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 11 हजार रुपये)
• राज्यस्तरीय पीकस्पर्धा- खरीप भात - 9 पुरस्कारार्थी, खरीप सोयाबीन 9 पुरस्कारार्थी - प्रत्येकी प्रथम क्रमांक - 10 हजार रुपये, व्दितीय क्रमांक- 7 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक 5 हजार रुपये
• पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार - 7 पुरस्कारार्थी.
..........
‘महा आवास अभियान 2020-21’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये गोंदिया
तर राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये अहमदनगर जिल्हा